संजय दत्तचा फोन-कॉल या मोठ्या चित्रपटासाठी मारक ठरला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
संजय गुप्ता चित्रपट बनवत होते. सिनेमाचं काम १९९८ पासून सुरू झालं पण २००० उजाडलं तरी अजून काही भागांच चित्रीकरण अपूर्णच होतं.
त्यातच निर्मात्याची मर्जी फिरली आणि त्यानं अपूर्ण चित्रपटच प्रदर्शित करण्याचं फर्मान सोडलं. गुप्तांनी राहिलेलं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी बऱ्याच विनवण्या केल्या पण निर्माते काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हतेच!
कशीतरी एका गाण्याची परवानगी मिळाली पण त्यातही अट अशी, की ते गाणं आयटम साँगच असावं आणि त्याचं चित्रीकरण फिल्मसिटी ते लिंकिंन रोड दरम्यानच व्हावं!
जेणेकरून खर्च कमी होईल. निर्मात्यांच्या ह्या अटी ला वैतागून संजय गुप्तांनी चित्रपट सोडला , संजय दत्त ने सुद्धा आपल्या संवादांचं डबिंग करायला नकार दिला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
शेवटी निर्मात्यांनी चित्रपटाची तांत्रिक कामं थोडक्यात उरकली अन चित्रपट प्रदर्शित केला! आणि गंमत म्हणजे हा चित्रपट चालला सुद्धा!
दुसरीकडे संजय गुप्तांनी दुसऱ्या एका चित्रपटावर काम सुरू केलं जो त्यांना गेल्या ८ वर्षांपासून बनवायचा होता.सिनेमाची कथा लिहून ते आपल्या जिगरी दोस्त संजय दत्त कडे गेले.
दोघांनी त्या पटकथेवर दिड-दोन वर्षे काम सुद्धा केलं. पटकथा पूर्ण झाल्यावर, हॉलिवूड चे निर्माते राजू पटेल आणि प्रीतिश नंदी ह्यात पैसा लावण्यास राजी झाले.
चित्रपट हॉलिवूड मधेच तिथल्याच टेक्निकल क्रू सोबत चित्रित केला जावा असं ठरवलं गेलं.त्यानुसार लॉस एंजिलीस येथे ३० दिवसांचं चित्रीकरण झालं. संपुर्ण चित्रपट LA मधे चित्रित झालेला हा पहिलाच हिंदी सिनेमा होता!
उच्च दर्जाचे तगडे कलाकार असलेला हा एक हटके थरारपट होता, नाव होतं ‘कांटे’ ! ह्याच चित्रपटामुळे संजय गुप्ता नंतर ‘कांटे फेम संजय गुप्ता’ बनले!
पण कांटे च प्रदर्शित होणं इतकं पण सोपं नव्हतं!
महेश मांजरेकरांचा ‘कुरुक्षेत्र’ रिलीज झाल्यावर संजय दत्त,महेश मांजरेकर,संजय गुप्ता आणि हरीश सुगंध शिर्डी ला साईंच्या दर्शनाला आले होते. तिथून परत येताना हे सर्वजण १४ डिसेंबर २००० ला नाशिक मधील एक हॉटेलात वास्तव्याला होते.
तिथून ह्या चौघांनी दुबईस्थित डॉन छोटा शकील सोबत फोन वर संभाषण केल्याचं उघड झालं!
बराच गाजावाजा झाला आणि पोलिसांना ह्यात हस्तक्षेप करावाच लागला. मात्र काही दिवसातच हा मामला शांत झाला अन कांटे च्या प्रदर्शनाची तारीख ऑगस्ट २००२मध्ये नक्की केली गेली.
मात्र प्रदर्शनाच्या एक महिन्यापूर्वीच पोलिसांनी ह्या चौघांची छोटा शकील सोबतच्या संभाषणाची टेप सार्वजनिक केली.
जंगलातल्या वणव्या सारखी ती टेप मीडियात पसरली.कांटे त्या वर्षातील सर्वाधिक उत्सुकता असलेला सिनेमा होता कारण होतं त्याची तगडी स्टारकास्ट अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, लकी अली, कुमार गौरव .
पण टेप जगजाहीर झाल्यावर फिल्मच्या दिग्दर्शकापासून ते प्रमुख कलाकार संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते.
त्या टेप मधील संभाषणात अंडरवर्ल्ड चा बॉलिवूड मधला हस्तक्षेप कमी करण्याबाबत कुख्यात डॉन छोटा शकील सोबत चर्चा झाली.
संजय दत्त फिल्म इंडस्ट्री मधल्या काही आतल्या बातम्या शकील ला देत होता तसेच गोविंदाची तक्रार सुद्धा करत होता.
महेश मांजरेकरांनी तर डॉन ला त्याचीच कहाणी द्यायची विनंती केली त्यांना त्यावर चित्रपट काढायचा होता.
थोडक्यात संजय गुप्तांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सिनेमा आता त्यांच्याच ह्या संभाषणामुळे अडचणीत आला होता.
तिकडे लकी अली ने कांटेच चित्रीकरण संपल्यानंतर ‘सूर’ च्या शूटिंग ला सुरवात केली, चित्रपट बनवून तयार झाला अन प्रदर्शित सुद्धा!
पण तरीही कांटे प्रदर्शनाच्या मार्गातले काटे काही संपत नव्हते!
सिनेमा रिलीज करण्यासाठी ६ आणि नंतर ११ डिसेंबर तारीख ठरवण्यात आली पण ह्या दोन्ही तारखेला कांटे पडद्यावर येऊ शकला नाही.
ह्या सगळ्या अडथळ्यातून, विवादातून शेवटी २० डिसेंबर २००२ ला कांटे प्रदर्शित झाला!
जेव्हा पोलीस सुनील शेट्टी ला दहशतवादी समजून पकडून नेतात!
संजय गुप्ता आपल्या टीम सह अमेरिकेत कांटे चं चित्रीकरणात व्यस्त होते तेव्हाच ९/११ चा हल्ला झाला. संपूर्ण अमेरिका हादरली होती ,देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता.
ह्या सगळ्याच परिणाम सिनेमाच शूटिंग काही दिवस थांबवाव लागलं,खर्च वाढायला लागले नियोजित चित्रीकरण स्थळांचे परवाने सुद्धा रद्द झाले.
कांटे साठी प्रत्येक पात्र हे खास तऱ्हेने तयार केलं होतं संजय गुप्तांनी कलाकारांना सुद्धा त्यांच्या पात्रा नुसार लूक देण्याचा प्रयत्न केला होता.
सगळेच कलाकार रफ-टफ होते पण प्रत्येक जण वेगळेपण राखून होता.
त्यातच एके दिवशी सुनील शेट्टी लॉस एंजिलीस विमानतळावरून बाहेर पडत होते. त्यांच्या संशयास्पद दिसण्यामुळे त्यांना तिथेच थांबवण्यात आलं. विमानतळाचे सुरक्षा कर्मचारी त्याला दहशतवादी समजले होते.
सुनील ची कसून चौकशी केली गेली .आपण दहशतवादी नसून एक बॉलिवूड कलाकार आहोत फक्त आपला या सिनेमातला रोल रफ (शेडी) आहे.. हे सिद्ध करण्यासाठी बरेच पुरावे दाखवावे लागले.
सुनील शेट्टी ने ह्या चित्रपटात ‘मार्क’ नावाच्या बाऊन्सर च काम केलं होतं. ज्याची मैत्रीण बार डान्सर असते.
ह्या सिनेमामुळेच सुनील च नाव ‘अण्णा’ पडलं!
संजय दत्त तर आपल्या मस्तमौला आणि फटकळ स्वभावाने प्रसिद्ध आहेच. कांटे च्या सेट वर पण संजय कायम टवाळक्या करायचा.
सुनील शेट्टी मात्र कायम संजू बाबाला समजावत असायचा. यालाच वैतागून शेवटी संजू सुनील ला ‘अण्णा’ म्हणजेच मोठा भाऊ ह्या नावानी बोलवायला लागला.
त्याचं पाहून अमिताभ बच्चनसुद्धा सुनील ला अण्णा म्हणू लागले. हळू हळू सेट वर सुनील शेट्टी ला सगळेचजण त्या नावांनी बोलावू लागले. आता आबालवृद्धांमधे सुद्धा तो याच अण्णा नावानी ओळखला जातो!
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुद्धा वाद – अभिनेत्री ने लावला ‘चिटिंग’ चा आरोप!
ह्या सिनेमात अमिताभ बच्चन, संजय दत्त,सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव यासारखी तगडी कलाकार मंडळी तर पूर्वीपासूनच होती.’
मॅक’ च्या रोल साठी अगोदर अक्षय खन्ना काम करणार होता पण नंतर अक्षय ने सिनेमा सोडला आणि ऐनवेळेस गायक लकी अली ह्या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आला.
हेच पात्र चित्रपटाच्या सुरवातीला सगळ्या पात्रांचा परिचय करून देतं आणि सबंध चित्रपटात निवेदकाची भूमिका सुद्धा पार पाडतं!
संजय गुप्ता तर कांटे ‘पुरुषांचा’ चित्रपट असच वर्णन करतात.तरी सिनेमात महिला कलाकार होत्या जस रती अग्निहोत्री ने अमिताभ च्या आजारी पत्नी ची भूमिका केली तर मलायका अरोरा ने सुनील शेट्टी च्या बार डान्सर मैत्रिणीची!
पण त्यांचा वावर ‘पाहुण्या’ कलाकारा इतकाच होता.ह्या सोबत ‘माही वे’ सारख्या लोकप्रिय गाण्यातून इशा कोप्पीकर सुद्धा कांटे चा भाग होती.
इशा ला या चित्रपटात करारबद्ध करतांनाच संजय गुप्तांनी तिला संजय दत्त च्या मैत्रिणीची भूमिका देण्याचं कबूल केलं होतं. कंपनी मधल्या ‘खल्लास’ गाण्यानंतर तसही तिला आयटम गर्ल सारख्याच भूमिका मिळत होत्या.
कांटे मध्ये अभिनयाला संधी मिळेल या आशेवर इशा ने हा चित्रपट स्वीकारला. चित्रीकरणाला सुरवात पण झाली सर्वात आधी ‘ईश्क समंदर’ गाण्याचं शूटिंग झालं.
ते संपताच चित्रपटाची लांबी वाढत असल्याने संजय दत्त च्या मैत्रिणीच्या भूमिकेला कात्री लावण्याचं कारण देऊन इशा कोप्पीकर ला चित्रपटातून बाहेर केलं गेलं. पुढे बऱ्याच मुलाखतीतून आपली फसवणूक झाल्याचं इशाने सांगितलं.
जेव्हा जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते क्वेइंटिन टैरंटिनो ‘कांटे’ ला आपल्या थिएटर मधे लावतात!
संजय गुप्तांच्या सगळ्याच कलाकृती या विदेशी चित्रपटाची नक्कल समजली जाते. त्यांचा पहिला सिनेमा ‘आतिष’ A Better Tomorrow पासून बनवला होता.’राम शस्त्र’ ही फिल्म ‘Hard to Kill’ पासून प्रेरणा घेऊन बनवली होती.
कांटे च्या बाबतीत म्हटलं जातं की हा ,क्वेइंटिन टैरंटिनो यांच्या ‘Reservoir Dogs’ चा रिमेक आहे.
पण संजय गुप्ता ह्या शिवाय अजून एका सिनेमाचा प्रभाव ‘कांटे’ वर असल्याचं सांगतात तो म्हणजे हाँग काँग ची फिल्म ‘City of Fire’
कदाचित ह्या कारणामुळेच ‘कांटे’ ला कधी फार भाव मिळाला नाही.
२००७ च्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ लॉस एंजिलीस ‘ मधे लघु चित्रपट दिग्दर्शक श्रीनिवास हे टैरंटिनो यांची मुलाखत घेत होते. जेव्हा त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या रिमेक बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणतात,
“माझ्या Reservoir Dogs चित्रपटाचे प्रचंड रिमेक झाले पण त्यातील हॉंगकॉंग मधला ‘Too many ways to be No 1’ आणि ‘कांटे’ मला प्रभावित करून गेला.
ह्या सिनेमाच्या कथेत भारतातून काही लोक अमेरिकेत बँक लुटायला येतात .माझ्या साठी सन्मानाची बाब म्हणजे ह्या सर्व भूमिका भारतातल्या दिग्गज कलाकारांनी निभावल्या आहेत.
मी आज इथे बसून एक चित्रपट पाहतोय – कांटे,जो माझ्याच फिल्म चा रिमेक आहे.पण हा चित्रपट प्रत्येक पात्राची कहाणी उलगडून दाखवतो.
मला ही गोष्ट प्रचंड आवडली. मी प्रत्येक वेळेस माझ्या चित्रपटात पात्राची पार्श्वभूमी कथा ठेवतो मात्र एडिटिंग च्या वेळेस त्यावर कात्री चालवावी लागते.
म्हणूनच कांटे ची ही गोष्ट पाहून मी अचंबित झालोय.चित्रपट पाहताना मला हे जाणवलं की कांटे तर ‘Reservoir Dogs’ नाही.
पण शेवटाला ही फिल्म प्रत्येक पात्राच्या गुप्त ठिकाणी येऊन पोचते आणि मला वाटत की सिनेमा परत ‘Reservoir Dogs’ च्या झोन मधे येतो. हे खूपच मजेदार आहे.”
Reservoir Dogs च्या रौप्यमहोत्सवी वर्षात क्वेइंटिन टैरंटिनो यांनी एप्रिल २०१७ मधे तीन चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग ठेवलं होतं.
यामध्ये Reservoir Dogs सोबतच City of Fire आणि कांटे सुद्धा दाखवला गेला होता.
ह्या चित्रपटांचं आयोजन टैरंटिनो चे थिएटर ‘New Beverly Cinema’ मधे करण्यात आलं होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.