आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आपल्यापैकी प्रत्येकाला डब्ल्यूडब्ल्यूई माहिती असेलच, खरं म्हणजे 90 च्या दशकातील प्रत्येक तरुणाला या खेळाबद्दल प्रचंड आकर्षण होतं.
हा खेळ बघून त्यावर चर्चा करणारे, त्याचं आकर्षण वाटणा-यांपैकी तुम्ही एक आहात? मग तर तुम्हाला हा लेख वाचलाच पाहिजे.
त्यावेळच्या काही स्पोर्ट्स चॅनल वरती या खेळाचे प्रक्षेपण व्हायचं, डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजे लहान मुलांसाठी फारच गमतीशीर करमणुक व्हायची,
त्यावेळचे जॉन सीना, अंडरटेकर, ट्रिपल एच, केन, बटिस्टा, बिग शो, रे मिस्टेरिओ, द ग्रेट खली, हरिकेन यासारखे अनेक रेसलर तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रचंड गाजले होते. तेव्हाचे ते एक प्रकारे हिरो होते.
अंडरटेकर सहा वेळेस मेला आहे ही तर त्या वेळची सर्वात मोठी अफवा होती. आजही यु ट्यूब वरती अंडरटेकर चे सामने खूप मोठ्या प्रमाणावर ती सर्च केले जातात.
तर, जगातील सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक समजले जाणारे जेफ बेझोज-लेड डब्ल्यूडब्ल्यूई विकत घेऊ शकतात अशी बातमी काही दिवसांपूर्वी वेबपोर्टल्सनं बाहेर आणली होती. काय आहे या बातमी मागील सत्य जाणून घेऊयात…..
डब्ल्यूडब्ल्यूई जगातील सर्वात प्रसिद्ध अशी एक रेसलिंग संघटना आहे. संपूर्ण जगामध्ये त्यांचा प्रेक्षकवर्ग आहे.
जसं प्रत्येक संस्थेला काही काळानंतर परिवर्तनाची आवश्यकता असते, त्याच प्रमाणे डब्ल्यूडब्ल्यूई सुद्धा स्वतःला अनेक वेळा बदल करण्याचा प्रयत्न करत असते. लोकप्रियता कमी जास्त होत असली तरी डब्ल्यूडब्ल्यूई चा प्रेक्षकवर्ग मात्र आजपर्यंत कमी झालेली नाही. आजही लोकांना डब्ल्यूडब्ल्यूई तेवढंच आवडतं जेवढ आधी आवडत असे.
मागच्या काही दिवसांमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची लोकप्रियता जरी घटले नसली तरी इतर काही व्हिडिओ कॉन्टॅक्ट मुळे डब्ल्यूडब्ल्यूई कडे आकर्षित होणाऱ्या नवीन प्रेक्षक वर्गाची संख्या मात्र नक्कीच कमी झालेली आहे आणि त्यासोबतच काही तांत्रिक कारणामुळे डब्ल्यूडब्ल्यूईचे स्टॉक देखील उतरलेले आहेत. ही बाब नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखी आहे.
मग अशा परिस्थितीत डब्ल्यूडब्ल्यूई कदाचित एखाद्या मोठ्या व्हिडिओ स्ट्रीमिंग संस्थेसोबत किंवा ॲप्लीकेशन सोबत काम करू शकते अशी शक्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्तविली जात आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचे व्हिडिओ राइट्स आज पर्यंत फक्त टेन स्पोर्ट्स या चॅनल कडे होते म्हणजे नव्वदच्या दशकापासून आजपर्यंत डब्ल्यूडब्ल्यूई फक्त एका चॅनेलवर स्ट्रीम होत आहे.
तसं, काही वर्षांपूर्वी डब्ल्यूडब्ल्यूईने स्वतःचं डब्ल्यूडब्ल्यूई नेटवर्क तयार केलेला आहे त्याच्यामार्फत ते झालेल्या खेळाचे चित्रीकरण टाकत असतात, पण जर डब्ल्यूडब्ल्यूई ला नवीन प्रेक्षकांना आकर्षित करायचं असेल आणि जर त्यांना अजून आर्थिक मदत आवश्यक असेल तर ते ऍमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीशी टाय अप करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे कारण, त्यामधून डब्ल्यूडब्ल्यूई ला दुहेरी फायदा आहे.
एकतर त्यांचा प्रेक्षकवर्ग वाढत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आर्थिक फायदा देखील होईल पण यासाठी डब्ल्यूडब्ल्यूई ला स्वतःचे राइट्स विकायला लागतील एवढं मात्र निश्चित.
डब्ल्यूडब्ल्यूईचे स्ट्रिमिंग राइट्स ऍमेझॉन सारख्या कंपनीला देखील खूप आवश्यक असतील, डब्ल्यूडब्ल्यूई सारखी एखादी संस्था जरी ॲमेझॉनं विकत घेतली तरी आजच्या काळात आश्चर्य वाटायला नको.
नीधम अॅनालीस्ट या कंपनीच्या प्रवक्त्या लाॅरा मार्टीन यांनीदेखील काही दिवसांपूर्वी असेच अंदाज वर्तवणारे एक वक्तव्य देखील केले होते, कारण जर जगातील सर्वात मोठी रेसलिंग संस्था त्यांचे व्हिडीओस ट्रेनिंग राइट्स कोणासोबत शेअर करणार असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कंपनीज ते राइट्स विकत घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.
अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव या आधी देखील डब्ल्यूडब्ल्यूई कडे आल्याचे सांगितले जातं आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई आधी आपले सर्व प्रोग्राम एकाच चॅनल मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असे, प्रत्येक देशामध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये त्यांना वेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं लागत असे मग अशाप्रकारे विस्कळीत पद्धतीने ते त्यांच्या प्रेक्षकांपर्यंत जात होते.
ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे, कारण आशियाई देशांमध्ये हा खेळ जर लाईव्ह दाखवायचा असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येत असे आणि खर्च होऊन देखील इकडे आशियाई देशांमध्ये हा शो किमान एक आठवडा उशिराने प्रक्षेपित होत असे.
आता काही वर्षांपूर्वी भारतामध्ये देखील इंटरनेटची स्पीड चांगली असल्यामुळे प्रक्षेपणामधील हा अवधी प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे. तरीही डब्ल्यूडब्ल्यूई ला कमी पैशात लवकरात लवकर, जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत जगभरात पोहोचायचं असेल आणि तेही अगदी एकाच वेळी तर मात्र एखाद्या मोठ्या मोबाईल ॲप्लिकेशन शिवाय हे सर्व शक्य नाही, कदाचित त्यामुळेच ऍमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीशी टाय अप करण्याचा विचार डब्ल्यूडब्ल्यूई नक्कीच करू शकते.
आता ती कंपनी ॲमेझॉन असेल असं खात्रीशीर पद्धतीने सांगता येणार नाही परंतु मागच्या काही दिवसातील घडामोडींमुळे असे लक्षात येते की ॲमेझॉन आणि डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये काहीतरी संवाद घडत आहे, कारण डब्ल्यूडब्ल्यूई सोबतच ॲमेझॉन च्या प्रवक्त्याने देखील याबद्दल सकारात्मक गोष्टी मीडियासमोर मांडलेल्या आहेत आणि मुख्य कारण म्हणजे हे दोन्ही प्लॅटफॉर्म जगभरामध्ये पसरलेले आहेत.
त्यांचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्मला या निर्णयामुळे फायदाच होणार आहे. त्यामुळे एकमेकांना पूरक असलेला हा निर्णय कदाचित दोन्ही कंपनी घेतील असा कयास आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती बांधला जात आहे.
मार्टिन ज्यांच्याकडे डब्ल्यूडब्ल्यूई चे काही शेअर्स आहेत, त्यांनी अलीकडेच मीडियासमोर एक भूमिका जाहीर केली होती. ते मीडियाशी बोलताना म्हणाले की, “डब्ल्यूडब्ल्यूई मार्फत चालणारे लाईव्ह प्रोग्रॅम हे विस्कळित पद्धतीने ग्राहकांना सेवा देत आहेत आणि डब्ल्यूडब्ल्यूई चे इतर ब्रँड्स म्हणजेच स्मॅक डाउन, राॅ, एन एक्स टी यांच्याकडे देखील लाईव्ह मध्ये कुठलाही विशेष प्रेक्षक उरलेला नाही.“
त्यामुळे मार्टीन यांच्यामते आता डब्ल्यूडब्ल्यूई समोर जागतिक स्पर्धेमध्ये स्वतःच टिकाव धरून राहण्यासाठी एकच पर्याय असल्याचं सांगितलं जातं, ते म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूईने आपले लाईव्ह स्ट्रीमिंग चे राईट्स ऍमेझॉन सारख्या प्रसिद्ध कंपनीला द्यावेत जेणेकरून डब्ल्यूडब्ल्यूई जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकेल.
ॲमेझॉन साठी देखील ही गोष्ट नक्कीच फायद्याची ठरेल कारण एक तर डब्ल्यूडब्ल्यूईचा प्रेक्षक जगभरात विखुरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूई ही एक सुरुवात ठरेल ज्याच्या माध्यमातून ॲमेझॉन जगातील सर्व रेसलिंग कंपन्यांना ॲमेझॉनकडे आकृष्ट करण्यात यशस्वी होऊ शकेल.
डब्ल्यूडब्ल्यूई चे सिईओ मॅकमोहॉन यांच्याशी मिडियाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,” डब्ल्यूडब्ल्यूई ला सध्यातरी अशा कुठल्याही गोष्टीसाठी धडपड करण्याची आवश्यकता भासत नाही. याआधी देखील अनेक मोठ्या कंपनी आमच्याकडे हा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या पण सध्या तरी आम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही प्रस्तावामध्ये रस नाही. डब्ल्यूडब्ल्यूई कडे सध्या स्वतःचे नेटवर्क आहे, ज्याच्या मार्फत आम्ही जगभरातील आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रस्तावावर सध्या आम्ही विचार देखील केलेला नाही.”
जर ॲमेझॉन अशाप्रकारे लाइव्ह रेसलिंग चे राईट्स विकत घ्यायचे असतील तर त्यांना कुठल्या तरी वेगळ्या प्रकारे डब्ल्यूडब्ल्यूई कडे हा प्रस्ताव मांडावा लागेल, कारण हा प्रस्ताव ॲमेझॉन साठी किफायतशीर आहे तसाच डब्ल्यूडब्ल्यूई साठी देखील फायदेशीरच आहे.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा अमेझॉन बाबत अशी कुठली चर्चा होत आहे. या आधी देखील NFL गेम्स आणि ॲमेझॉन बाबत अशीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर काही कालांतराने ॲमेझॉन त्या NFL गेम्सचे राइट्स विकत घेतले त्यामुळे असं म्हटलं जात आहे की ॲमेझॉन डब्ल्यूडब्ल्यूई च्या स्त्रीमींग राइट्स मध्ये इंटरेस्टेड आहे.
कदाचित डब्ल्यूडब्ल्यूई ॲमेझॉन साठी सर्वात महत्त्वाची संधी असू शकते कारण जगातील सर्वात मोठी रेसलिंग संघटना असलेली डब्ल्यूडब्ल्यूई आज प्रचंड मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आलेली आहे. एवढ्या सर्व घडामोडी घडून देखील ॲमेझॉनने आत्तापर्यंत या घडामोडींवर ती विशेष असं भाष्य केलेलं नाही त्यामुळे त्यांना काय अपेक्षित आहे हे अजून उघडपणे समोर आलेलं नाही. भविष्यात जे घडेल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.