Site icon InMarathi

कमीत कमी वेळात जास्त अभ्यास करण्याच्या या टिप्स तुम्हाला परीक्षेत १००% यश मिळवून देतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

सध्याचे युग म्हणजे स्पर्धेचे युग. ह्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर, तुम्हाला तुमचं शैक्षणिक करियर हे चांगलं असावचं लागतं. कारण त्यावरच तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं.

मग शैक्षणिक करियरमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण ज्या परीक्षा देतो त्यामध्ये चांगले गुण मिळवणे आणि अव्वल दर्जाने उत्तीर्ण होणे गरजेचे असते.अर्थातच, अव्वल येण्यासाठी अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं आणि परीक्षेत तो नीटपणे मांडणं तितकंच महत्त्वाचं असतं.

पण सध्या वाढलेला अभ्यासक्रम, काठीण्य पातळी आणि वाढती स्पर्धा या सगळ्याचा विचार केला तर असणारा वेळ पुरेल की नाही, अशी शंका विद्यार्थ्यांना येते आणि अभ्यासाचं टेन्शन वाढतं.

 

isha.sadhguru.org

 

शिवाय आजकाल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या असाइन्मेंट, प्रोजेक्ट वेगवेगळ्या टेस्ट, परीक्षा, अॅक्टिव्हिटीज ह्या सगळ्यांनी बांधून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर पालकांचा चांगले मार्क्स मिळवण्याचा दबावही विद्यार्थ्यांवर असतो.

अशा तणावात अभ्यास करताना लक्ष लागत नाही किंवा केलेला अभ्यास फारसा लक्षात राहत नाही. तसं सगळ्यांनाच थोडफार सोशल लाइफ आवडतं, पण त्यासाठी अभ्यासामुळे वेळ देता येत नाही.

म्हणूनच, अशा वेळेस कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करायचा याच्या काही आयडिया आपण पाहूयात. 

 

hindustan times

 

अभ्यासाची क्वांटीटी वाढवण्यापेक्षा क्वालिटी वाढवण्यावर भर दिला तर अभ्यास छान लक्षात राहतो आणि अभ्यासाचा तणाव कमी होतो.

अभ्यासाची इन्फॉर्मेशन जिकडून मिळेल तिकडून मिळवायचा प्रयत्न करा. क्लासमध्ये शिकवलेल्या नोट्स, पाठ्यपुस्तक आणि आज-काल निघालेले एज्युकेशनल ॲप्स,

त्यातली त्या विषयाची माहिती या सगळ्यांचा वापर करा.

 

dxminds

 

आजकाल हे सगळे ऑप्शन बाजारात सहज उपलब्ध आहेत. यातील प्रत्येकाचं एक स्वतंत्र असं विश्लेषण असतं आणि ते वाचून आपण आपलं एक ठाम मत बनवू शकतो.

एखादा धडा जर तुमचा अभ्यासून झाला तर , तुम्ही त्यात काय शिकला हे कोणाला तरी सांगा म्हणजे जेणेकरून ते तुमच्या कायमचे लक्षात राहील. पुढे परीक्षेत यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना याचा उपयोग होतो.

 

the economic times

 

रोज वेगवेगळ्या विषयांचा थोडा थोडा वेळ का होईना पण अभ्यास करा. एका दिवशी केवळ एकच विषय असं करू नका, कारण दिवसभर एकच विषय जर पहाला तर थोड्यावेळाने तो कंटाळवाणा वाटायला लागतो.

तेच तेच वाचून कन्फ्युजन वाढतं. म्हणून प्रत्येक विषयाचा साधारण ४५ मिनिटे तरी का होईना रोज अभ्यास करावा. सलग तीन तास, चार तास असा अभ्यास करू नये मधे थोडा थोडा ब्रेक घ्यावा.

 

quora

 

अभ्यास करताना जर एखाद्या विषयातील एखाद्या धड्याचा अभ्यास झाला की तो धडा किंवा त्या चाप्टरचा आपण एक चार्ट तयार करा. त्या धड्यांमध्ये काय सांगितले आहे, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी स्वतःच्या हाताने लिहून काढाव्यात म्हणजे या गोष्टी कधीच विस्मरणात जात नाहीत.

आठवड्यातून एकदा तरी तो चार्ट आपल्या डोळ्याखालून घालावा किंवा आठवून पहावा.

वर्गामध्ये नेहमी पुढच्या बेंचवर जागा मिळत असेल तर तिथेच बसण्याचा प्रयत्न करा. कारण पुढे बसल्यामुळे आपलं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन समोरचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे असतं.

आणि शिक्षकांचाही लक्ष तुम्ही बरोबर करताय की चुकीचं करता याकडे असतं. मागे बसून कदाचित कुचाळक्या करायला मिळतील, मात्र त्याचा करियर घडवण्यासाठी आयुष्यामध्ये उपयोग नाही.

यावर पुढे बसणारी मुलं, मागे बसणारी मुलं आणि मधल्या बेंचवर बसणारी मुले यांचा एक स्टडी करण्यात आला आहे. आणि त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की पुढच्या बेंचवर बसणारी मुलं ही नेहमी जास्त मार्क्स मिळवतात.

 

edexlive

 

त्यानंतर मधल्या बेंचवर बसणारी मुले मार्क्स मिळवतात तर सगळ्यात कमी मार्क्स बॅकबेंचर्स विद्यार्थ्यांना असतात.

अभ्यास करताना तुमचा मोबाईल बंद ठेवावा. मल्टिटास्किंग करत अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नये. आपले संपूर्ण लक्ष केवळ अभ्यासावर केंद्रित करावे. मोबाईल जवळ ठेवला आणि त्यावर नोटिफिकेशन्स वाजायला लागले तर मोबाईल उघडून बघण्याचा मोह आपल्याला होतो.

मग फेसबुक,व्हाट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल साईट्सवर आपला वेळ जास्त जातो व अभ्यास बाजूला राहतो. काहीजण गाणी लावून पण अभ्यास करतात पण असाही अभ्यास काही उपयोगाचा नाही.

 

adage.com

 

अभ्यासाच्या वेळेस फक्त अभ्यास करण्यावरच भर द्यावा. मात्र आजकाल काहीकाही असाइन्मेंट या कम्प्युटरवर करायला लागतात अशा वेळेस तुम्ही अभ्यास करत असलेल्या विषयाशी संबंधित नसलेले सगळे इंटरनेट ब्राउझर बंद करून ठेवावेत.

अभ्यास केलेली केलेली माहिती ही सोपी सुटसुटीत करून ठेवावी किंवा आपल्या लक्षात राहावं म्हणून त्या चाप्टरला किंवा एखाद्या गणितातील एखाद्या इक्वेशनला असं एखादं नाव ठेवावं जे आपल्या लक्षात राहील.

त्यामुळे ते इक्वेशन किंवा ती माहिती लक्षात राहील. कधीकधी कम्पॅरिझन टेबल,आकृत्या काढून त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

quora

 

शास्त्रज्ञ सांगतात की, जो अभ्यास कराल तो हाताने लिहून काढा. कधीही लॅपटॉप वर किंवा कम्प्युटरवर अभ्यास करू नका. कारण हाताने लिहून काढलेला अभ्यास हा आपल्या मेंदूशी लगेचंच रिलेट होतो.

आणि तो समजून घेऊन लिहिल्यामुळे लक्षात राहतो. म्हणूनचं हाताने नोट्स काढणारे विद्यार्थी नेहमीच जास्त मार्क्स मिळवतात.

 

the matchbox.com

 

अभ्यास झाला आहे असं वाटल्यानंतर त्याच्या टेस्ट, क्विज देऊन बघा. जितक्या अधिक टेस्ट द्याल तितकी प्रॅक्टिस जास्त होते आणि समर्पक उत्तर द्यायला त्याची मदत होते. आणि पेपर सोडवायचं, वेळेच मॅनेजमेंट ही चांगलं जमतं.

अभ्यास करताना टेक्स्ट बुक किंवा नोट्स ह्या मोठ्याने वाचल्या तर ते आपल्या चांगल्या लक्षात राहतं. पण यामध्येही पूर्ण चाप्टर मोठ्याने वाचत बसलात तर खूप वेळ जाईल.

अशावेळेस तुम्ही मनामध्ये चाप्टर वाचता त्याच वेळेस महत्त्वाच्या पॉईंटच्या खाली अंडरलाईन केलं किंवा तो एखादा पॅरेग्राफ हायलाईट केला आणि नंतर रिव्हिजन च्या वेळेस तोच भाग जर मोठ्याने वाचलात तर तो जास्त लक्षात राहतो.

 

1000 awesome things

 

एखाद्या दिवशी तुमचा ठरवलेला सगळा अभ्यास पूर्ण झाला तर लगेच नवीन अभ्यास चालू न करता थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. खरं तर रोजच असं करा. कमीत कमी तीस मिनिट ही स्वतः साठी ठेवा.

त्यात तुम्ही खेळू शकता, गार्डनिंग करू शकता, एखादं वाद्य वाजवू शकता किंवा तुमच्या आवडीची एखादी गोष्ट करा ज्याने तुमचा मूड अजून फ्रेश होईल.

अभ्यास करताना पाणी मात्र भरपूर प्या.रोज आठ ग्लास पाणी हे प्यायलं गेलंच पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास करताना पाणी पिण्याचे टाळतात किंवा विसरून जातात, पण त्यामुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन होतं आणि चिडचिड वाढते.

 

Young Woman Drinking Water by Sea

 

परीक्षेला जातानाही सोबत पाण्याची बाटली असावी.

विद्यार्थी आहात तर तुमचा डायट हा हेल्दी असला पाहिजे. जेवणामध्ये भरपूर पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, दूध, ड्रायफ्रूट्स आणि मांसाहारी असाल तर अंडी, चिकन, आणि मासे यांचाही समावेश असला पाहिजे.

सीजनल आणि लोकल जी फळे मिळतात ती खाल्ली पाहिजेत.

 

 

Twenty19

अभ्यास आहे, अभ्यास आहे म्हणून उगाच जागरण करू नयेत. रात्रीत किमान सात ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे. झोप नीट नाही झाली तरी कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही.

कारण मेंदूलाही तुम्ही जे वाचताय जो अभ्यास करताय त्याचं आकलन करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. तुम्ही झोपता तेव्हाच त्याला काम करायला वेळ मिळतो म्हणून झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे.

 

the economic times

 

अभ्यास करताना आपली तुलना कोणाशीही करू नका आपला अभ्यास हा केवळ आपल्यासाठीच करा. तुमच्या आयुष्यातील एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीचा फोटो समोर ठेवा.  

अभ्यास करताना केवळ मला खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत किंवा मला पहिला नंबर काढायचाचं आहे असं मनात धरून अभ्यास करू नका. अभ्यासाची प्रोसेस एन्जॉय करा केलेला अभ्यास समजून घ्या.

यामुळे एखादा विषय अवघड जात असेल किंवा त्यात स्कोअर होत नसेल तर त्या विषयातही सुधारणा झाली आहे हे लक्षात येईल. एक लक्षात ठेवायचं, जो काही अभ्यास करतो तो कधीही वाया जात नाही आयुष्यात तो कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतो.

 

hindustan times

या सगळ्या टिप्स एका दिवसात लगेच आत्मसात होणार नाहीत त्यासाठी थोडा वेळ द्यायला लागणार आहे. हे करतानाच आपला कोणता विषय चांगला आहे आणि कोणत्या शाखेकडे आपला कल आहे हेही हळूहळू उमगेल.

आणि मग त्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी तुम्ही सुरुवात कराल हे नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version