Site icon InMarathi

‘मनुष्य हा त्याच्या मेंदूचा फक्त १०% वापर करतो’ हे सत्य आहे की भंपकपणा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी मेंदू ही खरंच खूपच क्लिष्ट गोष्ट आहे. मानवजातीचा सगळा विकास हा माणसाकडे असलेल्या मेंदूमुळे झाला आहे. तरीही मेंदूचा पूर्ण अभ्यास अजून झाला नाही. शास्त्रज्ञ अजूनही मेंदूवर संशोधन करत आहेत.

परंतु एकोणिसाव्या शतकात अशी एक हुल उठली की, माणूस हा त्याच्या मेंदूचा फक्त १०% वापर करतो, तो १००% मेंदू वापरत नाही.

 

 

म्हणजे बघा हां जर आपण १००% मेंदू वापरला असता तर परीक्षेतील कुठलाही अवघड प्रश्न त्याच्यावर नजर फिरवल्या फिरवल्या युं सुटला असता!

अर्थात ह्या दंतकथेमागे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईनचं नाव आहे. मेंदू आणि आईन्स्टाईन संबंध आला नसता तरंच नवल होतं.

 

 

असं म्हटलं गेलं की, सर्वसाधारण माणूस त्याच्या मेंदूचा फक्त ६% भाग वापरतो परंतु आईन्स्टाईनने त्याच्या मेंदूचा ११% भाग वापरला आणि मोठे शोध लावले.

म्हणजे ५% भाग जास्त वापरुन आइन्स्टाइन वेगळा ठरला आणि ही दंतकथा सुरूच राहिली. आईन्स्टाईनच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे लोकांचा हेच मत झालं की तो मेंदूचा जास्त भाग वापरतो.

आणि हे लोकांच्या डोक्यात इतक बसलं की या भाकड कल्पनेवर हॉलिवूडमध्ये २०१४ मध्ये एक सिनेमा बनवला गेला, त्याचं नाव होत लुसी.

 

pinterest

 

ज्यामध्ये नायिकेला असं काही द्रव्य दिलं जातं त्यामुळे तिचा मेंदू १००% काम करायला लागतो आणि मग ती अशक्यप्राय गोष्टी करायला लागते.

जसं की, मेंदूच्या साह्याने वस्तू हलवणे, इजा झाल्यावरही वेदना जाणवून न घेणे आणि खूप सारी माहीती मुखोद्गत करणे, इ.

आणि ही कल्पना लोकांच्या इतकी आवडीची झाली की, अगदी विज्ञान शिक्षक देखील यात मागे राहिले नाहीत.

मोठमोठ्या युनिव्हर्सिटी मधून पण हेच सांगितलं जायचं की, माणसाचा मेंदू १०% काम करतो. अगदी एवढं की मेंदूला इजा झाली तरी फरक पडत नाही, कारण ९०% मेंदू शाबूत असतो.

 

 

ही कल्पना नेमकी आली कुठून? १९०७ साली मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांनी त्यांच्या ‘एनर्जी ऑफ मेन’ या पुस्तकात त्यांनी असं म्हटलं होतं की,

‘माणूस त्याला मिळालेल्या शारीरिक आणि मानसिक स्त्रोतांचा एक छोटासा भाग वापरतो’.

त्यांच्या विधानाचा १९३६ मध्ये लॉवेल थॉमस यांनी विपर्यास केला म्हणा किंवा वेगळा अर्थ काढला म्हणा, त्यांनी असं लिहिलं की,

‘विल्यम जेम्स असे म्हणतात की, माणूस त्याच्या मानसिक क्षमतेच्या फक्त १०% भाग वापरतो’. आणि पुढे हेच रूढ झालं.

म्हणून असं म्हणायला हरकत नाही की, हे १०%चं लॉजिक विल्यम जेम्सचे नसून लॉवेल थॉमस यांच्या मेंदूतून आलेले आहेत.

तसं पाहायला गेलं तर मानवी उत्क्रांतीच्या दोन दशलक्ष वर्षांमध्ये माणसाच्या मेंदूचा आकार वाढतो आहे. मानवी शरीराच्या वजनाच्या दोन टक्के वजन असलेला मेंदू माणसाची २०% एनर्जी वापरतो.

पृथ्वीतलावरील इतर कोणत्याही प्रजातीपेक्षा माणूस त्याचा मेंदू जास्त क्षमतेने वापरतोय.

 

lasestrellas.tv

 

माणसाचा मेंदू सतत कार्यरत असतो, आणि तो १००% काम करतो. मेंदूतील मोठा भाग म्हणजे सेरेब्रम. ह्याच्याकडूनच आपल्या हालचाली, श्वासोश्वास नियंत्रित केले जातात.

मेंदूत असलेले लाखो न्यूरॉन्स एकमेकांशी सतत संवाद साधत असतात.

हीच न्यूरॉन्सची बहुतांश ऊर्जा माणसाकडून कृती करून घेण्यात पुढाकार घेते. उर्वरित ऊर्जा ही कॉन्शियस माईंड आणि अन्कॉन्शियस माइंड या दोन्ही वेळेस वापरली जाते.

उदाहरणार्थ, अनकॉन्शस माईंड मध्ये हार्ट रेटवर नियंत्रण ठेवणे आणि कॉन्शस माईंड मध्ये ड्रायव्हिंग करणे. माणूस त्याच्या मेंदूचा १००% वापर करत असतो.

अगदी तुम्ही झोपेत असलात तरीही तुमचा मेंदू त्यावेळेस कार्यरत असतो. दिवसभर केलेल्या कामाच्या नोंदी ठेवणे, त्यांची संगती लावणे ही सगळी कामं मेंदू रात्री करत असतो.

 

 

येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवणे ही सगळी कामे मेंदू करत असतो.

कधीकधी मेंदूला इजा होते त्यातला काही भाग न्यूरोसर्जनला काढून टाकावा लागतो. तरीही नंतर ती व्यक्ती आपले आयुष्य नेहमीसारखे व्यतीत करते. हे असं का घडतं?

तर झालेल्या भागाची इजा कशी भरून काढायची हे मेंदूला माहित असतं.

माणसाच्या मेंदूमध्ये शरीराच्या प्रत्येक भागाच्या नोंदी, कार्य यांचे नकाशे वेगवेगळ्या कक्षात ठेवावेत अशाप्रकारे असतात.

उदाहरणार्थ, बोटांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारं न्यूरॉन्स क्लस्टर एका ठिकाणी असतं. तसंच दृष्टी, श्रवण यंत्रणा यांच्यासाठी वेगळे क्लस्टर असतात.

म्हणून न्यूरोसर्जनस् ना एखादी शस्त्रक्रिया करताना या क्लस्टरस् ना धक्का न पोहोचवता अत्यंत काळजीपूर्वक सर्जरी करावी लागते.

 

 

मेंदूचे काम किती शिस्तबद्ध चालते पहा, अगदी साधा चहा बनवायचा झाला तरी त्यातल्या प्रत्येक कृतीसाठी मेंदूकडून शरीरातील प्रत्येक अवयवाला आज्ञा दिली जाते.

त्यानुसार माणूसाचे गॅस जवळ जाणे भांडे घेणे, पाणी- चहा- साखर आणि दूध ह्या सगळ्या गोष्टी घेणे, चहा तयार करणे आणि तो पिणे. यात कोणताही बदल न होता सरळ गोष्टी घडतात.

 

 

किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आता तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर किंवा कम्प्युटरवर एखादा व्हिडिओ बघत असता.  त्याच वेळेस तुमच्यासमोर एका प्लेटमध्ये बिस्किटं आहेत, हातात चहाचा कप आहे.

यावेळेस तुमचं लक्ष व्हिडिओमध्ये असलं तरी तुम्ही बिस्किटंं खात असता आणि मधूनच चहा पीत असता. या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस घडत असतात.

त्याच वेळेस कोणाचा फोन आला तर तुम्ही फोनवरही बोलता. तुमची नजर समोरच्या स्क्रीन कडे असते आणि बोलणं फोनवरच्या माणसाशी असतं आणि मधूनच चहाचा एखादा घोट घेतला जातो.

 

shutterstock

 

आता या सगळ्या गोष्टी एकत्रंच घडत असतात, आणि तरीही काय व्हिडिओ पाहिला आहे तो तुमच्या लक्षात राहतो. फोनवरती काय बोलणं झालं हे माहीत असतं. समोरच्या प्लेटमधील बिस्कीटं संपतात आणि कपातील चहाही संपतो.

===

याच वेळेस आपल्या हृदयाचे ठोके पडत असतात. श्वासोश्वासासाठी फुफ्फुसांना ऑक्सीजन देण्याचं काम चालू असतं आणि श्रवणेंद्रिय यांचं ही काम चालू असतं.

म्हणजे आपल्या मेंदूला एकावेळेस किती व्यवधानं ठेवून काम करावं लागतं याची कल्पना येते.

 

brainfacts.org

 

ह्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की १०% मेंदू हा जर व्हिडिओ पाहण्यात व्यग्र असेल तर उरलेला ९० टक्के मेंदू इतर कामांमध्ये व्यस्त असतो.

आणि सध्याच्या आधुनिक तंत्राने एम आर आय(MRI) आणि (PET) पीईटी इमेजिंग या तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांद्वारे माणसाचा मेंदू किती आणि कसा काम करतो हे पाहता येतं.

 

 

म्हणून मेंदू फक्त दहा टक्के काम करतो या म्हणण्यात काहीच तथ्य नाही. कारण जर मेंदूने फक्त १०% काम केलं असतं तर आपल्या सगळ्यांनाच अल्झायमर्स डिसीज झाला असता.

पण ह्या १०% थेअरीकडे सकारात्मक दृष्टीने पहायचे असेल तर असं म्हणता येईल की मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी माणूस अधिक मेहनत घेत आहे.

असंही म्हणता येईल की, माणसाचा मेंदू १००% काम करतो मात्र तो कशाप्रकारे काम करतो हे माणसाला अजूनतरी फक्त १०% माहीत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version