या कारणांमुळे प्रेक्षकांनी ‘फिल्मफेयर’ ला ‘फिल्मफेक’ हे लेबल लावलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
फिल्मफेयर आणि हिंदी सिनेमा यांचं नातं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे! हिंदी सिनेमासाठी फिल्मफेयर अवॉर्ड्स किती महत्वाचे आहेत हे आपण सिने इंडस्ट्रीमधल्या कित्येक कलाकारांच्या तोंडून ऐकलं आहे!
पण हे अवॉर्ड्स का दिले जातात कुणाला माहित आहे का? ते अवॉर्ड्स कसे दिले जातात? नक्की कोण ते निर्णय घेतात? या सगळ्या बद्दल तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का?
फिल्मफेयर अवॉर्ड्स हे एखाद्या उत्कृष्ट सिनेमाला किंवा एखाद्या उत्कृष्ट कलाकाराला किंवा टेक्निशियन ला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातात!

शिवाय हे अवॉर्ड्स टीव्ही वर दाखवले जाणार असल्याने टीव्हीच्या प्रेक्षकांची करमणूक करायची म्हणून त्यात अनेक डान्स परफॉर्मन्स सुद्धा असतात त्याचबरोबर वेगवेगळी कॉमेडी स्किट्स सुद्धा असतात ज्यातून हे सगळे कलाकार त्यांची कला सादर करतात!
जवळ जवळ ५० पेक्षा जास्त वर्षांपासून फिल्मफेयर ची परंपरा चालू आहे!

पण या वर्षीच्या फिलफेयर अवॉर्ड्स ने एक वेगळंच रूप धारण केलेलं आहे, या वर्षीच्या अवॉर्ड नॉमिनेशन्स पासून विजेत्यांपर्यंत सगळ्याच बाबतीत एक वेगळीच धांदली आणि नाराजीचा सूर स्पष्टपणे दिसून आला आहे!
फक्त प्रेक्षकच नव्हे तर कित्येक मोठमोठ्या कलाकारांनी तसेच नेटकाऱ्यानी सुद्धा या गोष्टीची दखल घेत ‘बॉयकॉट फिल्मफेयर’ हे हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल केलंय!
या गोष्टीवर आधारित प्रचंड मिम्स तसेच अनेक जोक्स सुद्धा सध्या आपल्याला व्हायरल होताना दिसत आहेत!

गली बॉय या झोया अख्तर च्या सिनेमाला एकूण १३ पोरितोषिक मिळाली यावरून बरेच लोक नाराज आहेत, पण त्यांची नाराजी सुद्धा योग्य आहे!
कारण सिनेमा जरी चांगला असला तरी त्यापेक्षा कित्येक दर्जेदार सिनेमे या वर्षी येऊन गेले त्यामुळे त्यांना कोणतंही अवॉर्ड न देता मुख्य अवॉर्ड्स हि गल्ली बॉय ला दिली गेल्याने बरीच जण नाराज आहेत!

पण नक्की हे कशामुळे झालं, या अवॉर्ड्स मधला हा सगळा सावळा गोंधळ नक्की काय आहे? लोकांनी फिल्मफेयर वर बहिष्कार टाकावा असं नक्की काय झालंय ते जाणून घेऊया!
फिल्मफेअरची ब्लॅक लेडी आपल्या हाती घेण्यासाठी प्रत्येक हिरो मेहनत करतो, यंदाच्या स्पर्धेत अनेक कलाकार शर्यतीत असले तरी रणवीर सिंगला मिळालेल्या पुरस्कारावर अनेकांनी टिका केली आहे.
सुपर ३० मधील ऋतिक रोशन, उरीमधील विकी कौशल या भुमिकांना वगळण्यामुळे फिल्म फेअर नव्हे फिल्मफेक असंही अनेकांनी म्हटलंय.

कलाकाराची लोकप्रियता आणि लोकांची पसंती म्हणून नव्हे, तर त्याच्या भुमिकेचं वेगळेपण बघून पुरस्कार दिला गेला पाहिजे.
मात्र यंदा सगळी बक्षिसं गल्ली बॉयला देण्याचं ठरलं होत, तर पुरस्कार सोहळ्याचं नाटक कशाला केलं असंही अनेकांनी म्हटलं आहे.
१.सर्वोत्तम सिनेमा

फिल्मफेअरच्या झगमगत्या सोहळ्यात बेस्ट फिल्म अर्थात सर्वोत्तम चित्रपट हा मानाचा किताब मिळवणं हे केवळ दिग्दर्शकाचंच नव्हे तर संपुर्ण टिमचं स्वप्न असतं.
मात्र हे स्वप्न पाहणा-या अनेक दर्जेदार चित्रपटांना यंदा नाराजी पत्करावी लागल्याची टिका नेटेक-यांनी दिली आहे. सुपर ३०, मिशन मंगल, उरी, वॉर यांसारखे अर्थपुर्ण चित्रपट स्पर्धेत असूनही गल्ली बॉयलाच पारितोषिक मिळाल्याचा राग नेटेक-यांनी व्यक्त केला आहे.
२.सर्वोत्तम संगीत :

चित्रपटातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे त्यातील संगीत. उरी, केसरी यासारख्या चित्रपटातील गाणी देशभक्तीची नवी प्रेरणा देतात, असं म्हणतं या विभागातही गल्लीबॉयला प्राधान्य दिल्याचा आरोप केला गेला आहे!
याचं उदाहरण देताना, देशभक्ती सांगणा-या केसरी चित्रपटातील तेरी मिट्टी या गाण्याकडे डोळेझाक करत तु नंगाही तो आया है हे शब्द फिल्मफेअरच्या तज्ञांना आवडले का? असा खोचक प्रश्न विचारण्यात आला आहे.
३.सर्वोत्तम अभिनेत्री :

आलिया भटचं फॅनफॉलॉइंग पुष्कळ असूनही फिल्मफेअरमुळे तिच्यावरही टिका करण्यात आली. आलिया भट ही आघाडीची अभिनेत्री आहे यात शंका नाही!
मात्र तिच्याशिवाय इतर कोणतीही अभिनेत्री इंडस्ट्रीत नाही हा फिल्मफेअर कमिटीचा समज आहे अशी टिका व्हायरल होत आहे.
प्रियंका चोप्रा (द स्काय इज पिंक), राणी मुखर्जी (मर्दानी २), विद्या बालन (मिशन मंगल) यांसारख्या हिरोइन्सनी नेहमीपेक्षा वेगळे रोल्स यशस्वीरित्या केले, तसंच त्यांच्या भुमिका जास्त अवघड होत्या,
असं असूनही त्यांना डावलून पुन्हा गल्लीबॉयलाच पसंती दिल्याने नेटेकरी नाराज आहेत.
४.सर्वोत्तम दिग्दर्शक :

जगन शक्ती आणि आदित्य धार यासारख्या दग्दर्शकांच्या सिनेमाला बाजूला ठेवून गली बॉय वर जास्त लक्ष देणं हे सुद्धा लोकांना न पटण्यासारखंच आहे!
उरी द सर्जिकल स्ट्राईक किंवा मिशन मंगल हे सिनेमे यादीत असून सुद्धा फिल्मफेयर ज्युरींनी त्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं हाच प्रश्न कित्येक लोक विचारत आहेत!
५. सर्वोत्तम पदार्पण :

तसं बघायला गेलं तर या वेळच्या फिल्मफेयरच्या यादीत कुणीच सर्वोत्तम पदार्पण केलेलं नव्हतं, कारण नवीन कलाकारांचे सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर आदळलेच होते!
तरी फिल्मफेयर चा अट्टहास म्हणून अनन्या पांडे ला अवॉर्ड देणं म्हणजे बॉलिवूडच्या नेपोटीझम ला आणखीन खतपाणी घालण्यासारखंच आहे असं प्रेक्षकांचं आणि फिल्म चाहत्यांचं म्हणणं आहे!
६. पटकथेतही ‘गल्ली बॉयची’ :

आर्टिकल १५, सांड कि आँख, किंवा सेक्शन ३७५ अशा दर्जेदार सिनेमांची पटकथा असून सुद्धा त्याची साधी दखल सुद्धा घेतली गेली नाही!
गली बॉय पेक्षा कित्येक पटीने उत्तम पटकथा या सिनेमांची असून सुद्धा अवॉर्ड मिळवण्यात हे सिनेमे नाकाम ठरले! याला नेमकं दुर्दैव म्हणायचं का काय?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.