' “ट्रॅफिक” रूल तोडूनही शिक्षा झाली नाही, का? डोळे पाणवणारी घटना… – InMarathi

“ट्रॅफिक” रूल तोडूनही शिक्षा झाली नाही, का? डोळे पाणवणारी घटना…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खरंतर परदेशात वाहतूकीचे नियम फार कडक असतात आणि ते नेमाने पाळलेही जातात.

 

cp24

 

शक्यतो नियम भंग करण्यास कोणी जात नाही कारण नियमाचा भंग केल्यास नियम तोडणाऱ्या व्यक्तीस लगेच गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे शिक्षाही केली जाते.

इंटरनेटच्या जगभर पसरलेल्या जाळ्यामुळे आपल्याला घरबसल्या कुठे काही खुट्ट झालं तरी समजतं . अगदी असंच अमेरिकेतला एक व्हिडिओ सध्या वायरल होतोय . नेमकं असं काय आहे त्या चित्रफितीत की सर्वत्रच त्याची चर्चा व्हावी ?

खरंतर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वयोवृद्ध आजोबा आणि एक जज कोर्टात बसलेले दिसतात.

american citizen waived charge for breaking traffic rule inmarathi

त्या आजोबांवर ‘स्कुल झोन व्हायोलशन ‘ चा गुन्हा दाखल झालेला असतो. शालेय परिसरात वेगाच्या नियमाचा भंग केल्यामुळे त्यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर केलेलं असतं . हे समजल्यावर ते आजोबा त्यांचं कहाणी सांगतात आणि सगळेच निःशब्द होतात.

खरंतर ते ९६ वर्षांच्या आजोबांनी फक्त गरज असली तरच गाडी चालवत असल्याचं सांगितलं. आणि कधीच ते गाडी वेगात चालवत नाहीत असं त्यांनी फ्रॅन्क कॅप्रिओ  या न्यायाधिशांना सांगितलं.

मात्र स्वतःच्या कॅन्सरग्रस्त मुलाला डॉक्टरकडे न्यायच्यावेळी नियमभंग झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकून मात्र जज आश्चर्यचकीत झाले आणि त्यांनी आजोबांना मुलाचं वय विचारलं.

 

 

”माझा मुलगा ६३ वर्षांचा आहे ”असं आजोबांनी सांगताच  ”हेच अमेरिकेचं खरं रूप आहे” अशी प्रतिक्रिया न्यायाधिशांनी दिली. आज ६३ वर्षांच्या मुलाची काळजी नव्वदी पार केलेले वडील घेतायत हे सत्य खरंच आश्चर्यकारक आणि हृदय हेलावणारं आहे.

हे सांगताना त्या आजोबांच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू मनाला चटका लावून जातात.

विशेष म्हणजे, सगळं ऐकल्यावर त्या आजोबांना शिक्षा न ठोठावता खटला रद्द करणारे सुप्रसिद्ध जज देखील माणुसकीच्या जिवंतपणाचं चांगलं उदाहरण समाजापुढे ठेवतात.

हा इतका नाजूक प्रसंग उत्तम हाताळल्यामुळे खरंच जज बद्दल आदर निर्माण होतोच परंतु उतारवयातल्या बापाच्या मायेनं मन अंतर्मुख होतं  मनाला भावतो तो त्या आजोबांचा प्रामाणिकपणा आणि मुलासाठी अललेली मनाची घालमेल अन् तळमळ.

मग कसा बरं वायरल होणार नाही हा व्हिडिओ?

 

हे असं काही बघितलं की पुन्हा जाणवतं, आपले आई वडील खरंच ग्रेट असतात, आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्या आई वडिलांसाठी आपण कायमच लहान असतो. निस्वार्थी प्रेम जे म्हणतात ना ते हेच.

 

राष्ट्र कितीही वेगळी असो, कितीही स्वावललंबी संस्कृती असो, मुलांना गरज असते तेव्हा धावतात ते आईवडील. लहानपणापासून आपला सांभाळ करणारे पालक वेळ पडल्यास निव्वळ आपल्यासाठी जीवाचं रान करायला मागेपुढे बघत नाहीत.

आपल्या पाल्याला काही होत असेल तर पालकांनाच त्याच्या सर्वात जास्ती वेदना जाणवतात.  आईबद्दल तर नेहेमी लिहिलं जातंच मात्र आजकाल  इतरवेळी थोडंसं दुर्लक्षित असणाऱ्या बापाबद्दलही लिहिलं जाऊ लागलंय.

वडील हे वर वर कठोर वाटले तरी ते आतून मृदूच असतात. त्यांच्या प्रेमाची भाषा कळायला मात्र थोडा वेळ लागतो हेच खरं.

 

Father and son InMarathi

 

वरील प्रसंगातील आजोबा स्वतःच्या नव्वदीत होते. तसं पाहिलं तर ह्या वयात मुलांनी त्यांची काळजी घेणं अपेक्षित होतं. पण आजारामुळे ते शक्य नव्हतं.

आणि ह्या परिस्थितीत मुलाच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले ते म्हणजे आपले coella आजोबा. ही जबाबदारी ते वयाचं कारण देऊन झटकुही शकले असते परंतु तसं न करता ते जितकं जमेल तितकं, मुलगा लवकर बरा व्हावा ह्या आशेने त्याच्यासाठी करत होते.

अशावेळी आपल्या समाजातील काही घटना बघितल्या, ऐकल्या कि मन विषण्ण होतं.

वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबांना बघून एक वेगळीच खिन्नता जाणवते.

ते ही आपल्याच समजतील घटक मात्र कोणालातरी त्यांची जबाबदारी झेपत नाही म्हणून झिडकारलेले, काहींची स्वतःची घरं असूनही घरातून हाकलून दिलेले, आजारपणाचं, खर्चाचं कारण सांगून फसवणूक होऊन बेघर झालेले असे जीव पहिले की मनाला वेदना होतात.

 

old man InMarathi

 

आपल्यासाठी कधीही काही करायला मागे पुढे न बघणाऱ्या आई वडिलांना असं वाऱ्यावर सोडवतं तरी कसं?

ह्याची उत्तरं शोधणं खरंच कठीण आहे. परंतु अनेक स्वयंसेवी संस्था अशा लोकांसाठी आज मनापासून काम करतायत हे बघून थोडा दिलासा मिळतो.

आज अनेकांची मुलं परदेशात आणि पालक इथे असतात.त्यांना काय हवं नको ते बघणारी मंडळीही ह्याच समाजात दिसून येतात . काही अनाथालयांमध्ये आजीआजोबांचं प्रेम मुलांना मिळाव म्हणून दोघांचा एकत्रित सांभाळ केला जातो.

असा पुढाकार घेणारे फार कमी असतात  मात्र हळू हळू ही संख्या वाढताना दिसून येतेय.

आज एक पाल्य म्हणून आपण काय करू शकतो आणि आपल्या जबाबदाऱ्या मनापासून कशा पार पाडू शकतो ह्याचा विचार आपण करायला हवा.

फक्त कर्तव्य म्हणून नाही तर आपुलकीने आणि मनापासून आई वडिलांची जबाबदारी घेत त्यांचं आधारस्थान बनायला हवं. आयुष्यभर ज्या स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे त्यांनी जीवन व्यतीत केलं, त्याला जराही धक्का न पोहोचवता त्यांना लागेल तेव्हा आणि लागेल तशी मदत करणं आपण आपलं आद्य कर्तव्य मानलं पाहिजे.

 

 

मुलांमध्ये अशाप्रकारची जाणीव आणि फक्त पालकांप्रतीच नाही तर सामाजिक जाणीवही निर्माण व्हावी ह्यासाठी पालकांनीही प्रयत्नशील असायला हवं. आपल्या वागण्याचं अनुकरण आपली मुलं नेहेमीच करतात.

त्यामुळे त्यांच्या समोर आपण योग्य तो आदर्शच ठेवायला हवा. जेणे करून आपलं घरंच नव्हे तर समाजही सुदृढ होईल आणि एका उत्तम समाजाचं, देशाचं हे एक चांगलं चिन्ह असेल.

चला तर मग आपल्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?