Site icon InMarathi

केवळ एका मतदारासाठी उभारल्या जाणा-या गुजरातमधील या अजब मतदान केंद्राबाबत माहिती घेऊन तुम्ही थक्क व्हाल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

निवडणूक.! लोकशाहीच्या जत्रेतला असा उत्सव ज्यात पुर्णच्या पूर्ण देश सहभागी होत असतो.

 

the indian express

 

आणि विशेष म्हणजे देशाची जनता यामध्ये हिरीहीरीने भाग घेत असते.!

उन्हातान्हात लागलेल्या लांबलचक रांगा याचं उदाहरण आहे.

पण तुम्हाला हे माहीत आहे का,गुजरातच्या गीरच्या जंगलात निवडणूक आयोग फक्त एका मतदारासाठी पुर्णच्या पूर्ण पोलिंग बूथ ची व्यवस्था करते.?

होय फक्त एका मतदारासाठी.!

कारण लोकशाहीत मतदार हा राजा असतो.!

 

indiatimes.com

 

गीरच्या जंगलात जवळपास ५५० सिंह आहेत आणि त्या सिंहाच्या मध्ये राहतो जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा ‘विशेष’ मतदार.!

त्यांचं नाव आहे महंत भरतदास दर्शनदास.!

भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मतदाराला मत कास्ट करण्यासाठी २ किलो मीटर पेक्षा जास्त प्रवास करायला लागला नाही पाहिजे.

 

scoopwoop

 

याच नियमाच्या अंमलबजावणी साठी गुजरात निवडणूक आयोगाचे कर्मचारी दोन तासात ३५ किलोमीटर चा प्रवास करून गीरच्या जंगलात मतदान बूथची निर्मिती करतात.!

एका मतदारासाठी.!

महंत भरतदास हे मूळचे पाली,राजस्थानचे. गीरच्या प्रशस्त अशा सिंहाच्या जंगलात असलेल्या शिव मंदिराचे ते पुजारी आहेत. हेच त्यांचे घर.

वीस वर्षांपूर्वी ते सगळं सोडून इथे वास्तव्यास आले. वीज पासून मोबाईल फोन पर्यंत इथे काही नाही. एका सामान्य नैसर्गिक जीवनात त्यांनी स्वतःला व्यस्त करून घेतलं आहे.

 

mapio.net

 

या जीवनात त्यांना रमायला आवडतं. पण जेव्हा पासून त्यांच्याबाबत माहिती मिळण्यास सुरुवात झाली तेंव्हापासून त्यांच्या जवळ लोकांची वर्दळ सुरू झाली.!

पत्रकारांची सुद्धा.!

याचं मंदिराच्या शेजारी मोर,काळवीट,हरीण आणि विविध पक्षी विहार करताना दिसतील.

या आधीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान केलं होतं.

भरतदास मान्य करतात की ते विशेष आहेत. त्यांच्या एकसाठी केली जाणारी तयारी आणि घेतली जाणारी मेहनत त्यांना न्यात आहे. आणि त्यामुळे त्यांना या सर्वाचा आणि त्या कर्मचाऱ्यांचा त्यांना अभिमान आहे.

 

ndtv.com

 

ते म्हणतात.”केंद्रात भाजप सरकार फक्त एका मतामुळे पडलेलं.यावरून एका मताची काय किंमत आहे ते कळून येत. एक मत किती मोठा फरक पाडू शकत हे या वरून कळत. आणि माझ्या एका मतासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी इथे येतात त्याचा मला अभिमान वाटतो.!”

तर, लोकशाहीच्या या सोहळ्यात स्थानिक वन विभागाचे आस्थापन तीर्थक्षेत्रात बदलून जातं.

वन विभागाचे कार्यालय पोलिंग बूथ म्हणून निवडणुकीत वापरले जाते. दोन दिवस इथे त्या एका मतदार राजाच्या मतदानासाठी तयारी केली जाते.

जुनागड मतदार संघात येणाऱ्या बानेज या भागाची भरतदास यांच्यामुळेचं दरवेळेस १००% मतदान घडून येतं.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या नुसार, गुजरात मध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं.

भरतदास यांच्या एका मतासाठी ८ कर्मचारी उपस्थित होते.

 

world 4 books

 

भरतदास यांचं मतदानाला येणं हे ‘अतुल्य भारत’ स्लोगन पुरेपूर सिद्ध करत.

डोळ्यावर गॉगल चढवलेले, भगवे वस्त्र परिधान केलेले भरतदास जेव्हा मतदान करायला येतात तेव्हा त्यांची छबी टिपायला बरेच पत्रकार,फोटोग्राफर तिथे गर्दी करून बसलेले असतात.

एका सामान्य निवडणुकीत एका शाळेला मतदान केंद्रात बदलायचं म्हणजे पोलिसफाटा,निवडणूक साहित्य,कागदपत्रे आणि बरंच काही.!

नियमानुसार आदल्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी मतदानासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात पासून ते केंद्र मतदानासाठी खुलं झालं पाहिजे.

आपल्या जवळच्या एखाद्या शाळेत मतदानाच्या आदल्या दिवशी चाललेली तयारी आपण पाहतच असतो.!

जी प्रक्रिया सर्वसामान्य एरियामध्ये पार पाडली जाते.

तीच प्रक्रिया बानेज मध्ये सुद्धा पार पाडली जाते. मतदार जरी एक असला तरी इथे कर्तव्यात कसूर केली जात नाही.

निवडणूक अधिकाऱ्याची रुटीन काम,पोलिंग अधिकारी यांची काम,पोलीस आणि बरचं काही. उना मधलं एचडी हायस्कूल हे जवळपास च्या २७८ पोलिंग बूथ ला कंट्रोल करत.!बानेजचं हे मतदान केंद्र यातच समाविष्ट आहे.

 

scrool.in

 

३ दिवस ही शाळा मतदान प्रक्रियेत मुख्य केंद्र असत. सगळे यंत्र,कागदपत्र इथेचं.!

नियमानुसार आणि अनपेक्षित काही घटना घडू नये म्हणून मतदान केंद्रावर निघायच्या आधी कोणत्याही कर्मचाऱ्याला माहीत नसतं की त्याला कोणतं मतदान केंद्र अलॉट झाल आहे आणि ज्याला बानेज मिळालं आहे त्यांना हे माहीत नसतं की त्यांना मतदानाच्या कामासोबत एका अँडव्हेंचर ट्रिपची सुद्धा तयारी करायची आहे.

नियमानुसार मतदान केंद्रात कमीतकमी ६ कर्मचारी असणे आवश्यक आहे.

भरतदास यांच्या मतदान केंद्रात यावेळेस पीठासीन अधिकारी,एक पुरुष पोलिंग अधिकारी,एक महिला पोलिंग अधिकारी,एक शिपाई,दोन पोलीस कर्मचारी त्यात एक स्त्री पोलीस कर्मचारी आणि दोन सहाय्यक असे एकूण आठ जण होते.

आणि विशेष म्हणजे, हे सर्व कर्मचारी बानेज पासून कमीतकमी ४० किलोमीटर अंतर असलेल्या ठिकाणावरून येथे आलेले होते.

जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं गेलं तेव्हा जवळपास सगळ्यांची प्रतिक्रिया ही सारखीच होती.

 

youtube

 

‘भारतीय लोकशाही ही यामुळेचं जिवंत आहे आणि अमर आहे. मतदार एक असो वा हजार त्याचा आपण मान ठेवला पाहिजे.आणि या विशेष मतदानाचा भाग झाल्याचा त्यांना आनंद आहे.

फक्त प्रवास आणि राहण्याची गैरसोय यामुळे फक्त त्यांना त्रास झाल्याचा ते इथे नमूद करतात.

मतदानाच्या दिवशी भरतदास सकाळी १० च्या आसपास आपलं मत दान करून मोकळे होतात.

पण नियमानुसार मतदान केंद्र सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू असणे बंधनकारक आहे. त्यामुळे भरतदास यांचं मतदान झालं तरी, या बाकी कर्मचाऱ्यांना त्यांची जागा सोडण्यास परवानगी नसते.

निवडणूक निकालासोबत पोलिंगचे निकाल सुद्धा आता गुप्त राहिलेले नाही.

त्यामुळे बानेजच्या मतदार केंद्रावर टाकलेलं मत कोणाला गेलं हे सहज कळू शकते.

भरतदास यांना याबद्दल विचारलं असता ते स्वतः काबुल करतात की त्यांचा मोदींना पाठिंबा आहे. मोदी चांगले आहेत आणि ते स्वतः साठी काम न करता देशासाठी काम करत आहेत असं ते आपलं म्हणणं नोंदवतात.

त्यामुळेच त्यांचा पेहराव हा सुद्धा भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहे असं ते म्हणतात.

 

scroll.in

 

या अशा मतदारामुळे आणि त्या मतदाराची काळजी घेणाऱ्या यंत्रणेमुळे आज लोकशाही शाश्वत आहे आणि टिकून आहे.

मत कोणाला दिल गेलं हे गौण आहे पण मतदान केल गेलं हे विशेष आहे.

करोडोचा खर्च करून यंत्रणा आपल्यासाठी राबत असते,त्यामुळे त्या कष्टाला आणि त्या आपल्याचं खर्च होणाऱ्या पैशाला न्याय देण आपली जबाबदारी आहे.!

मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा.!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version