Site icon InMarathi

रोमन इतिहास माहितीये, पण “आज” रोमन लोक कुठे आहेत? कसे जगताहेत

rome inmarathi 11

theatrius

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

रोमन संस्कृती आणि त्यांचा इतिहास हा जगाला बऱ्यापैकी माहीत आहे. अत्यंत पुढारलेली आणि लोकशाहीची पाळेमुळे जिकडून आली ती रोमन संस्कृती.

मोठे रस्ते, नियोजित नगर निर्माण, सांडपाण्याची व्यवस्था, मोठे स्टेडियम, शिल्प, कला, ज्ञानविज्ञान ही सगळी देणगी जगाला त्यांच्यामुळेच मिळाली. मंगळ ग्रह ही त्यांची देवता होती.

डायना ही कुमारी देवता कुमारिका आणि महिलांसाठी होती तिने लग्न न करण्याची शपथ घेतली होती, असं म्हटलं जातं.

जवळपास पाचशे वर्ष टिकलेलं हे साम्राज्य सगळ्यात मोठं होतं. जगामध्ये त्याचं राजकीय आणि सामाजिक स्थान त्याकाळात ठेवून होतं. आजही पाश्चात्त्य संस्कृतीच्या सर्वच क्षेत्रावर रोमन संस्कृतीचा प्रभाव दिसतो.

मुख्यतः युरोप मध्ये इसवी सन पूर्व काळापासून रोमन संस्कृती अस्तित्वात आली.

 

सध्याच्या इटलीमधील रोम येथेच या संस्कृतीचा उदय झाला. पुढे तिथल्या राजांनी साम्राज्यविस्ताराचा धडाका लावला, पण पुढे जसं साम्राज्य वाढत गेलं तशा राज्यासमोरच्या अडचणीत पण वाढ झाली.

सततची युद्ध, अवास्तव खर्च यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला. गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढत होती. श्रीमंत लोकांवर अतिरिक्त कराचा बोजा लावल्याने ते लोक खेड्यांकडे परत चालले.

तिथली बरीचशी कामं हे गुलाम लोक करायचे, परंतु नंतर थोड्या दिवसांनी गुलामांचा पुरवठा कमी होऊ लागला. साम्राज्य वाढत होतं तसं त्याच्यावर देखरेख करणंही अवघड होतं होतं.

 

 

प्रशासकीय कामात सुलभता यावी म्हणून साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन करण्यात आले मात्र त्यांचा ताळमेळ कधीही जमला नाही.

साम्राज्य विस्तारामुळे वाढलेले सैनिक, वाढलेले सैन्यदल यांना सांभाळणे कठीण व्हायला लागले.

त्यात सैनिकांची कमतरता निर्माण व्हायला लागली. सैनिक बाहेरून मागवावे लागत असल्यामुळे परदेशी लोकांना सैनिक म्हणून आणावं लागायचं.

ते सैनिक बाहेरचे असल्यामुळे त्यांना देशाबद्दल निष्ठा नव्हती. त्यामुळे फंदफितूरी वाढली. त्यांच्यातही यादवी युद्धं सुरू झाली आणि मग हळूहळू प्रशासनातही भ्रष्टाचार वाढू लागला.

 

 

जर्मन नेता प्रोडूसर याने रोमन राजा रोमुलस ऑगस्टस् ला रोम मधून बाहेर जाण्यास भाग पाडले आणि रोमन साम्राज्याचा अंत झाला. इसवीसन पाचशेपर्यंत रोमन साम्राज्याचा अस्त झाला.

पण हे जे लोक होते ते कुठे गेले आणि आता अजूनही ते आहेत का? असतील तर कोणत्या परिस्थितीत?

रोमुलस आणि रॅम्स या दोन भावांनी (ज्यांना लांडगीने वाढवलं अशी दंतकथा आहे) रोम शहराची उभारणी केली होती. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल करण्यात आली.

 

 

नंतर युरोपात ख्रिश्चन धर्माच वर्चस्व वाढलं आणि तिथे बरेच लोक ख्रिश्चन झाले. नंतर हे रोमन लोक संपूर्ण युरोप खंडात, अफ्रिका खंडात आणि अमेरिकेतल्या काही भागात स्थलांतरित झाले.

१८७० मध्ये इटलीच्या एकीकरणानंतर रोमला इटलीची राजधानी करण्यात आली आणि आता जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी रोमला भेट देतात.

रोम शहरात फिरताना इतिहासाच्या पाऊलखुणा पदोपदी दिसतात.

 

 

जुन्या रोममध्ये अजूनही पुरातन काळातले दगडी रस्ते तसेच आहेत. बरीच पडझड झालेली कलोसीयम स्टेडियम पाहतानाही त्याची भव्यता लक्षात येते. रोमन संस्कृतीच्या खुणा मात्र रोम मध्ये खूप जपून ठेवल्या आहेत.

ग्रीक संस्कृतीतही रोमन लोकांचा खूप मोठा प्रभाव होता. ग्रीक लोक स्वतःला “ग्रीक ऱ्होमायो” असे म्हणून घेतात. परंतु आता १९ व्या शतकानंतर ते स्वतःला तसे म्हणून घेत नाहीत.

 

 

ग्रीक लोकांचा देश आणि त्यांच्या सैन्याच्या शिस्तबद्धपणा त्याकाळी एक कुतूहलाचा विषय होता. त्याबद्दल असे म्हटले जाते की,

एका बेटाचा ग्रीकांनी ताबा घेतला. त्यावेळेस ग्रीक सैनिकांना बेटावरील प्रत्येक गावात पाठवण्यात आलं आणि चौकाचौकात उभे राहण्यास सांगण्यात आले.

ग्रीक सैनिक कसे दिसतात हे पाहण्यासाठी त्या बेटांवरचे लहान मुलं त्यांना पाहायला यायचे आणि मग सैनिकांनी विचारलं की, “तुम्ही काय पाहत आहात” तर ते म्हणायचे की, “आम्ही helen’s पाहत आहोत”.

मग सैनिकांनी म्हटलं की तुम्ही helen’s नाहीयेत का?” तर ते म्हणायचे, “नाही आम्ही रोमन आहोत”.

 

रोमन लोक पाचव्या शतकापर्यंत लॅटिन भाषा बोलायचे. त्या भाषातले काही शब्द साधारणपणे स्वित्झर्लंडच्या बाजूला अजूनही थोडेफार वापरले जातात.

२०१७ मध्ये केलेल्या सर्वेनुसार साधारण ४५ हजार लोक स्वित्झर्लंडमध्ये रोमन्स आहेत आणि ते रोमन ही भाषा बोलतात.

ग्रीसचा भाग जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये सामील करण्यात आला त्यावेळेस तिथल्या भागात ही भाषा बोलणारे खूप मोठ्या प्रमाणावर होते.

 

 

१८८० सालापर्यंत रोमन बोलणारे लोक साधारण एकाच क्षेत्रांमध्ये राहत होते. परंतु त्यानंतर मात्र जागतिकीकरणाच्या फेऱ्यांमध्ये ते विखुरले गेले.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपली भाषा वाचवली पाहिजे आणि ती वापरात आणली पाहिजे म्हणून ‘ऱ्हायटो रोमन्स रीजनस’ ही भाषा विषयक चळवळ स्वित्झर्लंडमध्ये सुरू झाली.

आणि त्यानंतर १९३७ मध्ये रोमन भाषेला स्वित्झर्लंडची चौथी भाषा म्हणून मान्यता मिळाली.

फ्रान्समधल्या रोमन लोकांना रोमंडस असंही म्हटलं जातं, ते फ्रेंच भाषासुद्धा व्यवस्थित बोलतात. पुढे देश बदलत गेले तसे तसे भाषेमध्ये पण बदल झालेले आहेत.

म्हणजे जर्मनी मधली भाषा वेगळी आणि इटलीमध्ये मधली पण वेगळी. तुर्कस्तानात ही वेगळी भाषा वापरली जाते.

थोडक्यात काय तर जे रोमन लोक रोमन्स बोलतात त्यांना तिथली स्थानिक भाषा ही त्यांना व्यवस्थित बोलता येते.

शेवटचा रोमन सम्राट बायझेंटाईन हा तुर्कस्थानात होऊन गेला परंतु मुस्लिम आक्रमणानंतर त्याचं राज्य गेलं. आता तुर्कस्तान हा मुस्लिम बहुल प्रदेश होतोय.

 

 

म्हणूनच म्हटलं जातं की, रोमन लोकं ही मेल्टिंग बॉक्सेस आहेत. म्हणजे कुठल्याही संस्कृतीमध्ये त्यांचं सहज विलीनीकरण होतं.

मुख्यतः युरोपमध्ये इटली, फ्रान्स, जर्मनी, रशिया, इंग्लंड, स्पेन, तुर्कस्तान, बेल्जियम, ऑस्ट्रिया, नॉर्वे, पोलांड, डेन्मार्क, बल्गेरिया, czech रिपब्लिक, हंगेरी, स्वीडन, पोर्तुगाल या देशांमध्ये रोमन लोकसंख्या आहे.

तर उत्तर अमेरिका, कॅनडा तसेच दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, या देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही थोड्याफार प्रमाणात रोमन नागरिक आढळतात.

आता इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी रहात असल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत त्या – त्या प्रदेशाची वैशिष्ट्यं सामाविष्ट झाली आहेत.

सध्याच्या काळाचा विचार करायचा झाला तर मूळ रोमन सापडणं तसं कठीणच. सध्या कॉस्मोपॉलिटन संस्कृती संपूर्ण जगभर पसरत असताना ही शक्यता फारच कमी.

परंतु अजूनही म्हटलं जातं की, रोमच्या जवळपासच्या खेड्यांमध्ये किंवा इटलीच्या कंट्री साईड भागात म्हणजे शहरांपासून लांब आलेल्या खेड्यांमध्ये मूळ रोमन दिसतात.

म्हणजे तसेच उंच, देखणे, गोरे आणि तगडे लोक त्या भागात आढळतात. परंतु ते संख्येने कमी आहेत.

 

 

रोमन संस्कृती लयाला गेली मात्र त्यांनी जगाला खूप उपयुक्त गोष्टी दिल्या जसं की, (अल्फाबेट्स) अक्षर, (लँग्वेज ) भाषा, (लॉज) कायदे, (कॅलेंडर) दिनदर्शिका, वास्तुशिल्प (आर्किटेक्चर), धर्म (रिलिजन) आणि करमणूक (इंटरटेनमेंट).

या महत्त्वाच्या गोष्टींवर आजच जग उभं आहे. सध्या युरोपियन संस्कृतीला थोड्याफार प्रमाणात रोमन संस्कृती म्हटलं जातं, कारण रोमन लोकांचा खूप प्रभाव युरोपमध्ये पडलेला आहे.

रोमन संस्कृतीच्या खुणा युरोपभर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता राहीलेले रोमन लोकही आधुनिक जगाच्या आधुनिकतेचे स्वागत करताना, त्यात एकरुप होताना दिसतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version