Site icon InMarathi

जगातील फक्त “या” दोन देशांमध्ये कोका कोला विकला जात नाही, हे आहे कारण!

cocoa cola inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पार्टी फंक्शन, हॉटेलमध्ये लंच/डिनर, मीटिंग किंवा तत्सम सेलिब्रेशनच्या वेळेस अल्कोहॉलिक असो वा नॉन अल्कोहॉलिक, प्रत्येकाच्या टेबलवर कोका-कोला किंवा तत्सम ब्रँडचं पेय असणार म्हणजे असणार.

असले तर काही अपवाद असतील, पण जगात सर्वात जास्त घेतलं जाणार सॉफ्ट ड्रिंक म्हणजे कोका-कोला. 

१८८६ मध्ये जॉन पेमबर्टन यांनी तयार केलेलं हे पेय १९०० च्या नंतर अमेरिकेत जबरदस्त लोकप्रिय झालं. १८९२ ला ‘कोका कोला कंपनी’ स्थापन झाली आणि तिने जगभरात आपले हात-पाय पसरवायला सुरवात केली.

कोका कोला कंपनीचा बिझनेस आज एवढा वाढला आहे की, ती दिवसाला आपले १०८ करोड प्रॉडक्ट्स खपवते.

 

 

आजतागायत १९५ पैकी १९३ देशात कोका कोला विकला जातो, पण दोन देशात नाही.

ते दोन देश म्हणजे तेव्हाचा फिडेल कॅस्ट्रो चा क्युबा आणि हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया. 

पण या दोन देशातच कोका-कोला ला बंदी आहे असं नाही. या ही आधी बरेच असे देश होते ज्यांनी कोका-कोला वर बंदी आणली होती. त्यांच्याशी बिझनेस करार मोडला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पाहूया, काही असे देश ज्यांनी कोका कोला वर निर्बंध आणले होते, पण नंतर परत त्यांच्याशी व्यवसाय सुरू केला.

 

• चीन 

 

 

चीनमध्ये कोका कोला कंपनी १९२७ ला आली. १९४९ पर्यंत जबरदस्त हिट झाली आणि मग या कंपनीला  उतरती कळा लागली. का?

नाव- माओ झेडोंग. चिनी हुकूमशहा. याने पश्चिमेकडून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर याने बंदी आणली. सो कोका कोला कंपनी चीन बाहेर गेली.

परत चीन मध्ये यायला तिला १९७९ पर्यन्त वाट बघावी लागली.

 

• दक्षिण कोरिया 

 

 

आपल्या बिझनेस पॉलिसीमुळे दक्षिण कोरियाने परदेशी कंपन्यांना व्यवहार करण्यास बंदी आणली होती.

परंतु १९७० ला दुसन बॅवरेज कंपनी सोबत करार करून कोका कोला कंपनी दक्षिण कोरियात उतरली.

• व्हिएतनाम 

 

 

व्हिएतनाम युद्ध कोणाला माहीत नाही? यामुळेच अमेरिकन मूळ असलेली कोका कोला तिथे बॅन झाली.

पुढे युद्धाचा शेवट झाल्यानंतर, १९९४ च्या दरम्यान बंदी उठल्यावर कोला परत तिथे विकला जाऊ लागला.

 

• रशिया 

 

 

१९७९ ला सोव्हिएत रशियाने ऑलम्पिकमुळे स्वीकारलेल्या धोरणामुळे कोका कोला ने रशियात प्रवेश केला पण शीत युद्धामुळे तिला आपला पहिला प्लांट ओपन व्हायला १९९४ पर्यत वाट पाहावी लागली.

सोव्हिएत रशियाच्या विघटना नंतर कोका कोला ने आपला प्लांट रशिया मध्ये उघडला.

 

• जर्मनी 

 

१९२९ ला कोका कोला जर्मनी ला पोहोचली पण नंतर हिटलरच्या धोरणामुळे कोका कोला ला तिथून आपलं बस्तान गुंडाळून ठेवावं लागलं.

नंतर परत तिथे व्यवसाय करायला कोका कोला ला बर्लिन वॉल पडायची वाट पाहावी लागली.

 

• इस्त्रायल 

 

 

१९४९ ला इस्त्रायल मध्ये कोका कोला कंपनी पोहोचली, पण काही गुप्त कारणामुळे तिच्या वर बंदी घातली गेली.

नंतर अमेरिकन ज्युईश लोकांनी लावलेल्या सेटिंग मुळे १९६६ ला कोका कोला इस्त्रायल मध्ये पुन्हा सुरू झाली.

 

• भारत

 

होय भारत सुद्धा.

आपल्याकडे कोका कोला कंपनी आली १९५० ला. जवळपास १९७७ पर्यंत त्यांनी मजबूत पैसे छापले.

पण,भारत सरकार ने लागू केलेल्या फॉरेन एक्स्चेंज अॅक्टच्या अंतर्गत कोका कोला ला आपलं बस्तान बांधून परत मायदेशी जावं लागलं.

१९९२ ला नरसिंहराव सरकारने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर कोका-कोला पुन्हा भारतात कोला विकायला परत आली.

तर हे काही देश होते जिथे कोका कोलाला बंदी होती पण नंतर सेटलमेंट करून ती बंदी उठवली गेली. तरी आज क्युबा आणि उत्तर कोरिया या देशात अजून कोका कोला ला बंदी आहे.

बघूया नेमकं काय कारण आहे.

 

• क्युबा 

 

 

क्युबा आणि अमेरिकेमधला तणाव तर जगजाहीर आहे. या दोघांमुळेच जग तिसऱ्या महायुद्धाच्या सीमारेषेवर वर उभं होतं. अशा गोष्टी होत असताना हे दोघं एकमेकांसोबत व्यापार करतील असं वाटतं?

१९०६ मध्ये कोका कोला ने क्युबा मध्ये पाय ठेवला. अल्प अवधीतचं ते प्रसिद्ध सुद्धा झाले आणि क्युबा च्या राजकारणात एन्ट्री झाली साम्यवादी विचारसरणीच्या फिडेल कॅस्ट्रो ची.

तेव्हा कम्युनिस्ट आणि इंडस्ट्रीयालिस्ट यांचं संगनमत झालं म्हणजे ते ८वं आश्चर्य असलं असतं.

जसा कॅस्ट्रो सत्तेत आला तसं अमेरिकेशी त्याने व्यवहार तात्काळ थांबवले आणि सगळ्या अमेरिकन कंपन्या तिथून बस्तान बांधून निघून गेल्या. त्यात कोका कोला सुद्धा होती.

फिडेल कॅस्ट्रो च्या वेळेस निर्माण झालेला तणाव आजसुद्धा तेवढाच ताणलेला आहे.

म्हणून, कोका कोला अजून क्युबाच्या बाहेर आहे.

 

• उत्तर कोरिया 

१९१० ला कोरिया जपान पासून स्वतंत्र झाला. त्यात त्याचे दोन तुकडे झाले. उत्तर आणि दक्षिण.

उत्तर गेले सोव्हिएत रशियासोबत आणि दक्षिण गेले अमेरीकेसोबत.

सोव्हिएत रशिया आली म्हणजे अमेरिके सोबत वाद आलेच. म्हणून, अमेरिकन प्रॉडक्ट्स उत्तर कोरियेत विकले जात नाहीत.

नंतर दोन्ही कोरियन देशामधील युद्ध, दुसरे महायुद्ध यामुळे सदर वाद चिघळत राहिला आणि त्यात भर घातली ती एका घटनेने.

१९८० ला उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर बॉम्ब हल्ला केले. कोरिया युद्धामुळे अमेरिकेने उत्तर कोरिया वर एनिमी अॅक्ट च्या अंतर्गत आर्थिक निर्बंध घातली. जी २००८ पर्यंत लागू होती.

 

 

त्यामुळे अमेरिकन कोणतीच कंपनी तिथे व्यवसाय करत नव्हती.

नंतर आलेल्या किम जोंग उनने तर धडाधड आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून अण्वस्त्र विकसित करायला सुरुवात केली आणि वाटेल तेव्हा त्याची चाचणी करायला लागला.

म्हणून, पश्चिमी कंपन्या अजून तिथे बिझनेस करत नाहीत. त्यातीलच एक कोका कोला.

क्युबा आणि उत्तर कोरिया सोडलं तर जगात प्रत्येक देशात कोका कोला हा विकला जातो आणि तो ही प्रचंड प्रमाणात.

त्यामुळे दिवसाला करोडो डॉलरचा बिझनेस करणाऱ्या कोका कोलाला यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version