Site icon InMarathi

करोना व्हायरस वर औषध शोधणाऱ्या भारतीय संशोधकाचं यश जाणून घ्यायलाच हवं

dr wasan 1 inmarathi

toi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

सध्या जगभर करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्याचा उगम चीनमधून झाला आणि आता तो ‘वाढता वाढता वाढे’ या उक्तीप्रमाणे जगभर पसरला आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत तीस हजार लोकांना याची लागण झाली आहे.

त्यापैकी ७०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. तिथून हा व्हायरस जगभर पसरला आहे. जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमध्ये करोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये ५ ब्रिटिश नागरिक आढळले आहेत ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे.

 

fox news

अजूनपर्यंत तरी चीन व्यतिरिक्त इतर कुठल्याही देशातील करोना व्हायरसचा रुग्ण दगावल्याची बातमी नाही. हा नवीन व्हायरस २००३ साली आलेल्या सार्स करोना व्हायरस या फॅमिलीतील एक नवीन प्रकारचाच व्हायरस आहे.

त्याच्यावर अजून पर्यंत तरी औषध शोधण्यात यश मिळालं नव्हतं. गेली दीड-दोन महिने हा व्हायरस पसरतो आहे. चीनमधल्या हुआन प्रांतातील मासळी बाजारातून हा व्हायरस पसरला असं म्हटलं जात आहे, कारण हुआन मध्येच या व्हायरसचे रुग्ण सगळ्यात जास्त आढळून आले आहेत.

 

south china morning post

 

स्वतः चीननेच हुआन प्रांतात जाणाऱ्या सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला प्रतिबंध केला आहे. लोकांनाही घराबाहेर न पडता घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत. लागण झालेल्या लोकांसाठी स्वतंत्र वैद्यकीय हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत.

रात्रंदिवस या व्हायरसवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न होत आहेत, परंतु त्यात यश येत नव्हतं. मध्ये तर अशी अफवा आली की चीनमध्ये ज्या ज्या लोकांना करोना व्हायरसची लागण झालीय त्या सगळ्यांची सामूहिक हत्या करण्यात येणार आहे.

त्यासाठी त्यांनी कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. नंतर ही फेक न्युज असल्याचे उघड झाले. परंतु चीनचा इतिहास पाहता ते असे पाऊल उचलायला मागेपुढे पाहणार नाहीत, आणि जगाला त्याचा पत्ताही लागणार नाही.

 

 

म्हणूनच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा या व्हायरस वरील औषधासाठी प्रयत्नशील होतं. त्याच्यावर रात्रंदिवस संशोधन सुरू होतं. सध्या यासंबंधी जागतिक आरोग्य आणीबाणी लावावी का? याविषयी चर्चा WHO मध्ये होत आहेत.

आणि त्याच वेळेस एक सकारात्मक, चांगली बातमी ऑस्ट्रेलियातून या व्हायरसच्या अनुषंगाने आली आहे आणि यात भारताचा संबंध आहे. मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. वासन यांना या व्हायरस वरील संशोधनात यश मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील डोहेर्टी इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांना हा व्हायरस तयार करण्यात यश आलं आहे आणि त्यामुळेच आता त्यावर औषध शोधणं सोपं जाणार आहे.

हा व्हायरस, प्राणी आणि मनुष्य या दोघांनाही होऊ शकतो आणि त्याची वाढ शरीरातच होते. चीन मध्येच हे रुग्ण जास्त संख्येने असल्यामुळे त्यावर चीनमध्येच संशोधन केलं जातं होतं.

daily express

 

आता चीन मध्ये जे संशोधन सुरू होतं त्यानुसार, त्यांना तो व्हायरस माणसाच्या शरीरातून वेगळा करणं शक्य होत नव्हतं. आता मात्र तो व्हायरस वेगळा करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

तो आता लॅबरोटरी मध्ये तयार करण्यात आला आहे, त्यामुळेच आता त्यावर संशोधन करणे आणखी सुकर होणार आहे. एस. एस. वासन यांच्या मते, जेव्हा तुमच्याकडे व्हायरसचे खूप नमुने असतील त्यावेळेस त्यावर काम करणे अधिक सोपं असतं.

व्हिएतनाम मधून ऑस्ट्रेलिया मध्ये आलेल्या एका नागरिकाला करोना व्हायरसचं निदान झालं आणि त्याचे सॅम्पल्स तपासणीकरिता इन्स्टिट्यूट मधल्या शास्त्रज्ञांकडे पाठवण्यात आले.

 

france 24

 

त्यातूनच शास्त्रज्ञांनी व्हायरस वेगळा करून त्यांची संख्या वाढते का हे पाहण्यासाठी संशोधन केलं आणि त्यात त्यांना आता यश आले आहे. त्यामुळेच त्याच्यावरची लस शोधण्यात किंवा औषध शोधण्यात यश मिळेल अशी शाश्वती शास्त्रज्ञांना वाटते आहे.

हे संशोधन करण्यात वासन यांचा प्रमुख वाटा आहे. तिथे चाललेल्या संशोधनातील ते प्रमुख आहेत. त्यांचे शिक्षण भारतातील बिट्स पिलानी युनिव्हर्सिटी आणि IICS बेंगलोर येथे झाले आहे.

नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी डॉक्टरेट केली. त्यांनी डेंग्यू ,चिकुनगुनिया, आणि झिका या आजारांवरही संशोधन केले आहे.

 

 

चीनबाहेर, संशोधनासाठी ह्या व्हायरस चे सँपल मिळणे कठीण होतं. पण commonwelth scientific and industrial research organisation (CSIRO) च्या ऑस्ट्रेलियातील high security lab मध्ये याचं संशोधन झालं आहे, आणि व्हायरस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

मोठ्या प्रमाणात व्हायरस मिळाला तर पुढचं संशोधन आणखी सोप होईल, असा विश्वास वासन यांना वाटतो. एकदा का या व्हायरसची वैशिष्ट्य कळली तर व्हॅक्सिन शोधायला मदत होईल.

व्हायरस तयार व्हायला किती वेळ लागतो? त्याचा माणसाच्या श्वसनसंस्थेवर काय परिणाम होतो आणि तो दुसऱ्याच्या शरीरात कसा संक्रमित होतो? त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो? हे पण लवकरच कळेल असं त्यांचं म्हणणं आहे.

 

India TV

 

व्हायरस वेगळा करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसंच, पुढे अजूनही त्यावरील लस शोधण्यासाठी, antidote तयार करण्यासाठी त्याची मदत होईल.

जेणेकरून आजाराचं निदान झाल्यावर त्याचा पाठपुरावा करण्यात येईल आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो हे ही पाहिलं जाईल. असं त्यांनी नमूद केलं आहे.

येत्या १६  आठवड्यांचं टार्गेट त्यांनी ठरवले आहे, ज्यामध्ये करोना व्हायरसची लस शोधण्याचा त्यांचा संकल्प आहे.

 

natural news

 

आजपर्यंत अनेक साथी, आजार या पृथ्वीवर आले आणि मानवाने त्यावर काहीतरी उपाय शोधून काढला आहे. आताही जगाला हादरवून सोडणाऱ्या आणि मानवजातीसाठी घातक असलेल्या ह्या व्हायरस वर लवकरात लवकर लस उपलब्ध होऊ दे.

डॉ. एस. एस. वासन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कामासाठी अभिनंदन आणि पुढच्या संशोधनासाठी शुभेच्छा!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version