Site icon InMarathi

कॅन्सरचा धोका वाढवणारे हे पदार्थ तुमच्या आहारात तर नाहीयेत ना?

cancer causing food 1 inmarathi

10 key things

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

आपल्यापैकी प्रत्येकालाच आजकाल आपल्या आहाराची काळजी घेण्याची गरज आहे. कारण आपण रोज कितीतरी प्रमाणात अशा घटकांचं सेवन करतो जे घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहेत.

अशा घटकांच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आपण काय खात आहोत याची कल्पना आपल्याला नक्कीच हवी. सर्व आजारांमध्ये कॅन्सर असा आजार आहे जो आजार जडल्यानंतर माणसाला मृत्यूशिवाय दुसरं काही दिसत नाही.

आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये जर काही गोष्टी घेतल्या नाहीत तर आपण या जीवघेण्या आजारापासून स्वतःला नक्कीच वाचवू शकतो.

 

 

रोज नकळतपणे आपण अशा अनेक गोष्टींचं सेवन करतो ज्यामुळे कॅन्सरला पोषक घटक आपल्या शरीरामध्ये जात असतात.

कुठले पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरात कॅन्सर वाढू शकतो जाणून घेऊयात…..

काही गोष्टी अशा देखील आहेत ज्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही तुमच्या आरोग्याची निगा राखतं आहात परंतु त्यामुळे तुमच्या शरीरात काही घातक घटक चालले आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

१. मायक्रोवेव पॉपकॉर्न

 

rd.com

 

आज कालच्या या धावत्या युगात झटपट तयार होणाऱ्या अन्नपदार्थांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पॉपकॉर्न देखील आज-काल आपण खूपच झटपट तयार करायचा प्रयत्न करतो, पण खरंच हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे का?

कारण अशाप्रकारे मायक्रोवेव्हमध्ये झटपट तयार झालेल्या पॉपकॉर्न मुळे तुम्हाला लिव्हर आणि पॅनक्रिया कॅन्सर होण्याचा धोका उद्भवू शकतो.

झटपट तयार होणाऱ्या पॉपकॉर्न मध्ये अनेक प्रकारचे केमिकल मिश्रित केलेले असतात त्यामुळे तुम्हाला पॉपकॉर्न खाताना कृत्रिम बटर सारखी चव लागते.

चित्रपट बघताना आवडीचे स्नॅक्स खाणे बंद करु शकला नाहीत तर कमीत कमी पॉपकॉर्न खाण्याची सवय तरी नक्कीच बदला त्यामुळे अनेक धोके नक्कीच कमी होतील.

 

२. केमिकल्स असलेली फळं

 

 

कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की, बाजारात येणारं प्रत्येक फळ आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. परंतु यातील काही फळं आणि भाज्या ह्या अजैविक पद्धतीने तयार केलेल्या असतात ज्यावर भरपूर प्रमाणात केमिकल्सचा वर्षाव होतो.

हे केमिकल्स मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात आणि त्यांच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अनेक असे केमिकल्स आहेत जे भारतामध्ये भाज्यांवर आणि फळांवर सर्रासपणे फवारले जातात.

युरोपमध्ये अशा केमिकल्स वरती बंदी आहे. कारण या केमिकल्स मुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता बळावते.

त्यामुळे आज-काल फळांचे सेवन करताना शक्यतो फळ पाण्याने चांगल्या प्रकारे स्वच्छ करूनच घ्यावीत.

 

३. प्रक्रिया केलेलं मांस

 

popsci.com

 

आपल्यापैकी काही जण शुद्ध मांसाहारी असतील याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळेच जर मांसाहार तुम्हाला प्रिय असेल तर मात्र त्यातही काही गोष्टींची काळजी ही घेतली गेलीच पाहिजे.

आजकाल काही प्रमाणात प्रक्रिया केलेले मांस काही ठिकाणी सर्रास वापरले जात आहे. ही गोष्ट अत्यंत घातक आहे कारण प्रक्रिया करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मीठ आणि केमिकल्स वापरले जातात.

ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर अपाय होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे तुम्हाला ४४% कॅन्सर होण्याची शक्यता बळावली जाते.

एका अहवालानुसार, जर तुम्ही अशा प्रकारचे अन्न खाताय तर तुमचं आयुष्य नक्कीच घटतंय.

 

४. बटाट्याचे चिप्स

 

aspenspecialtyfoods.com

 

हे चिप्स सर्वात स्वस्त, सोपे आणि चवदार असे स्नॅक्स म्हणून ओळखले जातात, परंतु हेच प्रसिद्ध स्नॅक्स खाल्ल्यामुळे कधीकधी गंभीर परिणामांना सामोरे देखील जावे लागू शकते.

कारण अशा प्रकारचे पदार्थ तुमचे वजन भरपूर प्रमाणात वाढवू शकतात. यामध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असते. त्यासोबतच यामध्ये सोडियम देखील भरपूर प्रमाणात वापरले जातं. ज्यामुळे तुमचं ब्लडप्रेशर वाढू शकतं.

यामध्ये कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स देखील वापरले जातात, यांना टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह देखील मोठ्या प्रमाणावर ती वापरली जातातं हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ नेहमीच टाळायला हवेत.

 

५. डाएट पदार्थ

 

indiglamour.com

 

आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत एक प्रथा रुढ झाली आहे. ती म्हणजे बाहेरच्या अन्नपदार्थांमध्ये जर डाएट असा उल्लेख असेल तर ती गोष्ट लगेच सेवन करणे योग्य आहे असे समजणे.

कारण डाएट किंवा लो फॅट असं ज्या अन्नपदार्थांवर ती लिहिलेलं असतं त्याचं सेवन केल्यामुळे वजन वाढत नाही हा गैरसमज, परंतु तुम्हाला माहिती आहे का यामुळे आपण आपल्या शरीराचं प्रचंड प्रमाणात नुकसान करत आहोत.

विचार करा, डाएट म्हणजे असे अन्नपदार्थ असतात ज्यामध्ये घटक रासायनिक पद्धतीने कमी-जास्त केले जातात, यामध्ये कृत्रिम गोडवा देखील मिसळलेला असतो आणि लक्षात ठेवा अशा प्रकारचे पदार्थ तुमच्या शरीराला अपायच करत नाहीत तर त्यासोबतच यामुळे खऱ्या अर्थाने कॅन्सरला निमंत्रण देत असतात.

अशा प्रकारच्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे अनेक आजार जडू शकतात. या पदार्थांचं आज कालच्या तरूणाईला जणू व्यसनच जडलेलं आहे. त्यामुळे सतर्क होऊन या पदार्थांपासून दूर राहण्यातच शहाणपण आहे हे लक्षात घ्या.

 

६. मद्य

 

दारू जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच हानिकारक आहे कारण यामुळे हृदय विकार, स्ट्रोक यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

दारूचे सेवन करताना अत्यंत कमी प्रमाणात करावे त्यामुळे ती शरीरासाठी हानिकारक ठरणार नाही, परंतु खूप जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे तुम्हाला तोंडाचा, लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो.

त्यामुळे दारूपासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

 

७. सॉफ्ट ड्रिंक्स

 

saigoneer.com

 

आपल्याकडे सॉफ्ट ड्रिंक्सचं प्रस्थ देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे कारण कुठलीही पार्टी असो सॉफ्ट ड्रिंक पाहिजेच. सॉफ्ट ड्रिंक मध्ये काय येतं? सोडा आणि इतर अनेक कंपन्या ज्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या नावाखाली वेगवेगळ्या फ्लेवरचा सोडा विकतात.

या सॉफ्ट ड्रिंकमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, साखर आणि इतर कृत्रिम घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावरती अपाय होण्याची शक्यता वाढते.

 

 

सोड्याच्या एका कॅनमध्ये जवळपास दहा वाट्या शुगर टाकलेली असते, जे एका अॅसिड इतकंच घातक आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी सोडा जरी घेत असाल तरी तुम्हाला या सेवनामुळे अपायच होणार आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version