' इंग्रजी बोलायला घाबरताय? तर या ५ टीप्स आजमावून बघाच! – InMarathi

इंग्रजी बोलायला घाबरताय? तर या ५ टीप्स आजमावून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका : श्रुती कुलकर्णी 

===

नमक हलाल सिनेमातला अमिताभ बच्चन यांच्या तोंडचा तो “I can talk English, I can walk English because English is a very funny language!” डायलॉग आठवतोय का??

अगदी तशीच अवस्था आपल्या मराठीमधून क्षिकलेल्या मुलांची असते!

कॉलेजच्या शेवटच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यासाठी “प्लेसमेंट” सुरु होते आणि मी मी म्हणणारे हुशार विद्यार्थी सुद्धा बिथरलेले दिसत होते.

म्हणून अशाच एका ‘हुशार’ विद्यार्थ्याला बोलावून विचारलं की “काय रे ८०% मार्क असताना का घाबरतोस?” – तो म्हणाला “मॅडम मी मराठी शाळेतून शिकलोय”!

तेव्हा डोक्यात प्रकाश पडला की बहुतेक मराठी माध्यमाची पोरं निव्वळ ‘मराठी’ असल्याच्या न्यूनगंडामुळे मागे पडत चालली आहेत.

म्हणजे ज्यांना इंग्रजी व्यवस्थित येतं, ते सुद्धा “मी मराठी माध्यमातून शिकलोय”, “इंग्रजी शाळेतलया मुलांसमोर बोलताना मी चुकणारच!”

अशा पूर्वकल्पना करूनच बोलतात किंवा किंबहुना बोलतच नाहीत आणि आयुष्याच्या उमेदीच्या क्षणी ठेचाळतात.

 

taare zameen par marathipizza

 

ज्या लोकांना या चक्रव्यूहातून बाहेर यायचे असेल त्यांच्यासाठी काही टिप्स:

१. मराठीचा अभिमान असावा पण म्हणून इंग्रजीचा द्वेष करू नये

कोणतीही नवीन भाषा शिकल्याने आपल्याला फायदाच होणार आहे हे लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकल्यामुळे तुमच्यातला मराठीपणा कुठेही लोप पावणार नाही हे ही समजून घ्या.

 

english-to-marathi-marathipizza01

२. इंग्रजी वर्तमानपत्र आठवड्यातून तीनदा तरी वाचा

आणि त्यातल्या किमान पाच नव्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. त्यातील वाक्यरचना समजून घ्या. शब्दसंग्रह जितका वाढवाल, वाक्यांची बांधणी जसजशी समजून घ्याल, तसतसा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल.

 

english inmarathi
fluency corp

३. इंग्रजी सिनेमे, मालिका नियमित पहाण्याचा प्रयत्न करा

सुरुवातीला उपशीर्षकां (subtitles) सहित पहावे. (तरीही पहिले ५ सिनेमे कळणार नाहीत!) पण निराश न होता प्रयत्न चालू ठेवावेत १० सिनेमांनंतर तुम्हाला subtitles शिवाय सिनेमे समजू लागतील.

 

commondo inmarathi

या मुळे नवीन इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार तुमच्या कानी पडतील आणि इंग्रजीतून विचार करण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होईल. सर्वात महत्वाचं म्हणजे लिखित इंग्रजी भाषा “बोलली” कशी जाते हे कळून येईल.

इंग्रजी लिखाण-वाचनावरील प्रभुत्व ही पहिली पायरी आहे. तिचं “बोली भाषेत” स्वरूप कसं आहे हे इंग्रजी चित्रपट, टीव्ही सिरीजमधून उत्तम कळतं.

४. रोज अर्धातास तरी बोलणं

मित्र, मैत्रीण, आई बाबा किंवा आरसा यांच्या पैकी कोणा एका सोबतका होईना रोज अर्धातास बोला.

( काही सुचत नसेल तर पाहिलेल्या इंग्रजी सिनेमातले डायलॉग म्हणा, किंवा स्वतःबद्दल बोला, म्हणजे तुमचं नाव, शाळा वगैरे) – मग तुमच्या चुका तुम्हालाच लक्षात येतील आणि या चुका पुढे होणार नाहीत याची काळजी घ्या. जमलं तर चार लोकांसमोर बोला.

 

 

ही पायरी अत्यंत महत्वाची आहे. बोलण्याचा सराव स्वतः केल्याशिवाय तुमचं स्पोकन इंग्लिश सुधारणार नाही.

 

५. पुस्तक

फक्त वर्तमानपत्र वाचून शब्दसंग्रह वाढवणं कठीण आहे. इंग्रजी साहित्याला शिवल्याशिवाय त्या भाषेवर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा का होईना एक पुस्तक जरूर वाचावं.

सुरुवातच करायची असेल तर सुधा मूर्तींच्या पुस्तकांपासून करा, इंग्रजी किती सोपं आहे हे ती पुस्तकं सांगतात…!

 

sudha murthy books

 

आणि शेवटी, यादीत नसलेली परंतु सर्वात महत्वाची गोष्ट –

तुम्ही मराठी माध्यमातून शिकलाय ही समस्या नसून एक संधी आहे हे नीट समजून घ्या.

तुम्ही तुमची मातृभाषा पूर्णपणे आत्मसात केली असल्याने तुम्ही तिचा तर आस्वाद लुटताच (तुम्हाला पु.ल. कळतात…!). आता तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळत आहे हे ध्यानात ठेवा.

हे ही लक्षात ठेवा की इंग्रजी ही “आपली” भाषा नसल्यामुळे तिचा वापर करताना आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहेच, फक्त चुकांची पुनरावृत्ती होणार नाही एवढं पहा.

तुमच्यासमोर अनेक लोक असे असतील जे मराठी माध्यमांतून शिकले पण अस्खलित  इंग्रजी बोलतात.

त्यांनी देखील वरील ५ युक्त्याच वापरल्या आहेत ह्याची खात्री बाळगा…आणि आत्मविश्वासाने कामाला लागा…!

गुड लक! 🙂

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?