' या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता – InMarathi

या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दिनांक १३ जुलै २००२….कोणत्याही क्रिकेट प्रेमीला झोपेत जरी ही तारीख विचारली तर एकच उत्तर येईल,

नेटवेस्ट सिरीजची फायनल आणि धाकधूक करत जिंकलेल्या फायनल नंतर लॉर्ड्स च्या बाल्कनीत टीम इंडियाची जर्सी काढून हवेत फिरवणारा गांगुली!

सौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!

जिथे टेस्ट मध्ये भारतीय टीम ड्रॉ करायला बघायची, वन डे मध्ये एका पाठोपाठ एक पराभव सहन करायची अशातच भर म्हणजे फिक्सिंगच्या कांड मध्ये अडकलेल्या टीम इंडियाचं नेतृत्व सौरव गांगुली कडे आलं.

 

saurav ganguly inmarathi

===

हे ही वाचा राहुल द्रविड आणि सौरव गांगुली – या जोडगोळीने घडवलेल्या एका जबरदस्त चमत्कराचा किस्सा

===

सचिन, सेहवाग, स्वतः गांगुली, द्रविड, युवराज-कैफ सारखी नवोदित पण मजबूत बॅटिंग लाईनअप होती. झहीर, नेहरा, कुंबळे, हरभजन, श्रीनाथ, बालाजी सारखी तगडी बॉलिंग लाईनअप असताना सुद्धा टीम इंडिया फक्त मार खात होती.

आणि या मार खाणाऱ्या संघाला लढायला शिकवलं ते गांगुलीने. पराभव ऐवजी निर्णायक विजय मिळवून दिले ते गांगुलीने. भारतीय संघाला विजयाची सवय लावली ती गांगुलीने.

आपल्या अग्रेशनने, आपल्या एकछत्री अंमलाने गांगुलीने सगळंच बदलून टाकलं.

गांगुलीली अग्रेसिव्ह होता हे जगजाहीर होतं, पण जर्सी काढून हवेत गरागरा फिरवेल असं मात्र कोणाला वाटलं नव्हतं, पण ‘अरे’ ला ‘का रे’ करणार नाही मग तो गांगुली कसला?

तर या जर्सी फिरवण्याच्या मागची कथा सुद्धा ‘बदल्याची’ होती!

त्याच वर्षी इंग्लंडची टीम भारतात आलेली आणि वानखेडेवर झालेल्या निर्णायक आणि अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आणि विजयानंतर फ्लिंटॉफ जर्सी काढून तसाच मैदानावर पळायला लागला. गांगुलीच्या हे अक्षरशः जीवाला लागलं.

 

andrew flintof inmarathi

 

हातातोंडाशी आलेला घास ब्रिटिशांनी हिरावून घेतला आणि त्यात फ्लिंटॉफ चा जळवणारा जल्लोष. ही तर सर्वश्रुत घटना आहे.

पण गांगुलीच्या या जर्सी फिरवण्याच्या मागे कारण होता, एक बस ड्रायव्हर आणि तो बस ड्रायव्हर होता ‘मोहम्मद कैफ’. होय! मोहम्मद कैफ.

तर झालेलं असं,

नेटवेस्ट सिरीज च्या फायनल मॅच मध्ये इंग्लंडने मार्क ट्रेस्कोथिक आणि कर्णधार नासिर हुसेन यांनी भारतीय बोलर्सचा घाम काढत शतकं ठोकली आणि या शतकाच्या बळावर इंग्लंडने ३२५ धावसंख्या बोर्ड वर लावली.

३२६ चेस करताना गांगुली आणि सेहवाग ने १४ ओव्हर मध्येच १०० बोर्डवर लावले. झकास झालेल्या सुरवातीला खिंडार पडलं ते गांगुलीच्या विकेटने.

१०६ वर गांगुली, ११४ वर सेहवाग, १२६ वर मोंगिया, १३२ वर द्रविड आणि त्यादिवशी चौथ्या क्रमांकावर आलेला सचिन १४६ वर असा संघाचा स्कोअर असताना तंबूत परतलेले.  १००-० ते १४५-५.

नंतर मैदानावर उतरलेला नवखा मोहम्मद कैफ. आता जर विकेट पडली तर टीमला बस मध्ये बसून परत हॉटेल मध्ये जाणं फिक्स होतं.

 

mohammad kaif inmarathi 2

कैफला बघून त्याची खिल्ली उडवत इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, “चला मित्रांनो, भारतीय संघाने आता बस ड्रायव्हर पाठवला आहे,आपला चान्स तर बनतोय!”

२३ व्या ओव्हर ला मैदानात उतरलेल्या कैफने शेवटच्या ५० व्या ओव्हर पर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंना त्यादिवशी अक्षरशः नाचवलं.

युवराज आणि कैफ हे त्यादिवशी डोक्याने खेळत होते. चौके-छक्के ऐवजी एकेरी-दुहेरी वर भर देत स्कोअर बोर्ड हलता ठेवला आणि बघता बघता ८० बॉल मध्ये दोघांनी १२१ रनची पार्टनरशिप केली.

===

हे ही वाचा भारतीय क्रिकेटची अंधारातली बाजू उजळवून टाकणारा “सुपरमॅन” – मोहम्मद कैफ!

===

युवराज ६९ रन करून आउट झाला. भारताला हवेत ५० बॉल मध्ये ५९ रन्स.

 

mohammad kaif inmarathi 3

आता कमान हातात घेतलेली ती बस ड्रायव्हरने,आणि त्याने नासिर हुसेनला पार वेड लावायची पाळी आणलेली. हातातोंडाशी आलेला घास कैफ पळवणार होता.

हरभजन आणि कुंबळे माघारी परतलेले. मैदानावर कैफ आणि झहीर खान. विजयासाठी १३ बॉल्स मध्ये १२ रनची गरज.

४९ वी ओव्हर जशी तशी गेली आणि शेवटच्या बॉल वर चौका ठोकून कैफने स्कोअर आणला १ ओव्हर मध्ये २ रन. हातात २ विकेट होत्या. ५० वी ओव्हर टाकायला आला अँड्रयु फ्लिंटॉफ. तर,

वानखेडेवर झालेल्या सामन्यात भारताला गरज होती शेवटच्या ओव्हर मध्ये १० रन आणि तेव्हा सुद्धा हातात २ विकेट होत्या.

 

mohammad kaif inmarathi 1

त्या दिवशी सुद्धा ५०वी ओव्हर फ्लिंटॉफने टाकलेली, भारतीय संघाला त्याने ऑल आऊट केलेलं आणि जर्सी काढून मैदानात पळायची घटना घडलेली. आताही ५० वी ओव्हर टाकायला आला फ्लिंटॉफ.

पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल व्हाइड म्हणून झहीरने सोडून दिला. अंपायरने वाईड देण्यास नकार दिला.

तिथे बाल्कनीमध्ये देवासारखा शांत बसलेला गांगुली लाल झाला. तिथूनच आरडाओरडा करायला त्याने सुरवात केली. तिसरा बॉल, झहीरने मिस केला.

पण नॉन स्ट्रायकर एन्ड वरून कैफ जिवाच्या आकांताने पळत सुटला तसा झहीर सुद्धा पळाला. कैफने डाय मारत एक रन पूर्ण केला, ब्रिटिशांकडून मिस फिल्ड झाली आणि क्रिस वर झोपलेला कैफ तसाच उठून माघारी दुसरा रन घ्यायला पळत सुटला.

झोपलेला कैफ ज्या वेगाने उठून दुसरा रन घ्यायला धावला तो क्षण कोणी विसरणे तर अशक्य. 

 

mohammad kaif inmarathi

दुसरा रन पूर्ण झाला आणि झहीर आणि कैफ असे उड्या मारायला लागले जसे यांच्या बुटाला स्पाईक नाही तर स्प्रिंग आहेत. यापुढे जे झालं ते क्रिकेटच्या इतिहासात अजरामर आहेच.

सौरव गांगुलीची जगाने दखल घ्यावी अशी ती वेळ होती.

आता पर्यंत लॉर्ड्सच्या बाल्कनीत शांत बसलेला गांगुली अंगात वार संचारल्या सारखं आपली जर्सी काढुन हवेत गरागरा फिरवायला लागला. भारतीय क्रिकेटच्या नसानसात नवचैतन्य फुलवणारी ती घटना होती.

 

saurav ganguly inmarathi 1

 

पूर्ण टीम आनंद साजरा करत होती. लॉर्ड्स वर क्रिकेट रसिक जोशात ओरडत होते. समोर बसलेल्या भारतीय जनतेचा अजून विश्वास बसत नव्हता की, आपण नेटवेस्ट सिरीज जिंकली आहे.

१४५/६ धावसंख्या बोर्ड वर असताना नासिर हुसेन ज्याला बस ड्रायव्हर म्हणून हिणवत होता, त्याच बस ड्रायव्हरने टीम इंडियाला जिंकवलं.

===

हे ही वाचा युवराजच्या निवृत्तीच्या घोषणेवर सौरव गांगुली जे म्हणतोय ते विचारात टाकणारं आहे

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?