ट्रू कॉलर : पाहता पाहता हे अॅप एवढं मोठं झालंय की यांचा चक्क आयपीओ आणायचा प्लॅन आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
टेलिकॉम कंपनीचे नको असलेले कॉल,टेलिबिझनेस फोन,कामात असताना नको असलेले फोन कॉल्स टाळायचे आहेत तर कोणीही डोळे बंद करून ट्रू कॉलरचा पर्याय सांगेल.!

कोणाचा फोन आला आणि त्यासोबत ट्रू कॉलर चा लाल लेबल आला रे आला की सरळ फोन कट केला जातो, जवळपास सगळे हेच करतात. नको असलेले कॉल अवॉईड करायचं उत्तम साधन!
सध्या तर ट्रू कॉलर मीमचा पण भाग झाला आहे.
फोन कॉल यायच्या ३ सेकंद आधी कॉलर ची इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन पॅनल वर येते! पण हेच ट्रू कॉलर आपल्या भारतीयांच्या जीवावर किती मोठ झालं आहे माहीत आहे का?

२० करोड वर्ल्डवाईड एकूण युजर पैकी १५ करोड युजर हे फक्त भारतीयच आहे.!
भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, त्यात टेक इंडस्ट्री मध्ये जवळजवळ सगळे ब्रँड भारतात पाय रोवायला आतुर आहेत! मग सॉफ्टवेअर कंपन्या या बाबतीत मागे कशा राहतील? त्याचाच एक भाग म्हणजे हे ट्रू कॉलर!

सुरवातीला फक्त कॉलर आयडेंटिटी सांगणारं हे अॅप हळूहळू इन्स्टंट मेसेजिंग, व्हॉइस ओव्हर आयपी आणि युपीआय ट्रांजेक्शन सारख्या सुविधा प्रोव्हाईड करायला लागले,आणि कमी अवधीतच लोकप्रिय होत गेलं.
त्याची लोकप्रियता इतकी वाढली की ४०० च्या घरात कर्मचारी असलेल्या अँपचे २० करोड युजर आहेत! त्या ४०० पैकी २५० च्या जवळपास कर्मचारी हे तर भारतातच आहे.

त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या ओरिएंटेड हे अॅप विकसित होत गेलं! सध्या भारतात हा बिझनेस ते ५०% तर जगभरात ७०% वाढवण्याच्या इराद्याने ते काम करत आहेत!
आता हे झालं कंपनी,बिझनेस,युजर वगैरे वगैरे.यात विशेष असं काय? तर विशेष हे आहे की ट्रू कॉलर आता आयपीओ आणण्याच्या विचारात आहे.!

आता ही आयपीओ काय भानगड आहे! आताच ऐकलं असेल की सरकार एलआयसीचे आयपीओ ओपन करणार आहे.
म्हणजे आपले शेअर्स लोकांना विकण्यासाठी खुले करणार, म्हणजेच सामान्य जनता आपला पैसा त्यात गुंतवू शकते. यामुळे होतं काय, तरशेअर्सच्या बदल्यात त्या कंपनीकडे जनतेचा पैसा जमा होतो आणि त्याबदल्यात कंपनीच्या फायद्यात लांभांश त्याला मिळतो.!
कंपनीकडे शेअरच्या माध्यमातून गुंतवणुकीचा पैसा उभा राहतो आणि नियोजनानुसार त्या पैशाचा वापर सुरू होतो! एक प्रकारे शेअर मार्केटवाला प्रपंच इथे सुरू होतो.!

आता एलआयसीचं समजू शकतो,मोठी सरकारी कंपनी आहे, बऱ्यापैकी फायद्यात आहे, त्यामुळे सामान्य जनता त्यात गुंतवणूक करू शकते!पण त्यामानाने ट्रू कॉलर आहेच केवढी.?

सध्या ट्रू कॉलर ही एवढी मोठी कंपनी नाही की ती भागीदारी मध्ये चालू शकेल.पण ही साईट पैसे कसे कमावते याकडे आपण लक्ष देऊया!
ट्रू कॉलर हे फ्री अॅप आहे, पण त्यावर वेगवेगळ्या जाहिराती येत असता, या प्रमोशनच्या जाहिरातीतून त्यांना पैसे मिळत असतात.
दुसरं, याच जाहिराती काढून टाकण्यासाठी यांचं आणखीन एक पेड अॅप पण उपलब्ध आहे.जाहिराती नको असतील तर हा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे!
तिसरं, पेमेंट ट्रांजेक्शनच्या माध्यमातून. जे काही देवाणघेवाण होईल त्यावर चार्ज लावून ट्रू कॉलर पैसा गोळा करते.

या सर्व व्यवहारातून ट्रू कॉलर ने जवळपास १५ करोड डॉलरचा बिझनेस केला आहे!
स्पॅम कॉल अवॉर्ईड करायची लोकांची हौस बघता हि कमाई जवळपास दुप्पट म्हणजे ३२ करोड डॉलर एवढा करण्याचा कंपनीचा मानस आहे!
आजच्या घडीला भारतात जवळपास ८० करोड मोबाईल युजर आहेत, त्यातले ३० करोड हे स्मार्टफोन युजर आहेत! त्यातल्या अर्ध्या युजर्स पर्यंत तर ट्रू कॉलर पोहोचलं आहे आणि तेच ऍप आता ४५ करोड भारतीयांपर्यंत पोहोचवायचा त्यांचा मानस आहे!

ट्रू कॉलरचं बिझनेस मॉडेल सुद्धा बाजारात येण्याच्या मार्गावर आहे.
एखादी प्रायव्हेट फर्म, कंपनी किंवा स्टार्टअप हे आपले संपर्क माध्यमे ट्रू कॉलर वर रजिस्टर करू शकतात, यामुळे ट्रस्टेड नंबर हे व्हेरिफाय होऊ शकतात, नाहीतर विनाकारण स्पॅम मध्ये जाण्याचं ते टाळू शकतात.
त्याचसोबत जवळपासचा एखादा बिझनेस जर ट्रू कॉलर वर रजिस्टर असेल तर त्याला शोधण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही.
गुगलसोबत इंटरफेस होऊन व्हेरिफाईड नंबर मिळण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. फेसबुक, ट्विटर वर जशी व्हेरिफाईड अकाउंट दिसतात तशीच आता ट्रू कॉलरची व्हेरिफाईड अकाउंट सुद्धा येणार आहेत!
त्याचसोबत टिंडर सारखी डेटिंग फिचर, व्हाट्सअँप सारख चॅटिंग फिचर ट्रू कॉलर मध्ये पुढच्या काही काळात आपणास बघायला मिळेल.
एकाच अप्लिकेशन मध्ये मल्टी पर्पज फीचर्स असतील तर नक्कीच युजर वेगवेगळ्या प्रकारचे अॅप वापरण्याऐवजी अनेक फीचर्स असलेलं एकच ऍप वापरेल. बेस्ट उदाहरण म्हणजे, पे-टीएम!

तर,अशा विविध तऱ्हा जे ग्राहकांना आपलं अॅप्लिकेशन वापरायला भाग पाडेल अशी योजना ट्रू कॉलर आखत आहे.!
लिस्टेड कंपनीच्या मानाने पाहिलं गेलं तर भारताचं जगात प्रथम क्रमांक आहे, सर्वाधिक लिस्टेड कंपन्या या इथेच आहेत!
आंतरराष्ट्रीय कंपन्यांना फायदा यामुळे होतो की भारतात गुंतवणूक ही भारतीय रुपयामध्ये होते! आणि एकदा फॉरेन करन्सी ने जर गुंतवणूक झाली तर भारतीय मूल्यात तिची किंमत अधिक असेल!
भारतीय बाजारपेठेत असलेली अनुकूलता,शेअर मार्केटमधली गुंतवणूक आणि त्यातल्या त्यात भारत सरकारच्या व्यवसायसंबंधी असलेल्या अनुकूल पॉलिसी यामुळे पुढच्या तीन वर्षात ट्रू कॉलर भारतात आयपीओ आणण्यासाठी अनुकूल आहे!

एकदा का बाजारात अनुकूल वातावरण आणि विश्वास निर्माण झाला की जनतेतून गुंतवणूक मिळायला जास्त वेळ नाही लागत, पण तसं वातावरण निर्माण करणं हे जोखमीचे काम आहे. आणि तेच काम आता ट्रू कॉलर करण्याच्या मार्गावर आहे.!
आपल्या बाजाराच्या दृष्टीने बघायला गेलो तर ट्रू कॉलरचे भारतात सगळ्यात जास्त कर्मचारी आणि ग्राहक आहेत.आणि आता बाजारात पकड निर्माण करायची म्हणजे मॅन पावर आणि लोकल यंग टॅलेंट वापरणं सोयीस्कर ठरत.
त्या हिशेबाने ट्रू कॉलर आता भारतात डेटा अॅनालिस्ट, फायनान्शियल अॅनालिस्ट, रिस्क मॅनेजमेंट यांच्या शोधात आहे! एकूणच आपला पुढचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी स्थानिक वाटाड्याची गरज तर लागतेच.
आपलं ठेवलेलं व्हिजन पूर्णत्वास नेण्यासोबत ट्रू कॉलर भारतात रोजगार निर्मितीसाठी प्रवृत्त झालेली दिसते.
मार्केट मध्ये नवीन पायंडा घालण्यास आणि आपलं एक नवीन अस्तित्व निर्माण करण्यास आलेल्या या कंपनीचा प्रवास भारतात तरी रंजक असणार आहे.!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.