Site icon InMarathi

करोना व्हायरसला हरवायच असेल तर हे ११ गैरसमज दूर होणं अत्यावश्यक आहे

China-coronavirus feature InMaarthi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

सध्या करोना व्हायरसने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. इतर देशांसह भारतातही कोरोना फोफावतोय.

रोज वर्तमानपत्रात, टीव्हीवर, सोशल मीडियावर याविषयीच्या बातम्या येत आहेत.आत्तापर्यंत किती जणांना याची लागण झाली, किती लोक यामुळे गेले, मरण पावले याविषयीची चर्चा रंगताना दिसत आहे.

फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप सारख्या सोशल मीडियावर तर हा व्हायरस कशामुळे पसरतो आणि या व्हायरस पासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे याचे मेसेजेस येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

करोना व्हायरसची माहिती देण्यासंदर्भात न्यूयॉर्क येथे झालेल्या एका कार्यक्रमात एका माणसाने तर असा प्रश्न विचारला की, चायनीज फूड खाणं योग्य आहे का? आता खरंतर हा प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपाचा म्हणता येईल. यावरूनच लक्षात येतं की लोकांमध्ये या व्हायरस विषयी किती भीती आहे.

 

fox news

 

हा व्हायरस वटवाघूळ आणि सापाच मांस खाल्यामुळे झाला असा समज सध्या आहे. जानेवारी महिन्यात डब्ल्यूएचओ ने (WHO) जेव्हा या आजाराची घोषणा केली त्यात ह्या आजाराची लक्षणे कोणती?, आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलच माहिती दिलेली आहे.

चायनीज फूड खाऊनच तुम्हाला हा आजार होईल याविषयी WHO काहीही बोलत नाही, चायनीज फुड न खाता पण हा आजार होऊ शकतो याचीच माहिती खरंतर WHO ने दिलेली आहे.

पण चायनीज रेस्टॉरंट मध्ये जाऊ नका, तिकडे काय खाऊ नका, चायनीज लोकांपासून लांब राहा… अशा निरर्थक गोष्टी सोशल मीडियातूनच पसरवल्या जात आहेत.

सध्याच्या काळात सोशल मिडीया मुळे कोणतीही बातमी लगेचच जगाच्या कानाकोपऱ्यात काही सेकंदात जात आहेत. अशा अनेक पोस्ट आता सोशल मीडियावर आग भडकवण्याचे काम करताहेत. आताचा जो करोना व्हायरस आहे त्याला २०१९ n CoV असं नाव दिलं आहे.

या आजाराबद्दल पसरलेले गैरसमज पाहूया…

१. करोना व्हायरस इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापेक्षा वेगाने पसरत आहे.

 

India TV

 

तसं पाहायला गेलं तर गोवर सगळ्यात वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे पण त्याची लस उपलब्ध असल्यामुळे आणि जन्मलेल्या बाळाला लगेच लस देत असल्यामुळे गोवर सध्या इतक्या वेगाने पसरत नाही.

करोना हा व्हायरस जर एकाला झाला तर त्यापासून त्यात तीन ते चार लोकांना त्याची लागण होऊ शकते. अर्थात अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे की, नक्की किती लोकांना याची बाधा होईल.

परदेशात एका बाधितामुळे ९० हून अधिक जणांना बाधा झाल्याचंही सांगितलं जातं, मात्र ठोस असा पुरावा मिळालेला नाही.

तसं पाहायला गेलं तर गोवर आणि खोकल्यामुळे अठरा-एकोणीस लोकांना त्याची लागण होऊ शकते.

 

२. करोना व्हायरस इतर कोणत्याही संसर्गजन्य आजारापेक्षा भयानक असून त्याचा मृत्यूदर जास्त आहे.

 

 

याविषयी असंही म्हटलं जात आहे की, हा व्हायरस ज्याला होईल त्याचा मृत्यू अटळ आहे आणि म्हणूनच याच्याबद्दल भयंकर भीती लोकांच्या मनात आहे.

तस पाहिलं तर याचा मृत्युदर भारतात तरी कमी आहे, आणि त्यात घटही होताना दिसते.

जगातील काही देशांमध्ये मृत्युचं तांडव सुरुच आहे हे खरं, मात्र भारतात यापुर्वी अनेक आजार येऊन गेले ज्यांचा मृत्युदर कोरोनापेक्षाही अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. 

इबोला रोगाची लागण झालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोक हे मृत्यू पावत. हे विसरायला नको की, दरवर्षी फक्त अमेरिकेत इन्फ्लूएंजा मुळे ३००००० तर जगभरात जवळपास साडेसहा लाख मृत्यूमुखी पडतात.

 

३. करोना हा व्हायरस प्रयोगशाळेत तयार केला गेला आहे आणि मुद्दाम तो पसरवण्यात आलेला आहे

 

 

जेव्हा जेव्हा असे जीवघेणे आजार जगभर येतात तेव्हा तेव्हा त्या विषयी अनेक समज गैरसमज पसरवले जातात. तसेच ह्या बाबतीतही झालेलं आहे.

२३ जानेवारीला इस्त्राईलनही असं वक्तव्य केलं की, हा व्हायरस चीनने त्यांच्या लॅबरोटरी तयार केला. आता २७ जानेवारीला रशियाच्या सोशल मीडियात असं म्हटलं जातंय की, हा आजार अमेरिकेने तयार केला आणि तो चीनमध्ये नेऊन पसरवला.

अमेरिकेने जैव दहशतवादाचं शस्त्र चीन विरुद्ध काढलं आहे असं रशियाचं म्हणणं आहे. ज्यात काहीच तथ्य नाही.

 

४. करोना  हा व्हायरस फार्मासिटिकल कंपन्यांच्या फायद्यासाठी बनवण्यात आला आहे

आता हा पण गैरसमज आहे की, हा व्हायरस जगभर पसरवण्यासाठी फार्मासिटिकल कंपन्यांना हाताशी धरलं आहे. याचं कारण म्हणजे हा व्हायरस पसरेल आणि त्याची लस घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागतील. जेणेकरून फार्मासिटिकल कंपन्यांचा त्यात आर्थिक फायदा होईल.

 

business magzine

 

इंटरनेटवर याविषयी प्रचंड गोंधळ दिसून आला होता. उदाहरण पाहायचं असेल तर अमेरिकन सिनेटची निवडणूक लढविणारा रिपब्लिकन शिवा आय्यादुराई याने एक ट्विट केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, ह्या व्हायरसच्या लसीचे पेटंट पिरब्राईट इन्स्टिट्यूटला मिळालं आहे.

खरंतर करोना फॅमिलीतील हा नवीन व्हायरस आहे ज्यावर अजून कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाहीये.

शिवाच्या ट्विट वर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाच्या म्हणण्यानुसार, जगातली लोकसंख्या वाढत आहे आणि तीच कमी करण्यासाठी अशा प्रकारचे आजार निर्माण केले जात आहेत. जेणेकरून गरीब माणसे ही औषधे घेऊ शकणार नाहीत आणि त्यात त्यांचा मृत्यू होईल आणि जगाची लोकसंख्या कमी होईल.

 

५. करोना व्हायरसला रोखण्यासाठी लस शोधण्यात आलेली आहे

 

natural news

 

करोना व्हायरसला रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. लस तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी वेळ, पैसा आणि संशोधन गरजेचं आहे. त्यासाठी आधी या आजाराला कारणीभूत असलेला व्हायरस किंवा bacteria शोधावा लागेल.

अर्थात सगळ्याच देशाकडून यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ब्रिटन, इस्त्राईल, अमेरिका यांसारख्या देशांची शोधमोहिम यशाच्या अगदी जवळ आली असल्याचंही सांगण्यात येतं.

मात्र हमखास असं औषध मिळालं आणि ते सगळ्या रुग्णांपर्यंत पोहोचलं असं अजूनही झालेलं नाही. म्हणजे, लस शोधली गेलीय हे म्हणणं चुकीचं आहे.

 

६. करोना व्हायरस रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि औषध उपलब्ध आहेत

 

daily express

 

करोना व्हायरसची बातमी जशी बाहेर आली तसं वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि औषधांसाठी सोशल मीडियावर जणू पेवच फुटलं. कदाचित फार्मासिटिकल कंपनी त्यापासून खूप फायदा मिळवणार नाहीत, पण काही हितसंबंधी लोक मात्र त्यातून नफा नक्कीच कमावतील.

हे खा, ते प्या त्यामुळे रोग होणार नाहीत. तसंच काहींनी खूप वेगवेगळे उपचार सांगितले जसं की, तुमचा घसा कायम ओला ठेवा त्यासाठी गरम पाणी पीत रहा, सतत गरम पाण्याच्या गुळण्या करा, याचा तुम्हाला कदाचित त्रास नाही होणार आणि जर तुमचा बडबड करण्याचा व्यवसाय असेल तर फायदाच होईल.

पण करोना व्हायरस वर आत्ता तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही.आताचा सध्याचा प्रतिबंधक उपाय म्हणजे बाहेर गेल्यावर कुठेही स्पर्श ना करणे आणि तो हात तोंडाजवळ न नेणे.

कुठूनही बाहेरून आल्यानंतर आपले हात स्वच्छ धूत राहणे. कोणी आजारी असेल तर त्याला औषधोपचार देणे, पण शक्यतो अशा माणसांच्या खूप जवळ न जाणे.

 

७. कोणताही खोकला आणि ताप म्हणजेच करोना व्हायरस

 

extra ie

 

ह्या व्हायरसची इतकी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे की, साधा खोकला आणि ताप आला तरी लोकांना वाटतंय की आपल्याला कारोना व्हायरसचं इन्फेक्शन झालंय.

असा विचार करत असाल तर तो तातडीने बंद करा.

८. करोना व्हायरस लोकांना शिक्षा देण्यासाठी अस्तित्वात आलाय

 

the financial express

 

कोणताही नवीन आजार आला तर त्यासोबत एक हुल उठवली जाते की, विशिष्ट लोकांना संपवण्यासाठी हा आजार आलेला आहे. यावेळेस चिनी लोक याचा टार्गेट आहेत.

यांनी केलेल्या पापा मुळेच तिकडे आजार आला असं म्हटलं जाततंय.

 

९. चायनीज फूड किंवा चायनीज वस्तू या पासून तुम्हाला करोना व्हायरस इन्फेक्शन होऊ शकतं.

 

news gd

 

आता लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत ज्यानुसार, चायनीज फूड खाल्लं किंवा चायनीज वस्तू आणल्या तर आपल्याला करोना व्हायरस होऊ शकतो. याचं कारण म्हणजे तेच…. सापापासून हा व्हायरस आलंय हा गैरसमज.

पण जर चायना वरून कोणतं फूड येत असेल तर ते पॅकेजड् आणि प्रोसेसड् असेल तर त्याला व्यवस्थित दिलेल्या तापमानामुळे त्यात कुठलाही व्हायरस असेल तो लगेच नष्ट होईल.

शिपिंग च्या प्रोसेस मध्ये कुठलही इन्फेक्शन जगणं तस अवघडच.

 

१०. चिनी लोकांपासून दूर रहा

 

 

पाश्चात्त्य जगात आता हे नवीनच प्रकरण सुरू झालंय ज्यात ते म्हणतात की, तुम्ही सगळे चिनी लोकांपासून दूर रहा. या लोकांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरस एकूणच एशियन आणि चायनीज लोकांना लगेच आकर्षित करतो.

पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की प्रत्येक चायनीज माणसाला करोना व्हायरसचं इन्फेक्शन नाही. प्रत्येक चायनीज वूहान वरून आलेला नाहीये आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जगभरातल्या प्रत्येक माणसाला आहेत.

इन्फेक्शन काही तुमचा रंग, तुमचा वर्ण बघून होत नाही. जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत.

असा भेदभाव केल्यामुळे दोन समाजातील, लोकांमध्ये दरी निर्माण होईल आणि अशा आजाराचा सामना करणे आणखीन कठीण होईल.

 

११. करोना व्हायरस चा उद्रेक ही एक अफवा आहे

 

 

हे तर आणखीनच भयानक आहे. WHO किंवा जागतिक आरोग्य संघटना एखाद्या व्हायरसची अफवा कशी उठवेल? आणि त्यासाठी संपूर्ण जगाला का वेठीस धरलं जाईल….

काही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत राहतात आणि त्यांच्यापासूनच खरंतर मोठा धोका आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नाही. त्यांना व्हायरस म्हणजे काय ह्याची पण कल्पना नसते.

त्या लोकांना आपल्या मध्ये सामील करणं आणि त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर करणं, त्यांना अशा रोगांचा सामना करण्यासाठी कुशल बनवणं खूप महत्त्वाचं आहे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version