आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बील गेट्स हे नाव कोणाला माहीत नाही?? आज ज्या स्क्रीनवर म्हणजेच ज्या मोबाइलवर किंवा ज्या कॉम्प्युटरवर तुम्ही हा लेख वाचताय ते म्हणजे केवळ एका माणसाच्या मेहनतीमुळे आणि तो म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून बील गेट्स!
जगातल्या सर्वात श्रीमंत बिझनेस टायकून पैकी एक असलेले बील गेट्स आपल्याला परिचित आहेत. ते सर्वाधिक प्रसिद्ध आहेत, त्यांच्या सर्वात मोठ्या कंपनीमुळे जिचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट!
लहान वयातच त्यांनी जनरल इलेक्ट्रिक कॉम्प्युटर याच्याशी संबंधित पहिला कॉम्प्युटर प्रोग्राम लिहिला. जसे त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना समजले तसे त्यांनी संपूर्ण शाळेच्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शेड्यूल करण्याचे लहानग्या बीलकडे सोपवले!
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
इतर काही फेमस लोकांप्रमाणेच बील सुद्धा कॉलेज ड्रॉप आऊट आहेत!
शिवाय सॉफ्टवेअर दुनियेमधला या बादशाहने त्याच्या मुलांसाठी त्याच्या संपूर्ण संपत्तीपैकी फक्त १० बिलियन डॉलर्स इतकीच रक्कम राखीव ठेवली आहे, त्याहून अधिक रक्कम त्यांना देणे त्यांना योग्य वाटत नाही!
आज मायक्रोसॉफ्टचे नाव दुनियेच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे ते केवळ या कॉम्प्युटर युगाचा जनक मानल्या जाणाऱ्या बील गेट्स यांच्यामुळेच!
आज साऱ्या जगातली उलथा पालथ या छोट्याशा स्क्रीन वर होते ते शक्य झाले ते केवळ बील गेट्स मुळेच!
बील गेट्स सांगतात की जर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी उभी राहिली नसती किंवा म्हणावी तितकी लोकप्रिय झाली नसती तर ते खचून गेले नसते. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी तिथे रिसर्चर म्हणून काम केले असते!
अनेकांना आठवत असेलच – काही वर्षांपूर्वी एका सुंदर अमेरिकन मुलीचा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्या फोटोत त्या मुलीची “बील गेट्सची मुलगी!” म्हणून तिची ओळख करून दिली गेली होती. तो फोटो बघून त्यावेळेस कित्येक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकला होता!
–
–
कारण बील गेट्सची मुलगी आहेच तशी!
बील गेट्स यांना ३ अपत्यं आहेत. त्यातल्या या मुलीचं नाव जेनिफर गेट्स. तिचा जन्म १९९६ चा आणि तीच शिक्षण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये झालं आणि २०१३ मध्ये तिने त्याच युनिव्हर्सिटी मधून पदवी मिळवली!
तिच्याकडे बघून अजिबात वाटणार नाही की ती बील गेट्स यांचीच मुलगी आहे. कारण त्यांच्या श्रीमंतीचा बडेजाव तिच्या रहाणीमानावरून अजिबात जाणवत नाही. वडील खूप श्रीमंत आहेत म्हणून त्याचा देखावा करणाऱ्यांपैकी ती नाही! उलट स्वतः खंबीरपणे ती स्वावलंबी जीवन जगते आहे हीच मोठी कौतुकाची बाब आहे!
आणि तसं बघायला गेलं तर अमेरिकेत १८ वर्ष पूर्ण करताच तिकडच्या मुलांना पायावर उभं राहण्यासाठी घर सोडावं लागतं ही तिकडची रीतच आहे!
पण आज याविषयावर बोलायच कारण हे आहे की बील गेट्स यांच्या मुलीने तिचा जोडीदार निवडला असून त्याच्याबरोबर ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपुर्वी याविषयी तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन ही गोड बातमी दिली!
–
हे ही वाचा – “स्टीव्ह जॉब्ज जिवंत आहे! इजिप्तमध्ये लपून बसलाय”- एक नवी कॉन्स्पिरसी थिअरी
–
तिच्या जोडीदाराचे नाव Nayel Nassar आहे आणि तो एक इजिप्शियन मुस्लिम असून त्याने सुद्धा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. दरम्यान त्याची ओळख जेनिफर गेट्सशी झाली आणि तिथून त्यांची मैत्री झाली आणि आता ते एकमेकांसोबत त्यांच उर्वरित आयुष्य घालवणार आहेत!
Nassar हा वयाच्या दहाव्या वर्षापासून हॉर्स रायडिंग च प्रशिक्षण घेत आहे, त्यामुळे तो उत्तम हॉर्स रायडर आहेच शिवाय त्याचा स्वतःचा बिजनेस देखील आहे! ऑलिंपिक मध्ये त्याने त्याच्या देशाला बऱ्याच वेळेला रीप्रेझेंट केले आहे!
Nassar चा जन्म शिकागो येथे झाला आणि त्याचे आई वडील ही मूळचे इजिप्शियनच आहेत. हे कुटुंब बरीच वर्षे कुवेत येथे स्थित होते! त्यानंतर तो २००९ साली पुन्हा अमेरिकेत आला आणि त्याने त्याचं उर्वरीत शिक्षण पूर्ण करून जेनिफरला सुद्धा सोबत केली! दोघांचेही शिक्षण याच विद्यापीठात झाले!
काही महिन्यांपूर्वीच जेनिफरने ही गोष्ट सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली! आणि त्या पोस्ट वर कित्येक शुभेच्छांचा वर्षाव झाला! सगळ्या नेटीजन्सनी तर त्या दोघांना खूप शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करून त्यांनी शेयर केलेले फोटोस व्हायरल केले!
लगोलग Nassar ने सुद्धा तशीच पोस्ट केली आणि त्यावर सुद्धा खूप लोकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!
पण या सगळ्या गदारोळात बील गेट्स यांची प्रातिक्रिया यांचीच सगळ्यांना उत्सुकता होती. जगातल्या श्रीमंत बापाच्या मुलीने एका एजिप्शियन मुस्लिम मुलाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतल्याचं ऐकून बील गेट्स कशी प्रातिक्रिया देतील याचीच उत्सुकता लागून होती!
आणि अखेर त्यांनी ती प्रातिक्रिया दिलीच…!
त्यांनी कमेंट केली की “मी प्रचंड उत्सुक आहे आणि अभिनंदन” असे म्हणत त्यांनी शभेच्छा दिल्या!
या प्रतिक्रियेवरून आपल्याला दिसून येतं की हात कितीही गगनाला भिडले तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. आपल्या मुलीच्या या निर्णयाचे त्यांनी कशाप्रकारे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या हे आपल्याला यातून दिसतं!
आपला होणारा जावई दुसऱ्या धर्माचा असून सुद्धा त्यांनी कुठेही आडमुठेपणा न बाळगता मनापासून शुभेच्छा दिल्या! तसे बील गेट्सच्या या स्वभावाचे प्रत्यय आपल्याला बरेच वेळा आले आहेत. ते किती कमालीचे साधे आहेत याविषयी सुद्धा आपण जाणून आहोत!
पण तरीही एका बिझनेस टायकून पेक्षा एक “बाप” म्हणून अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभं राहायला प्रत्येक पालकांनी शिकायला पाहिजे. त्यासाठी जगातली श्रीमंत व्यक्ती असण्याची गरज नाही. गरज आहे ती समजूतदारपणाची!
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – इजिप्त मध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा राजवाडा आहे भयावह कारणांसाठी प्रसिद्ध
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.