आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज-काल इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्युच्यूल फंड असं एक समीकरण झालेलं आहे. इतर फंड मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला एवढे पैसे मिळत नाहीत जेवढे म्युच्युअल फंड मध्ये मिळतात.
आपणा सर्वांनाच म्युच्यूल फंड बद्दल काही गोष्टी माहिती आहेतच इतर इन्व्हेस्टमेंट प्रमाणेच म्युच्यूल फंड मध्ये देखील काही प्रमाणात अनिश्चितता नक्कीच आहे.
परंतु जर आपण विचार करून, काही गोष्टी विचारात घेऊन भरपूर वेळासाठी पैसे म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणार असू तर मात्र हा धोका तुम्ही कमी प्रमाणात पत्करत आहात ही गोष्ट लक्षात घ्या.
एका सर्वेक्षणानुसार आज-काल प्रत्येक इन्वेस्टर आपले पैसे म्युच्यूल फंड मध्ये गुंतवू इच्छितो. पारंपरिक इन्व्हेस्टमेंट पेक्षा म्युच्यूल फंड आज एक ब्रँड झालेला आहे. यामध्ये फायदा देखील कितीतरी पट जास्त आहे, मग असा प्रचंड फायदा असलेेली इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याकडून नेहमीच काहीतरी चुका होत असतात.
त्यामुळेच, म्युच्यूल फंड मध्ये गुंतवणूक करताना कुठल्या चुका करू नयेत याबद्दल या लेखामध्ये माहिती देणार आहोत!
म्युच्यूल फंड मध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत. कारण, यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपनीमध्ये विभागून गुंतवता येतात.
म्युच्यूल फंड मध्ये तुम्हाला अनेक प्रकारे गुंतवणूक करण्याची मुभा असते त्यामुळेच तुम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये संमिश्र पणे इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त नफा मिळू शकता.
त्यासोबतच म्युच्यूल फंडचा तुम्हाला अजून एक देखील फायदा होऊ शकतो. तो म्हणजे यामध्ये तुम्ही फ्लेक्झिबल पद्धतीने देखील पैसे गुंतवू शकता,
म्हणजेच जर तुम्हाला लहान लहान भागांमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने देखील गुंतवू शकता किंवा जर तुम्हाला एकाच ठिकाणी भरपूर प्रमाणात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने देखील पैसे गुंतवू शकता.
या सगळ्यांमध्ये आत्ता एक नवीन पद्धतीची इन्वेस्टमेंट ज्याला आर्थिक भाषेत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच “एसआयपी” असे म्हणतात. यासोबतच शेअर मार्केट सारखेच इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्युचल फंड मध्ये देखील आरामात करू शकता.
यातील काही फंड्स तुम्ही केव्हाही विकत घेऊ शकता किंवा विकू शकता. आज म्युचल फंड मध्ये इन्वेस्ट करण्याचे प्रमाण जरी मोठ्या प्रमाणात वाढले असले तरीही आपल्या सर्वांना आज देखील म्युच्यूल फंड मध्ये आपले पैसे सुरक्षित पद्धतीने कसे गुंतवता येतील याबद्दल आपण आज देखील अनभिज्ञ आहोत की काय असा प्रश्न पडतो.
त्यामुळेच,आज या लेखामध्ये आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना कुठल्या चुका करायला नकोत याबद्दल माहिती घेणार आहोत.
जास्त फायद्यासाठी भरपूर स्कीम्स मध्ये इन्व्हेस्ट करणे
आपण सर्वजण अशा प्रकारचा विचार नक्कीच करत असू, की जर जास्त स्कीम्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर मला जास्त प्रमाणात फायदा होईल. परंतु ही विचार करण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे कारण अशा पद्धतीने पैसे इनवेस्ट करणे कदाचित एक मोठी चूक असू शकते.
कारण, पैसे विभागून गुंतवण्याच्या नावाखाली आपण आपल्या वरील एक फार मोठी जबाबदारी वाढवून ठेवत आहोत, ती जबाबदारी म्हणजे त्या फंडकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी.
मग कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करावी –
शक्यतो इन्व्हेस्टमेंट करताना दोन किंवा तीन स्कीम्स अशा शोधाव्यात ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि या मोजक्याच स्कीम मुळे तुमचा पोर्टफोलिओ देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करण्यास मदत होईल!
आणि कमी स्कीम असल्यामुळे तुम्हाला त्या पोर्टफोलिओ कडे लक्ष देताना देखील अडचण जाणवणार नाही.
फायद्याची वेळ ओळखा
अनेक वेळा जेव्हा मार्केट उसळी मारते तेव्हा अनेक इन्वेस्टर्स मोठ्या प्रमाणावरती आपले इन्व्हेस्टमेंट विकून टाकतात परंतु त्यामुळे प्रत्येकाला फायदा होईलच असे नाही. खूप कमी जणांना या युक्ती मधून पैसा कमावता येतो त्यामुळे असा विचार चुकूनही करू नये.
त्या ऐवजी आपले पैसे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी मध्ये गुंतल्यामुळे तुमच्या पैशाची योग्य किंमत तुम्हाला मिळण्यास मदत होईल आणि यामुळे तुम्हाला योग्य फायदा तर कमवता येईलच, त्यासोबतच तुम्हाला शिस्तबद्ध इन्वेस्टमेंट करण्याची देखील सवय लागेल.
विभागून गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या
भरपूर नफा कमवण्याच्या दृष्टीने गुंतवणूकदार एकाच स्कीम मध्ये भरपूर पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूक करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे पैसे विभागून गुंतवणे यावर भर द्यायला हवा कारण जर तुम्ही एकच स्कीम मध्ये भरपूर पैसे गुंतवता तेव्हा रिस्क फॅक्टर वाढतो.
जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा नेहमी तुमच्या गरजा ओळखूनच पैसे गुंतवणे सोयीस्कर राहील. म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीमधून काय अपेक्षीत आहे, तुम्हाला किती पैसे वाढवून मिळायला हवेत आणि तुम्ही किती धोका पत्करू शकता या गोष्टींचा विचार करून पैशांची विभागून गुंतवणूक करायला हवी.
यासोबतच इतर अनेक गोष्टींचा ही विचार करायला हवं. म्हणजेच तुमचं फिक्स इन्कम किती आहे, तुमची सेविंग किती आहे, गोल्ड मध्ये तुमची काही इन्व्हेस्टमेंट आहे का आणि रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काही इन्व्हेस्ट करू शकता का या सर्व गोष्टींचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करणे सोयीस्कर राहील.
तुमच्या पोर्टफोलिओ कडे वेळोवेळी लक्ष द्या
तुमच्या पोर्टफोलियो कडे तुम्ही जर लक्ष दिले नाही तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता बळावते. कारण, पोर्टफोलिओ कडे नेहमी लक्ष देण्याची गरज असतेच.
काही गुंतवणूक आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळवून देत नाहीत त्यामागे हेच कारण असतं की आपण आपला पोर्टफोलिओ नेहमीच ट्रॅक आणि मॉडरेट करायलाच हवा.
असे म्हटले जाते की गुंतवणूकदाराने नेहमीच इन्व्हेस्टमेंट कडे लक्ष द्यायला हवे, त्याला ट्रेक करायला हवे जेणेकरून तुम्हाला गुंतवणुकीतून होणारा फायदा वेळोवेळी लक्षात येईल. त्यासोबतच त्या स्कीम्स मध्ये कुठले बदल घडत आहेत का यावरही लक्ष द्यायला हवं.
जेणेकरून गुंतवणुकीमध्ये होणारी वाढ थांबणार नाही आणि याच पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त फायदा कमवू शकता.
धोका वेळीच ओळखा
आपण नेहमी बघतो की सर्वजण इन्वेस्ट करत आहेत मग आपल्यालाही कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करावं वाटतात आणि मग याच प्रेशर मध्ये आपण कुठलाही धोका लक्षात न घेता पैसे इन्वेस्ट करतो. ही सवय अत्यंत चुकीची आहे.
आपण आजकाल लहान लहान गोष्टी करतानाही भरपूर विचार करतो, तर मग पैशांची गुंतवणूक करताना फक्त प्रेशर मध्ये इन्व्हेस्टमेंट करणे चुकीचं आहे. त्यामुळेच पैसे इन्वेस्ट करताना धोक्याची शहानिशा करूनच पैसे इन्वेस्ट करावेत.
जर कोणाला पैशांची बचत करायचे असेल तर त्याने त्याच्या ठरवलेल्या पद्धतीनेच काम करायला हवं कारण तज्ञ सांगतात कि ज्याला बचत करायची आहे त्याने इतर लोकांप्रमाणे न विचार करता ठरवलेल्या पद्धतीनुसार काम केले तर ते त्याच्यासाठी अधिक किफायतशीर राहील.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.