आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – शिवराज दत्तगोंडे
—
१९ जानेवारी…आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची तारीख आहे.
भारतातील घाणेरड्या राजकारणामुळे तिचा उल्लेख केला जात नसला तरी सर्वसामान्य हिंदू नागरिकांसाठी व संवेदनशील भारतीय मुस्लिमांसाठीही, ही तारीख लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.
काय महत्त्व आहे १९ जानेवारीचे? या दिवशी नेमके काय घडले होते? कुणासोबत घडले होते?
याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असावी. तीच करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
३० वर्षापूर्वी, १९ जानेवारी रोजी कश्मीरी पंडितांना कश्मीर खोऱ्यातून हाकलवून देण्यात आले होते.
अर्थात याची तयारी चार वर्षे अगोदरपासूनच सुरू जरी असली तरी पंडिताना या दिवशी काश्मीर घाटी सोडावी लागली होती.
अंगावर असेल त्या कपड्यासह, घरदार जमीनी सोडून या लोकांना तेथून रातोरात पसार व्हावे लागले होते.
याचे विस्मरण लोकांना झालेले असले तरी एक संवेदनशील नागरिक म्हणून मी याला विसरू शकत नाही.
दोन दिवस घर सोडून गेल्यानंतर होणारी अडचण आपल्याला घराची आठवण आणण्यासाठी पुरेशी ठरते. तिथे कधीही न परतण्यासाठी काहीही न घेता निघून आलेल्या लोकांची परिस्थिती काय झाली असेल – याची कल्पना कुठलाही संवेदनशील मनुष्य सहज करू शकेल.
कश्मीरचे खरे भूमिपूत्र कोण असतील तर ते हेच कश्मीरी पंडित आहेत. यांची कश्मीरच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक इतिहासावर एक विशिष्ट छाप आहे.
पण नव्वदच्या दशकात हे सगळे दुर्लक्षित करून त्यांना गद्दार ठरवले गेले होते. कश्मीर नावच याची साक्ष पटविण्यासाठी पुरेसे आहे!
कश्यप ऋषीने शमितसर नावाचा तलाव सुकवून तिथे जमीन बनवली तीच जमीन म्हणजे आजची कश्मीर घाटी होय…!
आधी या जागेला कश्यपमुर असे म्हणत असत. मूर म्हणजे रहाण्यायोग्य जागा. याच कश्यपमूरचा अपभ्रंश होऊन पुढे ही जागा कश्मीर म्हणून ओळखली जाऊ लागली.
१३२० पर्यंत हा प्रदेश पूर्णपणे हिंदूभूमी होता. येथील राजे व लोक हिंदूच होते. यानंतर आलेल्या मुस्लीम शासकांनी मग इथे मुस्लीम संस्कृतीचा प्रचार व प्रसार केला.
येथील पहिला मुस्लीम शासक असलेला शद्दूद्दीन हा ही रिमचंद शहा नावाचा पूर्वाश्रमीचा हिंदूच होता. यांनतर आलेल्या हमदानी या शासकाने मग धर्मांतरास बळ दिल्यामुळे पूर्वाश्रमीचे हे हिंदू लँड आज मुस्लीम बहुल बनलेले आहे.
पण हा झाला इतिहास. आजच्या आधुनिक भारताच्या स्थापनेनंतर या लोकांसोबत कशा प्रकारचा अन्याय झालाय हे सुद्धा तितकेच वेदनादायी आहे.
१९४७ साली झालेल्या युद्धानंतर कश्मीरची फाळणी झाली.
तोपर्यंत प्रामुख्याने घाटीतच असलेले पंडित हे भारतात राहिले. पण या नंतर शेख अब्दुलाच्या नेतृत्वाखाली या लोकांना तिथे अतिशय योजनापूर्वक दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्यात आले.
ते अल्पसंख्य असले तरी त्यांना त्यांच्या प्रमाणातही प्रतिनिधित्व नाकारण्यात आले. त्यांना पलायन करण्यासाठी जाणीवपूर्वक भाग पाडण्यात आले. यासाठी तिथे असलेल्या मुस्लीमांचे पद्धतशीरपणे ब्रेनवाशिंग करण्यात आले.
याचाच परिणाम म्हणून मग यातील काही लोकांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबून कश्मीरी पंडितांविरोधात हिंसा केली…! त्या हिंसेला चिथावणी दिली गेली. यात JKLF ही संघटना आघाडीवर होती.
–
- ज्यावर खरा हक्क भारताचा आहे त्या पाकव्याप्त काश्मीरबाबत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!
- काश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं
–
१९ जानेवारी १९८९ रोजी दिल्ली सरकारने फारूख अब्दुलाचे सरकार बरखास्त केले व राज्यपाल म्हणून जगमोहन यांची नियुक्ती केली. पण जोपर्यंत जगमोहन येऊन पदभार घेत तोपर्यंत फारूख अब्दुला गेले असल्यामुळे तिथे राज्याचे अस्तित्वतच नव्हते.
या काळात लाखो लोक रस्त्यावर आले व घोषणा देऊ लागले. कश्मीरात “निजाम ए मुस्तफा”, “शरिया” आणण्याच्या घोषणा देऊ लागले. यामुळे मग हिंदू असलेले पंडित आपोआपच काफीर ठरले…!
त्यांना मारणे, धमकावणे हे प्रकार सर्रास सुरू झाले. त्यांच्या घरावर ‘रलीव (धर्म बदला आणि आमच्या सोबत रहा), सलीव(पळून जा), गलीव (नाहीतर मरा)’ अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात येऊन त्यांना घाटी सोडण्यासाठी बाध्य करण्यात आले.
पंडितांना या लोकांनी जबरदस्तीने घराबाहेर काढून या मोर्चाचा भाग होण्यासाठी बाध्य केले… त्या मोर्चात दिली जाणारी एक घोषणा म्हणजे,
“इथे बनणार पाकिस्तान, पंडितांच्या बबायकांसह, पंडितांच्याविना”अशी होती.
ती ऐकून सर्व पंडितांना, आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाही, हे समजून चूकले व त्यांनी मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू केले.
आजही हे पंडित कश्मीरात परत जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. याला कारणीभूत – आपल्या येथील घाणेरडे राजकारण होय.
पंडितांच्या विस्थापनावर बोलले तर मुस्लीम नाराज होतील ही ती भिती – ह्या परिस्थितीवर काही करण्यासाठी राजकीय पक्षांना पुढे जाऊ देत नाही.
पण भारतीय नागरिक म्हणून आपण मात्र पंडितांच्या कमजोर आवाजाला बळ पुरविलेच पाहिजे असं मला नेहेमीच वाटत आलेलं आहे.
विशेषतः हिंदूनी १९ जानेवारी नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे…
आता हे कुणाला धर्मांध वक्तव्य वाटेल… पण पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.
–
- जम्मू काश्मीर मधील वादग्रस्त “कलम ३५” मुळे आजवर कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत? वाचा !
- ड्रग्ज, बंदुका आणि “आझादी” : धगधगत्या काश्मीरचे अज्ञात वास्तव
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.