अलेक्सा वरील विनोद वाचलेत? या गोड नावामागचं रहस्य जाणून घेऊया….!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तुम्हाला अलेक्सा माहिती आहे का? अहो ती नाही का जी तुम्ही सांगाल ते प्रत्येक डिजिटल काम करू शकते. म्हणजेेच जर तुम्ही तिला गाणे लावायला सांगितले तर ती गाणे लावते, जर तुम्ही तिला कोणाला फोन करायला सांगितला तर ती फोन देखील करते
किंवा जर तुम्ही तिला घरातील लाईटची प्रखरता कमी-जास्त करायला सांगितली तर ती तेदेखील काम आज करू शकते. होय ही तीच अलेक्सा आहे जी ॲमेझॉनचं कुठलंही डिजिटल डिवाइस ऑपरेट करण्यासाठी यापुढे तुम्हाला मदत करेल.
इंटरनेट वरती या अलेक्सा वरती प्रचंड विनोद तुम्हाला वाचायला मिळतील. परंतु तुम्हाला अलेक्सा म्हणजे नेमके काय माहिती आहे का? या लेखामध्ये समजून घेऊयात एलेक्सा नावाच्या एका अप्रतिम टेक्निकल जादू बद्दल!
तुम्ही एखादं ॲमेझॉनचं प्रॉडक्ट वापरत असाल आणि तुम्ही अलेक्सा म्हटल्यानंतर एक सुंदर आवाज तुम्हाला उत्तर देतो तो आवाज आहे ॲमेझॉनची टेक्निकल असिस्टंट अलेक्साचा. अलेक्सा म्हणजे ॲमेझॉन ची व्हॉइस कंट्रोल टेक्निकल असिस्टंट आहे.
एलेक्सा तुम्हाला तुमचे काम सोपे करण्यात मदत करते म्हणजे जर तुम्ही ॲमेझॉन या कंपनीने तयार केलेले उत्पादन “एको” याचा वापर केलात तर तुमच्या नक्की लक्षात येईल की हा प्रकार काय आहे. तुमच्या अनेक समस्यांचे उत्तर हे उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला आरामात मिळेल.
अलेक्सा हे नाव वापरून तुम्ही ॲमेझॉन सोबत इंटरॅक्ट करायला सुरुवात करता. यामुळे तुम्ही अनेक गोष्टी आवाजावरून कंट्रोल करू शकता.
अलेक्सा या वर्च्युअल असिस्टंटला ॲमेझॉन या कंपनीने जरी बनवले असले तरी अनेक कंपनीच्या उत्पादनांमध्ये तुम्हाला अलेक्सा आढळून येईल. उदाहरणार्थ, आज-काल लाईट मध्ये किंवा सोनोस या कंपनीच्या स्पीकर मध्ये देखील अलेक्सा वापरण्यात आलेलं आहे.
ॲमेझॉन ने देखील या टेक्निकल असिस्टंट चा वापर इतर अनेक उत्पादनांमध्ये वाढवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही या अलेक्सा चा वापर तुमच्या स्मार्ट होम मध्ये देखील करू शकता.
ही अलेक्सा तुम्हाला या स्मार्ट हाऊस मध्ये लाईट ची प्रखरता कमी जास्त करणे, घराचे दार लोक करणे, घरातील तापमान कमी-जास्त करणे अशा लहान-मोठे गोष्टींमध्ये देखील मदत करू शकते.
अलेक्सा आज संपूर्ण जगामध्ये जरी प्रसिद्ध असली तरी तुम्ही एखाद्या टेक्नीकल दुकानात जाऊन हा आवाज विकत घेऊ शकत नाही. कारण, हा आवाज तुम्हाला फक्त ॲमेझॉन या कंपनीच्या एखादा उत्पादनासोबतच मिळू शकतो.
जसे की “सिरी” ही आयफोनची टेक्निकल असिस्टंट आहे तसेच अलेक्सा ॲमेझॉन टेक्निकल असिस्टंट आहे.
अलेक्सा नेमकं काय आहे?
अलेक्सा ही एक प्रकारे सिस्टीम मधील सॉफ्टवेअर आहे जे, क्रोटन विंडोज १० या सॉफ्टवेअर च्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे.
तुम्हाला अलेक्सा बद्दल एवढंच जाणून घेण्याची आवश्यकता आहे की जेव्हा तुम्ही अलेक्सा हा शब्द उच्चारता तेव्हा ते उत्पादन तुमचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सुरुवात करेल. अलेक्सा ला प्रश्न विचारून तुम्ही उत्तरं देखील मिळवु शकता.
तुम्ही अलेक्साला कुठलाही प्रश्न विचारा, ती नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ, आज पुण्यातील वातावरण कसं असेल? अस विचारलं तरीही ती नक्कीच उत्तर देईल.
अलेक्सा म्हणजे एक क्लाऊड बेस्ड सर्विस आहे जी तुम्हाला उत्पादन चांगल्या पद्धतीने वापरायला मदत करते.
ॲमेझॉनने अलेक्सा व्हॉईस सर्विस म्हणजेच ” ए व्ही एस” अशा पद्धतीने डिझाईन केला आहे ती वापरकर्त्याला तो कुठल्यातरी खऱ्या ॲलेक्साशी संवाद साधतो आहे असे वाटते.
खरं म्हणजे एलेक्सा हा एक शब्द आहे ज्यामुळे ॲमेझॉन मधील त्या उत्पादनाला तुमचे म्हणणे ऐकण्याची चालना मिळते. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर अलेक्सा ही एक ट्रीगरींग वर्ड आहे ज्यामुळे डिवाइस तुमचं म्हणणं ऐकून घेतो आणि त्यानुसार प्रोसेस सुरू करतं.
आजपर्यंत प्रत्यक्ष वापरात आलेली अलेक्सा ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सर्वात मोठी उत्पत्ती आहे.
आज देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बऱ्याच बाबतीत वापरण्या योग्य आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे अलेक्सा, होय ॲमेझॉनच्या म्हणण्यानुसार अलेक्सा व्हॉईस सर्व्हिस म्हणजेच ए व्ही एस क्लाऊड मध्ये स्थित आहे.
या प्रणाली मध्ये डिव्हाइस तुमचा आवाज ओळखू शकतं. अगदी तुम्ही ग्रामीण भाषेत बोलायचं जरी प्रयत्न केलात तरी अलेक्सा तुमचा आवाज लगेच ओळखू शकेल.
तुम्ही अलेक्सा चा वापर मायक्रोफोन किंवा स्पीकर च्या माध्यमातून केव्हाही करू शकता. अलेक्सा मध्ये नवीन कौशल्य विकसित करण्याचा ऍमेझॉन नेहमीच प्रयत्न करत आहे असे ॲमेझॉन डेव्हलपर साईट वरती सांगण्यात आले आहे.
अलेक्सा हेच नाव का वापरण्यात आले?
ऍप्पल ने आपला टेक्निकल असिस्टंटचे नाव सिरि अस ठेवलं आहे, गूगल होम ने देखील आपल्या गुगल असिस्टंट चे नाव ओके गूगल असे ठेवलं आहे
आणि आता ॲमेझॉन ने आपल्या टेक्निकल असिस्टंट चे नाव अलेक्सा असे ठेवले पण तुम्हाला माहिती आहे का ॲमेझॉन ने त्यांच्या टेक्निकल असिस्टंट चे नाव अलेक्सा असे का ठेवले आहे?
ॲमेझॉन चे एक्झिक्यूटिव्ह डेव्हिड लींप यांच्या मते अलेक्सा हे नाव काही कारणांसाठी निवडले गेले होते. त्यातील पहिले कारण म्हणजे हे नाव अलेक्झांड्रिया या ग्रंथालयाची आठवण करून देते. या ग्रंथालयामध्ये जगभरातील ज्ञान उपलब्ध होते.
ॲमेझॉन ला देखील या सर्विस कडून हीच अपेक्षा होती की अलेक्साकडे जगभरातील सर्व ज्ञान उपलब्ध असावे. यातील मुख्य कारण म्हणजे या नावांमध्ये एक्स हा आवाज मोठ्या प्रमाणावर ती वापरला जातो आणि ॲमेझॉन ला असेच नाव अपेक्षित होते जेणेकरून ती सर्विस इतर अनेक आवाजांमध्ये गोंधळून जाऊ नये.
हे नाव ठरवताना ॲमेझॉनने अनेक नावांचा विचार केला होता कारण सर्विसेस सोबतच हे नाव देखील ॲमेझॉन साठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच ॲमेझॉन अलेक्सा अशा या वेगळ्या नावाचा वापर या नवीन डिवाइस मध्ये व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम साठी केलेला आहे.
अलेक्सा विषयी भरपूर जोक आणि माहिती देखील तुम्हाला इंटरनेट वरती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे या माहितीचा वापर करून तुम्ही या नवीन सिस्टीम बद्दल अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.