Site icon InMarathi

क्षुल्लक गोष्टीचा अतिविचार करताय? या सोप्या गोष्टी पाळा आणि मन शांत ठेवा!

varun 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणत्याही गोष्टीचा विचार करणं ही एक न संपणारी क्रिया आहे. विचार अनेक प्रकारचे असू शकतात: निर्णय घेताना सतत विचार करणे आणि नंतर निर्णयावर प्रश्न विचारणे, भविष्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणे, छोट्या छोट्या तपशीलांमध्ये विचार करणे इ.

आजकाल ऑनलाईन काय पोस्ट करावे याबद्दल देखील लोक विचार करताना दिसतात. इतर लोक पोस्ट वाचून काय प्रतिक्रिया देतील आणि त्या प्रतिक्रियेला आपण फेस कसं करायचं, काय कमेंट द्यायची अशा प्रकारचे.

तसं विचार करणं चुकीचं नाही, पण अति विचार करणं हानिकारक आहे. तर कसं?

 

 

एखादा विचार मनात ठेवून रात्री कधीच झोप लागत नाही आणि झोप झाली नाही की चिडचिड होते ती वेगळी. अतिविचार करण्याने आपण भूतकाळ किंवा भविष्यकाळात असतो. त्यामुळे वर्तमानात काय चालले आहे याचा बहुतेक वेळा विसर पडतो. कामात लक्ष लागत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखाद्याचा राग दुसऱ्यावर निघणे हे तर आता कॉमन होत चाललं आहे. एखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालेलं आहे.

या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होत असतो. तर बघूया असे पॉईंट ज्यामुळे अति विचार टाळून आपलं मन शांत ठेवता येईल.

 

१. निर्णय घेण्यासाठी एक टाईम लिमिट (डेडलाईन) सेट करा.

 

 

एखाद्या गोष्टीचा निर्णय घेऊन त्यावर काम करणं गरजेचं नसेल तर तो तसाच सोडून दुसऱ्या गोष्टींवर काम करायला घ्या. परत परत त्या गोष्टीचा विचार करू नका. एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम रहा.

निरर्थक त्या गोष्टींवर विचार करून वेळ सुद्धा वाया जातो आणि एनर्जी सुद्धा…!

म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात डेडलाईन ठरवून निर्णय घ्या. “मी ठराविक वेळेत निर्णय घेईन” असं स्वतःला सांगा.  हा छोटा किंवा मोठा निर्णय असला तरी हरकत नाही.

 

२. दिवसाची चांगली सुरवात करा

तुमचा दिवस कसा सुरू होतो यावर सगळा खेळ अवलंबून असतो.

 

 

दिवसाची सुरुवातचं नकारात्मक पद्धतीने झाली असेल तर तीच नकारात्मकता आपल्या चालण्या-बोलण्यात दिसून येते आणि त्याचप्रकारचे निगेटिव्ह थॉटप्रोसेसिंग सुद्धा चालू राहतं.

व्यायाम करणं, योग्य वाचन, योग्य श्रवण यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. लवकर उठलात तर अति उत्तम.

 

३. काम करताना ब्रेक घ्या

 

 

जे काम चालू असतं त्याबद्दलच आपला मेंदू विचार करत असतो. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कन्टीन्यू राहतं.  ओव्हर थिंकिंगसाठी ही सुद्धा गोष्ट तेवढीच जबाबदार आहे.

काम चाललं आहे चालू द्या, पण त्या कामादरम्यान ब्रेक घ्या.  मन आणि मेंदू यांना त्या विचारातून थोडं बाहेर काढा.

अफकोर्स विचारातून बाहेर पडाल तर ताण पण तेवढाच कमी होईल.

 

४. सोशल मीडियाचा वापर कमी करा

 

 

हल्ली इंस्टावर फोटो, फेसबुक वर पोस्ट आणि व्हाट्सअँप वर स्टेटस टाकलं की, इतरांपेक्षा आपणच ते जास्त वेळा ओपन करून बघत असतो.

विचारा स्वतःला याबद्दल आणि हो की नाही ठरवा.

याच्यामुळे साध्या, सोप्या पद्धतीने विचार करणं अवघड होऊन जातं आणि सारख सारख एकाच गोष्टीच्या मागे जाऊन अतिविचार करण्याच्या भानगडीत आपण पडत असतो.

 

५. कृतिशील व्यक्ती व्हा

आपलं काम कशा रीतीने आणि केव्हा पूर्ण होईल यावर आपण विचार करतच असतो, पण त्यावर अॅक्शन घेऊन पूर्ण करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.

छोट्या छोट्या टप्प्यात काम करून ते पूर्ण केलं की, काम लवकर पूर्ण होतं.

 

 

काम पूर्ण होणार-नाही होणार या द्विधा स्थितीमध्ये मन अडकत नाही. त्याबद्दलची भीती सुद्धा निघून जाते.

कृती करून काम पूर्ण होतंच आणि अतिविचार करण्याची वेळ सुद्धा टळून जाते.

 

६. सगळं आपल्या कंट्रोल मध्ये नसतं हे मान्य करायला शिका, चुकांमधून शिका

 

 

अनपेक्षित घडलेल्या घटनेवर सतत विचार करण्याने ती झालेली चूक किंवा घडलेली घटना दुरुस्त होत नसते. झालेली घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घ्या पण त्यावर अतिविचार करू नका.

त्यामुळे “आपण मूर्ख आहोत आणि म्हणूनच ही घटना घडली” यावर शिक्कामोर्तब होतं. त्या चुकांमधून शिका.

आपल्या कंट्रोल मध्ये नसलेल्या गोष्टी तिथेच सोडून पुढे चालायला शिका. आपोआप विचारांचा अतिरेक कमी होईल.

 

७. व्यायाम, योग

हे ही वाचा – आहारात हे सोपे बदल करा आणि मिळवा तल्लख, तरतरीत बुद्धीमत्ता, वाचा!

जरा विचित्र वाटेल, पण मनात चांगले विचार येण्यासाठी मेंदू आणि शरीर तंदुरुस्त असणं गरजेचं आहे.

चांगले विचार जास्त वेळ आपल्या डोक्यात राहत नाहीत, पण वाईट विचार, चुकीचे विचार जास्त काळ राहतात.

व्यायाम, योग यामुळे शरीर तर फिट राहीलच आणि नकारात्मकता सुद्धा निघून जाईल.

 

८. रिकामे बसू नका

‘रिकामं मन म्हणजे शैतानाच घर’ हे  बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल. हे थोडंफार खरं आहे.

रिकाम्या वेळेतच आपल्याला काही ना काही सुचत असतं आणि त्यावर विचार करण्यात आपला वेळ निघून जातो. सतत काही ना काही करत रहा.

वाचन तर याला उत्तम पर्याय आहे. वाचायला आवडत नसेल तर हेडफोन आपल्या पासून दूर करू नका.

 

 

गाणी ऐकल्याने लिरीक्स आठवण्यात मेंदू कामाला लागतो. सकारात्मक, ऊर्जा देणारी गाणी ऐका.

 

९. वर्तमानात जगायला शिका

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.

 

भूतकाळात-भविष्यात जगण्यात काही अर्थ नसतो हे जगजाहीर आहे. त्याच्या विचारात आपण आपला वेळ वाया घालवतो.  चुकून जर निगेटिव्ह थॉट प्रोसेसिंग असेल तर मूडचे बारा वाजलेच समजा.

 

 

वर्तमानात जगा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या.

 

१०. आपल्या समस्येबद्दल सजक रहा

 

हे ही वाचा – चिडचिड, उदासीनता दूर ठेवण्यासाठी ही एक सवय लावून घ्या आणि निरोगी आयुष्य जगा

आपल्याला नक्की काय समस्या आहेत, कोणाबद्दल आहेत हे आपल्या व्यतिरिक्त अजून कोणाला चांगलं माहीत असेल? तात्काळ त्या रस्त्याला जाणं टाळावं.

आपल्याला ज्या समस्या आहेत त्याला पर्याय पण आपल्यालाच माहीत असतात. समस्या उद्भवणार नाहीत याकडे लक्ष द्यावं.

तर अशा काही छोट्या छोट्या आणि सहज अवलंबिता येतील अशा बाबींनी आपण आपला विचारांचा अतिरेक थांबवू शकतो आणि मन, शरीराला निरोगी ठेऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version