आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
दूर अंतराळात कुठल्यातरी अगम्य ठिकाणी aliens नक्कीच असतील असा विश्वास (की आशा? 😀 ) अनेक शास्त्रज्ञाना आहे. हे aliens चं जग आपल्याला वाटतं तेवढं दूर नसेल कदाचित !
University of New South Wales (UNSW) इथल्या Australia च्या शास्त्रज्ञांनी एक red dwarf star – Wolf 1061 – आणि त्याच्या भोवतीचे ३ ग्रह शोधले आहेत.
हा तारा पृथ्वीपासून फक्त 14 light years (प्रकाशवर्षे, light years – म्हणजे प्रकाश एका वर्षात जितकं अंतर कापू शकतो – तेवढं अंतर. एक प्रकाशवर्ष म्हणजे – 9.4607 × 1012 किलोमीटर !) दूर आहे. हे अंतर आपल्याला जरी खूप जास्त वाटत असलं तरी अंतराळाच्या गणितांमध्ये हे बरंच कमी आहे.
ह्या ताऱ्याभोवती असलेल्या तीन ग्रहांपैकी एक, Wolf 1061 c , हा पृथ्वीच्या ४ पट मोठा आहे आणि – habitable आहे, म्हणजे जीवसृष्टीस पोषक आहे. एखाद्या ग्रहाने habitable असण्यासाठी एक महत्वाचा criteria असतो तो म्हणजे ताऱ्यापासून आवश्यक तेवढं अंतर. हे अंतर फार जास्त असलं तर ग्रह थंड पडतो आणि खूप कमी असेल तर ग्रहावर अति उष्णता असते.
Wolf 1061 c हा ग्रह त्या ताऱ्यापासून optimum अंतरावर आहे.
ह्या तिन्ही planets चं mass (घनत्व) ते planets rocky आणि solid surface असण्याच्या अनुकूल आहे.
Wolf 1061c हा त्या system च्या Goldilock Zone मध्ये स्थित आहे (जिथे planet त्याच्या सूर्यापासून perfect अंतरावर असतो जेणेकरून तिथे पाणी liquid स्वरूपात राहू शकतं आणि त्यामुळे तिथे जीवन असण्याची शक्यता जास्त असते).
जिज्ञासूंसाठी Wolf 1061c च्या विषयावरील २ व्हिडिओ :
२) Wolf 1061 c
येणाऱ्या काळात alien life बद्दल अधिकाधिक उत्साहवर्धक माहिती मिळत जाणार हे नक्की !
Image and Info source: cnn
Featured image: extremetech
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi