Site icon InMarathi

तुमच्या रोजच्या वापरातील ‘जीन्स’ नेमकी आली कुठून? वाचा जीन्सचा हा रंजक प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपल्या अंगात असणाऱ्या ‘genes’ प्रमाणेच ‘jeans’ सुद्धा अतिशय कॉमन झाली आहे. आजच्या काळात जीन्स ही कपाटातील एक अविभाज्य भाग झालीये.

तर मंडळी आपल्या सर्वांना परिचित आणि सर्वांची लाडकी असलेली जीन्स नेमकी कुठून बरं आली असेल? चला तर मग तिच्या जन्माचा आणि इथवरच्या शतकाहून अधिक अशा घोडदौडीचा मागोवा घेऊया.

 

जीन्सचा इतिहास :

 

जीन्स ही ‘डेनिम’ नावाच्या कापडापासून तयार केली जाते. ‘डेनिम’ हे नाव मजबूत अशा ‘Serge de Nîmes’ ह्या कापडाच्या नावावरून ठेवण्यात आलं आणि ते कापड फ्रान्स मधील ‘de Nîmes’ मध्ये तयार केलं जायचं म्हणून ‘डेनिम ‘ शब्द तयार झाला.

 

 

अनेक प्रयोगांनंतर हे कापड तयार करण्यात विणकरांना यश आलं. ह्या डेनिमला एका बाजूने नीळ आणि एका बाजूला पांढरा रंग असे.

अतिशय मजबूत असं हे कापड असल्यामुळे कामगार तसेच इतरही शारीरिक कष्टाची कामं करणाऱ्यांनी ह्या कापडास पसंती दिली.

हे ही वाचा –

===

जीन्सचा जन्म :

 

procopy writers

 

इसवी सन १८०० दरम्यान, वर म्हटल्याप्रमाणे कामगार वर्गाने डेनिमला पसंती दिल्यामुळे ती मंडळी डेनिमच्या पॅन्ट, ट्राउझर वगैरे वापरायचे ज्याला ‘वेस्ट ओव्हरऑल’ असं नाव होतं.

कसंही पादडवलं तरीही ती बरीच टिकाऊ होती. त्यामुळं जेकोब डेविस ह्या शिंप्याने लेवी स्ट्राउस ह्या व्यापाऱ्याकडे डेनिम पँटचं पेटंट घेता यावं म्हणून पैशांची मदत मागितली.

तर कल्पना अशी होती की, ह्या पँट्सला बटणं आणि चेन इत्यादी जोडून त्यांना अधिक टिकाऊ बनवायचं. ह्यातूनच २० मे १८७३ मध्ये आपली लाडकी पहिली ब्लू जीन्स जन्माला आली.

 

वेस्टर्न फॅशन :

१९२० -१९३० दरम्यान कामगार, खाण कामगार, गुराखी ह्यांच्यासाठी डेनिम फॅशन बनली. कुठेही कशीही वापरली तरीही ती लवकर खराब होत नसे.

नंतर १९३६ ला लेवी स्ट्राउस ह्यांनी आपली ओळख असलेला असा लाल झेंडा पॅन्टच्या बाहेरील बाजूस लावत पहिल्यांदा ब्रँडच नाव बाहेर डिस्प्ले करण्याचा पायंडा पाडला.

 

heddles

 

१९३० मध्ये आपल्याला माहित असलेल्या वोग मासिकानेही फ्रंटपेज वर जीन्स घातलेल्या मॉडेलचा फोटो छापत ‘जीन्स ही फक्त पुरुषांपर्यंतच मर्यादित नाही तर बायकाही जीन्स वापरू शकतात’ असं जणू विधानच मांडलं.

हे ही वाचा –

===

 

कुल जीन्स :

 

१९५० मध्ये जीन्स तरुणीच्या गळ्यातलं ताईत बनली होती. त्याचं बरंचसं श्रेय हॉलिवूडपटांना आणि त्यांच्या कलाकारांना जातं. जेम्स डीन आणि मर्लोन ब्रँडो ह्यांनी त्यांच्या चित्रपटांत जीन्स घालत युवकांना वेड लावलं.

 

pinterest

 

वॉश, ब्लॅक असे रंग सगळ्यांना जीन्स मध्ये आवडू लागले होते आणि levi’s, lee-cooper ,wrangler असे ब्रँड्स नावारूपाला येत होते. पण अर्थातच महिलांमध्ये जीन्स ची फॅशन अजूनही आली नव्हती.

 

जीन्सचं नवं कल्चर :

१९६० मध्ये जीन्सने जणू हिप्पी युगाची नांदीच केली. अमेरिकेतील फ्री लव्ह मुव्हमेंटमध्ये सर्वांनी जीन्स परिधान करत नवीन फॅशन स्टेटमेंट केलं.

नेहमीच्या रेखीव पेहेरावापासून जशी ती सुटकाच होती! त्याच काळात जीन्स वर वेगवेगळे पॅच लावणे, एम्ब्रॉयडरी करून सजवणे, भडक रंगांचा वापर करणे, स्टोन वॉश करणे असे अनेक प्रयोग ट्रेंड होऊ लागले.

 

pinterest

 

अगदी बेलबॉटम जीन्स सुद्धा लोकं वापरू लागले. (करीनाने चित्रपटांत वापरलेली तशी जीन्स तुम्हाला नक्कीच आठवत असेल.) जीन्स हा तेव्हा हिप्पी फॅशन आयकॉन बनला.

हळूहळू जीन्स अर्थात डेनिम जॅकेटही फेमस होऊ लागलं.

 

पुढील वाटचाल :

 

stylecaster

 

१९६० मधली प्रगती तर आपल्याला माहितीये. १९७० मधेही तो ट्रेंड सुरूच होता. त्याचकाळात डेनिम शर्ट आणि वेस्ट चा शोध लागला.

 

डिझाईनर जीन्स :

 

kims

 

फॅशन विश्वात १९८० मध्ये जीन्स वर प्रयोग होऊ लागले आणि डिझाईनर्सच्या मनात विविध विचार सुरु झाले. ऍसिड वॉश,स्टोन वॉश तसेच ripped जीन्स हे प्रकार ट्रेंडिंग होते.

त्याचवेळी नॅरो बॉटम पँट्स बाजारात दिसू लागल्या. शिवाय पुरुषमंडळीही डिझाईनर जीन्सच्या जाहिरातीत झळकू लागली.

 

बॅगी जीन्स :

 

 

आता हळूहळू १९९० मध्ये प्रवास करत जीन्स बाईंनी आपलं माप कॅजुअलकडे वळवलं आणि अगदी साध्या वापरातली वस्तू म्हणून ओळख निर्माण केली. ढगळपगळ जीन्सचा एव्हाना जमाना आला होता.

कार्पेंटर जीन्स, कार्गो अशा अनेक खिसेवाल्या जीन्स प्रसिद्धीस आल्या. त्याबरोबरच जीन्सचे बाबासूटही मुलामुलींमध्ये प्रिय होऊ लागले.

हिप-हॉपचं वारं घोंगावू लागलं आणि म्हणून पुरुषवर्गातही लूज डेनिमचा ट्रेंड आला.

 

skinny जीन्स :

 

lee

 

Britney Spearsआणि Christina Aguilera ह्या पॉप स्टार्सनी सन २००० मध्ये अतिशय लोवेज ‘लो राईज’ पँट्सचं फॅड आणलं. तसंच आता जीन्स ही फॉर्मल ते कॅज्युअल अशा सर्व प्रकारात वापरली जाऊ लागली होती.

फ्लेअर कट, बुट कट अशा कट्सनाही त्यात पसंती मिळत होती. तेव्हाच नवीन फॅशन उदयास अली ती म्हणजे स्ट्रेचेबल जीन्स ची.

अगदी legging सारखी दिसणारी जीन्स लोकं ऑफिस, पार्टी, डेटला घालून जाऊ लागले. ब्रॅण्ड्सही वाढू लागले होते. बॉयफ्रेंड जीन्स हा प्रकार महिलांमध्ये विशेष लाडका बनला होता.

 

हाय वेस्ट, क्रॉप लेग्स :

 

vogue india

 

हल्ली हाय वेस्ट, क्रॉप लेग्स अशा जीन्सच्या स्टाईल लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. स्ट्रेट फीट असलेल्या जीन्सही तरुणाई वापरताना दिसते.

लॉन्ग, शॉर्ट तसेच hot pants मध्येही डेनिम वापरली जातेय आणि अजूनही त्यावर विविध प्रयोग सुरूच आहेत. जीन्समध्ये अनेक रंगही आता उपलब्ध असतात.

मध्ये इंद्रधनूतल्या जवळजवळ प्रत्येक रंगाची जीन्स परिधान केलेल्या व्यक्ती आसपास भटकताना दिसून यायच्या. अगदी लहान मुलांनाही फॅशनेबल जीन्स घालण्याकडे नव्या पालकवर्गाचा कल दिसू लागलाय.

 

levis

 

ती इवलीशी मंडळीही अगदी उत्तमप्रकारे हा पेहेराव कॅरी करतात. ripped जीन्स (आई आणि आजीच्या भाषेत फाटकी /भोक पडलेली ) हेही फॅशन स्टेटमेंट बनलंय.

जशी कचऱ्यातून कला,अगदी तसंचअसलेल्या जुन्या जीन्सला भादरून ripped जीन्स करणारे कलाकार घरोघरी दिसू लागलेत.

तर थोडक्यात काय तर जीन्स हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा, वॉर्डरोबचा अविभाज्य घटक बनलीये.अगदी जीन्स वापरणं आपल्या ‘genes’ मध्ये आहे म्हणा ना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version