Site icon InMarathi

करोना व्हायरस चीनने मुद्दाम तयार केलाय, हे खरं की खोटं?

corona virus in lab feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२०२० ची सुरुवात झाली तिच एका भयानक आजाराची चाहुल घेऊन. WHO कडे नोंद झालेला पहिला कोरोना व्हायरसचा रुग्ण ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीनमध्ये आढळला आणि आता त्या व्हायरसने जगभर थैमान घातले आहे.

कोरोना व्हायरसने आत्तापर्यंत ८० लोकांचा बळी घेतला आहे आणि हजारो लोकांना याची लागण झाली आहे.

हा व्हायरस आला तो चीनमधल्या हुआन प्रांतातून. आता हूआन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील लोकांना कुठेही जाण्यास चिनी सरकारने बंदी घातली आहे. तिथले विमानतळ, रेल्वेमार्ग, बस स्टॉप बंद करण्यात आले आहेत.

 

fox news

 

लोकांना घरीच राहायचा सल्ला देण्यात आला आहे. म्हणजेच आजार किती भयानक स्वरूप धारण करू शकतो याची कल्पना येईल. अनेक देशांमध्ये आता त्याचे रुग्ण आढळून येत आहेत.

त्यांच्यासाठी स्वतंत्र आरोग्य कक्ष, औषधयोजना करण्यात आली आहे. जगभर आता कोरोनासाठी हायअलर्ट लावला गेला आहे. सर्व महत्त्वाच्या विमानतळांवर येणाऱ्या चिनी नागरिकांची तपासणी केली जात आहे.

 

the financial express

 

अगदी चीनमधून येणाऱ्या कुठल्याही देशाच्या नागरिकांची तपासणी आता होत आहे. हा आजार सापांमार्फत माणसांपर्यंत आला आहे असं म्हटलं जात आहे.

चीनमध्ये साप, बेडूक, झुरळ सर्रास खाल्ले जातात, त्यामुळेच हा आजार आला असं म्हटलं जात आहे.

शंका

ह्या आजाराची तीव्रता जसजशी वाढत आहे तसं तसं त्याविषयी अनेक शंका-कुशंका निर्माण होत आहेत. हा आजार नेमका आला कुठून? सापांपर्यंत तो कसा गेला याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

एक तर चीनमधून हा आजार आलाय. त्यामुळे चीन जे सांगत आहे त्यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. त्याला कारणही तसंच आहे, या आजाराचे रुग्ण सुरुवातीला आढळल्यानंतर चीनने त्याविषयी काहीही बाहेरच्या जगात सांगण्यास टाळाटाळ केली.

खरंतर १ डिसेंबर २०१९ रोजी एक रुग्ण, कोरोना आजाराची लक्षणे असलेला एक रुग्ण हुआन प्रांतात मिळाला होता. पण चीनने ही माहिती दडपली.

 

 

अगदी WHO च्या नियमानुसार कोणताही नवीन आजार आला तर त्याची माहिती त्यांना सगळ्यात आधी देणं गरजेचं असतं, कारण त्यानंतरच संपूर्ण जगभरात त्याच्यासाठी काळजी घेतली जाऊ शकते. लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

पण चीनने यासंदर्भात दिरंगाई केली किंवा निष्काळजीपणा केला असं म्हटलं जात आहे. आणि जेव्हा आजाराची तीव्रता वाढली, तेव्हा मग हे जाहीर करण्यात आलं की हा आजार संसर्गजन्य आहे आणि त्यामुळे मानवास धोका आहे.

आता असे म्हटले जात आहे की, चीनच्या हुआन प्रांतातल्या प्रयोगशाळेत हा व्हायरस तयार करण्यात आला. हुआनच्या मासळी बाजारापासून ही प्रयोगशाळा फक्त वीस मैलांच्या अंतरावर आहे.

 

south china morning post

 

तिथूनच हा व्हायरस पसरला किंवा पसरवण्यात आला असे म्हटले जात आहे. पण चीनने असं का केलं असेल?

चीनची सगळ्यात बलशाली राष्ट्र व्हायची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये, पण सगळ्या देशांशी युद्धभूमीवर जाऊन लढणं शक्य नाहीये हेही सगळ्यांना माहिती आहे.

म्हणूनच तिसरे महायुद्ध जे होईल ते रक्तरंजित न होता रक्तविरहित होईल असं म्हटलं जातं.

त्यासाठी जैविक शस्त्रास्त्रांचा वापर केला जाईल असं म्हटलं जातं. त्यासाठी बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्या वापरातून मनुष्य आणि प्राणी यांना संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

खरंतर निरनिराळ्या देशात काही आजारांपासून कायमची मुक्ती मिळावी आणि निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी संशोधन सुरू आहे. ज्याला WHO च समर्थन आहे.

अगदी असेच संशोधन हुआन मधल्या प्रयोगशाळेत सार्स, H5N1 इन्फ्ल्यूंझा, जापनीज इन्सिफिलीतिस, डेंग्यू , एबोला या आजारांवर केले जात आहे. पण यावर शंका उपस्थित केली ती डॉक्टर ड्यॉनी शोहँम या इस्त्रायली गुप्तहेर संस्थेत काम केलेल्या अधिकाऱ्याने.

त्यांच्या म्हणण्यानुसार, चीनमधल्या हुआन मध्ये जैविक आजार पसरवण्यासाठी संशोधन केले जात आहे. असंही म्हटलं जात आहे की, हा व्हायरस कॅनडातल्या प्रयोगशाळेतून चीनमध्ये आला.

 

India TV

 

तिथे काम करणार्‍या चिनी डॉक्टर एजंटांनी जैविक शस्त्रास्त्रांच्या प्रयोगासाठी तो आणला आणि चीनची जागतिक महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात घेता हे नाकारता येणार नाही.

चीनचा दावा

चीनच्या म्हणण्यानुसार हा २०१९ मध्ये कोरोना व्हायरस कोणत्याही प्रयोगशाळेत तयार झाला नाही. कोरोना व्हायरस फॅमिलीतील एक नवीनच व्हायरस सध्या बघायला मिळतोय.

आता जानेवारी २०२० मध्ये फेसबुक आणि ट्विटरवर एक पोस्ट आली ज्यामध्ये म्हटलं गेलं की, २०१५ सालीच चीनने याविषयीचे संशोधन चालू करण्याचे पेटंट मिळवलं आणि त्यांनीच हा व्हायरस शोधला आणि आता तो जगभर पसरला आहे.

ही पोस्ट सोशल मीडियामुळे लगेच व्हायरल झाली, पण चीनच्या म्हणण्यानुसार २००३ साली आलेल्या सार्स या आजाराचे संशोधन करण्याचे पेटंट चीनला २०१५ साली मिळाले आणि त्यावरच खरंतर संशोधन सुरू होतं.

 

interestin engineering

 

सार्स मुळे त्यावेळी जवळपास आठ हजार लोकांना त्याची लागण झाली होती आणि काही बळी पण गेले होते. जवळपास २६ देशांमध्ये सार्स आजार पसरला होता. परत असे आजार येऊ नयेत यासाठीच त्यावर संशोधन सुरू होतं असं चीनचे म्हणणं आहे.

आता आलेला कोरोना हा पूर्णतः नवीन व्हायरस आहे. सार्स आणि आता आलेला कोरोना व्हायरस हे आजार चीन मधूनच सगळ्या जगभर पसरले.

नक्की ते प्राण्यांपासून आले आहेत की काय हे अजूनही ठामपणे सांगता येत नाही.

पण हे आजार प्रयोगशाळेत तयार झाले नाहीत असं चीनचे म्हणणं आहे. या नवीन व्हायरसवर कोणतीही लस सध्यातरी उपलब्ध नाहीये. जी औषध सुद्धा दिली जात आहेत तीही पूर्वीच्याच व्हायरसची दिली जात आहेत.

 

 

आता फक्त काळजी घेण्यासाठी हात वारंवार धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे आणि सर्दी खोकला झालाच तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आणि त्याची काळजी घेणे हेच उपाय आहेत.

खरंतर पृथ्वीवर अनेक वेळा अनेक साथी, आजार येऊन गेले. अनेक असाध्य आजारांनी मानवांचा बळी घेतला. मानवजातीला वाचवण्यासाठी दरवेळेस खूप प्रयत्न केले.

खरंतर माणसाच्या प्रयत्नांतून त्यावर मातही करता आली, पण आता जैविक शस्त्रांचा धोकाही मानवाच्याच महत्त्वाकांक्षेपोटी निर्माण होताना दिसतोय आणि यावर माणसाच्या चांगुलपणानेच मात करता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version