सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरची सर्वात परिपूर्ण जागा !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्हाला काय वाटतं जगात अशी एखादी जागा असेल का जी जगण्यासाठी अगदी योग्य आणि परिपूर्ण असेल? जेथे तुम्ही अगदी सुखाने जीवन जगालं. ना कोणता आजार असेल आणि तुम्ही त्या वातावरणात शंभर वर्षे जगालं? अनेक जण काश्मीर किंवा परदेशातील सुंदर सुंदर ठिकाणांची नाव सांगतील. पण खरं सांगायचं तर या जागा पूर्वी तश्या होत्या पण आता या सर्व जागा पर्यटनाच्या गराड्यात अडकल्या आहेत, त्यामुळे जगण्यासाठी त्या पूर्वी होत्या तितक्या परिपूर्ण नाहीत. आता स्वित्झर्लंडचं उदाहरण घ्या. डोळ्यांना मिळणारं नेत्रसुखद सुख कुठे मिळेलं तर ते केवळ स्वित्झर्लंडमध्ये असं काही वर्षांपूर्वी सर्वांचं एकमत असायचं, पण आता मात्र पर्यटकांच्या गर्दीत स्वित्झर्लंडचं खरं रूप हरवलंय हेच खरं! इथे तुम्ही काही दिवस राहिलात तर तोच तोच पणा बघून, ती पर्यटकांची गर्दी बघून काही दिवसांनी बोर व्हाल. अश्या बोर करणाऱ्या ठिकाणाला परिपूर्ण जागेचा दर्जा देण योग्य वाटत नाही. जगण्यासाठी अतिशय परिपूर्ण जागा कोणती तर जेथे विशेष प्रकारची जीवनपद्धती, चांगला आहार आणि चांगले वातावरण असते आणि कित्येक वर्षे तेथून हलायला आपले मन तयार होत नाही. तुम्ही म्हणालं अशी जागा तर जगात कुठे सापडणारच नाही कारण हे सर्व एका ठिकाणी मिळणे शक्य नाही.
जर तुम्ही असा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा आम्ही तुम्हाला अश्या जागेबद्दल सांगणार आहोत जेथे सर्व गोष्टी आहेत आणि म्हणूनचं ही जागा जगण्यासाठी अतिशय परिपूर्ण आहे.
ग्रीसमधील आयकेरिया नावाचे बेट म्हणजे मानवी वास्तव्यासाठी परिपूर्ण ठिकाण आहे. या बेटावरील डोंगर समुद्रातून वर आल्यासारखे वाटतात. सर्वत्र हिरवीगार वनराई आणि डोंगरमाथ्यावर ठिकठिकाणी मधमाश्यांची पोळी आणि झुडपांमध्ये सर्वत्र भटकणा-या बक-या आणि इतर प्राणी असे दृश्य या बेटावर पाहायला मिळते. या बेटावरील वातावरण इतके आल्हाददायक आणि निरोगी आहे की बेटावर राहणा-या लोकांमधील बहुसंख्य लोक शतायुषी म्हणजे वयाची शंभरी गाठलेले किंवा उलटलेले आहेत. या बेटावर राहणारे ग्रिगरी साहास यांनी नुकताच त्यांचा ९९वा वाढदिवस साजरा केला. आयकेरियाचा लौकिक पाहिला तर ग्रिगरी त्या बेटावर लहान ठरतात.
या बेटावरील अनेक लोकांचे जीवन अतिशय समाधानी आहे. दीर्घायुष्याचे अमेरिकी अभ्यासक डॅन ब्युटनर यांनी या बेटावरील लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अभ्यासात त्यांना असे आढळले की,
या लोकांमध्ये वैफल्याची भावना अतिशय कमी प्रमाणात असते व त्यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंशाचा विकारही कमी प्रमाणात होतो. आयकेरियन लोक वयाची नव्वदी गाठण्याचे प्रमाण इतरांपेक्षा चार पटीने जास्त असते. शेवटपर्यंत या लोकांची बुद्धिमत्ता तीव्र असते.
सुमारे १०० चौरस मैलावर पसरलेल्या या बेटावर आयकेरियन लोक त्यांच्या बागांमध्ये आणि घराच्या गच्च्यांवर फळे, भाजीपाला आणि धान्य यांची लागवड करतात. त्यांच्या दीर्घायुष्याचे आणि निरोगीपणाचे रहस्य त्यांचा आहार, व्यायाम आणि वाइन यांमध्ये आहे. लाल आणि पांढ-या द्राक्षांच्या मिश्रणापासून बनवलेल्या वाइनला ते महत्त्वाचे मानतात. त्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारची अॅरडिटिव्ह आणि सल्फाइट्स नसली तरी अल्कोहोलचे प्रमाण ब-यापैकी म्हणजे १६ ते १८ टक्के असते. मात्र, तिचा वापर माफक प्रमाणात आणि जेवणासोबतच केला जातो. आहारही स्थानिक, हंगामी आणि नैसर्गिक असतो.
या बेटावर काही वर्षापूर्वी सुपरमार्केट सुरू झाले असले तरी प्रक्रिया केलेले अन्न खाणे येथील ज्येष्ठ नागरिक टाळत असतात. मांसाचे सेवन कमी प्रमाणात होते व मेंढीपेक्षा बकरीच्या मांसाला प्राधान्य दिले जाते. तरीही येथे घेतला जाणारा स्थानिक आहार म्हणजे डोंगरावर मिळणारी होरता नावाची वनस्पती. या वनस्पतीची पाने उकडून ते पाणी हे लोक पितात. होरता सूप कडू असले तरी अगदीच वाईट नव्हते आणि ते प्यायल्यावर दुस-या दिवशी खरोखरच ताजेतवाने वाटले, असे ब्युटनर यांचे म्हणणे आहे. मध, ऑलिव्ह तेल यांचा वापर हेसुद्धा महत्त्वाचे ठरते. पण या बेटावर सर्वत्र डोंगराळ भाग असल्याने कुठेही जायचे असेल तर चढउतार करावा लागतो म्हणजे आपसूकच व्यायाम देखील होतो.
आता काय म्हणणं आहे तुमचं? राहायला आवडेल का इथे??
—
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.