जेव्हा नील आर्मस्ट्राँग इंदिरा गांधींची माफी मागतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नील आर्मस्ट्राँग म्हणजे चंद्रावर पाउल ठेवणारा पहिला माणूस होय. या माणसाच्या नम्रतेचे किस्से जगात सगळीकडे ऐकवले जातात. त्यांचात इतकं चांगुलपणा होता की स्वत: मोठे असून देखील आपल्या पेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या व्यक्तीला देखील ते आदर द्यायचे.
आपले काही चुकले तर माफी मागायला देखील बिलकुल घाबरायचे नाहीत. नील आर्मस्ट्राँग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये देखील असाच एक किस्सा घडला होता.
जेव्हा नील आर्मस्ट्राँगने स्वत:हून कोणतीही लाज न बाळगता पंतप्रधान इंदिरा गांधी यांची माफी मागितली होती.
मुळात त्यांनी स्वत:हून काही चूक केली नव्हती. परंतु इंदिरा गांधीना आपल्यामुळे त्रास झाला या गोष्टीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही.
.
माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंग यांनी एकदा हा किस्सा जगासमोर उघड केला होता. तो असा-
आर्मस्ट्राँग व एडविन ऑल्ड्रिन यांची चांद्रमोहीम इंदिरा गांधी यांनी पहाटे साडेचारपर्यंत जागून पाहिली होती. चांद्रमोहिमेनंतर आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी जागतिक दौरा केला होता.
काही वर्षांनी ते भारतात आले असता त्यांनी संसदेमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी नटवर सिंग हेच आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांना पंतप्रधानांच्या दालनात घेऊन गेले होते.
त्यावेळी अमेरिकेचे भारतातील राजदूतही उपस्थित होते. या ऐतिहासिक भेटीचा क्षण छायाचित्रकारांनी कॅमेरामध्ये बंदिस्त करून घेतला आणि ते निघून गेले.
त्यानंतर काय बोलायचे ते कोणालाच न सुचल्याने काही वेळ शांतता पसरली.
त्यामुळे इंदिरा गांधी यांनी नटवर सिंग यांना इशारा केला. त्यानंतर सिंग यांनी आर्मस्ट्राँग यांना सांगितले की,
इंदिरा गांधी यांना या मोहिमेत इतका रस होता की, तुम्ही चंद्रावर उतरलेला क्षण चुकू नये म्हणून त्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत जाग्या होत्या.
त्यावर आर्मस्ट्राँग तत्काळ आपल्या आसनावरून उठले आणि म्हणाले,
पंतप्रधानांना ‘झालेल्या त्रासा’बद्दल माफी मागतो. पुढील वेळेस थोडे आधीच चंद्रावर उतरेन. आर्मस्ट्राँग यांची ही नम्रता पाहून क्षणभर इंदिरा गांधी देखील भांबावल्या.
कारण स्वत:ची काही चूक नसतात हा एवढा मोठा माणूस माफी मागतो याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी स्वत:हून पुढे येत नील आर्मस्ट्राँगच्या नम्रपणाचे कौतुक केले.
नील आर्मस्ट्राँगच्या या वर्तनाला त्या काळी संपूर्ण जगभरातून चांगलीच दाद मिळाली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.