' दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका भारतीय व्यक्तीचे तब्बल २२ फ्लॅट्स! – InMarathi

दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका भारतीय व्यक्तीचे तब्बल २२ फ्लॅट्स!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जगातील सर्वात उंच इमारत म्हणजे दुबईची बुर्ज खलिफा होय! ही इमारत जेवढी इंच आहे तेवढीच आलिशान देखील आहे. इथे एखादा फ्लॅट घ्यायचा म्हटला तर जन्मभर रगडून काम करून पैसे कमावले तरी तो पैसा कमी पडायचा. पण काही लोक इतकी नशीबवान असतात जी गरिबीमध्ये जन्माला येतात, परंतु त्यांच्या नशिबात एक असं वळण लिहिलेलं असतं जे त्यांना थेट श्रीमंतीच्या शिखरावर घेऊन जातं.

ज्या बुर्ज खलिफा मध्ये एक फ्लॅट घेताना श्रीमंत माणूस देखील दोनदा विचार करेल त्याच बुर्ज खलिफामध्ये एका भारतीयाने तब्बल २२ फ्लॅट्स विकत घेतले आहेत. म्हणजे आपला बांधव जगातील सर्व उंच, अलिशान आणि महागड्या इमारतीमधील २२ फ्लॅट्सचा मालक आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा भारतीय काही जन्मत: श्रीमंत नाही, तर त्याने स्वत:हून मेहनत करून ही गोष्ट मिळवली आहे.

चला जाणून घेऊया त्याची कहाणी!

 

mechanic-BurjKhalifa-marathipizza

स्रोत

जॉर्ज नेरेपरांबली यांचा जन्म आपल्या केरळ राज्यातला! गरिबीतून वर आलेल्या जॉर्ज यांना देखील श्रीमंत होण्याचे वेड परंतु स्वत:च्या मेहनतीने! याच श्रीमंतीच्या मागे धावत ते संयुक्त अरब अमिरातीमधील शारजा शहरात येऊन पोचले. बुर्ज खलिफा जेव्हा तयार होत होती तेव्हा त्याची प्रसिद्धी पाहून जॉर्ज यांनी या इमारतीमध्ये मी देखील स्वत:चा फ्लॅट घेणार असे मनोगत एका नातलगाकडे बोलून दाखवले. त्या नातेवाईकाने त्याची थट्टा केली आणि त्याच वेळी जॉर्ज यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधत अखे आपले स्वप्न साकार केले.

 

mechanic-BurjKhalifa-marathipizza01

स्रोत

वयाच्या अकराव्या वर्षापासून वडिलांसोबत शेतमालाचा व्यापार करण्यासाठी जाणाऱ्या जॉर्ज यांना व्यावसायिक बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मॅकेनिक म्हणून दुबई गाठली. दुबईसारख्या देशात ‘एसी’चा उद्योग चांगला चालेल हे जॉर्ज यांनी ७०च्या दशकातच हेरले.

 

mechanic-BurjKhalifa-marathipizza02

स्रोत

ते १९६७ साली शारजात गेले आणि तिथं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि शारजा शहरात ‘जीईओ’ ही ‘एसी’ची कंपनी सुरू केली आहे. आज संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांच्या कंपनीचा बोलबाला आहे.

 

mechanic-BurjKhalifa-marathipizza03

स्रोत

जेव्हा बुर्ज खलिफा तयार झाली तेव्हा ते एकामागून एक फ्लॅट्स ते घेत गेले आणि आता बहुधा ८२८ मीटर उंचीच्या बुर्ज खलिफामधील ९०० पैकी सर्वाधिक २२ फ्लॅट त्यांच्याकडेच आहेत.

 

mechanic-BurjKhalifa-marathipizza04

स्रोत

एक मॅकेनिक ते आज बुर्ज खलिफामधील सर्वाधिक फ्लॅट्स असणारा व्यक्ती हा त्यांचा प्रवास स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांसाठीचं प्रेरणादायी आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?