आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इतिहास आणि राजकारण या दोन विषयांवर रंगणा-या चर्चा आणि त्यातून उफाळणारे वाद ही बाब आपल्याला काही नवी नाही.
इतिहास हा म्हणजे प्रत्येकाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, पण जनेतेची ही दुखरी नस पकडून राजकारण्यांकडून चर्चिले जाणारे हे विषय कधी उग्ररुप धारण करतील हे सांगणंही अशक्य आहे.
महाराष्ट्र म्हटलं की इतिहासावर भाष्य हे आलंच कारण आपल्या देशाच्या इतिहासाच्या पानांमद्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे स्थान हे खूप महत्वाचे आणि अढळ असे आहे!
आपल्या राज्याला तो ऐतिहासिक वारसा लाभलेलाच आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळेच इतिहासावर भरभरून बोलतात आणि लिहितात सुद्धा!
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी या महापुरुषांबद्दल सगळेच खूप मनापासून बोलतात कारण, याच काही माणसांमुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत!
या सगळ्यांची कीर्ती, त्यांचं इतिहासातलं योगदान, त्यांची कामगिरी यावर आपण कुणीही बोलणं म्हणजे लहानतोंडी मोठा घास घेणंच आहे कारण आपल्या कुणाचीच तेवढी कुवत नाही!
तरीही सध्या सोशल मीडिया वर काही लोक राजकीय संदर्भ घेऊन किंवा फक्त वाद निर्माण करायच्या हेतूने या महापुरुषांची तुलना करतात जे अत्यंत विकृत मानसिकतेचं लक्षण आहे!
कारण त्यांची आपापसात तुलना करणं हे एका अर्थाने त्यांचा ,त्यांच्या कामगिरीचा त्यांनी दिलेल्या बलिदानाचा अवमानच आहे!
सध्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होताना आपल्याला दिसते जे अतिशय निंदनीय आहे!
कारण कुणाचीच तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही!
तसेच Quora या ऑनलाईन साईट वर एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे पहिले बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराज यांच्यापैकी कोण सर्वश्रेष्ठ योद्धा आहे?
तर या बिनडोक तुलनेला लोकांनी याच साईट वर काही इंटरेस्टिंग उत्तरं दिली आहेत त्यावर आपण एक नजर टाकू!
उत्तर क्र १ :(विवेक तुलजा)
योद्धा? योद्धा या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे सैनिक! तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो!
आधुनिक काळाच्या अनुषंगाने विचार करायला गेलं, तर शिवाजी महाराज हे एक Entrepreneur आहेत
ज्यांनी एक मोठी कंपनी सुरु केली आहे आणि बाजीराव पेशवे हे त्या कंपनीचे एक अत्यंत यशस्वी CEO आहेत ज्यांनी ती कंपनी आणखीन पुढे वाढवली!
आपण जेंव्हा ऍपल या कंपनीविषयी बोलतो तेंव्हा लगेच आपल्या डोक्यात एकच नाव येत ते म्हणजे स्टीव्ह जॉब्स, मग भले टीम कुक च सुद्धा त्यात खूप योगदान असो!
==
हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं
==
पण नाव समोर येत ते स्टीव्ह जॉब्सच, तसंच काहीस शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्याबाबतीत सुद्धा आहे!
शिवाजी महाराज यांनी इतरांच्या तुलनेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि त्यांच्यापेक्षा प्रचंड शक्तिशाली शत्रूशी दोन हात केले, तर बाजीराव पेशवे यांची ओळख म्हणजे एकही युद्ध न हरलेला असा अजिंक्य योद्धा अशी आहे!
आणि त्यातून सगळ्या लढायांमध्ये बाजीराव हे युद्धभूमीवर स्वतः शत्रूचा सामना करायला उतरले आणि बाजीराव यांची युद्धनीती हीे नेहमीच चर्चेचा विषय ठरते!
त्यामुळे या दोघांमध्ये तुलना कधीच होऊ शकत नाही, आणि करायचा प्रयत्न देखील करणे चुकीच आहे, जस ऍपल कंपनी स्टीव्ह जॉब्स आणि टीम कुक या दोघांशिवाय अपूर्ण आहे ,
तसंच महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे आणि राहील,
कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एक ठराविक मार्ग आखला आणि बाजीराव यांनी त्याच मार्गावरून मिळालेलं स्वराज्य अबाधित राखलं!
उत्तर कर २. (रोहित लुगडे)
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रित करून स्वातंत्र्य, राष्ट्रनिष्ठा आणि सर्व धर्मांचा आदर या गोष्टींची शिकवण दिली
तसेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अगदी शून्यापासून सुरुवात केली.
शिवाजी महाराजांनी साम दाम दंड भेद ही नीती वापरलीच, शिवाय कूटनीती, गनिमी कावा अशा युद्धनीतीमुळे त्यांनी एक वस्तुपाठच आपल्यापुढे मांडला,
त्यांची आग्र्याहून सुटका याचे अत्यंत समर्पक उदाहरण आहे!
==
हे ही वाचा : या ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..
==
बाजीराव हे शाहू महाराज यांनी नेमलेले पेशवे होते जे एकही युद्ध हरले नव्हते, तसेच त्यांच्याकाळात मुघलशाही कमकुवत झाली असून निजामशाहीचा उगम होत होता!
अशातही दिल्लीपर्यंत मराठा साम्राज्य पसरवण्यात बाजीराव यांचा अत्यंत मोलाचा सहभाग आहे त्यामुळे यांच्यात तुलना होणे हे निव्वळ अशक्य!
उत्तर क्र ३ (रुचा)
अगदी स्वराज्यातल्या सामान्य जनतेप्रमाणेच बाजीराव सुद्धा शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे आणि राष्ट्रभक्तीमुळेच प्रेरीत होते!
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तर हे साम्राज्य दिल्ली पर्यंत पसरवण्याचे कार्य केले!
पेशवे घराण्यातल्या प्रत्येकानेच छत्रपतींशी नेहमीच इमान राखला!
मला नाही वाटत कि खुद्द बाजीरावांनी सुद्धा कधी स्वतः महाराजांशी तुलना करण्याचं धाडस केलं नसतं कारण हे दोन्ही योद्धे त्यांच्या जागी योग्यच होते!
उत्तर क्र ४ (रुपेश सुकाळे)
योद्धा म्हणून या दोन्ही महापुरुषांनी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बरोबरीचंच योगदान दिलं आहे!
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड मराठा साम्राज्याच्या भूमीचे राजे होते, आणि बाजीराव हे शाहू महाराजांनी राज्य करायला दिलेल्या भूभागाचे पेशवे होते!
छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले योद्धे होते ज्यांनी मुघलांविरुद्ध बंड पुकारून पारतंत्र्यात गेलेला भूभाग परत मिळवायला सुरुवात केली!
आणि या दोन्ही महापुरुषांचे आपल्या मातृभूमीसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे!
उत्तर क्र ५ (माणिक साहू)
१६ व्या शतकात शिवाजी महाराज आणि १७ व्या शतकात बाजीराव पेशवे हे असे दोन्ही उत्तम योद्धे होऊन गेले, खरं बघायला गेलं तर शिवाजी महाराज हे योद्धा तर होतेच पण सर्वोत्तम राज्यकर्ते देखील होते
म्हणूनच त्यांना जाणता राजा असं संबोधलं जातं!
तर बाजीराव पेशवे हे एकही युद्ध न हरलेले एक सर्वोत्तम योद्धा होते….हाच काय तो फरक करता येण्यासारखा आहे!
==
हे ही वाचा : राजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता…
==
उत्तर क्र ६ (दीपक पाटील)
हे दोघेही सर्वश्रेष्ठ योद्धा होते यात कसलंच दुमत नाही, पण शिवाजी महाराजांची नीती, राजकारणाची योग्य जाण, आणि त्यांची दुरद्रुष्टी हि खासियत होती.
बाजीराव यांच्या काळात मुघल साम्राज्य रसातळाला गेले होते आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पार कमकुवत करून सोडले होते.
शिवाजी महाराजांनी स्वत्रंत हिंदुस्थानची पायाभरणी केली आणि बाजीराव पेशवा यांनी तोच वारसा पुढे नेला आणि जपला!
तर अशा या दोन सर्वश्रेष्ठ योद्धांमध्ये तुलना न केलेलीच बरी, कारण त्यांच्या नखाची सर सुद्धा आपल्याला येऊ शकत नाही!
त्यांनी केलेलं कार्य, त्यांची राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रनिष्ठा, त्यांचे बलिदान, त्यांचे पराक्रम, या सगळ्याची उजळणी करत त्यातून आपण फक्त शिकायचं!
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे या दोघांच्या कार्याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यांच्यामुळेच आज मराठी मातीला स्वतःची ओळखच नव्हे तर जाज्वल्य असा भुतकाळ, तितकाचं यशस्वी वर्तमान लाभला आहे,
त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये श्रेष्ठ कोण या वादात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा त्यांच्या कार्याचा आदर आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचं पालन करणं ही काळाची गरज आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.