Site icon InMarathi

भगवान विष्णूंनी “दशावतार” घेण्यामागे काय उद्देश होता…? वाचा

Avatars-of-Lord-Vishnu IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भगवान श्री विष्णूंचे दहा अवतार आहेत. प्रत्येक अवतार घेण्यामागे श्री विष्णूचा काहीतरी उद्देश आहे, अशी श्रद्धा आहे.

विष्णूचे दशावतार समजून घेऊ या.

 

just watch

 

१. मत्स्यावतार

दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. आधुनिक जीवशास्त्राचे असे म्हणणे आहे की, सर्वप्रथम पृथ्वीवरचा एकपेशीय जीव पाण्यात जन्मला.

तो पेशींची विभागणी करून प्रजोत्पादन करू लागला. त्यातूनच मग बहुपेशीय सजीव निर्माण झाले, ते लैंगिक प्रजोत्पादन करणारे जीव होते. मत्स्य हा त्यातील सर्वात विकसित जीव.

याचे प्रतिक म्हणून प्रथम अवतार हा मत्स्यावतार आहे.

 

hindu gods

 

या अवतारामध्ये सत्ययुगात प्रभु विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. सत्यव्रत मनु, सकाळी सूर्यदेवला अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या कमंडलूमध्ये लहान मासा अचानक आला.

तो मासा पाण्यात परत फेकून द्यावा अश्या विचारात असतांना मनुला वाटले, इतर मासे त्याला खाऊन टाकतील आणि म्हणून मनुने मासा एका छोट्या कलशामध्ये ठेवला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

रात्रीत मासा मोठा झाला आणि म्हणून त्याला कलशातून एका मोठ्या कुंभामध्ये हलवावे लागले, तरीही त्या माशाचा आकार वाढतच गेला आणि म्हणून मनुने त्याला तळ्यात सोडले.

परंतु, मासा आकाराने वाढतच गेला आणि इतका विशालकाय झाला की मनुला त्या माशाला समुद्रात सोडणे भाग पडले.

माशाने नंतर एक भविष्यवाणी केली की सात दिवसांत मोठा पूर येईल परंतु या आपत्तीबद्दल, “हे मनू, तू काळजी करू नकोस.”  मग माशाने त्याला विशाल मोठ्या बोटीमध्ये जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या आणि सर्व वनस्पतींचे बियाणे भरण्यास सांगितले.

 

post card news

 

काही काळानंतर, माशाच्या भविष्यवाणीनुसार, महासागरांच्या पातळीमध्ये अविश्वसनीय अशी वाढ झाली आणि जगात महापूर आला. परंतु, आधीच काळजी घेतल्यामुळे पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व प्रजाती आपत्तीजनक पूरातून वाचल्या.

हा पुर कमी झाल्यावर, मानवजाती आणि सर्व जीवसृष्टी परत संस्थापित झाली.

 

२. कूर्मावतार

सर्वात प्रथम प्रकट झालेल्या जलचर प्राण्यांची उत्क्रांती होत-होत, उभयचर प्राणी निर्माण झाले. कूर्म म्हणजेच कासव हा एक उभयचर प्राणी. त्याचे प्रतिक म्हणून कूर्मावतार.

कूर्माचे आयुष्य इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते. तैत्तरीय, आरण्यक आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात याचा उल्लेख सापडतो.

 

bhakti marg mauritius

 

समुद्रमंथनाचे वेळी जेव्हा मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे समुद्राला घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली. आणि मेरू पर्वत बुडू लागला, तेंव्हा विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्यास तोलून धरले अशी आख्यायिका आहे.

हे ही वाचा –

===

 

३. वराहावतार 

जमिनीवर राहणारे प्राणी मग उभयचरांतून उत्क्रांतित झाले. त्यातील वराह हा तिसरा अवतार होय. हा प्राणी आपल्या खास चार वैशिष्ट्यांमुळे सर्व प्राण्यात उठून दिसतो.

त्याची प्रजननशक्ती खूप अधिक आहे. यासोबत दुसरा गुण – तीक्ष्ण घ्राणेंद्रीय. या दैवी शक्तीमुळे त्याच्यात माग काढण्याचे कौशल्य आहे.

 

templepurohit

 

तिसरा गुण म्हणजे, झाडांना आपल्या शिंगांनी समूळ उखडून टाकण्याचे कौशल्य. समूळ उच्चाटन करणे हा भाव.

आणि चौथा गुण – मजबूत ताकतीचा जबडा. वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे. राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे.

 

४. नरसिंहावतार

नरसिंह म्हणजे अर्धा नर (माणूस) आणि अर्धा सिंह (वनचर). या अवतारात श्रीविष्णूने आपल्या भक्ताची, प्रल्हादाची रक्षा केली.

प्रत्येक भक्ताला हे कळून येते की, परमेश्वर हा सृष्टीच्या चराचरात वव्यापून आहे, तो जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आहे. भक्त प्रल्हादाच्या कथेतून ही श्रद्धा व धारणा भक्तांच्या मनात वसवली.

 

indian mythology

 

५. वामनावतार

वामन म्हणजे बुटका, म्हणजेच ज्याची शारीरिक शक्ती सीमित आहे, पण जो बुद्धीचा वापर करतो असा तो वामनावतार.

 

youtube

 

पौराणिक कथेनुसार, त्याने आपल्या बुद्धीने बली असुर राजाला पाताळात धाडले.

 

६. परशुरामावतार

मानवामध्ये अजून उत्क्रांती, प्रगती होत गेली. तो जीवनापयोगी व जीवन जगण्यासाठी आवश्यक ती साधने बनवू लागला. त्याने धातूचा वापर सुरू केला. परशु (कुऱ्हाड) साठी धातूचे पाते वापरणारा तो परशुराम.

 

ruchiskitchen

 

त्यांनी या परशुच्या जोरावर २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकविणारे हेच होते. परशुरामावतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज याचा मिलाप.

 

७. रामावतार

परशु हे शस्त्र असे आहे की, त्याचा शत्रुवर फार जवळून वापर करावा लागतो. त्यामध्ये शत्रुचा वार आपल्यावर देखील होण्याचा संभव असतो.

पुढची उत्क्रांती अशी की, स्वतःस सुरक्षित ठेऊन, दूरवरून शत्रूवर मारा करता येण्याजोगे अथवा शिकारीसाठी लागणारे शस्त्र मानवाने विकसित केले.

 

 

प्रभू रामचंद्र हे धनुष्य व बाण वापरणारे योद्धा होते.

राम व त्यानंतर आलेले कृष्ण, यांना पूर्णावतार म्हणतात. याचे  कारण असे की, यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले.जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था पार केल्या.

 

हे ही वाचा –

===

 

८. श्री कृष्णावतार

श्रीविष्णूचा आठवा अवतार कृष्णावतार मानला जातो.

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते.

लग्न झाल्यानंतर कृष्णाची माता देवकी आणि पिता वसुदेव यांना मथुरेचा राजा कंस रथात घेऊन जात असतो.  त्यावेळी झालेल्या आकाशवाणीत “देवकीचा पुत्र तुझा वध करेल” हे ऐकून मामा कंस भयभीत होतो आणि त्यांना कैदेत ठेवतो.

त्यांना झालेली पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली गेली. वसुदेवाने, आठवे अपत्य जन्माला आल्यावर मात्र त्याला आपला गोकुळातील मित्र गोपमहाराज नंदचा घरी नेले. हेच अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण!

 

Hindustan.com

 

कृष्ण या शब्दाचा अर्थ “काळ्या मुखवर्णाचा” आणि “सर्वाना आकर्षित करणारा” असा होतो. कृष्ण हा पराक्रमी, मुष्टीयोद्धा, उत्कृष्ट सारथी, सखा, तत्त्वज्ञानी होता.

त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे.

श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापारयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

 

९. बौद्धावतार

‘बुद्ध’ हे नाव नाही, तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ असा ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.

‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.

बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.

 

achintya

 

गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते.

शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.

सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला.

त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले.

यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.

 

९. बालाजी- अवतार 

 

 

या अवताराची देखील एक कथा सांगितली जाते.

ही ऐकीव कथा अशी आहे की, भृगू ऋषी एकदा श्री ब्रम्हदेवाकडे गेले पण ब्रह्मदेवाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. ते श्री सरस्वतीदेवींशी वार्तालाप करण्यात मग्न होते.

रागात येऊन ऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला की, पृथ्वीतलावर तुझी पूजा केली जाणार नाही.

तिथून भृगूऋषी श्री महादेव शंकराकडे गेले तिथेही असंच झालं. महादेव पार्वती आपसात मग्न! भृगू ऋषींनी महादेवाला शाप दिला की, पृथ्वीवर तुझी केवळ लिंग पूजा होईल.

तिथून ऋषीश्वर श्रीविष्णूंकडे गेले. श्रीविष्णू शेषशायी होते आणि श्री लक्ष्मीदेवी त्यांची सेवा करत होत्या. त्यांनी शाप उच्चारण्यापूर्वीच श्रीविष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली.

ऋषींनी त्यांच्या छातीवर लाथ मारली, तरीही श्रीविष्णूंनी त्यांचा राग शांत केला. नंतर भृगू ऋषी तिथून निघून गेले. विष्णूंनी ऋषींच्या लत्ताप्रहाराला सुद्धा वत्सलांच्छन म्हणून हृदयाशी ठेवले.

हे पाहून लक्ष्मीदेवी नाराज झाल्या त्या श्रीविष्णूंनी म्हणाल्या, तुमच्या हृदयात माझं स्थान आहे, म्हणजे ऋषींनी माझ्यावरच लत्ताप्रहार केला आहे. तरीही तुम्ही त्याचा आदराने स्वीकार केला?

या कारणाने श्रीलक्ष्मी देवी विष्णूंपासून रुसून निघून गेल्या. प्रत्यक्ष लक्ष्मी रुसून निघून गेल्यामुळे नारायण हा दरिद्री नारायण झाला. या कथेत पुढे जाण्यापूर्वी आपल्याला श्रीविष्णूच्या राम अवतारातील एका कथेची माहिती घ्यावी लागेल.

सीता देवीला रावणाने पळवून नेले तेव्हा अग्निदेव रावणाला सामोरे गेले व त्यांना एक रात्र स्वतःच्या घरी विश्रांती घेण्याची विनंती केली.

अग्नी देवांना सीता ही प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार आहे हे माहीत होते. तिच्यावर कोणतेही संकट वा लांछन येऊ नये ही त्यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी रावणापासून लपवून सीतेला स्वतःच्या घरी ठेवून घेतले.

व सीतेइतकीच सुंदर असलेली स्वतःची मुलगी पद्मावती हिला रावणा सोबत सीता म्हणून पाठवले.

पुढे रामाने रावणाशी युद्ध करून सीतेला सोडवले. ही सीता नाही, हे राम ही जाणवत होते. म्हणून त्यांनी तिला अग्निकडे सोपवले व तिथून स्वतःची पत्नी सीता हिला सोबत घेतले.

हेच ते अग्निदिव्य होय!

 

gyan app

 

त्यावेळी अग्नी देवाने रामाला विनंती केली की, माझ्या निष्कलंक कन्येशी आता तू विवाह करावास कारण ती रावणाकडे राहून आली हे जगजाहीर झाले आहे, तिच्याशी आता कुणीही विवाह करणार नाही.

यावर रामाने अग्निदेवाला सांगितले की ते या अवतारात एकपत्नीव्रत धारण करून आहेत, पद्मावतीशी विवाह करण्यासाठी ते पुन्हा अवतार धारण करतील.

आपण आता पुन्हा मूळ कथेकडे येऊ.

लक्ष्मीदेवी रुसून गेल्यानंतर नारायणाने म्हणजे श्रीविष्णूंनी बालाजीचा अवतार धारण केला, पद्मावतीशी विवाह करण्यासाठी!

परंतु लक्ष्मी नसल्यामुळे प्रत्यक्ष नारायणाकडे ही धन नव्हते, त्यामुळे त्यांनी विवाह खर्चासाठी कुबेराकडून कर्ज घेतले आणि पद्मावतीशी विवाह केला.

त्यानंतर बालाजी आता कुबेराकडून घेतलेले कर्ज फेडत आहे. काही लोक असेही म्हणतात की, आपण परमेश्वराला त्याचं कर्ज फेडण्यासाठी मदत करावी म्हणून तिथे दान करतो.

 

१०. श्रीकल्कि अवतार

 

WJS

 

हा श्रीविष्णूचा भविष्यात येणारा अवतार मानला जातो. पुराणानुसार, कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version