या सोप्या आणि स्मार्ट उपायांसह घर सजविले तर ते एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलहूनही सुंदर दिसेल…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बऱ्याचदा निरनिराळ्या प्रसिद्ध स्थळं किंवा हिल स्टेशनला जातो. तिकडे आपण एखाद्या आलिशान हॉटेलात रूम बुक करून राहतो आणि त्या हॉटेल मधल्या सुख सुविधा, रूमचा देखणेपणा ,मिळालेला आराम याने आपण खूप सुखावून जातो.
मग आपल्या मनात असा विचार येतो की आपल्या घरातही रोज अशा सुविधा मिळाल्या तर काय बहार येईल!
पण मग लगेचच मनात विचार येतो तो खर्चाचा. दोन दिवसांसाठी केला जाणारा खर्च वर्षभर करायचा?
यांचा मेंटेनन्स खर्च किती असेल ? आपल्याला काही जमणार नाही. हॉटेलचा धंदा असतो म्हणून त्यांनाच जमू शकतं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण आपल्या बजेटमध्ये आपल्याला या सगळ्या सुख-सुविधा अनुभवता येऊ शकतात.
तुमच्या कल्पनाशक्तीला थोडी चालना देत, तुमच्या बजेटमध्ये बसणा-या वस्तुंसह घरात थोडे बदल केलेत, तर तुमचं घरही एखाद्या हॉटेलप्रमाणे सजेल.
हॉटेल मध्ये प्रवेश करताना आपल्याला जाणवतं की तिथला एंट्रन्स हा काहीतरी एक्सक्लुझिव्ह आणि भन्नाट आहे. मग आपण विचार करतो की आपल्या घरात काय करता येईल?
चला तर मग, सुरुवात करुयाच घराच्या प्रवेशव्दारापासून…
दिमाखदार एन्ट्रन्स
जर आपल्या घरातल्या एन्ट्रन्ससाठी कमी जागा असेल , तर त्याठिकाणी तुम्ही आरशाचा वापर करू शकता,
त्याच्याखाली एखादं छोटंसं कपाट किंवा शोपीस ठेवलात तर ते जास्त आकर्षक दिसतं, आणि एन्ट्रन्सही भव्य वाटतो. याचवेळी प्रवेशाच्या भिंतींचा सुरेख वापर करण्यासाठी कुटुंबांतील सदस्यांच्या फोटोफ्रेम्स यांचा वापरही करता येईल.
आलिशान खोली
हॉटेलमधल्या रुम मध्ये सगळ्यात आरामदायक काय असतं तर ते तिथला बेड.
आपल्याला आपल्या घरात हे असं बेड तयार करता येऊ शकतो. आपली रूम जर र्यापैकी मोठी असेल तर किंग साइज बेड आपण घरामध्ये करू शकतो..आणि छोटी रुम असेल तर क्वीन साइज् बेड तयार करू शकतो.
सध्या तुमच्या घरातही असेच बेड्स असतील, मात्र तो कसा सजवावा याचा विचार तुम्ही केला आहे का?
बेडवर चांगल्या प्रकारची बेडशीट असली तरी कम्फर्ट मिळावा म्हणून आपण त्यावर कंफर्टर घालू शकतो जो तुम्हाला अगदी हॉटेल रूमचा फील देईल.
दररोजच्या धकाधकीच्या रुटीननंतर घरी परतल्यानंतर रिलॅक्स फील देणारा बेड हवा आहे? तर त्यासाठी extra foam देखील लावून घेता येईल.
आपल्या बजेटमध्ये बसतील अशा गोष्टी आज-काल ऑनलाईन सेल किंवा एखाद्या मॉलचा सेल असतो त्यावेळेस बर्याच सवलतीत मिळू शकतात.
बेडचे बेडशीट हे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कॉटनचे घेतले तर आपण अगदी हॉटेलच्या रूमचा रॉयल फिल घेऊ शकतो. अर्थात हे नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
–
- रजनीकांतच्या या दिमाखदार घरासमोर फाईव्ह स्टार हॉटेल पण फिकं दिसेल !
- तर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत!
–
बेडला साजेसे कुशन्स देखील आपल्याला मिळू शकतात. हल्ली कमी किमतीत तीन किंवा पाच कुशनचा सेट ऑनलाईन शॉप्स वर उपलब्ध आहेत.
बेडरूम मध्ये आणखीन आवश्यक गोष्ट म्हणजे साईड टेबलवर असलेला टेबल लॅम्प.
आपण झोपायच्या आधी वाचताना त्याचा वापर निश्चित करता येतो. त्यातही विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
त्याच्यामुळे आपली रूम छान उबदार राहते. आपल्याला हवा तितकाच प्रकाश आणि तो बंद करायची सोयही ना उठता करता येते.
तसंच बेडरुमच्या एखाद्या भिंतीवर छानसं पेंटिंग असेल किंवा ज्याच्यामुळे आपल्या मनाला शांती मिळेल असं एखादं चित्र असेल तर ते जरूर आपल्या डोळ्यांच्या समोर येईल असे लावावे त्यामुळे आपल्याला शांत झोप लागू शकते.
बेडरूम मधले पडदे हे शक्यतो पूर्ण खिडकी झाकणारे असावेत. त्यातही थोडेसा डार्क रंग असावेत, की जेणेकरून बाहेरचा प्रकाश आत येऊन आपली झोपमोड होऊ नये.
आज-काल पडद्यांचे ऑप्शनस पण आपल्याला बरेच पाहायला मिळतात. त्यामुळे बजेटची चिंता करु नका. आपल्या खोलीला उठाव देतील असे पडदे जरूर निवडावेत.
हॉटेल रूममध्ये कम्फर्ट देणारे आणखीन एक ठिकाण म्हणजे बाथरूम.
अगदी तसं बाथरूम पण आपल्याला घरातही छान सजवता येऊ शकतं. साबण, शाम्पू ,बॉडी वॉश, कंडीशनर ,फेसवॉश, हँडवॉश, टूथपेस्ट, ब्रश या सगळ्या गोष्टी एक छान ट्रे मध्ये ठेवल्या तर त्या अधिक उठावदार दिसतात.
एकाच रंगाच्या बाटल्यांमधे आणि साधारणपणे एकाच वासाची प्रॉडक्ट जर ठेवली तर सगळ्या बाथरूममध्ये एक प्रकारचा अरोमा भरून राहिल.
आपण निरनिराळ्या प्रकारचे टॉवेल वापरु शकतो, म्हणजे केवळ एकच टॉवेल न ठेवता आंघोळीचा टॉवेल, हात पुसायचा टॉवेल, चेहरा पुसायचा टॉवेल अशा तीन कॅटेगरीत ठेवले तर ते बाथरूम खूपच छान दिसतं.
हे टॉवेल्स पण घडी न घालता जर त्यांचे रोल्स करून ठेवले तर ठेवायला सोप्पे आणि आकर्षकही. आणि घडीच घातली तर मोठी घडी खाली म्हणजेच मोठा टॉवेल खाली मग त्यावर त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात वर छोटा टॉवेल, असं ठेवलं तर ते जास्त आकर्षक दिसतं.
हॉटेलमधली बाथरूम आकर्षक असतात ती तिथल्या शॉवरमुळे. आपणही तशा प्रकारचे शॉवर आपल्या घरातल्या बाथरूममध्ये बसवू शकतो. तसेच बाथरूमला आणखीन उठाव देण्यासाठी एखाद्या वेगळ्या प्रकारचे बेसीनही खूप छान दिसतं.
बाथरूम मध्ये जर आपण एखाद्या ताज्या फुलांचा फ्लॉवर पॉट ठेवू शकलो तर सुगंधामुळे बाथरुम भरून जाईल आणि मनाला प्रसन्नता देईल.
अजून एक प्रकार हॉटेलमध्ये असतो तो म्हणजे बाथरोब. आंघोळ केल्यावर हा बाथरोब घातला की खूप रिलॅक्स वाटतं. असा बाथरोब घरामध्येही ठेवायला हरकत नाही, आणि हे बरेच टिकाऊ पण असतात.
हॉटेल मधल्यासारखे जर घरातले नळ देखील बसवून घेतले तर ते फायदेशीर ठरतं, आणि आकर्षकही दिसतं. कारण या गोष्टी महाग असल्या तरी दीर्घकालीन विचार करता फार उपयुक्त आहेत यांची वरचेवर दुरूस्ती करावी लागत नाही.
हॉटेल मधल्या सारखे चप्पलची जोडी पण आपल्याला मिळू शकते. ती वापरायला हरकत नाही.
अजून एका गोष्टीमुळे हॉटेलची रुम आकर्षक वाटते आणि ती म्हणजे तिथली रंगसंगती.
आपणही आपल्या घरामध्ये अशा रंगसंगतीचा वापर करू शकतो.
समजा आपल्या घरात हॉलमध्ये जर क्रीम कलर किंवा व्हाईट कलरचा वापर केलेला असेल तर एखादी भिंत वेगळ्या रंगाने रंगवली किंवा त्यावर texture पेंटिंग केलं किंवा एखाद्या वॉलपेपरचा पीस लावला, तर त्या भिंतीला आणि आपल्या दिवाणखान्याला म्हणजेच हॉलला एक वेगळाच लुक येतो.
–
- ही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं!
- हनीट्रॅप – कोल्हापुरच्या व्यापाऱ्याने गमावले ३ कोटी; शेवटी वाचवले पोटच्या पोराने…
–
अशीच जरा वेगळी रंगसंगती आपण आपल्या बेडरूम मध्ये पण वापरू शकतो की जेणेकरून आपल्या कम्फर्ट अजून वाढला पाहिजे.
अजून एका गोष्टीमुळे आपल्या घराला रॉयल लूक येऊ शकतो आणि ते म्हणजे फर्निचर.
आपण कशा प्रकारचं फर्निचर करतोय, घेतोय यावरही घराचा लूक किंवा स्टेटस अवलंबून असतं. सोफा, डायनिंग टेबल किंवा सेंटर टेबल हे जर युनिक असतील तर नक्कीच त्यामुळे घराची शोभा वाढते.
डायनिंग टेबलवर जर आपण वरतून लाईट सोडल्या तर आपल्याला हॉटेलमध्ये जेवण केल्याचा फील येऊ शकतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर ही आपल्याला मिळतात त्यांचाही वापर आपण आपल्या घरामध्ये करू शकतो.
फॉल सिलींग करूनही निरनिराळ्या रंगांचे लाइट्स सोडता येतात जेणेकरून घराला एक वेगळाच फिल येतो.
जरासे हटके पंखे ,पडदे, घड्याळ लावूनही आपण आपल्या घराचा लूक चेंज करू शकतो. आणि शक्य झाल्यास रोज ताजी फुल वापरून सुद्धा घर सजवू शकतो. एखाद्या फ्लावर पॉट मध्ये ठेवलेले ताजी फुलं त्यामुळे घरात छान प्रसन्न वातावरण तयार होत.
वुडन फ्लोरिंग, गालीचे, हटके मॅट्स यांनी पण आपण आपल्या घराचा लुक चेंज करू शकतो.
स्टडीरूम मध्ये स्टडी टेबल जवळ एखादं पुस्तकांच कपाट, टेबल-खुर्ची आणि लाइट्स यांनी पण तिथला लुक चेंज होईल. आणि जो रंग आपला आवडता आहे आणि ज्या मध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं असा रंग त्याठिकाणी लावला तर आपला अभ्यासही छान होईल.
काही अँटिक गोष्टी वापरूनही आपण आपल्या घराचा लुक बदलू शकतो.
शोपीस मध्ये जर कंदील त्यात लाईट किंवा पितळी बैलगाडी , मोठी पितळी समई किंवा घरात देवाजवळ एखादा लामणदिवा याने पण एक वेगळाच परिणाम साधला जातो.
जर तुमच्याकडे जुन्या पितळी वस्तू, तांब्याची भांडी असतील तर त्यांचाही वापर आपण शोपीस म्हणून करू शकतो, फक्त ते कसे ठेवायचे याची दृष्टी मात्र हवी.
होम स्विट होम यांप्रमाणे प्रत्येकाला आपलं घर आवडतं असतंच, मात्र थोडी मेहनत घेऊन त्यात लहानसे बदल केलेत, तर तुमचं घर तुमच्यासह अनेकांसाठी आवडीचं ठिकाण ठरेल.
यापैकी सर्वच वस्तु ऑनलाईन उपलब्ध असल्याने आपल्या गरजेनुसार, आपल्याला परवडणा-या किंमतीच्या वस्तु सहज विकत घेता येतील.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.