Site icon InMarathi

आत्मविश्वास, मेहनत सगळं काही परफेक्ट असूनही यश मिळत नाहीये…? मग यशस्वी होण्यासाठी या टिप्स वाचाच

stress 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

या विश्वामध्ये कोणी कितीही परफेक्ट असलं तरीही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल याची काही शाश्वती नाही. जर कोणी विचारलं की यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक असतं तर रूढार्थाने आपल्याकडे एक उत्तर प्रत्येक जण देईल ते म्हणजे आत्मविश्वास आणि मेहनत.

आता काहीजण म्हणतील आमच्याकडे तर दोन्ही आहे. या यशस्वीततेच्या फॉर्मुल्यामध्ये आम्ही परफेक्ट बसतो तरीही आम्हाला यशाचा मार्ग सापडतच नाही.

मग तुम्ही हा लेख नक्कीच वाचला पाहिजे कारण या लेखात दिलेल्या टिप्स तुम्हाला यशस्वी होण्याकडे वाटचाल करण्यास नक्कीच मदत करतील.

 

bryant archway

 

आपण नेहमीच यशाच्या बाबतीत इतरांशी तुलना करत असतो. मग जर तुलनाच करायची असेल तर विचार करा तुमच्यासोबत जे शाळेत शिकत होते, ते सर्व तुमचे मित्र यशस्वी आहेत का?

उदाहरणार्थ, आपला एक मित्र असा नक्कीच असायचा जो नेहमीच वर्गाच्या बाहेर असायचा कारण शिक्षक त्याला वर्गात बसू देत नसत किंवा ते टॉपर विद्यार्थी तुम्हाला आठवत आहेत का? ज्यांच्याकडे बघून आपल्याला वाटायचं की हे जग नक्कीच बदलू शकतील, त्यांचं प्रगतीपत्रक नेहमीच चांगलं असायचं, त्यांचं नेहमीच कौतुक व्हायचं.

पण मग आता वर्तमानात येऊन विचार करा की त्यांनी काही नेत्रदीपक केलेलं तुम्ही ऐकलं आहे का? कदाचित तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच ऐकलं देखील नसेल कारण हा सर्व फरक आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आहे.

यश आणि अपयश आपल्याकडे मार्कांवरती ठरवण्याची पद्धत आहे, पण खऱ्या आयुष्यात हे मार्क कुठल्याच कामाचे नसतात. असं म्हटलं जातं की बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी आपल्याला यशस्वी बनवतात. परंतु हे नेहमीच सत्य असू शकत नाही.

होय या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण खऱ्या आयुष्यामध्ये यासोबतच अनेक असे घटक असतात ज्या घटकांचा आपण विचार देखील केलेला नसतो त्यामुळेच काही टिप्स खाली देत आहोत ज्यामुळे तुमचा यशाचा मार्ग सुकर होईल.

 

१. नवीन व्यक्तींना भेटत रहा

 

Inscape Consulting Group

 

आपण ज्या व्यक्तींना आधीपासून ओळखत आहोत त्यांच्याशी मैत्री टिकवणे फार अवघड काम नाही, पण तुमच्या चौकटीबाहेर इतरही नवीन मित्रांशी मैत्री निर्माण करणे गरजेचे आहे.

हे नवीन मित्र तुम्हाला कदाचित विचार करण्याची नवीन पद्धत देऊन जातील.

 

२. नवीन परिस्थितीशी सामावून घेण्याचे कौशल्य शिका

 

 

जेव्हा परिस्थिती अचानकपणे बदलते तेव्हा सर्वात प्रथम गरज असते ती त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सामावून घेण्याची, ॲडजस्ट करण्याची. कारण बदल हा नवीन संधींसाठी आणि नवीन कल्पनांसाठी कधीही चांगलाच असतो.

त्यामुळे, बदलांना विरोध करण्यापेक्षा ते बदल चांगल्या पद्धतीने कसे करता येतील याचा विचार करा. प्रत्येक नवीन बदलाला स्वीकारण्याची क्षमता तुमच्यामध्ये असलीच पाहिजे कदाचित नवीन बदल तुमचे आयुष्य देखील बदलू शकतो.

 

३. विचार करून धोकादेखील पण करायला शिका

 

 

लक्षात ठेवा दोन प्रकारे तुम्ही धोका पत्करत असता. एक म्हणजे अत्यंत आंधळेपणाने धोका पत्करणे होय. यामध्ये तुम्ही अतिउत्साहामध्ये असे कुठले तरी पाऊल उचलता ज्यामध्ये तुमचे नुकसान ठरलेले असते.

विचार करून पत्करलेल्या धोक्यामध्येही तुमचे नुकसान तर होऊ शकते, परंतु तुम्ही विचार केला नसेल एवढा फायदा देखील होऊ शकतो.

थोडक्यात तुम्हाला अनपेक्षित लाभ होऊ शकतो. त्यामुळे विचार करून धोका पत्करणे ही चांगली गोष्ट आहे आणि असे करणे प्रत्येकाला जमतेच असे नाही त्यामुळे ते जमायलाच हवं.

 

४ . इतरांसारखा विचार करू नका

 

Life Palette

 

जसे आपण पहिल्यांदा बघितले की जी हुशार मुलं असतात त्यांच्याकडे प्रचंड यशस्वी असण्याचा अनुभव असू शकतो परंतु प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हे उपयोगी पडेलच असे नाही.

त्यामुळे त्याच रेसमध्ये न धावता तुम्ही वेगळा विचार करून वेगळ्या पद्धतीने ती रेस यशस्वी होऊन पार पाडू शकता. कारण, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुमचे काम आणि त्या कामातून मिळालेले फळ महत्त्वाचे असते.

तुम्हाला त्या कामाचे फळ मिळाले याचा अर्थ तुम्ही मेहनत केली आहे, विचार करून पावले टाकलेली आहेत आणि या गोष्टीचा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होतो.

 

५. एकाच ध्येयावर ठाम रहा

 

Inc.com

 

कुठलेही ध्येय पूर्ण करण्यासाठी संयम महत्त्वाचा असतो.

त्यामुळेच, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत कुठल्याही इतर ध्येयावर लक्ष देऊ नका. कारण जर एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर ते ध्येय पूर्ण होण्याची शक्यता वाढते.

 

६. निर्णय घ्यायला शिका

 

vision.org

 

 

एका बुद्धिमान आणि मेहनती व्यक्तीला अनेक संधी चालून येतात. अनेक जण याला चांगली गोष्ट म्हणतात परंतु, जेव्हा अनेक संधी एकाच वेळी आपल्यासाठी खुल्या होतात तेव्हा आपल्यातील निर्णयक्षमतेचा कस लागतो.

आपल्याला काय करायचं आहे हे ठरवायचं असतं आणि त्यासोबतच आपल्याला काय चांगलं जमेल यावर देखील लक्ष द्यायचं असतं. मग भांबावलेल्या अवस्थेतील ही मंडळी अनेक वर्ष ध्येय शून्य अवस्थेत इकडे तिकडे भटकत असतात आणि काही वर्षानंतर त्यांना काय करायचं आहे हेच माहिती नसतं.

त्यामुळे, अनेक गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला करायची गोष्ट विचारपूर्वक करायला हवी. जेणेकरून, आपल्या आयुष्यातील निर्णय चुकणार नाही आणि अशाप्रकारे आपण यशस्वीततेच्या मार्गातील अजून एक अडथळा योग्य पद्धतीने पूर्ण करू शकू.

 

७. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा

 

mans world india

 

लक्षात ठेवा बुद्धिमान व्यक्तीने त्याच्या क्षमतांवर ती नेहमीच विश्वास ठेवला पाहिजे. पण जास्तकरून असे होताना दिसत नाही. बुद्धिमान व्यक्ती नेहमीच आपल्यातील क्षमतांबद्दल साशंक असतात.

ते नेहमीच स्वतःवरती टीका करणारी वक्तव्य करत असतात. या गोष्टीमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो.

ही गोष्ट वरून जरी चांगली दिसत असली तरी यामुळे तुम्ही मार्गक्रमण करण्यामध्ये अडखळत असता. त्यामुळे, पुढे काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आत्ता मी जे करत आहे ते मी अत्यंत चांगल्या पद्धतीने करेल असा विचार केला पाहिजे.

आत्मविश्वास आणि मेहनत असतानाही यशाचा मार्ग पूर्ण करण्यासाठी वरील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील याचा वापर तुम्ही नक्की करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version