खमंग पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या स्विगीबद्दल ही इंटरेस्टिंग माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सध्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक ऍप झळकतंय ते म्हणजे स्विगी हे ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप. भारतातलं सगळ्यात फास्ट फूड डिलिव्हरी करणारे अॅप म्हणून सुद्धा हे ओळखलं जातंय ते सुद्धा कोणत्याही मिनीमम रकमेची अट न ठेवता!
शिवाय स्विगी हा देशातला सर्वात मोठा यशस्वी स्टार्ट-अप बिझनेस म्हणून सुद्धा ओळखला जातो, जो प्रथम बेंगलोर येथे सुरु केला आणि म्हणता म्हणता संपूर्ण देशभर याची ख्याती पसरली!
शिवाय या अॅप ने झोमॅटो, फूडपांडा या अशा काही तात्कालीन अॅपना सुद्धा अगदी टक्कर देत, देशातलं फास्टेस्ट फूड डिलिव्हर अॅप म्हणून नाव कमावलं.
यामध्ये फक्त फूड डिलिव्हरीच नव्हे तर त्या ऑर्डर च लाईव्ह ट्रॅकिंग, ती डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉयचा नंबर, त्याचं नाव, ज्या हॉटेल मधून डिलिव्हरी मागवतोय तिकडचा पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिसतात.
त्यामुळे ती डिलिव्हरी अगदी अचूकपणे आपल्यापर्यंत पोहचते!
श्रीहर्ष मजेटी, नंदन रेड्डी आणि राहुल जैमिनी या तिघांनी मिळून २०१४ साली स्विगी हे अॅप लाँच केलं आणि आज ते या यशाच्या उंच शिखरावर जाऊन बसले आहेत!
या ऍप वर ५००० पेक्षा जास्त विविध हॉटेल्स उपलब्ध आहेत जिथून तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ तुम्ही मागवू शकता ते देखील कोणत्याही ठराविक किमतीचे किंवा वेळेच बंधन न ठेवता!
पण तुम्ही कधी याचा विचार केलाय की या अॅप वर सर्वात जास्त कोणता पदार्थ मागवला जातो किंवा कोणत्या प्रकारचे पदार्थ हे जास्त फेमस आहेत??? तर या अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!
१) बिर्याणी
यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो बिर्याणीचा, काही सर्व्हेज च्या अनुसार दर मिनिटाच्या मागे ४५ बिर्याणीची ऑर्डर येतात इतकी ती फेमस आहे!
शिवाय २०१७ मध्ये चिकन बिर्याणी हि सर्वात जास्त ऑर्डर केलेली डिश होती हे एका सर्व्हेमधूनच समोर आलं!
२) डोसा आणि तत्सम पदार्थ
त्याखालोखाल दुसऱ्या नंबर वर येतो डोसा किंवा ज्याला आपण साऊथ इंडियन फूड असेही म्हणतो.
आणि आपल्या देशात इडली डोसा हे पदार्थ खाणारे फक्त साऊथ इंडियन लोकं नसून त्यात महाराष्ट्रीयन तसेच नॉर्थ कडच्या लोकांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे डोसा आणि तत्सम पदार्थ हे दुसऱ्या क्रमांकावर येतात!
३) डेझर्ट्स आईस्क्रीम्स आणि पिझ्झा बर्गर
यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी सर्वात जास्त ऑर्डर केली जाते ती म्हणजे डेझर्ट्स किंवा गॉड पदार्थ आणि त्यामध्ये सुद्धा गुलाबजाम हि गोष्ट सर्वात जास्त ऑर्डर केली जाते!
यानंतर काही फास्ट फूड चेन्स ची सुद्धा या अॅप मुळे बरीच चलती झाली आहे, त्यात मॅक्डोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, डॉमिनोज किंवा पिझ्झा हट अशा कित्येक फूड चेन्स चा सहभाग आहे!
यामुळे पिझ्झा बर्गर अशा फास्ट फूड ला सुद्धा खूप भाव आलाय आणि हे शरीरासाठी अपायकारक असलं तरी त्याचा खप जास्त आहे हे सत्य आपल्याला नाकारून नाही चालणार!
बंगलोर इथे स्थायिक असलेल्या एका कस्टमर ने स्विगी या अॅप वरून १७९६२ वेळा ऑनलाईन पदार्थ ऑर्डर केल्याचा विक्रम केला आहे!
तसेच स्विगी वर सर्वात जास्त होणारा डेझर्ट्स चा खप पाहिला तर आश्चर्याचा धक्काच बसेल, साधारणपणे ७०००० रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न हे आईसक्रीम आणि तत्सम डेझर्ट्स च्या ऑर्डर मधून मिळतं असा स्विगीचा दावा आहे!
तसेच या स्विगी च्या डिलिव्हरी एग्झिक्युटीव्ह मध्ये महिलांचा सहभाग सुद्धा तितकाच प्रभावी आहे आणि या महिलांनी पूर्ण केलेल्या फूड डिलिव्हरीची संख्या हि दोन लाखाहून अधिक आहे!
स्विगीवर सध्या दोन लाखाहून अधिक डिलिव्हरी एग्झिक्युटीव्ह कार्यरत असून संपूर्ण देशातील २९० शहरातले दिड लाखाहून जास्त रेस्टॉरंट पार्टनर्स स्विगी शी जोडले गेले आहेत!
या अॅपवर सर्वात जास्त धुंडाळला जाणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा, इटालियन पदार्थ असून सुद्धा आपल्या इथे पिझ्झाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही!
कडक उन्हाळ्यात थंड पेय जस कि ज्यूस, मिल्कशेक्स कोल्ड्रिंक्स अशा गोष्टींचा खप स्विगी वर ४०% नी वाढला हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण या दिवसात अशा थंड गोष्टींची गरज खूप जास्त भासते!
तसेच सकाळच्या ९.३० च्या सुमारास मसाला डोसा, इडली वडा अशा गोष्टी ब्रेकफास्ट साठी मागवल्या जातात!
मुंबई सारख्या शहरात पाव भाजी हे स्टेपल फूड सर्वात जास्त ऑर्डर केले जाते!
संध्याकाळी ५ नंतर पाव भाजी, फ्रेंच फ़्राईस किंवा सामोसा हे असे चमचमीत खाद्यपदार्थ ऑर्डर केले जातात!
तसेच हैद्राबाद, दिल्ली, बेंगलोर या शहरांमध्ये सर्वात जास्त लेट नाईट ऑर्डर्स केल्या जातात! तसेच दिल्ली हे एकमेव शहर आहे जिथे पास्ता या पदार्थाची ऑर्डर जास्त केली जाते!
मुंबईचा फेमस वडा पाव हा बेंगलोर इथे मागवल्या जाणाऱ्या सर्वात जास्त पदार्थांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे!
कितीही झालं तरी वडा पाव हि गोष्ट मुंबईत खायची मजा काही वेगळीच असते पण प्रत्येकालाच ते शक्य असतंच असं नाही!
कलकत्ता इथे होणाऱ्या दुर्गा पूजेच्या दिवसांमध्ये इतर शहरांच्या तुलनेत सर्वात जास्त गोड पदार्थ मागवले जातात! पुणे हे एकमेव असं शहर आहे जिथे लोक बिर्याणी ऐवजी दाल-खिचडी या देशी पदार्थाचा आस्वाद घेणं कधीही पसंत करतात!
तसेच मांसाहारी पदार्थामध्ये चिकन फ्राईड राईस किंवा चिकन ६५ या दोन डिश जास्त ऑर्डर केल्या जातात!
आईस्क्रीम मध्ये शहाळं हा फ्लेव्हर किंवा चॉकलेट ब्रॉवनी हा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय असून मुबई बेंगलोर अशा ठिकाणी आईस्क्रीम चा खप हा सर्वात जास्त आहे हे आढळून आले आहे!
तसेच फ्रुट सलाड किंवा मेक्सिकन सलाड हे असे प्रकार हैद्राबाद या शहरात जास्त खपतात!
आपल्याइथे इंडियन चायनीज हा प्रकार प्रचंड लोकप्रिय असून तो पदार्थ आवडीने खाणारा एक विशिष्ट वर्ग आहे, पण या पदार्थाच्या चवीत होणारा बदल जसं शहर बदलत तसा बदलत जाताना तुम्हाला जाणवेल!
आणि हैद्राबाद आणि बेंगलोर हि दोन शहरं चायनीज फूड चे प्रचंड शौकीन आहेत हे त्यांनी केलेल्या ऑर्डर्स वरून समजतंच!
या फास्टफूड बरोबरच कित्येक हॉटेल्स आपल्याला घरगुती पोळी भाजी किंवा तत्सम घरगुती पदार्थ सुद्धा प्रोव्हाइड करतात पण अशा हॉटेल्स किंवा आउटलेट्स ची संख्या हि हातावर मोजता येण्याइतकीच आहे!
तर अशाप्रकारे लोकांच्या पोटातून मनात उतरणाऱ्या स्विगीने ने एक बेंचमार्क सेट केलाय आणि त्या अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतंच आहे हे आपल्याया त्यांच्या नवीन प्रोमोशनल इमेज वरून दिसून येत आहेच!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.