Site icon InMarathi

प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या या सेलिब्रिटींनी केलेली समाजसेवा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल

priyanka chopra 2 inmarathi

vogue

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. जिथे आपला जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे आणि म्हणूनच आपण आपल्याला जमेल तसा सामाजिक कार्यात भाग घेतला पाहिजे.

प्रत्येक वेळी जाऊन मदत करणे शक्य नसतं. अशा वेळी आपल्याला जमेल तशी मदत नक्कीच केली पाहिजे. आपण या समाजाचं देणं लागतो हे भान प्रत्येकाला असलच पाहिजे.

भारतात बऱ्यापैकी उलाढाल होणारं क्षेत्र म्हणजे बॉलिवूड. बॉलिवूड हे नेहमीच गाजत असणारं क्षेत्र आहे. प्रत्येक कलाकार हा प्रसिद्धीच्या झोतात असतो मात्र त्याच वेळी बऱ्याच कलाकारांनी सामाजिक भान म्हणून खूप गोष्टी केल्या आहेत.

आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. म्हणूनच आज जाणून घेऊया काही कलाकारांनी केलेली सामाजिक कामे..

१. ऐश्वर्या राय बच्चन

 

firstpost

 

ऐश्वर्या रॉय फाऊंडेशन या संस्थेमार्फत ऐश्वर्या रॉय आपली सामाजिक जबाबदारी निभावत आहे. smile train India या संस्थेसोबत ती जन्मतः च ओठांमध्ये वैगुण्य असलेल्या मुलांसाठी काम करते.

तिच्या मते, ज्या मुलांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे वैद्यकीय मदत मिळू शकत नाही त्यांच्यासाठी मला काम करायला नक्कीच आवडेल.

 

२. सलमान खान

 

youtube

 

सलमान खान….खूप जणांचा आवडता नट. मात्र सलमान खान ने being human या त्याने स्थापन केलेल्या संस्थेमार्फत अनेक गरीब लोकांसाठी काम केले आहे.

मुख्यतः ही संस्था मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत काम करते. being human या टी शर्ट मधून जमणारा पैसा लोककल्याणासाठी वापरला जातो.

 

३. प्रियांका चोप्रा

 

vogue

 

प्रियांका चोप्रा..एक आघाडीची अभिनेत्री. ती सुद्धा The Priyanka Chopra Foundation for Health and Education या संस्थेतर्फे विशेषतः महिलांच्या शिक्षण,आरोग्य आणि सुरक्षा या गोष्टींसाठी काम करते.

ती आपल्या पगाराच्या १/१० हिस्सा या कामासाठी दान करते. तिच्या मते, आपण लहान मुलंच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्रित आवाज उठवला पाहिजे.

 

४. दीपिका पदुकोण

 

yourstory

 

दीपिका पदुकोण पद्मावत या तिच्या गाजलेल्या चित्रपटानंतर एका depression संबंधित व्हिडिओ मुळे खूपच चर्चेत आली होती. याच धर्तीवर तिने The Live Love Laugh Foundation ची स्थापना केली.

दीपिका पा स्वतः ला हा अनुभव आल्यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत ही संस्था खूप मोठं काम करत आहे.

 

५. शाहरुख खान

 

pakistan today

 

शाहरुख खान हा एक आघाडीचा नट. त्यानेही २०१३ मध्ये मीर फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन केली. त्याच्या वडिलांच्या नावाने त्याने ही संस्था स्थापन केली.

ही संस्था महिला सबलीकरणासाठी काम करते. आत्तापर्यंत अनेक अॅसिड अटॅक झालेल्या मुलींना यातून मदत झाली आहे.

 

६. सोनम कपूर

 

India tv

 

सोनम कपूर ने Cuddles Foundation तर्फे लहान मुलांच्या पोषण आहारासाठी काम केले जाते. कॅन्सर शी लढा देणाऱ्या लहान मुलांच्या जेवणाची सोय या संस्थेकडून केली जाते.

 

७. आमीर खान

 

tata trust horizon

 

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून अमीर खान याने आजपर्यंत अनेक गोष्टींविरुद्ध आवाज उठवला आहे. यातूनच पाणी फाऊंडेशन ची २०१६ मध्ये स्थापना झाली.

यातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात खूप महत्त्वाचे काम ही संस्था करत आहे जेणेकरून दुष्काळाचं संकट टळेल.

 

८. गुल पनाग

 

hindustan times

 

या नटीने Gul 4 Change and The Col. Shamsher Singh Foundation ची स्थापना पर्यावरणासाठी काम करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी तसेच विविध गरजूंना मदत करण्यासाठी केली आहे.

या अभिनेत्रीने अजूनही अनेक विविध संस्थांतर्फे चांगली कामे केली आहेत.

 

९. राहुल बोस

 

desimartini

 

The Foundation ची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. या संस्थेचा मुख्य हेतू प्रत्येक नागरिकास त्याचे हक्क मिळवून देण्यास मदत करणे हा आहे. या सोबतच अनेक चांगल्या संस्थांतर्फे त्याने काम केले आहे.

 

१०. जॉन अब्राहम

 

john abraham

 

हा नट जरा खास आहे. याने प्राण्यांसाठी PETA foundation ची स्थापना केली. त्याच्या मते,  प्राणी बोलू शकत नसले तरी त्यांना भावना असतात.

त्यांनाही बोलू द्या आणि त्यांना मदत करा. याआधी त्याने अनेक संस्थासोबत प्राण्यांसाठी काम केले आहे.

 

११. अनुपम खेर

 

huffpost india

 

भारताचे भविष्य म्हणजे आजची लहान मुले आहेत या भावनेने अनुपम खेर नी Anupam Kher Foundation ची स्थापना केली.

मुलांना चांगले शिक्षण देणे व त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा यामागचा हेतू आहे.

 

१२. शबाना आझमी

 

postoast

यांनी यांचे वडील कैफी आझमी यांच्या नावाने Mijwan Welfare Society ची स्थापना केली.

कैफिंच्या उत्तर प्रदेश मधील गावातून आलेल्या मुलींच्या शिक्षण व इतर गोष्टींची जबाबदारी यातून घेतली जाते व त्यांचे सबलीकरण केले जाते.

 

१३. नफिसा अली सोधी

 

republic world

 

Action India ची स्थापना करुन नफिसा यांनी वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या संस्थेतर्फे एड्स आणि एच. आय. व्ही रुग्णांसाठी काम केले जाते.

त्या रुग्णांना उपचार व मानसिक उभारीसाठी मदत करणे हे मुख्य हेतू आहेत.

 

१४. मिलिंद सोमण

 

social news xyz

 

मिलिंद सोमण सुद्धा वेगळ्या गोष्टींसाठी काम करतात. त्यांच्या United Sisters Foundation कडून pinkethon या marathonचे आयोजन केले जाते. यातून स्तनांचा कर्करोग या विषयावर जागृती केली जाते. यात खूप महिला सहभागी होतात.

थोडक्यात काय तर सर्वच नट आणि नट्या आपले सामाजिक भान विविध माध्यमातून जपत आहेत..आणि याचीच आज खरी गरज आहे.

त्यांच्यापासून आदर्श घेऊन आपणही यात सहभागी होऊया आणि आपली सामाजिक जाणीव जपूया..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version