Site icon InMarathi

तुमच्या नकळत आरोग्यावर घाला घालणाऱ्या या सवयींपासून दूरच रहा

unhealthy habits inmarathi

shutterstock

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सगळ्यांनाच थोड्याफार फरकाने हे माहीत असतं की जंकफूड खाणे, सिगरेट, दारू सारखी व्यसन करणे, व्यायामाचा कंटाळा करणे आदी गोष्टी हानिकारक आहेत, पण हे माहीत आहे का की काही गोष्टी ज्या आपण खूप आनंदाने किंवा आपल्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून करतो त्या खरंतर long term साठी घातक आहेत?

अर्थात आपल्या नकळत त्याचे तोटे आपल्याला होतात. आज अशाच काही गोष्टी जाणून घेऊ.

बऱ्याचदा आपल्याला वाटतं की, आपण जे अन्न खातो ते आरोग्याला योग्य आहे, पण बरेच धान्य, सोयाबीन, कडधान्य हे रासायनिक खतं, रासायनिक फवारणी करून पिकवली जातात. त्यात वापरली जाणारी रसायन कॅन्सरला आमंत्रण देणारी असतात.

मग प्राणी पण हेच वनस्पती, धान्य खातात आणि ह्याच प्राण्यांचे मांस जर माणसाने खाल्ले तर धोका अजूनच वाढतो. म्हणूनच (organic) सेंद्रिय, नैसर्गिक पद्धतीने पिकावलेल्या भाज्या, फळं खाणं जास्त फायदेशीर असतं.

 

IndiaMART

 

फुटपाथवर कशाही पद्धतीने ठेवलेल्या भाज्या घेण्यापेक्षा एखाद्या खात्रीशीर शेतकरी गटाकडून भाज्या घेणं केव्हाही श्रेयस्कर कारण त्यामुळे शेतकऱ्याचं पण नुकसान होत नाही आणि तुमचंही.

बऱ्याचदा बातम्यांमध्ये येत असतं की सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जातो. जो जास्तच हानिकारक असतो. आज-काल लोक वेगवेगळ्या प्रकारची डायट करत असतात म्हणजे किटो डायट ज्यामध्ये फक्त प्राणीजन्य पदार्थ खाल्ले जातात दुसरा हेल्दी डायट म्हणून फक्त सलाड खाल्ले जातो आणि तेही कच्चे.

अशा प्रकारचे डाएट्स करणं उपयोगी नाही. कारण अशा कोणत्याही अतीटोकाच्या डायटमुळे तुमच्या पोटाला त्रास होणार आहे म्हणून तुमचा आहार हा संतुलित असला पाहिजे.

सगळ्यांना हेही माहीत असतं की आपण साखर न खाणं हे हितकारक आहे. म्हणून मग लोक साखरेला पर्याय म्हणून स्वीटनर घालणं पसंत करतात म्हणजे बिनसाखरेचे लाडू किंवा बिन साखरेचा मुगाचा हलवा, मिठाई यामध्ये साखर सोडून फक्त स्वीटनर घातलेलं असतं.

चहा-कॉफी हे द्रवपदार्थ स्वीटनर घालून प्यायले जातात पण आपल्याला माहित आहे का की स्वीटनर सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही. स्वीटनर मुळे आपल्या शरीरातील उपयुक्त बॅक्टेरिया नष्ट होतात.

 

harvard health

 

म्हणून जर तुम्हाला गोड खायचं असेल तर ते शक्यतो नैसर्गिकपणे गोड असलेले पदार्थ, नैसर्गिक फळं खाणं किंवा अगदीच गोड खाण्याची आवड असेल तर कुठल्याही गोड पदार्थावर मध घालून खाणे श्रेयस्कर.

साखरेच्या ऐवजी तुम्ही नैसर्गिकरित्या बनवलेल्या गुळाचा वापर करू शकता, पण हे लक्षात घेतलं पाहिजे.

काही लोक खूप कमी पाणी पितात आणि म्हणतात की, आम्हाला खूप पाण्याची गरज नाही, पण आपल्या शरीरासाठी साधारणपणे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाण्याची गरज असते.

त्यामुळे आपला वॉटर इंडेक्स हा नेहमी चांगला असायला हवा. तो तुम्ही ताकामधून किंवा सरबत घेऊन पूर्ण करू शकता, परंतु त्यासाठी फळांचा ज्यूस घेणं परत चुकीचं आहे. कारण ज्यूस मध्ये भरपूर प्रमाणात साखर घातलेली असते जी आपल्यासाठी हानीकारक असते.

 

 

ज्युस घेण्याऐवजी फळं खाणं कधीही चांगलं म्हणजे तुम्हाला ज्यूस पण मिळेल आणि फायबर पण मिळेल. मुळात पाणी भरपूर प्यायलं पाहिजे त्यामुळे आपलं रक्त घट्ट होण्यापासून वाचू शकतं आणि रक्तप्रवाह नीट राहतो.

आज-काल ऑरगॅनिकच्या नावाखाली बरीच प्रोडक्ट्स बाजारात आलेली आहेत. पण जर ती पॅकेजड फुड असतील, तर ती आपल्यासाठी योग्य नाहीत. कारण पॅकेज्ड फूडला बरीच प्रोसेस करून तयार केलेलं असतं आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह,साखर यांचे प्रमाणही भरपूर असतं. म्हणून कोणती प्रोडक्टस आपण घेतोय हे नीट तपासून घ्यावं.

आज-काल फ्लेवर्ड कर्ड हा एक प्रकार आपल्याला दुकानांमधून, मॉल्स मधून दिसतोय त्यामध्ये काही फळ पण घातलेली असतात. पण हे दही भरपूर साखर घालून तयार केलेला असतो म्हणून आपण साखर न घातलेले प्लेन दही घेणे केव्हाही चांगलं.

 

 

त्यापेक्षा घरी जर आपण दही लावता येत असेल,वेळ असेल तर ते अधिकच उत्तम कारण त्याच आपल्याला ताकही बनवता येतं

बऱ्याच जणांना बसायच्या, झोपायच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्रास होऊ शकतो. म्हणजे तुम्ही ऑफिसात टेबलवर समोर झुकून जर बसत असाल आणि काम करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला काही वाटणार नाही, पण त्यामुळे नंतर तुम्हाला पाठदुखी, मानदुखीचा त्रास होऊ शकतो.

तसंच झोपतानाही लोक बऱ्याचदा एका कुशीवर होऊन झोपतात किंवा आपले पाय एकमेकांवर घेऊन झोपतात त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. हे लवकर कळत नाही. पण हळूहळू मात्र त्याचा परिणाम दिसून येतो.

 

medium.com

 

तसेच झोपायच्या आधी बऱ्याच जणांना टीव्ही बघत झोपायची किंवा मोबाईल बघत झोपायची सवय असते, पण त्यामुळे आपली झोप नीट होत नाही. झोपेच्या चुकीच्या सवयीमुळे आपल्याला थकवा, हाय ब्लडप्रेशर, ओबेसिटी, ऍसिडिटी, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतो माणसाला रात्रीतून किमान आठ तास तरी झोप आवश्यकच आहे.

बऱ्याच जणांना परफ्युम किंवा डिओ लावून जायची सवय असते पण परफ्यूम मध्ये असणाऱ्या ॲल्युमिनियम मुळे आपल्याला त्रास होऊ शकतो कारण ते माणसाच्या शरीरासाठी, त्वचेसाठी विषारी आहे.

 

virgin experience days

 

आज-काल नॉनस्टिक, टेफ्लॉन ची बरीच भांडे बाजारात दिसतात आणि आणि त्याची बरीच मोठी जाहिरात मोठमोठे कलाकार, शेफ लोक करत असतात आणि आपल्या सारखी माणसं त्याला बळी पडतात.

नॉनस्टिक आणि टेफ्लॉन हे खरंतर माणसाच्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे म्हणून ही भांडी न घेता शक्यतो जर आपण लोखंडाची किंवा स्टीलची कढई तवे घेतले तर ते उपयुक्त असेल. आज-काल मातीची भांडी सुद्धा बाजारात येत आहेत, त्यांचाही वापर करणे खूपच चांगला.

जर पाणी सुद्धा जर तुम्ही माठातले पीत असाल तर ते उपयोगाचं आहे, पण जर तुम्हाला प्लास्टिकच्या बाटलीतून मिळणारे पाणी प्यायची सवय असेल तर मात्र ते घातक आहे, जरी ते मिनरल वॉटर असलं तरी त्याचा दीर्घकाळ वापर करणे आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही.

 

livehindustan

 

आजारी पडल्यावर बऱ्याचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. खरंच आपल्या शरीरात काही बिघाड होत असेल तर आपले शरीर आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सूचना देत असतं. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अगदीच आपल्याला माहीत असलेले औषधे घेतो, पण हे असं करणं चुकीच आहे.

त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं किंवा डॉक्टरांना भेटणे खूप महत्त्वाचं असतं, कारण ते आपल्याला जितक्या सहजपणे मार्गदर्शन करतील तसं कोणी करणार नाही. म्हणून वेळोवेळी आपल्या तपासण्या करून घेणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version