' इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवला उपग्रह: COEPians ची “स्वयम्” झेप – InMarathi

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी बनवला उपग्रह: COEPians ची “स्वयम्” झेप

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

होय! पुण्याच्या COEP कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी बनवलाय चक्क एक उपग्रह.

First ते final year च्या सर्व Branches च्या तब्बल २०० विद्यार्थ्यांनी घेतलेल्या ६ वर्षांच्या मेहनतीचं चीज म्हणजे  १ किलोग्राम वजनाचा प्रायोगिक “स्वयम्”.

सागरी आणि जमिनीवरची सुरक्षा भक्कम करण्यासाठीच्या COEP च्या २००८ मध्ये सुरु केलेल्या ह्या मोहिमे अंतर्गत स्वयम जून २०१४ ला पूर्णपणे तयार झाला. तांत्रिक बाबींची पूर्तता आणि मार्गदर्शनाची सोय बंगळूर येथील ISAC (Indian Satellite Application Centre)  येथे दर तीन महिन्यांच्या दौऱ्यात तिथेच केली होती.

Swayam-2

सर्व तांत्रिक बाबी पूर्णत्वास नेल्यावर आणि आवश्यक त्या परीक्षणांमधून पास झाल्यावर इस्रो (ISRO – Indian Space Research Organization) च्या शास्त्रज्ञांनी “स्वयम्” ला अवकाशात झेपावण्यास हिरवा सिग्नल दिला होता.

२९ एप्रिल २०१६ रोजी श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपण केंद्रातून PSLV द्वारा “कार्टोसॅट-२” हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार होता पण काही तांत्रिक कारणांमुळे २२ जून २०१६ रोजी अजून १९ उपग्रहांबरोबर स्वयमने झेप घेतली आणि पृथ्वीच्या कक्षेच्या ५०० ते १००० किमी दरम्यान PSLV पासून वेगळा होऊन पृथ्वीभोवतीच्या स्वतःच्या कक्षेत स्थिरावला.

 

Satellite च्या design चा नमुना :

Swayam-1

संपूर्ण भारतीय बनावटीचा असलेला स्वयम ५० लाखांपेक्षा कमी खर्चात बनलेला ‘एकाच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला’ पहिला उपग्रह आहे. खर्च कमी व्हावा म्हणून Active Stabilization (कक्षेत स्थिरावण्यासाठी सौर-उर्जेचा वापर – जो महाग ठरला असता) च्या ऐवजी Passive Stabilization (कक्षेत स्थिरावण्यासाठी पृथ्वी आणि उपग्रह ह्यांच्यातील magnetic energy) चा वापर केला आहे.

स्वयम नेमका काय करणार?

Swayam-3

तर स्वयम खालील कार्यासाठी प्रायोगिक तत्वावर बनवलेला उपग्रह आहे :

१. सागरी आणि जमिनीवरील communication आणि safety साठी उपयुक्त
२. समुद्रात हरवलेल्या भारतीय नौकांना स्वयमकडे मदत मागता येईल
३. समुद्री सीमांवर लक्ष ठेवण्यात नौदलाला मदत
४. सांकेतिक भाषेत संदेशाची देवाण घेवाण, त्यासाठी देशभरात १० centers उभारली जाणार आहेत आणि आवश्यक असलेली softwares पुरवण्याची जबाबदारी COEP ने स्वतः घेतलेली आहे.

वाखाणण्याजोगा हा प्रकल्प सध्या धवल वाघुलदिवे as Project Manager, monitor करतायत.

व्हिडिओ स्वयमचं model आपण बघू शकता:

 

Image and Info: SWAYAM-A COEP INITIATIVE

Featured Image: AmsatIndia

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?