आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खाणं हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी प्रेमंच म्हणा ना! और हर लव्हस्टोरी मे एक विलन होता ही हैं. आपल्या या प्रेमातला व्हिलन म्हणजेच “दातदुखी.
दातदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. कधी दाताला कीड लागल्यामुळे, कधी दातावरील आवरण नष्ट झाल्यामुळे ,कधी कॅव्हिटीमुळे तर कधी एखादी नस उघडी पडल्यामुळे.
अगदी हिरड्यांमध्ये इन्फेकशन झाल्यामुळेही दंतसमस्या आपल्याला जाणवू शकते आणि हा राक्षस कधी कुठे प्रकट होईल ह्याचाही काही नेम नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टरकडे जाता येईलच असंही नाही.
कधी आपण एखाद्या ट्रिपला गेल्यावर , कधी सुट्टीच्या दिवशी,कधी शाळा-कॉलेजात, तर कधी अगदी रात्रीअपरात्रीदेखील हा दुष्ट राक्षस आपल्या भेटीस येतो.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
त्यामुळे ह्याच्याशी दोन हात करून त्याला मात देणंही तितकंच गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी अशा लहानसहान गोष्टींवर घरगुतीच उपाय केले जायचे .
तर आजीच्या बटव्यातील हे गुणकारी काही घरगुती, सोप्या आणि गुणकारी उपायांबद्दल जाणून घेऊया आणि ह्या दंतदुखीला पळवून लावूया
–
- दातांच्या भयंकर व्याधींपासून दूर राहण्यासाठी ह्या ५ गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!
- दातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो!
–
१. आईसपॅक
आपला दात अचानक ठणकायला लागला तर ते दुखणं असह्य होतं . आणि म्हणूनच सगळ्यात सोपा पहिला उपाय म्हणजे आईसपॅक.
अगदी कुठल्याही मेडिकलच्या दुकानात हा सहज उपलब्ध असतो.
तुमच्या घरी जरी नसला तरी एखाद्या रुमालात बर्फाचे काही तुकडे घेऊन तुम्ही त्याचा शेक दाताला बाहेरून नक्कीच देऊ शकता. त्या थंडाव्यामुळे दातदुखी कमी होते .
२ लवंग
प्रत्येकाच्या घरात हमखास मिळणारं जिन्नस म्हणजे “लवंग”.
आपल्या ह्या लवंगीत अनेक औषधी गुणधर्म आहेत . त्यामुळे फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणूनच नव्हे तर औषधी गुणांसाठीही याची ओळख आहे.
लवंगाचे एखाद-दोन तुकडे दाताखाली ठेवून चघळले तरीही आराम मिळतो आणि दुखणं कमी होतं.
हल्ली बाजारात लवंगाचं तेलही मिळू लागलंय . त्यामुळे एखादा स्वच्छ कापसाचा बोळा त्या तेलात बुडवून दुखऱ्या दाताखाली धरून ठेवता येईल.
३ मिठाचे पाणी
जवळजवळ सगळ्याच पदार्थात वापरलं जाणारं मीठ, मिठाच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. पण हे मीठ जर कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्या किंवा चूळ भरली तर दुखणारा दात शांत होऊ शकतो.
अगदी एखाद्या मित्राप्रमाणे हे मीठ अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करतं.
४ पेरूची पानं
सध्या बाजारात गेल्यावर नजरेत भरणारं आणि मोहात पडणारं फळ म्हणजे पेरू.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पेरू आवडतो . दगड मारून पेरू चोरून खाल्ल्याच्याही अनेकांच्या आठवणी असतात . अश्या ह्या पेरूची पानंही औषधीतत्वांनी परिपूर्ण असतात . तोंडातील जीवाणूंचा नाश करण्यासाठी ती उपयुक्त असतात .
दातदुखी किंवा दातातली जळजळ थांबवण्यासाठी ह्याचा वापर केला जाऊ शकतो . पेरूची पानं स्वच्छ धुवून ती चावता येतात अथवा त्यांचा चुरा करून उकळत्या पाण्यात टाकून एखाद्या माऊथवॉश प्रमाणेही त्याचा वापर केला जाऊ शकतो.
५ एलोवेरा (कोरफड)
आपल्यापैकी अनेकांना बागकामाची आवड असते आणि आपण एखादं कोरफडीचं रोपही अगदी आवडीने लावतो. आपल्या घरी नसली तरी अतिशय सहज मिळणारी कोरफड अनेक गोष्टींवर रामबाण उपाय आहे.
त्वचा व केसांसाठीही ती उपयुक्त आहे . इतकंच नव्हे, तर अगदी आपल्या दातदुखीला सुद्धा ती हुसकावून लावते. कोरफडीचा गर दुखणाऱ्या भागावर लावल्यास दातदुखी कमी होण्यास मदत मिळते. हलक्या हाताने गर लावल्यावर मसाजदेखील करता येईल.
६ लसूण
औषधी गुणधर्मांमुळॆ अनेक वर्षांपासून लसणीचा वापर केला जातोय . लसणीत ‘ऍलिसिन’ नावाचा घटक असतो जो जीवाणूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. लसणीच्या पाकळ्या जर दाताखाली धरल्या तर नक्कीच फायदा होऊ शकतो.
अनेकांना अख्खी लसूण तोंडात धरणं आवडत नाही. तसं असल्यास लसणीचे बारीक तुकडे करून त्यात मीठ घालून ती पेस्ट दुखऱ्या भागावर लावता येईल.
–
- महागड्या ‘डेंटल ट्रिटमेंट’पेक्षा या घरगुती उपायांच्या मदतीने दातांना कीड लागू न देणं केव्हाही योग्यच!
- डेंटिस्ट कडे न जाता या पदार्थांनी तोंडाचं आरोग्य राखलं जातं याचा तुम्ही विचारही केला नसेल!
–
७ गव्हांकुर (wheatgrass)
गव्हांकुर रसाच्या सेवनामुळे आरोग्य उत्तम राहतं . हल्ली बऱ्याच दुकानांत हा रस विकलाही जाऊ लागलाय.
सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर बागेबाहेर मिळणार ताजा गव्हांकुराचा रस हा एक हेल्दीट्रेंड झालाय.
ह्या गव्हांकुरात क्लोरोफीलचं प्रमाण अधिक असतं . दातातील किटाणूंचा सामना करण्यास त्याची मदत होते. हा रस माऊथवॉशप्रमाणे वापरल्यास नक्कीच फरक जाणवेल .
८ थाईम्स
बेसिल , थाईम ,रोजमेरी अशा विविध गोष्टी आपण इटालियन पदार्थांत वापरू लागलोय . तसेच अशा गोष्टींचा इसेन्शिअल ऑईल्स मध्येही वापर केला जातोय.
तर अशा ह्या थाईम इसेन्शिअल ऑईल आणि पाण्यामध्ये कापूस बुडवून तो कापूस वेदना होणाऱ्या भागावर लावू शकतो. इतकंच नव्हे तर पाण्यात ह्या तेलाचे एक-दोन थेंब घालून त्याचा माऊथवॉश म्हणून वापर करता येईल .
९ टी – बॅग
आजच्या रेडी टू इट आणि इन्स्टंट फूडच्या जमान्यात टी बॅग्स कॉमन झाल्या आहेत. अशा ह्या टी बॅग्स थोड्या गरम असताना दातांवर ठेल्यास हळू हळू दुखणं कमी होऊ लागेल आणि त्रास कमी होईल.
पेपरमिंट टीबॅगचा वापर केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही.
वेदना असह्य असतील तर तुम्ही नेहेमी घेता ती पेनकिलर ची गोळीही तात्काळ उपाय म्हणून घेऊ शकता. त्यामुळेही तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
मात्र कोणत्याही नवीन गोळ्यांचा प्रयोग करू नका. पण अशा गोळ्या परवानगीशिवाय लहान मुलांना देऊ नका.
ह्यापैकी तुम्हाला जो उपाय आवडेल आणि सोपा वाटेल तो करून बघण्यास हरकत नाही. दातदुखी १-२ दिवसांपेक्षा जास्त काळ सतावू लागली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
असं म्हणतात की , ‘precaution is better than cure ‘. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवूच नये म्हणून आपण थोडेसे प्रयत्न करू शकतो.
नियमित दोनदा दात घासणे तसेच वेळोवेळी दातांची काळजी घेणे अशा कृतीतून आपण संभाव्य धोका नक्कीच टाळू शकू. ठरलं तर मग ! आपल्या दातांच्या आरोग्याकडे लक्ष देऊयात आणि छान छान पदार्थांवर मनसोक्त ताव मारुयात !
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.