Site icon InMarathi

टॅटू काढायचाय? त्याआधी जाणून घ्या टॅटू काढण्याचे ७ गंभीर साईड इफेक्ट्स..!

virat tattoo inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टॅटू काढणं हे आत्ताच्या जमान्यात जरी फॅड वाटत असलं तरी ते काही नवीन नाही. जुन्या काळातसुद्धा अगदी सहजपणे हातावर नाव किंवा तत्सम चित्र किंवा एखादं सिम्बॉल गोंदवल जायचं आणि ती गोष्ट ही काही विशिष्ट लोकांच्या हातावर किंवा शरीराच्या अन्य भागावर दिसायची.

आता ते गोंदवणं  लांब राहिलं आणि टॅटू हे नवीन गोंडस नाव देऊन याचा एक वेगळा बिझनेसच सुरू झाला आहे. सध्याची तरुणाई तर हा ट्रेंड अगदी मनापासून फॉलो करतेय कारण ‘जे ट्रेंडिंग तेच महत्वाचं’ असा काहीसा चुकीचा समज झाला आहे!

 

 

आपल्या प्रियकराचं नाव, एखाद्या सेलिब्रिटीचं नाव, एखादी कोड लिपी किंवा तशीच वेगळी भाषा त्यातले प्रकार, वेगवेगळे मंत्र हे सगळं हातावर, पायावर, मनगटावर, मानेवर मांडीवर तसेच अजूनही काही खासगी ठिकाणी टॅटू करून घेणं हा ट्रेंड झाला आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आधी काही विशिष्ट ठिकाणी गेलं जसं की, परदेशी किंवा गोव्याला जाऊन लोकं खास टॅटू करून यायचे पण आता तर हा बिझनेस अक्षरशः गल्लोगल्ली उघडला आहे! कित्येक सेलिब्रिटीसुद्धा हे असले टॅटू काढून घेतात.

उदाहरण द्यायच झालं तर सैफने काढलेला करीनाचा टॅटू किंवा दीपिका पदुकोणने मानेवर काढलेला रणबीरच्या नावाच्या इनिशीयल्स चा टॅटू… काही कारणास्तव तो टॅटू काढून टाकायला तिला झालेला त्रास आणि खर्च या अशा गोष्टींमुळे तरुणाई याकडे जास्त आकर्षली गेली!

 

या टॅटूमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक म्हणजे तात्पुरता आणि दुसरा म्हणजे कायमस्वरूपी. आता तर काही पैसे अजून खर्च करून कायमस्वरूपी टॅटू सुद्धा काढला जाऊ शकतो, पण हे स्टाईल स्टेटमेंट बनलेलं फॅड आकर्षक जरी असलं तरी त्याचे शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स खूप गंभीर आहेत.

काही काही साईड इफेक्ट्स तर तुमच्या जीवाशी खेळणारे आहेत, त्यामुळे जर तुमच्याही मनात टॅटू करून घ्यायच असेल तर त्याचे हे गंभीर परीणाम अवश्य जाणून घ्या, कदाचित तुमचा विचार बदलू शकतो!

 

१.त्वचेचे विकार

 

 

टॅटू ही एक प्रकारची कला जरी असली तरी ती योग्य प्रोफेशनल्स कडून करून घेतली नाही तर ती खूप भयानक ठरू शकते आणि कितीही नाही म्हटलं तरी या टॅटू मुळे तुमच्या स्किनवर त्याचा परीणाम दिसून येतोच!

हा त्वचेचा रोग त्वचेच्या तिसऱ्या लेयर पर्यंत गेला तर तो आणखीनच वाईट ठरतो. स्किन लाल पडणे, खाज येणे अशी काही चिन्ह दिसायला लागली की समजावं की हा टॅटूचा परीणाम आहे, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवलीच पाहिजे!

 

२. एलर्जीक रिऍक्शन

 

टॅटूमुळे आणखीन एक धोका असतो तो म्हणजे एलर्जीचा. तुमची त्वचा जर खूप संवेदनशील असेल तर तुम्ही टॅटूच्या भानगडीत न पडलेलंच बरं..

जरी तुम्ही टॅटू काढलात तरी त्या शाई मध्ये असलेल्या केमिकल किंवा प्लास्टिकमुळे सुद्धा एलर्जीक रीऍक्शन होते आणि कालांतराने त्याच रूपांतर सूज येणे किंवा जखम होऊन त्यातून रक्त येणे यात होऊन ती गोष्ट अजून चिघळण्याची शक्यता दाट असते!

 

३. एमआरआयमध्ये येणारा अडथळा

 

 

हा अडथळा फार क्वचितच येतो पण शक्यता नाकारू शकत नाही. टॅटू करताना स्वस्त किंवा चालू क्वालिटीची शाई वापरली असल्यास किंवा टॅटू जुना झाला असल्यास डॉक्टरकडे तुमचा एमआरआय काढताना अडथळा येऊ शकतो.

हे खूप रेअर आहे त्यामुळे याबाबत वैद्यकीय सल्ला घेणं कधीही उत्तमच..!

 

४.स्किन कॅन्सर असल्यास त्याची सुद्धा चिन्ह न दिसण्याची भीती

 

 

टॅटूने झालेल्या एलर्जीमुळे आणि त्यातून त्वचेवर आलेल्या लाल डागांमुळे किंवा सूज आल्यामुळे त्या व्यक्तीला स्किन कॅन्सर असल्यास तो लगेच डिटेक्ट होऊ शकत नाही आणि ही गोष्ट तुमचा जीव सुद्धा धोक्यात घालते!

५. योग्य ठिकाणी टॅटू न काढल्याने होणारे दुष्परीणाम

प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट तोच असतो जो आपल्या कस्टमरची काळजी घेऊन टॅटू कुठे काढला पाहिजे आणि कुठे नाही याबाबत सल्ला देतो! काही लोकं फक्त पैशासाठी सांगतील तसा आणि तिथे टॅटू काढतात.

 

 

काही काही लोक तर त्यांच्या गुप्तांगांवरसुद्धा टॅटू काढायला पूढे मागे बघत नाहीत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देणं हे नंतर खूप कठीण होऊन बसते, त्यामुळे अगदीच टॅटू काढायचं मन असल्यास एका प्रोफेशनल आर्टिस्टच्या सल्ल्यानुसारच टॅटू करावा!

 

६. रक्तदान करताना अडचण

 

 

टॅटू केल्यानंतर साधारणपणे एक आठवडा ते एक महिना तुम्ही कुणालाही रक्तदान करू शकत नाही, कारण ती शाई आणि त्यातली घातक केमिकल्स तुमच्या त्वचेमार्फत किंवा रक्तामार्फत समोरच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता जास्त असते!

त्यामुळे टॅटू केल्यावर हा ठराविक काळ तरी इच्छा असून सुद्धा किंवा घरच्या व्यक्तीला अडीअडचणीला सुद्धा तुम्ही रक्तदान करू शकत नाही, त्यामुळे हे सर्वस्वी ज्याचं त्याने ठरवावं की टॅटू करणं बरं की रक्तदान!

 

७. चुकीच्या सुया वापरल्याने होणारे रोग

 

 

आपण लहानपणी सायन्स मध्ये शिकतो की एकमेकांच्या सीरींज, टूथब्रश, रेझर वापरल्याने एचआयव्ही किंवा हीपेटेटीस बी सारखे रोग किंवा कॅन्सर व्हायचे चान्सेस असतात, तसंच टॅटू काढताना कुणा दुसऱ्याला वापरलेल्या सुईचा तुमचा टॅटू काढण्यासाठी वापर केल्यास सुद्धा हाच धोका निर्माण होऊ शकतो.

प्रत्येक टॅटू आर्टिस्ट सुई बदलतोच असं नाही, त्यामुळे हे सगळे धोके पत्करून आताही जर तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर किमान तो टॅटू आर्टिस्ट सुई बदलतो का नाही यावर बारकाईने लक्ष द्या आणि मगच टॅटू काढायला सुरवात करा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version