' सिगरेट सोडायचा प्रयत्न करताय पण जमत नाहीये? मग या टिप्स नक्की वापरा!! – InMarathi

सिगरेट सोडायचा प्रयत्न करताय पण जमत नाहीये? मग या टिप्स नक्की वापरा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्यापैकी प्रत्येकाला धूम्रपानाचे तोटे माहिती आहेत. शरीराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान या व्यसनापासून होऊ शकतं, पण मात्र तरीही ही सवय सोडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.

तुम्ही प्रासंगिक धूम्रपान करत असाल किंवा नेहमी धुम्रपान करत असाल तरी या सवयीपासून स्वतःला मोकळं करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. धूम्रपान करण शरीरासाठी हानिकारक आहेच, पण त्यासोबतच हे व्यसन तुम्हाला मानसिक दृष्ट्या देखील आजारी पाडू शकतं.

 

smoking inmarathi
AAO.org

 

सिगारेटमध्ये निकोटीन वापरलं जातं ज्यामुळे आपल्याला तात्पुरतं त्याचं व्यसन जडतं आणि यांने निकोटीनची आपल्या शरीराला सवय होते. जेव्हा हे निकोटिन आपल्याला मिळणे बंद होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक अपायकारक बदल घडू लागतात.

त्यामुळे या सवयीपासून दोन हात दूर राहिलेलं चांगलं. आपल्यापैकी अनेकजण असे असतात ज्यांना हे व्यसन सोडायचं आहे पण त्यांना हे शक्य होत नाही. मित्रांनो या लेखामध्ये काही असे उपाय दिलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला धूम्रपानाचे व्यसन सोडण्यास मदत होईल.

 

१. धूम्रपान सोडण्याचे तुमचे कारण शोधा

 

smoking 1 inmarathi

 

धूम्रपान सोडण्याची इच्छा अनेक जणांची असते परंतु असे व्यसन सोडण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती हवी आणि त्यासोबतच हे व्यसन सोडण्याचे कारण देखील हवे.

उदाहरणार्थ, हे व्यसन सोडल्यामुळे मला होणाऱ्या गंभीर आजारांपासून मी मुक्त होणार आहे. ज्या आजारांमुळे कदाचित माझ्या परिवाराला देखील हाल सहन करावे लागतील. असे काहीतरी कारण शोधल्याशिवाय तुम्ही या व्यसनापासून मुक्त होऊ शकत नाही.

 

२. निकोटीनला पर्याय शोधा

जेव्हा तुम्ही व्यसनापासून मुक्त होण्याचे ठरवाल तेव्हा तुम्ही निकोटीनच्या पर्यायाचा देखील विचार करायला हवा कारण जर एकदम तुमच्या शरीरामध्ये जाणाऱ्या निकोटीनचे प्रमाण कमी झालं तर त्यामुळे तुम्ही डोकेदुखी अनुभवू शकता, तुमच्यामध्ये मानसिक बदल होऊ शकतात.

 

nicotex inmarathi

 

“फक्त एकदाच” असं म्हणून परत ती सिगरेट हातात घेण्यासाठी तुम्ही इतरांना विनवण्या देखील करू शकता. त्यामुळे निकोटीनला पर्याय म्हणून बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

तुम्ही यासंबंधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता, पण या सवयीपासून मुक्त होण्याच्या आधीच अशा प्रकारची तयारी करून ठेवावी.

 

३. डॉक्टरांचा सल्ला घ्या :

जेव्हा तुम्ही हे व्यसन तुमच्या स्तरावरती सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत, त्यामुळे गरज लागल्यास तुमच्या डॉक्टरांकडून वेळेत सल्ला घ्यावा.

 

quit smoking inmarathi

 

तुम्ही व्यसनमुक्ती केंद्राकडून देखील सल्ला घेऊ शकता किंवा तुमचे मन वळवण्याकरिता मेडिटेशन सारखा पर्याय वापरा ज्यामुळे तुम्ही भविष्यात परत व्यसन सुरु करणार नाही.

 

४.  संयम ठेवा :

जर तुम्ही व्यसनमुक्तीकरीता डॉक्टरांकडून मदत घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे तुमच्या धुम्रपानामध्ये कमी येईल परंतु तरीही तुमचा स्वतःवरील संयम ढळता कामा नये.

 

patience inmarathi

 

कारण औषधांमुळे तुमच्यात व्यसनमुक्तीचे काही साईड इफेक्ट काही दिवसांकरता होऊ शकतात. उदाहरणार्थ, तणाव किंवा मन एकाग्र करण्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो.

 

५. व्यसनमुक्तीसाठी जवळच्या माणसांची मदत घ्या

तुम्ही व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करत आहात ही गोष्ट तुमच्या मित्रांना, परिवाराला आणि इतरही जवळच्या लोकांना सांगून ठेवा. या गोष्टीमुळे तुम्हाला व्यसनातून मुक्त होण्यास मदत होईल.

 

people chatting inmarathi

 

ते तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन देतील, ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रावर होणाऱ्या चर्चेमध्ये देखील भाग घेऊ शकता यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.

 

६. स्वतःसाठी वेळ काढा

मुळात धूम्रपानाचे व्यसन जडते कारण निकोटीन माणसाच्या शरीराला आराम देते. जेव्हा तुम्ही हे सर्व सोडण्याचे प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला इतर पद्धतीने आराम शोधण्याची नितांत गरज भासेल.

 

tension inmarathi

 

 

अशावेळी तुम्ही तुमचे आवडीचे गाणे ऐकू शकता, मित्रांशी चर्चा करू शकता किंवा अगदी मसाज देखील तुम्हाला मदत करेल. शक्यतो तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा व्यसनमुक्तीचा संकल्प पूर्ण होईल.

 

७. मद्यपानापासुन दूर रहा

 

shahid kapoor 1 inmarathi

 

जेव्हा तुम्ही मद्यपान करता तेव्हा व्यसनमुक्तीचा संकल्प पाळणे अत्यंत कठीण जाते. त्यामुळे व्यसन सोडायला सुरूवात केल्यापासून काही महिने तुम्ही दारूपासून दूर राहणे गरजेचे आहे.

अगदी दारूच नव्हे तर इतरही गोष्टी ज्या तुम्हाला धूम्रपानाची आठवण करून देतात अशा गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला चहा घेताना धूम्रपान करण्याची सवय असेल तर पुढचे काही महिने तुम्ही कॉफी घ्यायला हवी.

 

८.  स्वच्छता

 

smoking 4 inmarathi

 

जेव्हा तुम्ही व्यसनमुक्तीचा संकल्प कराल आणि तुमची शेवटची सिगारेट संपवाल तेव्हा तुमच्या घरातील सर्व अॅश ट्रे, लाइटर फेकून द्या.

तुमच्या कपड्यामधून जर धूम्रपानाचा वास येत असेल तर सर्व कपडे धुऊन घ्या. तुमच्या घरातील वातावरण बदलासाठी कार्पेट आणि इतर गोष्टींची देखील स्वच्छता करून घ्या.

घरामधील धूम्रपानाचा वास जाण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर करा. जर तुम्हाला कार मध्ये धूम्रपान करण्याची सवय असेल तर कारची देखील संपूर्ण स्वच्छता करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला परत धुम्रपानाची आठवण येणार नाही.

 

९. प्रयत्न करत रहा

जेव्हा आपण एखाद्या व्यसनापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होऊ याची शक्यता कमी असते. त्यामुळे निराश न होता प्रत्येक वेळी प्रयत्न करणे एवढेच आपल्या हातात आहे हे समजून घेऊन नवीन उत्साहाने प्रयत्न करत रहा.

 

 

 

जेव्हा तुम्हाला परत प्रयत्न करायचा असेल तेव्हा परत एकदा तारीख ठरवून घ्या आणि जोमाने कामाला लागा.

 

१०. आहारामध्ये फळांचा प्रमाण वाढवा

 

fruits inmarathi

 

व्यसनापासून मुक्त व्हायला सुरुवात केल्यावर कधीही डाएट करू नये त्यामुळे तुमच्यातील तणाव वाढण्यास मदत होते आणि शक्यता आहे की, त्यामुळे तुम्ही परत जास्त प्रमाणात व्यसन करू लागाल.

त्यापेक्षा तुम्ही तुमचं डेली रुटीन पाळा आणि आहारामध्ये फळ, पालेभाज्या यासारख्या प्रोटीन युक्त घटकांचा वापर करा. या गोष्टी तुमच्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

 

११. मन रमवा

 

running-tips-inmarathi

 

एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कुठल्याही कामात व्यस्त असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यसनाची आठवण कमी येते, त्यामुळे नेहमी व्यस्त रहा. जेव्हा तुम्हाला धूम्रपानाची आठवण येईल तेव्हा तुमचे आवडीचे जॉगिंग शुज घालून धावण्यासाठी निघून जा.

अशा प्रसंगी व्यायामही तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि या व्यायामांमधून तुमचे वजनही घटेल कारण जेव्हा तुम्ही व्यसनापासून मुक्त होता तेव्हा तुमचे वजन अचानक काही प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते.

 

१२. वेगळा विचार करा

 

nicotex inmarathi

 

असा विचार करा की, धूम्रपान सोडल्यामुळे तुमचा शारीरिक फायदा तर होतच आहे पण त्यासोबतच तुमचा आर्थिकदृष्ट्या देखील फायदाच होणार आहे.

त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यसनाची आठवण येईल तेव्हा तुम्ही किती पैसे आत्तापर्यंत वाचवले आहेत याचा हिशोब करा आणि ते पैसे चांगल्या कामासाठी खर्च करा या गोष्टीमुळे तुम्ही परत व्यसनाकडे जाणार नाही.

 

१३. नेहमी लक्षात ठेवा धूम्रपान शरीरासाठी घातक आहे

 

 

जेव्हा तुम्ही धूम्रपान सोडता तेव्हा लक्षात घ्या फक्त वीस मिनिटांच्या आतमध्ये तुमचे हार्ट रेट मूळ स्थितीत येतात आणि व्यसनमुक्तीच्या दिवशीच तुमच्या रक्तातील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण देखील कमी होईल.

फक्त दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला हे सर्व परिणाम अधिक चांगल्या प्रमाणात दिसू लागतील. अशाच प्रकारे जर तुम्ही व्यसनमुक्तीचा संकल्प पाळलात तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता देखील कमी होईल.

लक्षात ठेवा, धूम्रपान हे एक गंभीर व्यसन आहे आणि यापासून मुक्त होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. धुम्रपानापासून मुक्त होण्यासाठी वरील सल्ले तुम्हाला नक्कीच मदत करतील.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?