' आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं? भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा – InMarathi

आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं? भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नविन वर्षात सगळ्यात पहिली खरेदी कुठली केली तर याचं ठरलेलं उत्तर म्हणजे कॅलेंडर.

आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी तयार झालं याचा विचार आपण कधी केलाय का?

freepic

आता सगळ्यांनाच कॅलेंडर आपल्या हातात ठेवायची सोय आहे. म्हणजे मोबाईलमध्ये हो! एका क्लिकवर आपल्याला बारा महिन्यांची सगळी माहिती मिळते. महत्वाच्या तारखा लक्षात ठेवायची गरज नाही.

पण हे वर्षानुवर्षापासून वापरलं जाणां कॅलेंडर कसं तयार झालं असेल? माणसाला हे तयार करण्यासाठी किती प्रयास पडले असतील? यात accuracy येण्यासाठी किती काळ आणि अभ्यास करावा लागला असेल याचा विचार केलाय? आज आपण त्याची माहिती करून घेऊ.

आदिम काळाचा विचार केला तर मानवाला मुळातच सूर्य,चंद्र, तारे याविषयी आकर्षण होतं. त्याच्या लक्षात आलं की ठराविक काळानंतर दिवस आणि रात्र होतात.

the indan express

पण मग हे मोजायचे कसे ? कारण त्याच्या लक्षात यायला लागलं की ठराविक काळात झाडांची पाने येतात, गळतात, फुलं पानं यायचा एक हंगाम असतो. आणि जगण्यासाठी महत्वाचं पीक पण ठराविक वेळेला पेरलं तरच येतं. फक्त ते दिवस मोजायचे कसे याचा तो विचार करू लागला.

मग त्याने आकाशाचा आधार घेतला. आकाशात सूर्य, चंद्र, तारे कधी येतात,कधी जातात याचं निरीक्षण सुरू झालं. माणसाच्या आकाशाच्या आकर्षणातूनच खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि कॅलेंडरचा उगम झाला.

खगोलशास्त्रात आकाशाचा वैज्ञानिक अभ्यास असतो तर ज्योतिषशास्त्र म्हणजे छद्म विज्ञान असं पण म्हणू शकतो.

म्हणजे आकाशातील  ग्रहताऱ्यांचा माणसाच्या जीवनावर काय परिणाम होत असेल याची काल्पनिक मांडणी. पण कॅलेंडर म्हणजे आहेत ते दिवस, महिने,वर्ष याची माहिती.

अगदी कांस्य युगापासून कॅलेंडर तयार करायला सुरुवात झाली. पहिल्यांदा सुमेरियन संस्कृतीत त्या लोकांनी कॅलेंडर तयार केलं. ईजिप्शियन,बॅबिलीयान, झोराष्ट्रीयन,पर्शियन हिब्रू या सगळ्या संस्कृतीत कॅलेंडर तयार केलं गेलं होतं..

इजिप्शियन संस्कृतीत  कॅलेंडर बनवायची सुरुवात फार गमतीदार आहे. त्यांनी आकाशातील सिरीयस (जो सर्वात तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो) या ताऱ्याचं निरीक्षण केलं.

त्यांचं निरीक्षण असं होतं की सिरीयस जर पहाटेच्या आधी क्षितिजावर उगवला तर त्यावेळेस नाईल नदीला पूर यायचा आणि वर्षातून एकदा ही परिस्थिती यायची.

इथूनच यांची कालगणना सुरू व्हायची. त्यांनी तीस दिवसांचा एक महिना केला पण 365 दिवस ॲडजस्ट होत नव्हतं पाच दिवस हे जास्त होते. मग हे जास्त दिवस ते शेवटच्या महिन्यात अधिक  करत. पण त्यांच्या लक्षात आलं की सिरीयस हा दर चार वर्षांनी एक दिवस उशिरा उगवतो.

म्हणजेच वर्षातले दिवस हे 365 दिवस 6 तास असे साधारण येतात. पण ते adjust कसं करायचं त्याचं गणित काही त्यांना जमवता आलं नाही.

बॅबिलोनियन संस्कृतीत ज्योतिषावर भर दिला जायचा म्हणून  ते चंद्रवर्ष मानायचे. पण यानुसार गणना केल्यामुळे महिन्याचे 29.5 दिवस येतात. म्हणजे साधारणपणे वर्षात 354 दिवस असतात. आणि सौर वर्षात साधारणपणे 365 दिवस असतात.

म्हणजे एका वर्षात अकरा दिवसांचा फरक पडतो. आणि चंद्राची स्थिती सूर्यगणनेनुसार येण्यासाठी बत्तीस वर्षांचा कालावधी जावा लागतो. पण अजूनही इस्लाम मध्ये हीच गणना मोजली जाते. त्यांनी सौरगणनेबरोबर येण्यासाठी कोणतीही सुधारणा स्वीकारली नाही. म्हणजे मुस्लिम कालगणना जेव्हापासून सुरू झाली त्यानुसार जरी पाहिलं तरी  सौरवर्षाची 1378 तर चंद्रवर्षाची 1421 वर्ष झाली आहेत.

ज्यू कालगणनाही चंद्र वर्षाप्रमाणे होते. पण सौर गणनेनुसार 365 दिवस येण्यासाठी, सौरवर्षाशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी एका महिन्याची ऑडिशन केली होती.

 माया संस्कृतीत तर अजूनच गमतीदार भाग आहे. त्यांना माहीत होतं की वर्षात 365 दिवस असतात पण त्यांनी ते 18 महिन्यात विभागले म्हणजे 20दिवसांचा एक महिना आणि राहिलेले 5 दिवस हे शेवटच्या महिन्यामध्ये घातले.

pintrest

या पाच दिवसांना ते अशुभ मानायचे. त्यांच्या एका महिन्यात एकच दिवस दोनदा यायचा.म्हणजे 2 दिवसाला एकच नाव.

आपल्याला माहितीच आहे की रोमन संस्कृती ही आधुनिक आणि पुढारलेली होती. रोमन लोकांनी जगावर राज्य केलं,त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या कॅलेंडरला त्याकाळात जगभर मान्यता होती. परंतु त्यातही बर्याच त्रुटी होत्या.

नंतर जूलियस सिझरने, सोसेगेनसच्या सल्ल्यानुसार त्यात काही सुधारणा केल्या. सोसेगेनसने त्याला सांगितलं की वर्षांमध्ये 365 दिवस आणि सहा तास असतात. वर्षाची सांगड कशी घालायची, तर त्यांनी यावर एक उपाय केला तो म्हणजे दर चार वर्षांनी एका महिन्यात एक दिवस अधिक करायचा. त्यांचा सगळ्यात छोटा महिना फेब्रुवारी, यामध्येच तो दिवस ॲड केला गेला अजूनही आपण ही पद्धत वापरतो..

लीप वर्षाची संकल्पना म्हणजे हीच. अगदी बरेच वर्ष हीच पद्धत वापरली जायची पण यातही एक कमतरता आहे लक्षात आलं कारण एका वर्षामध्ये अगदीच मोजून 365 दिवस आणि 6 तास नसतात तर 365 दिवस 5 तास  48 मिनिट आणि 46 सेकंद असतात.

आणि कालगणनेचा विचार केला, तर 130 वर्षात एका दिवसाचा फरक पडतो. आता यासाठी काहीतरी पर्यायी पद्धत शोधणे आवश्यक होतं.

youtube

 

अकराव्या शतकात उमर खय्यामने जे कॅलेंडर केले ते मात्र अॅक्युरॅसी च्या अगदी जवळ जाणारे होते. खैयाम यांनी काढलेल्या वर्ष गणनेनुसार वर्षातील एकूण दिवस 365.24219858156 आहेत तर आत्ताच्या आधुनिक कालगणनेनुसार  दिवस येतात ते म्हणजे 365.242190 दिवस.

सध्या आपण जे कॅलेंडर वापरतोय ते आहे ग्रेगोरियन कॅलेंडर,जे 1582 नंतर अस्तित्वात आले. जे अक्युरसीच्या बाबतीत एकदम बरोबर मानल जातं. पण तोपर्यंत वापरल्या जाणाऱ्या ज्यूलियन कलेंडरच्या बाबतीत खरी समस्या उद्भवली ती 1582 यावर्षी.

त्यावेळेसचं ज्युलियन  सौर वर्ष हे 10मिनिट आणि 14 सेकंदाने कमी होतं.  यानुसार चारशे वर्षात जवळजवळ दहा दिवसांचा फरक पडला आहे हे लक्षात आले.आता हा पेच कसा सोडवायचा असा प्रश्न पडला.

मग पहिल्यांदाच चर्चने यात भाग घेतला,पोप ग्रेगरी13 यांनी प्रसिद्ध जर्मन ज्योतिषी क्रिस्तोफर याला समस्येचं निराकरण करायला सांगितलं .आणि क्रिस्तोफरने त्यावर खूप चांगला उपाय सांगितला.

ancient origens

त्यावर्षातील ऑक्टोबर महिन्यातील दहा दिवस वगळण्यात आले. तसेच चारशे वर्षातील तीन दिवसांचा फरक काढण्यासाठी क्रिस्तोफरने एक भन्नाट सोल्युशन दिलं ते म्हणजे शतकी वर्षाला 400 ने भाग जात असेल तरच ते लीप वर्ष मानले जावे म्हणजे  चार शतकात तीन वर्ष हे बाद होतील. म्हणजे 1600 हे लीप वर्ष असेल पण 1700,1800आणि 1900 हे मात्र लीप वर्ष नसतील.

ग्रेगरिने हे दिलेलं सोल्युशन  फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल आदी राष्ट्रांनी स्वीकारले. पण इंग्लंडने हे इ. स. 1752 नंतर स्वीकारले.

तोपर्यंत ज्युलियन कॅलेंडर व ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये 11 दिवसांचा फरक पडला होता, मग सप्टेंबर 1752 मधील 11दिवस वगळण्यात आले. तर रशियाने सन 1800नंतर या पद्धतीचा स्वीकार केला. आणि नंतर संपूर्ण जगभर हीच पद्धत स्वीकारली गेली.

पण आताच्या आधुनिक कालगणनेनुसार अजून एक अशी तरतूद केलीय की दर 3323 वर्षात एका दिवसाची addision करावी लागेल. म्हणूनच सन 2000 ला 400ने भाग जाऊन पण ते लीपवर्ष नव्हतं. तसचं सन 4000 ला पण 400नेभग जाऊन पण तेही लीप वर्ष नसेल.

हा झाला एकंदरित कॅलेंडरचा इतिहास…

भारतात मात्र हिंदू दिनदर्शिका अगदी प्राचीन काळापासून वापरली जाते. आता त्याला प्रादेशिक स्वरूप प्राप्त झालंय, म्हणजे उत्तर, दक्षिण या भागात त्या त्या भागाचं वैशिष्ट्य त्यात आलंय पण एक गोष्ट मात्र संपूर्ण भारतभर एकच राहिली आहे ती म्हणजे 12 महिन्यांची नावं.

हिंदू कॅलेंडर मध्ये सौर , चंद्र या दोन्हींचा विचार करण्यात आलंय. म्हणजे चंद्राच्या कलांचा त्यावर प्रभाव आहे. धार्मिक सण, दिवस यांचा जास्त विचार केला गेला आहे.

clipartstaion

ग्रेगोरियन कॅलेंडर मध्ये दिवसाची तासांमध्ये विभागणी आहे तर हिंदू कॅलेंडर मध्ये दिवसात 15 मुहूर्त आहेत. सकाळचा मुहूर्त हा पूजापाठ करण्यासाठी, तर दिवसातील ठराविक वेळा या मंत्रोच्चार करण्यासाठी आहेत. हिंदू आठवड्याची सुरुवात रविवारपासून होते.

प्रत्येक वाराला ग्रहांची नावं दिली आहेत. हिंदू नववर्ष हे चैत्र पाडवा पासून सुरू होते.  हिंदू कॅलेंडरने नवीन बदल नेहमीच स्वीकारले आहेत. जेंव्हा लीपवर्ष ही संकल्पना आली तेंव्हा त्याला मिळतं जुळत घेण्यासाठी 22मार्च 1957 ला यात बदल केले गेले.

आणि शक संवत चैत्र 1,1879 पासून सुरुवात केली. हिंदू महिने हे साधारणपणे 29.5दिवसांचे असतात. ह्या महिन्यांची नाव ही 12 राशींवरून ठेवली आहेत.

kalniranay

लीप वर्षाशी जुळवून घेण्यासाठी हिंदू कालगणनेत दर 4 वर्षांनी अधिक मास येतो. हिंदू वर्षांनां पण ठराविक नावे असतात. अशी एकूण ६० नावं आहेत. ६० वर्ष झाल्यावर परत पहिल्या वर्षांपासून म्हणजेच प्रभाव या पहिल्या वर्षापासून सुरुवात होते.

तर असा हा कॅलेंडरचा इतिहास, आपली ओळख आपल्याला सांगणारा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?