' कुशीत, मिठीत घेणे, जवळ घेऊन कुरवाळणे; गोड मिठीचे ७ फायदे! – InMarathi

कुशीत, मिठीत घेणे, जवळ घेऊन कुरवाळणे; गोड मिठीचे ७ फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

कडलिंग किंवा कडल ह्या इंग्रजी टर्मशी आपण सगळेच परीचित आहोत, यालाच आपल्या मराठी बोलीभाषेत कुशीत अथवा मिठीत घेणे किंवा जवळ घेऊन कुरवाळणे असं म्हणतात.

बाहोमे चले आ… यासारख्या अनेक हिंदी गाण्यांतून मिठीचा झालेला उच्चार पाहता, संगीतसृष्टिलाही मिठीनं भुरळ घातल्याचं दिसतं.

मुन्नाभाईने मारलेली जादुकी झप्पी आजही आपल्या लक्षात आहे.

 

munna bhai mbbs InMarathi

 

ही अशी मिठी फक्त प्रियकर प्रेयसीच करतात अशातला भाग नाही, तर आपल्या अगदी जवळची व्यक्ती जस की आपला पार्टनर, किंवा मित्र-मैत्रीण, पालक, भावंडं किंवा लहान बाळ यांना मिठीत घेऊन कुरवाळण्याचे बरेच फायदे आहेत हे बहुतेक लोकांना ठाऊक नसतं.

वरकरणी केवळ प्रेमाचं हे प्रतिक वाटत असलं, तर तुम्ही दुस-याला मारलेली मिठी ही तुम्हा दोघांचं शरीर सुदृढ ठेवणारी असु शकेल याचा तुम्ही विचार केलाय?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दिवसभरात किमान एकदा तरी आवडत्या व्यक्तीला मारलेली मिठी किंवा रात्री झोपताना, केलेलं कडलींग संपुर्ण दिवसभराचा थकवा नाहीसा करतो.

 

 

तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल काहीतरी काळजी किंवा आपुलकीची भावना वाटते त्या व्यक्तीला कवेत घेउन कुरवाळल तरी आपल्या मनावरचा ताण हलका व्हायला खूप मदत होते, शिवाय कडलींग करताना ब्लड प्रेशर सुद्धा कमी होऊन स्ट्रेसि हार्मोन्स ची लेव्हल सुद्धा कमी होते.

जेणेकरून एक वेगळीच एनर्जी निर्माण होते ज्यामुळे मन, मेंदू तणावमुक्त होते. तसंच एका जोडप्यामधल रिलेशनशिप डेव्हलप करायला सुद्धा हा प्रकार फार उपयोगी असतो,

खासकरून या गुलाबी थंडीच्या दिवसात तर याचे खूप फायदे होतात, तर या गोड मिठीच्या मागचे फायदे आपण जाणून घेऊया..

१.हृदयाला ठेवा फिट

लंग्स आणि हृदय यांच्या मध्ये एक छोटासा भाग असतो ज्याच्या मदतीने रक्तदाबावर नियंत्रण राहतं आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या घट्ट मिठीने हा भाग अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी करायला मदत होते.

काही वैज्ञानिकांच्या मते कडलिंगचे फायदे महिलांना जास्त आहेत पण पुरुषांना सुद्धा त्याचा तितकाच फायदा होऊ शकतो

 

deepika ranbeer hug inmarathi

 

त्यामुळे ह्रयद सुदृढ ठेवण्यासाठी जादुकी झप्पी झालंच पाहिजे.

२.शारिरीक किंवा मानसिक दुःखात फायदेशीर

कोणतीही शारिरीक जखम किंवा इजा झालेल्या व्यक्तीला आपल्या जवळच्या माणसाने एक घट्ट मिठी मारली, जवळ घेऊन कुरवाळलं तर त्याचं दुःख थोडफार तरी नक्कीच कमी होतं आणि त्याच समाधान समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतं.

जे शारिरीक दुःखाच तेच मानसिक दुःखाच सुद्धा, समोरच्या व्यक्तीला मन मोकळं करायला एक मिठी सुद्धा पुरेशी असते,

 

couple-inmarathi

 

त्या एका मिठीमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की आपलं ऐकून घ्यायला कुणीतरी आपल माणूस आहे.

याचाच अर्थ, मिठी ही केवळ शारिरीक गरज नसून, मानसिक गरज आहे, हे लक्षात ठेवा.

३. शारीरिक आजारापासून संरक्षण

या कडलिंग मुळे फक्त मनावरचा ताण हलका होतो अशातला भाग नाही तर त्यामुळे जे व्हायरस हवेत असतात त्यापासून सुद्धा आपले संरक्षण होते आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.

 

loving-couple-InMarathi

 

जसं की सर्दी खोकला या अशा किरकोळ आजाराचे व्हायरस आणखीन पसरू नये यासाठी या कडलिंग चा खूप उपयोग होतो हे सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे.

४. पार्टनरशी कनेक्ट व्हायला मदत

जसं एका नात्यात दोघांची मन जुळणं महत्वाचं असतं तसं त्या दोन व्यक्तींच्या शारीरिक गरजा सुद्धा पूर्ण होणं हे सुद्धा महत्वाचं असतं.

 

Lovely couple Inmarathi

 

ज्या जोडप्यांना आपलं शारीरिक आयुष्य सुखी हवं असेल, त्या जोडप्यांनी कडलिंग, किसींग या अशा गोष्टींकडे एक थेरपी म्हणून बघणं गरजेच आहे. या थेरेपीचा पुरेपूर वापर केल्यासं जोडपं हे सदैव सुखी, निरोगी आणि तणावमुक्त आयुष्य जगतं हे कित्येक प्रोफेशनल डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

५. शांत झोप लागायला मदत

जर आपल्या पार्टनर ची झोप ही खूप सावध असेल किंवा शांत नसेल तर अशा लोकांचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता जास्त असते,

कारण एक परिपूर्ण निरोगी आयुष्य जगायला लागणारी शांत झोप कधीच त्यांच्या नशिबी नसते. अशा प्रॉब्लेम्स वर कडलिंग हा अतिशय उत्तम उपाय आहे.

 

couple inmarathi

 

जर तुम्ही तुमच्या पार्टनर ला कुशीत घेऊन झोपलात तर तुमच्या त्वचेच्या स्पर्शाने सुद्धा समोरच्याचा मनावरचा ताण कमी होऊन शांत झोप लागायला मदत होते.

६. तान्ह्या बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम

आई तान्ह्या बाळाला अंगावरच दूध पाजते किंवा वडील लहान बाळाला कुशीत घेऊन त्याचे लाड करतात यामुळे सुद्धा त्या बाळाचे आरोग्य उत्तम राहू शकतं,

 

Mother & newborn InMarathi

 

खासकरून बाळाची त्वचा इतकी नाजूक असते की त्या कडलिंग चे फायदे लगेच दिसून येतात, जसं की बाळाचे रडणे कमी होतं किंवा बाळाला अगदी शांत झोप लागते त्यामुळे हे कडलिंग जितकं आपल्याला फायदेशीर आहे तितकच लहान बाळांसाठी सुद्धा उत्तम आहे.

७. राग कमी होण्यात मदत

सगळ्यांना मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमातली संजय दत्त ची जादू की झप्पी माहीत असेलच तर त्यामागे फक्त हा सिनेमा नसून शास्त्रीय कारण आहे.

एखादा माणूस रागावला असेल किंवा त्याची जास्त चिडचिड होत असेल तर एक मनापासून मारलेली घट्ट मिठी त्या माणसाचा राग एका झटक्यात घालवू शकते, कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील चांगल्या भावना नकळत समोरच्या व्यक्तीमध्ये पाठवता यालाच इंग्रजी मध्ये Good/Positive vibes असे देखील म्हणतात.

 

marriedcoupleslookalike 7 INMarathi

 

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तुम्ही महागड्या जीमवर खर्च करता, जीभेवर ताबा ठेवून डाएट करता. मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेक थेरेपीज शिकता. मात्र या सगळ्यांत घरबसल्या केला जाणा-या कडलिंगचा उपाय एकदा तरी ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?