Site icon InMarathi

२०२० मध्ये प्रदर्शित होणारे हे आत्मचरित्रपर चित्रपट पाहणं अजिबात चुकवू नका..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चित्रपटसृष्टीला सध्या मोहिनी घातली आहे ती बायोपिक्सने. गेल्या वर्षात आपण ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने ७० च्या दशकातली मुंबई अनुभवली.  ‘भाई व्यक्ती की वल्ली’च्या निमित्ताने पु.ल.देशपांडे यांचे सुवर्णयुग अनुभवले.

तसंच संजू, मणिकर्णिका, सांड की आख, पीएम मोदी यांसारखे वेगवेगळ्या व्यक्तीरेखांवर आधारित चित्रपट आपण वर्षभरात पाहिले. एखाद्या व्यक्तीचा प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसाद तर लाभलाच शिवाय समीक्षकांनीही यातील अनेक चित्रपटांचे कौतुक केले.

त्यामुळेच एकंदरच चित्रपट सृष्टी बायोपिक्सच्या प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्येही एकापेक्षा एक सरस बायोपिक्स आपल्याला भेटीला येणार आहेत.

या चित्रपटांचा रसिकांचा प्रतिसाद कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक नजर टाकूया याच वेगवेगळ्या चरित्रपटांवर.. 

१) छपाक

 

the hans india

वर्षाच्या सुरुवातीला दीपिका पादुकोण एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ऍसिड हल्ल्यात बचावलेली लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर प्रेरित असलेल्या छपाक या सिनेमात दीपिका दिसणार आहे.

१० जानेवारीला या चित्रपट लोकांसमोर येत असून दीपिकाच याची निर्मातीसुद्धा आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

२) ८३

 

deccan chronical

 

भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप पटकावला होता. यावर आधारित चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणवीर सिंग या चित्रपटामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर यामध्ये दीपिकासुद्धा एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय, अनेक कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. भारताच्या वर्ल्ड कप विजयाचा प्रवास याद्वारे उलगडण्यात येणार आहे.कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या ऐतिहासिक खेळीचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

१० एप्रिल २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

३) तान्हाजी द अनसंग वोरिअर

 

india today

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील एक शूर मावळा म्हणजे तान्हाजी मालुसरे. तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यात अजय देवगण याने तानाजीची भूमिका साकारली असून चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे. यामध्ये अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री काजोलसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

३डीमध्येसुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तानाजी मालुसरे यांचे अतुलनीय कार्य यामधून लोकांसमोर मांडले जाणार आहे.

४) गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल

 

india today

 

कारगिलमध्ये युद्धभूमीवर पाऊल ठेवणारी पहिली महिला गुंजन सक्सेना . १३ मार्च २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. लखनऊ येथे या चित्रपटाचे बरेचसे शूटींग पार पडले आहे.

५) शकुंतला देवी – ह्युमन कॉम्प्युटर

 

india today

 

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असणारा शकुंतला देवी हा बायोपिकसुद्धा असाच स्पेशल आहे. अद्भुत प्रतिभेचे वरदान लाभलेल्या, मानवी संगणक अशी ओळख मिळालेल्या शकुंतला देवी यांच्यावर हा चित्रपट असणार आहे.

१९८२ मध्ये शकुंतला देवी यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. त्यांचा प्रवास यातून उलगडला जाणार आहे. मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अनु मेनन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

६) गंगुबाई काठियावाडी

 

संजय लीला भन्साळी एक वेगळ्या धाटणीच्या सिनेमाच्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुसैन झैदी यांच्या माफिया क्विन्स या पुस्तकातील प्रकरणावर हा चित्रपट आहे. आलिया भट या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून सप्टेंबर २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

dainik bhaskar

 

गंगूबाई ६० च्या दशकात हिरामंडी भागात कोठा चालवत असे. भारतभरात याचा विस्तार त्यांना करायचा होता. त्यांचाच संघर्ष आणि प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

७) सरदार उधम सिंग

 

youtube

सरदार उधम सिंग यांच्या साहसी भूमिकेत अभिनेता विकी कौशल आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून उधम सिंग यांचे साहसी चरित्र मांडण्यात येणार आहे.

उधम सिंग यांनी जालियानवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायरची हत्या केली होती. ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

 

८) मैदान

 

orissapost

अजय देवगण आणखी एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मैदान या चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगण फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारत आहे.

१९५२ – १९६२ या काळातील भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ लोकांसमोर याद्वारे येणार आहे. २७ नोव्हेंबर २०२० ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

९) पृथ्वीराज

 

patrika

भारताला लाभलेल्या थोर राज्यकर्त्यांपैकी एक पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिका साकारत आहे. मिस वर्ल्ड मनुषी छिल्लर यामध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे.

नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

१०) थलाइवी

onlookersmedia

दक्षिणेतील ज्येष्ठ नेत्या दिवंगत जयललिता यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये कंगना रानौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासाठी खास अमेरिकेत जाऊन तिने तयारी केली आहे.

ए. एल. विजय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विष्णु वर्धन इंदुरी, शैलेश आर सिंह यांनी निर्मिती केली आहे.

११) झुंड

 

songsuno

सैराटच्या विक्रमी यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे हिंदीमध्ये बिग बजेट चित्रपट घेऊन लोकांसमोर येत आहे. यामध्ये बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन झळकणार आहेत.

चित्रपटाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नसली तरीही येत्या वर्षभरात निश्चितच हा चित्रपट लोकांसमोर येणार आहे. यामध्ये फुटबॉल कोच आणि सॉकर स्लमचे संस्थापक विजय बरसे यांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत.

१२) जंगजोहर

फर्जंद आणि फत्तेशिकस्तनंतर एका नव्या ऐतिहासिकपटातून दिगपाल लांजेकर प्रेक्षकांसमोर येत आहे. बाजीप्रभू देशपांडे हे शब्द म्हणजे नि:स्पृह स्वामीनिष्ठा आणि अजोड पराक्रमाचे प्रतिक.

पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले.

 

 

हजारोच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि ३०० बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली.

अविस्मरणीय पराक्रमाचा हा प्रवास ‘जंगजौहर’ या ऐतिहासिकपटातून जून २०२० मध्ये रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version