' कुटुंबात, मित्राला पैसे उधार का देऊ नयेत? न दुखावता उधारी टाळण्याचे ५ उपाय… – InMarathi

कुटुंबात, मित्राला पैसे उधार का देऊ नयेत? न दुखावता उधारी टाळण्याचे ५ उपाय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेकदा तुमच्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणालातरी पैशांची आवश्यकता असते. अशावेळी तुमच्याकडे मदत मागितल्यावर तुम्हाला नाही म्हणता येत नाही. शिवाय पैसे उधार दिल्यावर परत कसे मागायचे असा यक्षप्रश्न सुद्धा डोळ्यासमोर येतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शिवाय पैसे परत मागितल्यावर तुमच्या संबंधांवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी काय करावं आणि हा विषय कसा हाताळावा हे अनेकांना कळत नाही. घराघरात जाणवणारी ही समस्या कठीण असली तरी, हा विषय व्यवस्थितरित्या हाताळला तर कोणतंही नुकसान होत नाही.

 

hera pheri inmarathi 1

 

 

त्यामुळे, कुटुंबात किंवा मित्राला पैसे उधार देणे टाळले पाहिजे. हे टाळताना आपण मित्राला दुखावत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.

पैसे उधार का देऊ नयेत.. याची ही कारणं जाणून घ्या. 

१. परताव्याबद्दल चिंता

मित्रांना किंवा कुटुंबाला दिलेल्या रकमेच्या परताव्याची बऱ्याचदा निश्चिती  नसते. पैसे करत कधी मिळणार, त्याबद्दल व्याज काय असेल किंवा तत्सम गोष्टींबद्दल लिखित स्वरूपात कोणताही करार किंवा बोलणी झालेली नसतात.

त्यामुळे अनेकदा आपले पैसे परत कधी मिळणार याबद्दल आपल्याला कोणतीच स्पष्टता नसते. शिवाय व्यक्ती जवळची असल्याने त्याबद्दल उघडपणे बोलता येत नाही. त्याचबरोबर घरचीच किंवा जवळची व्यक्ती असल्याने पैसे घेणारासुद्धा निश्चिंत असतो.

 

question mark inmarathi 1

 

त्या व्यक्तीलासुद्धा परताव्याबद्दल काळजी नसते तसेच बऱ्याचदा पैसे देणाऱ्याला घाई नसेल असे गृहितसुद्धा धरले जाते. तसेच बँकेच्या कर्जाप्रमाणे येथे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क किंवा उशिरा पैसे भरल्याबद्दल दंडसुद्धा भरावा लागत नाही.

त्यामुळे अनेकदा पैसे परत मिळताना उशीर होऊ शकतो. आपल्याला गरज असताना उघडपणे मागणी करणेसुद्धा अवघड होऊ शकते म्हणूनच पैसे देण्याची वेळ आलीच तर त्यावेळी परताव्याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे.

===

हे ही वाचा पैसा टिकवणं अवघड असतं; या टिप्स वाचल्यात तर पैसा फक्त टिकणारच नाही, वाढतही राहील

===

savings-marathipizza03

तर सर्वात महत्वाची गोष्ट ही की, नंतर होणार त्रास टाळण्यासाठी, थोडे स्पष्टवक्ते व्हा!  ठरलेली रक्कम, त्यातील हफ्ते इतर सर्व गोष्टींबद्दल उघडपणे बोलून मगच तुमच्या जवळच्या व्यक्तीला पैसे दिले पाहिजेत.

२. गेटटूगेदरच्यावेळी कटुता

तुम्ही एख्याद्या मित्राकडून किंवा नातेवाइकाकडून पैसे घेतले आहेत किंवा तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे दिले आहेत तर दोन्ही प्रकारांमध्ये एकत्र भेटण्याच्यावेळी किंवा समारंभांच्या वेळी तुमच्या मनामध्ये कटुता राहण्याची शक्यता असते.

पैसे घेणारी व्यक्ती तुमच्या समोर आल्यावर काय बोलावं असा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात असतो शिवाय पैशांचा विषय कसा काढणार अशी समस्यासुद्धा असते त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाणं अनेकदा टाळलं जातं.

 

friends get together InMarathi

 

त्या व्यक्तीच्या समोर जाताना असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये कायम राहतात. पैसे घेणाऱ्या व्यक्तीच्याही मनामध्ये बऱ्याचदा अशाच भावना असतात , आणि त्याचा परिणाम,  तुमच्या परस्परसंबंधांवर होतो.

प्रत्यक्षात मात्र कर्ज किंवा दिलेल्या पैशांचा विषय हा तुमच्या दोघांमधील वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल कटुता मनात बाळगू नये. शिवाय त्यामुळे कौटुंबिक समारंभांमध्ये पैशाचा विषय येऊ न देता इतर गोष्टींकडे लक्ष देणे श्रेयस्कर ठरते.

याचबरोबर तुमच्या कटुतेमुळे कार्यक्रमाचा विचका होण्याची शक्यता असते त्यामुळे वैयक्तिक विषय बाजूला ठेऊनच या कार्यक्रमांमध्ये दिलखुलास पणे सहभाग घ्यावा.

३. देणाऱ्याचे सेवेकरी

बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीने पैसे घेतल्यावर ती व्यक्ती समोरच्या पैसे देणाऱ्या व्यक्तीसाठी कोणतीही गोष्ट करते. अनेकदा इच्छेविरोधातही केवळ पैशाच्या दबावामुळे काही तडजोड केली जाते.

मात्र, हा समज चुकीचा आहे हे पैसे देणाऱ्या आणि पैसे घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी लक्षात घेतले पाहिजे.

 

Fighting with friends Inmarathi

घेतलेले कर्ज हा एक व्यवहार आहे त्या पलीकडे त्याचा संबंध उरत नाही. त्यामुळे त्या पैशावरून तुमच्या वैयक्तिक संबंधांवर परिणाम होता कमा नये.

तुम्ही पैसे दिल्यावर समोरच्या व्यक्तीला अशाप्रकारे वाटत असेल तर त्याच्याशी योग्य वेळी संवाद साधून त्याचे गैरसमज दूर करणे योग्य ठरते. अशाने मोठे गैरसमज निर्माण होत नाहीत आणि व्यवहार पूर्ण होतानासुद्धा अडचणी निर्माण होत नाहीत.

 

४. अतिरिक्त पैशांची मागणी

अनेक लोकांना जाणवणारी ही समस्या आहे. बऱ्याचदा काही रक्कम दिल्यानंतर अनेकदा अतिरिक्त पैशांची मागणीसुद्धा काही दिवसांनी केली जाते. अशावेळी तुम्हाला पैसे देणे शक्य होईलच असं नाही शिवाय दरवेळी नकार देतानासुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात.

 

lend money inmarathi

 

याशिवाय अनेकवेळा नातेवाईकांमधील इतर लोकांकडूनसुद्धा तुम्हाला पैशाची मागणी केली जाऊ शकते. मात्र, दरवेळी तुम्ही प्रत्येकाला पैसे देऊ नयेत.

कधीतरी गरजेच्या वेळी मदत करणे योग्य असते मात्र सतत तुम्ही इतरांना पैसे उधार दिल्याने तुमची स्वतःची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे याचा विचार तुम्ही मदत करताना करणे आवश्यक आहे.

 

५. परताव्यासोबत व्याज नाही

नातेवाईकांना किंवा मित्रांना केलेल्या मदतीवर तुम्हाला व्याज किंवा कुठल्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. बँकेमध्ये किंवा इतर माध्यमातून गुंतवणूक करताना तुम्हाला काही प्रमाणात व्याजाची हमी असते, तसंच बाहेरून व्यावसायिक कर्ज घेतल्यास त्याचा परतावा करताना व्याज भरावे लागते.

 

money inmarathi

 

मात्र अशाप्रकारे मदत म्हणून रक्कम एखाद्याला दिल्याने तुम्हाला व्याजाची अपेक्षा ठेवता येत नाही, त्यातच परताव्याला उशीर झाल्यास पैसेसुद्धा अडकून राहतात.

त्यामुळे या गोष्टीचा विचार पैसे देताना करणे आवश्यक आहे. मदत म्हणून जरी पैसे दिले तरीही ठराविक व्याज किंवा रक्कम ठरवूनच मदत केली पाहिजे.

 

६. नात्यावर परिणाम

अनेकदा परताव्यामध्ये झालेल्या विलंबामुळे, संभाषणात आलेल्या कटुतेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे तुमच्या नात्यावरसुद्धा परिणाम होतो. पैसे ही महत्त्वाची गोष्ट असली तरीही त्याचा नात्यावर अशाप्रकारे परिणाम होणे योग्य ठरत नाही त्यामुळे संवाद साधून सामोपचाराने चर्चा करून भांडण टाळले पाहिजे.

 

hera pheri inmarathi 2

 

स्पष्टपणे चर्चा केल्यामुळे त्याचा नात्यावर परिणाम होत नाही शिवाय व्यवहारसुद्धा योग्य पद्धतीने राहतो त्यामुळे याचा विचार केला पाहिजे.

===

हे ही वाचा ऑनलाईन व्यवसाय करताना या चुका केल्या, तर नुकसान अटळ आहे! वेळीच सावध व्हा

===

७. तुमची आवश्यकता

मदत म्हणून जरी एखाद्याला पैसे दिले असले तरीही एखाद्यावेळी तुम्हाला स्वतःला पैशांची आवश्यकता भासू शकते. त्यावेळी स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीकडे पैशाची मागणी केली पाहिजे.

 

Confidently ask Inmarathi

 

मात्र, अनेकदा समोरच्या व्यक्तीलाही पैसे त्वरेने देणे शक्य नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य विचार करून मगच समोरच्या व्यक्तीला मदत केली पाहिजे.

 

या गोष्टी लक्षात ठेवा.. 

* एखाद्या व्यक्तीला कर्ज म्हणून रक्कम देण्यापेक्षा त्याला इतर पर्यायांची जाणीव करून द्या.

 

savings inmarathi

 

* प्रत्येक वेळी कर्ज म्हणून मदत करण्याऐवजी नाही म्हणणे योग्य असते त्यामध्ये गैर काही नाही.

* समोरच्या व्यक्तीला गुंतवणूक आणि अन्य माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचे पर्याय सुचवा.

 

saving inmarathi

 

* व्यावसायिक मार्गाने कर्जाची माहिती द्या.

* स्पष्टवक्तेपणा अंगी ठेऊन स्पष्टपणे पैसे देणे शक्य नसल्याचे कोणतेही आढेवेढे न घेता सांगा.

 

say no inmarathi

 

* निर्णय घेण्यासाठी काही वेळ मागून घ्या त्यानंतर विचार करून मगच निर्णय घ्या.

* मदत करताना भावनेच्या आहारी जाऊन मदत करू नका.

* वैयक्तिक आर्थिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे डिटेल्स शेअर करू नका.

पैसा ही गोष्ट तुमचं नातं तोडू शकते. त्यामुळे योग्य वेळीच नाही म्हणायला शिका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?