आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लग्नसराई सुरु झाली की वर – वधुचा पोषाख, दागदागिन्यांची खरेदी यांपासून ते थेट हॉलच्या बुकिंग पर्यंत अनेक कामांच्या याद्या तयार होतात, कुुटुंबातील सगळेच या कामांच्या गडबडीत व्यस्त असले, तरी ती आणि तो हे आपल्या प्रिवेडिंगच्या तयारीत गुंगलेले दिसतात.
विवाहसोहळ्याची खरीखुरी सुरुवात होते, ती प्री वेंडिंग फोटोशूट पासून, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ९०च्या दशकातील लग्नाचे फोटो म्हणजे केवळ ग्रुप फोटो आणि लग्नाला जमलेला गोतावळा यासाठी होत होतं.
पण आता याच गर्दीपासून दूर जातं, वधू-वर एकांतात, निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सहजीवनाचं सुंदर चित्र रंगवितात, त्यासाठी प्रिवेडिंग फोटोशुट ला हमखास पसंती दिली जाते.
ऐतिहासिक ठिकाण असो वा निसर्गरम्य देखावा, थोडक्यात नेत्रसुखद पार्श्वभूमीवर फक्त दोघांच्या खासगीतील आठवणी कॅमेरात कैद करून ठेवतात.
लग्न ठरल्यापासून पुढचा प्रत्येक सेल्फी आणि छायाचित्र पुढे आयुष्यभराची आठवण म्हणून जपण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
प्रीवेडिंगचा घाट घातला, तरी गजबजलेल्या शहरांत जागा शोधणं म्हणजे समुद्रातून मोती शोधण्याइतकं कठीण आहे. तुमचं प्रीवेडिंग शुट इतरांपेक्षा वेगळं, हटके व्हावं यासाठी नव्या कल्पनांचा शोधात असाल, तर तुमचा शोध इथे संपला असं समजा.
या वर्षभरात तुमच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत ? किंवा तुमचे मित्र मैत्रिणी बोहल्यावर चढणार आहेत ? मग तर हा लेख तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल.
प्री वेंडिंग करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास या आठवणी आणखी सुखावह होतील.
तुम्हाला तुमचं शुट वेगळं करायचं असेल, तर नेहमीच्या रटाळ कल्पना रद्द करणं ही सर्वात पहिली स्टेप. पानाफुलांमध्ये किंवा एखाद्या बागेत दिवसाच्या उजेडात केलेल्या प्रीवेडिंस शुट्सचे असंख्य फोटो तुम्ही पाहिले असतील, त्यामुळे तुमचं प्रीवेडिंग आखताना चाकोरीतील कल्पना रद्द करा.
बहुतेक कपल्स हे फोटोशूट सकाळच्या प्रकाशात, साधारण दुपार पर्यंत करतात, पण तुम्हाला काही युनिक क्लिक्स करायचे असतील तर लेट नाईट फोटो शूटची मजा काही औरच.
रात्रीच्या अंधारात फटाके, आकाशदिवे, स्कोमी आतषबाजी यांच्या सानिध्यात नाईट फोटो सुंदर येतात. मात्र यासाठी तुमच्या फोटोग्राफरचे कौशल्य पणाला लागेल.
मिनिएचर फोटोग्राफी बद्दल ऐकलंय ? इतरांपेक्षा स्पेशल फोटोशुट करण्याची इच्छा असेल, तर मिनीएचर फोटोशुटला पर्याय नाही.
हटके कपल्स मिनिएचर फोटोग्राफीला प्राधान्य देतात. ही थोडी हटके आणि मजेशीर संकल्पना असल्याने बघायला मजा येतेच, पण फोटोज क्लिक करताना इतरांपेक्षा तुम्हाला जास्त मजा येईल,
मिनिएचर प्री वेडिंग फोटोशूट करताना रिंग्ज, झोपाळा, किंवा पाण्याच्या जवळ, एखाद्या झाडा खाली असं कोणतंही ठिकाण निवडू शकाल. मुख्यतः एखादं ठिकाण आणि त्या ठिकाणाला अनुरुप असलेल्या प्रोपर्टीज यांना वापर केला जातो.
यासाठी कपल्स आणि फोटोग्राफर यांच्या एकत्रित विचारांतून कोणतीही अनोखी जागा, आणि भन्नाट प्रोपर्टिज यांचा वापर करून केलेलं फोटोशुटचं कौतुक झालं नाही तरच नवल…
टॉवर, ताज महाल, कॅमेरा,वाईन ग्लास, सायकल सारख्या छोट्या प्रतिकृतींबरोबर तुम्हाला तुमच्या छबी रेखाटता येतील,
भविष्याचं स्वप्न रंगविताना भुतकाळात डोकवायचंय ? आपल्या पार्टनरला बालपणीचे किस्से फोटोव्दारे सांगायचेत ? आणि दोघं मिळून बालपण जगायचंय ? मग अगदी आवडत्या कार्टून व्यक्तिरेखेसोबत सुद्धा मिनिएचर प्री वेडिंग फोटोशूट करता येतं.
हे फोटो शूट जरा मजेशीर असले तरी खूप कल्पक आहे. यासह बॅक टु स्कुल म्हणजेच शाळेच्या आवारात केलंल फोटोशुट, एखाद्या बागेत, किंवा लहानपणीचे किस्से आठवून त्या त्या जागी केलेले शुट अशाही कल्पना रंगविता येतील.
नव्या आयुष्याची सुरुवात थ्रिलिंग करायची असेल, तर अंडर वॉटर फोटोशूट संकल्पनेला प्राधान्य देता येईल, अर्थात यासाठी दोघेही आणि तिसरा फोटोग्राफर उत्तम स्विमर असावा लागेल.
याच पार्श्वभूमीवर पावसातील फोटोशूट, स्विमिंग पूलजवळ, किंवा द-याखो-यांमध्ये रॉक क्लॅंमबिंग, व्हॅली क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग करतानाही हे शुट करता येईल, मात्र हे शुट करताना तज्ञांची मदत घ्या.
संगीत किंवा वाद्यांशी निगडित कपल्स असल्यास हेडफोन, ब्ल्यू टूथ स्पीकर किंवा घुंगरु यांच्यासह शुट करता येईल. वाद्यांबरोबर जसे की पियानो, गिटार घेऊन एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूटचा पर्याय देखील वेगळा ठरतो.
रॉयल फोटोशुट करायचं असेल तर पाळीव प्राणी, घोडे, हत्ती किंवा अन्य कोणत्याही प्राणी आणि पक्षी अशा आवडीनुसार फोटोशूट करतात. मात्र असं शुट करतानाही तज्ञांच्या मदतीचा आधार घ्या.
रॉकिंग कपल्स ज्यांना बाईक, कार्स, बुलेट अशी आवड असेल, तर त्यावर बसूनही कमाल फोटो येतात. वेगवेगळ्या गाड्या, स्पोट्स बॅग्राऊंड, एखादं मैदान येथेही फोटोशुट करता येई शकतं.
प्री वेडिंग करताना वेळा, पेहराव यांची योग्य सांगड घातल्यास या आठवणी खरंच संस्मरणीय होतात. काहीजण आहे त्या संस्कृतीचा पेहराव लग्नात करायचा म्हणून प्री वेडिंग मध्ये ते टाळतात.
यासाठी जर तुम्ही मराठी संस्कृतीचे असाल तर एखाद्यावेळी पंजाबी, राजस्थानी, दाक्षिणात्य अशा वेगवेगळ्या संस्कृतीच्या पेहराव करूनही प्री-वेडिंग करू शकता.
दोघं वेगळ्या संस्कृतीतील असतील तरीही कॉम्बिनेशन करून देखील या आठवणी जपू शकता. प्री वेंडिंग करताना काही खास सणांचा थोडक्यात फेस्टिव्ह लूकमध्ये रंगबिरंगी फोटो शूट करू शकता.
महाराष्ट्रात अशी काही खास ठिकाणे आहेत जिथे गार्डन, रिसॉर्ट, टेकड्यांवर देखील मस्त व्ह्यू मिळतो. याशिवाय पाण्यात बोटीत, बीचवर, सेफ असलेल्या समुद्र किनारी, कॅफे, फुलांचा बाजार अशा विविध ठिकाणी तुम्ही फोटो शूट करू शकता.
दाक्षिणात्य कपल्सचा पेहराव हा बहुतेक ऑफव्हाईट रंगात असल्याने त्यांच्या पार्श्वभूमीला रंगबिरंगी जसे फुलांचा बाजार, मंडई, हिरवळीच्या ठिकाणी केल्यास उठावदार दिसतो.
काही कपल्स ‘हाऊज अरेस्ट’ सारखी असतात. घराबाहेर पडून कुठे रानावनात जायचे त्यापेक्षा घरात काय ते करू.. नाही का? डोन्ट वरी घरातल्या घरात देखील रोमँटिक प्री वेडिंग फोटो शूट होऊ शकते.
काही कपल्स ज्यांना आजूबाजूंला काही पॅटर्नची डिझाईन्स, जसे मोठे मॉल्स किंवा प्रशस्त हॉटेल्समध्ये असतात. विशिष्ट आकाराच्या इमारती यांच्या जवळ किंवा मध्ये देखील अगदी पायऱ्यांवर देखील फोटो शूट होतं.
प्री वेडिंग करताना पूर्वनियोजित पोजेस असतात पण त्याच त्या टिपिकल होऊ न देता कपल्स म्हणून ज्या तुम्हाला कम्फर्टेबल असतील अशाच देणे सोयीचे ठरेल.
प्री वेडिंग करताना काही कोट्स, स्टिकर्स, कपल टीशर्टस, काही ऍक्सेसरीज जसे की छत्री, सायकल, रंगबिरंगी फुले, फुगे, पाट्यांवर ‘सेव्ह डेट’, कलर्स ऑफ लव्ह अशा कॅप्शन जरूर वापराव्यात.
सर्वांत महत्वाची बाब म्हणजे लग्न करतानाही आणि प्री वेडिंग फोटो शूट करताना देखील दोघांमधील समजूतदारपणा, कम्फर्ट, प्रेम दिसलं तर प्रत्येक छायाचित्राला जिवंतपणा येतो. लग्नानंतर काही वर्षांनी हे फोटो तुमच्या आठवणी देखील तितक्याच ताज्या करतील यांत शंका नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.