Site icon InMarathi

वादग्रस्त JNU बद्दल चर्चा होतात, परंतु अनेकांना JNU बद्दल या महत्वपूर्ण गोष्टी माहीत नाहीयेत!

jnu inmarathi 8

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विविध आंदोलने, वाद, गोंधळ यामुळे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव चांगलेच गाजत आहे. देशविरोधी घोषणा, मोर्चे यामुळे जेएनयुला वादग्रस्त रूप प्राप्त झाले आहे. मात्र हे जेएनयु आहे तरी काय हे अनेकांना माहित नाही.

अत्यंत गुणवंत विद्यार्थ्यांची खाण असेही जेएनयुबद्दल बोलले जात असले तरीही प्रत्यक्षात मात्र वादग्रस्त रूपच वारंवार डोळ्यासमोर येते. आजच्या घडीला जवळपास ८००० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात.

 

the financial express

 

याशिवाय जवळपास ६५० शिक्षक आणि १२७५ कर्मचारी सक्रीय आहेत. दर्जेदार शिक्षणासाठी ओळख असलेल्या जेएनयुचे नाव मात्र सतत वादांमुळेच चर्चेत राहिलेले आहे. विविध आंदोलनामुळे जेएनयुचे तेच रूप लोकांसमोर चर्चेत राहते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या लेखाच्या माध्यमातून जेएनयुच्या अप्रकाशित काही गोष्टी जाणून घेऊया… 

१) संसदेमध्ये कायद्याद्वारे स्थापना

इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान असताना १९६९ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या नावाने विद्यापीठ स्थापन करून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पर्याय देण्याबाबत कायदा संमत करण्यात आला होता. या कायद्यानुसार पुढे दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयुची स्थापना करण्यात आली आहे.

 

india resist

 

त्यावेळी दिल्ली विद्यापीठ अस्तित्वात असल्याने नवीन विद्यापीठाच्या स्थापनेचा वाद झाला. स्थापनेपासूनच वादाची परंपरा आजपर्यंत कायम आहे .

या विद्यापीठाबद्दल संसदेमध्ये चर्चेदरम्यान स्थापनेबद्दल आणि गुणवत्तेबाबत वाद झाले होते मात्र तरीही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजुर झाल्यानंतर विद्यापीठाच्या स्थापनेला मंजुरी मिळाली.

 

२) भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अशी ओळख

 

indian express

 

जेएनयुला भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे. शिक्षणासाठी आजही परदेशातूनही लोकांची जेएनयुला पसंती असते. राजकारण बाजूला ठेवलं तर जेएनयुच्या शैक्षणिक दर्जा नेहमीच अव्वल राहिला आहे. आजही अनेक मान्यवरांनी जेएनयुला गौरविले आहे.

शैक्षणिक मूल्यांकन करणाऱ्या NAAC काउन्सिलने ४ पैकी ३.९१ मुल्यांकन देऊन जेएनयुला गौरविले आहे. भारतातील विद्यापीठांमध्ये हे सर्वोच्च मूल्यांकन असून यामध्येच जेएनयुची गुणवत्ता स्पष्ट होते.

 

the tribune

 

विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, अन्य उपक्रम, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता आणि अन्य अनेक गोष्टींमुळे हे मूल्यांकन  केले जाते.

अलीकडेच व्हिजिटर्स अवोर्ड विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाला हा पुरस्कार प्रदान केला जातो. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा खिताब प्रदान करण्यात आला होता .

याचबरोबर देशातील ३० विद्यापीठांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये जेएनयुने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे.

 

३) पेपरलेस विद्यापीठाकडे वाटचाल

सेव्ह पेपर या मंत्राचा स्वीकारकरून जेएनयुची पेपरलेस विद्यापीठाकडे वाटचाल सुरु आहे. यासाठी जेएनयुद्वारे अथक प्रयत्न गेली काही वर्षे सुरु आहेत. सध्याच्या घडीला विप्रो या मानांकित कंपनीची साथ त्यांना मिळत आहे.

जेएनयुमधील अधिकाधिक कामकाज पेपरविरहित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची जोड विद्यापीठाला मिळाली आहे. विद्यापीठातील लायब्र्री वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित आहे.

 

 

वायरलेस तंत्रज्ञानामुळे थेट वायफायच्या माध्यमातून मुलांना आणि प्राध्यापकांना लायब्ररीची पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होतात.

प्रचलित, अप्रचलित आणि वेगवेगळ्या शैक्षणिक कोर्सेसबद्दलच्या अनेक पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. येत्या काळामध्ये १००% पेपरलेस होण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

४) मान्यवरांची आणि गुणवंतांची खाण

 

Indiatimes.com

 

जेएनयुच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आपल्या यशाचे श्रेय यातील अनेक जण आजही जेएनयुला द्यायला विसरत नाहीत.

जेएनयुमधील उत्तम कोर्सेस आणि शिक्षणामुळे अनेकांना हा फायदा झाला आहे.

 

gulf news

 

लिबियाचे माजी पंतप्रधान अली झैदान, प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसद सदस्य उदित राज, राज्यसभेचे सदस्य डी पी त्रीपाठी, आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव, रिजर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हरून रशीद खान यांसारख्या अनेक मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.

 

५) उत्तम सुविधांचे माहेरघर

 

 

जवळपास २०-२५ रुपये इतकी अल्प ट्युशन फी, १० रुपये प्रति महिना हॉस्टेल फी यांसारख्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरामध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते. जेएनयुमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून येथे अभ्यासिका आणि लायब्ररीमध्ये संपूर्णपणे ए.सी सक्रीय आहेत.

येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी २४ तास ३६५ दिवस खुल्या असतात. याशिवाय केवळ १००० रुपये प्रति महिना दरामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे जेवण मेसमध्ये दिवसातून तीनवेळा उपलब्ध होते.

 

nationalheraldindia

 

संशोधनासाठी मोफत संगणक, उत्तम सुरक्षा, संपूर्ण हरित कॅम्पस, स्वच्छता आणि सुव्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना येथे नेहमीच प्रसन्न वाटते.

१०२० एकर च्या परिसरात जेएनयुच्या कॅम्पसचा विस्तार झाला आहे. जवळपास ५५०० विद्यार्थ्यांसाठी येथे २२ हॉस्टेलस आहेत.

 

६) विद्यार्थ्यांना शासनाचे सहकार्य

जेएनयुमधील विद्यार्थ्यांना विविध स्कीम्सच्या माध्यमातून आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून केंद्र सरकार सहकार्य करते. उपलब्ध माहितीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सोयी सुविधा आणि त्याच्या शिक्षणासाठी अंदाजे प्रतिवर्षी जवळपास ३ लाख रुपये खर्च केला जातो.

 

DNA

 

 

अत्यंत अल्प शुल्क आकारून दिल्या जाणाऱ्या चांगल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना फायदा होतो. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी आणि शिक्षणासाठी जेएनयुला दर वर्षी सबसिडी प्रदान केली जाते.

इतर विद्यापीठांच्या तुलनेत हा आकडा जास्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, जेएनयुला वर्षाकाठी ४२ कोटी रुपये सबसिडी दिली जाते.

 

७) आंदोलनाची मालिका

 

the print

 

जेएनयु मोठ्या प्रमाणावर नेहमीच चर्चेत असते ते येथील आंदोलनामुळे. सध्याच्या घडीला जेएनयुमधील वाढवण्यात येणाऱ्या फीच्या मुद्द्यावर आंदोलन चांगलेच गाजत आहे.

२००० मध्ये जेएनयुमध्ये पाकिस्तानी कवींना निमंत्रित करण्यात आलं होत त्यावेळी सैन्यातील अधिकारी उपस्थित होते त्यांनी याबद्दल निषेध नोंदवल्यानंतर वातावरण तापल्यावर मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचे स्वरूप त्याला प्राप्त होते.

याशिवाय, राष्ट्रविरोधी विचार आणि घोषणांसाठीसुद्धा जेएनयु चर्चेत आलेले आहे.

 

thewire.in

 

अफझल गुरुच्या फाशीच्या मुद्द्यावरून जेएनयुमध्ये आंदोलन करण्यात आले होते त्यानंतरही हिंदुत्व आणि अखंड भारताच्या विरोधातील विचार पसरवण्यावरून दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि विचार यामुळे नेहमीच जेएनयुकडे बघितले जाते.

या वादामुळे एकंदरच जेएनयुकडे संशयित नजरेने बघितले जाते. किंबहुना देशविरोधी संस्था, वाद आणि जेएन यु अशी काही समीकरणे यामुळे तयार झालेली आहेत.

मात्र, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन आजही उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून जेएनयुकडे बघितले पाहिजे. ती जेएनयुची खरी ओळख आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version