' जाणून घ्या, स्वस्तिकचा हिटलरने बदनाम करण्यापूर्वीचा जाज्वल्य वैदिक इतिहास! – InMarathi

जाणून घ्या, स्वस्तिकचा हिटलरने बदनाम करण्यापूर्वीचा जाज्वल्य वैदिक इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

हिंदू धर्मात श्लोक, जपजाप्य, प्रथा आणि चालीरीतींना खूप मान आहे. घरात, देवळात आणि सगळ्याच शुभ स्थळी सकारात्मक स्पंदने, उर्जात्मक लहरी मिळवण्यासाठी काही विशिष्ट अशी चिन्ह वापरली जातात.

कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी आपण गणेशवंदनाने करतो तसंच एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेल्यानंतर, आपल्याकडे वास्तुशांत करण्याची प्रथा आहे. फक्त वास्तुशांतच नाही तर, कोणतीही पूजा करण्याआधी आपण पाटापुढे स्वस्तिक, श्री अशा गोष्टी काढतो.

 

history-of-swastika-inmarathi
learning-mind.com

 

शुभ चिन्हांमध्ये स्वस्तिक हे असे चिन्ह आहे जे फक्त हिंदू धर्मियांमध्ये नाही, तर जैन धर्मियांमध्ये ,बौद्ध धर्मियांमध्ये आणि चीन देशातील ताओ धर्मियांमध्ये ही पुजले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

स्वस्तिक चिन्ह नावारुपाला येण्याच्या मागे बरेच संदर्भ आढळतात. संस्कृत भाषेतून सु+अस्ति (म्हणजे शुभ असणे) हा शब्द उचलला गेला आहे. तर गौतम बुद्धांच्या पाऊलखुणा मानून बौद्धधर्मीयांतही हे शुभ चिन्ह वापरले जाते.

 

swastika-budhha-inmarathi
IndiaDivine.org

 

जपान आणि चीन देशात स्वस्तिक चिन्ह प्रामुख्याने बुद्धमूर्तींवर आढळून येते. हिंदू धर्मात शक्तीदायक सूर्याचं प्रतीक म्हणून स्वस्तिक चिन्ह दरवाज्यांवर, रोजच्या दारासमोरील किंवा देवघरा समोरील रंगोळीमध्ये, वह्यांमध्ये आणि भिंतींवरही बनवले जाते.

हिंदु, बौद्ध आणि जैन धर्माच्या संस्कृतीतही स्वस्तिकाला विशेष म्हत्त्व आहे. शुभ संकेताचे चिन्हं म्हणून स्वस्तिकाचा आपण प्रामुख्याने वापर करतो. स्वस्तिकाच्या या चिन्हाला हजारो वर्षांचा इतिहास आहे.

स्वस्तिकाचा सर्वात पहिला वापर इसवी सन पूर्व १० हजार वर्षांपूर्वी दगडांच्या शिल्पावर केलेला आढळला होता. त्यानंतर स्वास्तिकाचा वापर रशियाच्या सीमेजवळ असलेल्या मेझिनच्या आसपास इमारतींच्या बांधकामांवर पाहायला मिळतो.

 

nazi-swastik-inmarathi
booksfact.com

पक्षी किंवा इतर शिल्पांवर हे स्वस्तिक काढल्याचे पाहायला मिळते. अश्मयुगातील ही शिल्पे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तसेच हस्तीदंताचा वापर करून तयार केलेल्या शिल्पावरही मोठ्या प्रमाणावर स्वस्तिक असल्याचे पाहायला मिळते. अश्मयुगाच्या संस्कृतींमध्ये स्वस्तिक हे भरभराटीचे चिन्हं समजले जात होते.

हस्तीदंतापासून तयार करण्यात आलेल्या विविध शिल्पांवर करण्यात आलेल्या कोरीव कामांमध्ये स्वस्तिक असल्याने आणि मुळात हत्तीच भरभराटीचे प्रतिक मानले जात असल्यानेही स्वस्तिकाच्या चिन्हाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते.

युरोप खंडामध्ये स्वस्तिकाचा वापर करण्याची सुरुवात दक्षिण पूर्व युरोपमध्ये आढळणाऱ्या नेओलिथिक विंका संस्कृतीमध्ये झालेली असावी. सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती अस्तित्वात होती. त्यानंतर कास्ययुगापर्यंत संपूर्ण युरोपमध्ये स्वस्तिकच्या चिन्हाचा प्रसार झाला होता.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पाश्चिमात्य देशांमध्येही स्वस्तिक हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले होते.

त्यानंतर जाहिरात, डिझाइन एवढंच काय पण हॉकीच्या जर्सीवरही स्वास्तिकाची चिन्हे पाहायला मिळू लागली होती. सर्वांमध्येच स्वस्तिक हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले होते. अगदी अमेरिकन मिलिट्रीच्या काही ट्रूप्सनेही पहिले महायुद्ध आणि त्यांच्या आरएएफ विमानांवर १९३९ च्या दरम्यान स्वस्तिकाचा वापर केला होता.

अत्यंत शुभ मानले जाणारे असे हे चिन्ह मात्र ज्यू धर्मियांमध्ये अत्यंत अपवित्र मानले जाते. इतके की, त्याचा वापर किंवा त्याचं दर्शनही अमंगळ ग्राह्य असल्याने कुठेही वापरणे एक गुन्हा ठरतो. ज्यू धर्मिय ह्याच स्वस्तिकाला कुठेही थारा देत नाहीत. हे चिन्ह त्यांच्या देशातून म्हणजे जर्मनीतून हद्दपार केलेलं आहे.

 

nazi-swastik-inmarathi
nypost.com

 

१९३९ मध्ये नाझींची सत्ता आली. ज्यू लोकांना संपवण्याचा आदेश देण्यात आला आणि त्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजला. त्यामुळे नाझींनी त्यांचे चिन्हं म्हणून वापरलेले स्वस्तिक हे इतिहासातील सर्वात क्रूर घटना घडवण्याऱ्यांचे प्रतिक ठरले.

याला कारणीभूत ठरला तो ज्यूंचा झालेला अमानुष नरसंहार. ज्यू धर्माला आणि त्या धर्मातील लोकसमूहाला समूळ नष्ट करण्यासाठी जर्मनीचा सर्वे-सर्वा असणाऱ्या ऍडॉल्फ हिटलर ने जणू विडाच उचलला होता. ना भूतो ना भविष्यती अश्या कत्तली करण्यात आल्या. असतील तिथे त्यांना ठेचण्यात आलं. जे जिवंत राहिले त्यांनी कसेबसे देशातून पलायन केले आणि स्वतः चा जीव वाचवला.

जेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य असताना जी भारतीयांची ससेहोलपट झाली होती तशी किंबहुना त्याहून कितीतरी अधिक पटीने ज्यू लोकांचे हाल झाले होते.

अर्थातच हिटलर संबंधित सगळ्याच गोष्टींशी ज्यूंच्या पुढील पिढ्यांना घृणा वाटणे, चीड वाटणे साहजिकच आहे. त्यातच काळ्या रंगाचे स्वस्तिक हेच हिटलरचे चिन्ह होते म्हणजेच नाझी पक्षाचे आणि तत्कालिक जर्मनीच्या ध्वजाचे. ज्याचा उपयोग शुभ कृत्यांसाठी नसून विघातक कृत्यांसाठी झाला.

जगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्हच नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी का घेतलं? हा प्रश्न साहजिकच पडेल. खूप मोठी विचारसरणी मांडून, खल निश्चय करून हे चिन्ह स्वीकारलं गेलं होतं.

 

nazi-swastik-inmarathi
india.com

 

१८७० च्या काळात एक जर्मन व्यापारी आणि पुराणवस्तू संशोधक असलेला हेन्रीक श्लीमन नामक गृहस्थ ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘ट्रॉय’ नावाच्या ग्रीक देशातील शहरात पोचला आणि त्याला उत्खननात काही भांडी आणि बाकी बऱ्याच वस्तू सापडल्या. त्यावर स्वस्तिक चिन्ह होतं. त्याला काहीच कल्पना नव्हती त्या चिन्हांबाबत.

अशातच, बरनॉफ नावाच्या एका भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या हुशार व्यक्तीने त्याचं अस्तित्व शोधून काढलं. त्याच्या निकषांनुसार ते चिन्ह आर्य संस्कृतीतील होतं, ग्रीक आणि जर्मन माणसे हे देखील आर्यांचे वंशज आहेत हे ही त्याने शोधून काढलं.

आर्य समाज हा क्षत्रिय म्हणजेच अत्यंत शूरवीर होता आणि स्वस्तिक हे शुभ आणि शौर्याचे प्रतिक म्हणून वापरले जात असे. ह्या आर्यांनी बाहेरून हल्ले करून भारतात आपले बस्थान बसवले होते ही गोष्ट त्याने क्रूर नाझींच्या ध्यानात आणून दिली. ऋग्वेदात पण स्वस्तिकाचा उल्लेख आहे असे बरनॉफने शोधून काढले होते.

 

swastik inmarathi

 

एवढंच नाही तर असाही एक समज आहे की, स्वतः हिंदू धर्म आचरणात आणणाऱ्या आणि नाझी नेता असलेल्या सवित्रीदेवी (खरे नाव – मॅक्सिमिआनी पोर्तास) नामक महिलेने, जिने सुभाषचंद्र बोस यांना पण जर्मनी च्या बाजूने वळवले होते, तिने असा दावा केला होता की एडॉल्फ हिटलर हा विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक कलकी नावाचा अवतार आहे.

तो दुष्टांचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे आणि ज्यूंची कत्तल देखील ह्यातीलच त्याचे एक कर्म आहे. असे हे नाझी स्वतःलाच उच्च धर्मिय आणि उच्च प्रतिष्ठेचे मानव मानणारे होते.

नाझी विचारसरणीच्या लोकांना सोडून बाकी सगळ्या लोकांना आपल्या टाचेखाली ठेवून त्यांना जगावर राज्य करायचे होते. आर्यांचे क्षत्रिय आणि शूर असणे ह्याचा पूर्ण उलटा अर्थ लावून जगाला नेस्तनाबूत करायचे होते.

त्यावेळी म्हणजे साधारण १९३३ च्या काळात हिटलर सुद्धा नाझी पक्षाच्या चिन्हाच्या शोधात होता. त्याला जर्मनीच्या माणसांची जगावर हुकूमत गाजवणारी एक वेगळी सत्ता अस्तित्वात आणायची होती. नाझी विचारसरणीच्या लोकांना उच्च धर्मिय म्हणून प्रस्थापित करायचे होते.

 

nazi-swastik-inmarathi
bbc.com

म्हणून स्वतः अत्यंत निडर आणि क्रूर वृत्तीच्या हिटलर ला आर्यांचे हे ‘शक्ती’ दर्शक चिन्ह आवडले. जे वापरून तो ज्यूंच्या मनात दहशत माजवू शकणार होता. ते चिन्ह त्याने स्वतः च्या मर्जीप्रमाणे थोडे बदलून ही घेतले आणि नाझी विचारसरणीला साजेसा ध्वज बनवला गेला. ज्यात लाल कापडावर पांढऱ्या वर्तुळात 45 अंशात फिरलेले स्वस्तिक चिन्ह बनवण्यात आले.

त्याच्या काळ्या प्रवृत्तीला साजेल असेच कर्म त्याने स्वस्तिकाच्या निशाणी खाली केले. पहिल्या महायुद्धात अपयश आल्याने त्याचं खापर हिटलरने ज्यू लोकांवर फोडले. आधीपासून ज्यूंबद्दल मनात असणारा द्वेष आणि पहिल्या महायुद्धातली हार हिटलर ला स्वस्थ बसू देत नव्हती. तिथूनच ज्यू लोकांच्या काळ्या दिवसांची सुरुवात झाली.

 

nazi-swastik-inmarathi
disneyvillains.wikia.com

 

ज्यू धर्मियांच्या संहाराला कारणीभूत असलेल्या एडॉल्फ हिटलर ने स्वस्तिक चिन्ह वापरून ते नाहक बदनाम केले. स्वस्तिक हे निशाण असणारा नाझी ध्वज उंच ठेवण्याच्या नादात हिटलरने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या गर्तेतही लोटले.

अजूनही बऱ्याच देशात ह्या चिन्हाला नैराश्याचे, मानवी संहाराचे प्रतिक मानले जाते. आपण कोठेही फिरावयास गेल्यास आणि स्वस्तिक चिन्हाचा वापर करत असल्यास लोकांच्या रागाने किंवा द्वेषाने भरलेल्या नजरेस बळी पडू शकतो. कित्येक ठिकाणी ह्या चिन्हाच्या वापरास ही बंदी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?