Site icon InMarathi

जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी “या” गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका..

hera pheri inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आनंद असो वा दुःख… माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील भावना चटकन व्यक्त करतो. भावनाप्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याचं ठरु शकतं, याचा तुम्ही विचार केला आहे का ?

हा विचार केला नसेल तर हा लेख तुम्हाला याबाबतचा एक नवा दृष्टिकोन निश्चितच देईल, कारण भावनेच्या भरात आपल्याकडून झालेली एक लहानशी चुकही चांगलीच महागात पडू शकते, किंबहुना अशा चुकीचे गंभीर परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात.

 

 

आई, वडिल, पत्नी, पती, मुलं, मित्र यांसारखं कोणतंही नातं तुमच्यासाठी प्राणापेक्षा प्रिय असलं, तरी काही गोष्टींबाबत अळीमिळी गुपचिळी बाळगण्यातंच खरं शहाणपणं आहे.. या काही गोष्टी आहेत, ज्या स्वतःपलिकडे इतर कोणाला कधीही सांगू नका.. 

 

१) सुखी जीवनाचा मार्ग

 

 

तुमचं वैयक्तिक आयुष्य सुखी करायचं असेल तर “गुप्तता” हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. कुटुंबात वावरताना सर्व गोष्टी एकमेकांना सांगितल्या जात असल्या तरी, कुटुंबाच्याच हितासाठी काही गोष्टी सांगणं आवर्जून टाळा.

अनेकदा मित्र, नातलगं यांना भावनेच्या भरात सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात येणा-या अडचणी, संकटं यावेळी आपण सांगितलेल्या गोष्टींमुळे अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते.

 

२) आर्थिक बाबतीत सावधान

 

पैशाची दुनिया आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे जगातील प्रत्येक व्यवहार, इतकंच नव्हे तर नातीगोतीही हल्ली पैशांवर अवलंबून असतात, त्यामुळे तुमची आर्थिक मिळकत किंवा अन्य कोणत्याही आर्थिक व्यवहारांची वाच्यता करु नका. मित्रांसोबत गप्पांची मैफल किंवा सणसमारंभात नातेवाईकांना भेटल्यानंतर आर्थिक व्यवहारांचा विषय हमखास निघतो, अशावेळी आपणही नकळत आपल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देतो.

तुम्ही असं करत असाल, तर लवकारत लवकर ते थांबवा, कारण तुम्ही दिलेली ही माहिती तुमच्यासाठीच कधी धोक्याची ठरेल हे तुम्हालाही कळणार नाही. आपली आर्थिक मिळकत, केले जाणारे खर्च, गुंतवणूक, एकुण उत्पन्न यांची माहिती स्वतः व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही असणार नाही याची काळजी घ्या

तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या तुम्ही नोंदी करत असाल, तर त्या सुरक्षित ठिकाणी केल्या जातील, तसेच त्या इतरांच्या नजरेस पडणार नाहीत किंवा अनवधानाने इतरांना दिसल्या तर त्याचा फारसा बोध होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचं आहे.

 

३) दोघाच्या भांडणात तिसरा नको

 

 

संसार फुलताना भांड्याला भांड लागणं ही सामान्य बाब आहे, रुठना-मनाना यांमुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडी वाढते, याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल, मात्र दोघांचा हा वाद तिस-या व्यक्तीस समजलं तर मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.

पती पत्नीमध्ये शुल्लक कारणांवरून जसे वाद होतात, तसेच ते लगेच मावळतांत, मात्र दरम्यानच्या काळात दोघांपैकी कोणाकडूनही या वादाची माहिती अन्य कोणत्याही व्यक्तीस समजली, तर भांडण अधिक वकोपाला जाऊ शकते.

पतीपत्नीच्या वादात अनेकदा कुटुंबातील इतर व्यक्ती डोकावितात, मित्रमंडळी सल्ले देण्यासाठी पुढे येतात, मात्र यापैकी कोणालाही भांडणाबाबत सविस्तर माहिती देण्यापेक्षा आपणचं ते भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर वाद अधिक चिघळणार नाही.

 

 

हे ही वाचा –

 

कुटुंबीय असो वा मित्र, प्रत्येकाची त्या वादासंदर्भात वेगळी मतं असतात, त्यामुळे वादाला नवं वळणं लागण्याची शक्यता असते, तसंच अनेकदा पतीपत्नींमधील वाद संपला तरी इतरांना त्याची माहिती मिळाल्याने अवघ्या काही मिनिटात ती माहिती व्हायरल होण्याचीही भिती असते.

त्यामुळे आपला सुखी संसार कायम सुखी रहावा असं वाटत असेल तर दोघांमधील भांडण कधीच तिस-याला सांगू नका. 

 

४) दुःखातही संयम ठेवा

 

 

वैयक्तिक आयुष्य असो वा करिअर, एकही दुःख नसलेला माणुस तुम्ही पहिला आहे का ? उत्तर नाही असंच येईल. प्रत्येक माणासाला आपल्या आयुष्यात दुःख, चिंता असतातचं.काहींना आर्थिक चणचण असते, तर कुणी आजाराने ग्रासलेला असतो

काहींना कौटुंबिक वाद सतावतो, तर काहींना मुलांच्या भविष्याची चिंता स्वस्थ बसु देत नाही तर चिंता ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यात सारखीच असली तरी इतरांसमोर तिचा गवगवा करु नये. सुख वाटल्याने वाढतं आणि दुःख लपविल्याने कमी होतं, असं म्हणतात,

त्यानुसार तुमचं दुःख, ताण चुकूनही इतरांसमोर उघड करु नका. सध्या असलेल्या चिंता लवकरच मिटतील असा विश्वास ठेवा, त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा, मात्र त्याचे भांडवल करु नका

इतरांकडून तुम्हाला धीर देत तात्पुरते सांत्वन केले गेले तरी त्याची सर्वदूर चर्चा होईल, आणि भविष्यात वारंवार तुमचा कमकुवतपणा चर्चिला जाईल हे लक्षात ठेवा.

 

५) अपमानाबाबत गुप्तता पाळा

 

 

मित्र, परिचित यांच्याकडून तुमचा अपमान झाला असेल तरी त्याबाबत मौन बाळगणंच सर्वात उत्तम..! आपल्या अपमानाबाबत आपल्याला झालेले दुःख किंवा आलेला राग गिळून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळा.

आपला अपमान करणा-याची निंदा करण्याच्या हेतून आपण अनेकदा त्या प्रसंगाची वारंवार चर्चा करतो, कुटुंबातील सदस्यांपासून नव्याने परिचित झालेल्यांकडेही तो प्रसंग अनेकदा उगाळतो, मात्र प्रत्यक्षात असे करताना, आपण स्वतःचेच नुकसान करत आहोत, हे कधी तुमच्या लक्षात आले का ?

आपला झालेला अपमान, त्याच्याशी संबंधित व्यक्ती, प्रसंग यांचा पुर्नउच्चार करणे कटाक्षाने टाळा आलेल्या रागावर संयम ठेवण्यातच आपले खरे हित दडले आहे.

 

६) इतरांचं गुपित सांभाळा

 

 

आपल्या घरातील व्यक्ती अथवा एखादा मित्र, आपल्याजवळ त्यांचे मन मोकळं करतो. त्याच्या मनातलं एखादं गुपित तो आपल्याला मोठ्या विश्वासाने सांगतो. मात्र अशावेळी त्यांनी सांगितलं गुपित जपून ठेवणं आपलं कर्तव्य आहे.

त्यांनी सांगितलेली गोष्ट इतरांना सांगितल्यास त्या व्यक्तीचा आपल्यावरील विश्वास उडेल, मात्र त्याचबरोबर तुमच्या नात्यातही वितुष्ट निर्माण होईल आणि कदाचित या एका प्रसंगामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादं महत्वाचं नात कायमंच गमावून बसालं.

त्यामुळे तुमच्यासाठी मोलाचं असणारं नात, आणि ती व्यक्ती यांना आयुष्यातून घालवायचं नसेल, तर त्या व्यक्तीने तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाची जाण ठेवा आणि त्याचं गुपित मनाच्या कोप-यात बंद करून सुरक्षित ठेवा.

 

७) भविष्यातील बेत

 

 

तुमच्या घरात एखादं लग्न कार्य ठरतयं? सुट्टीत परदेशी फिरण्याचा बेत आखताय? किंवा बिझनेसमध्ये एखादा मोठा व्यवहार अथवा नवा बदल होण्याच्या मार्गावर आहे? उत्तर हो असेल तर ते काम पूर्ण ठरेपर्यंत त्याबाबत चुकूनही इतरांना सांगू नका.

घरात ठरणारे लग्नकार्य असो वा परदेशी प्रवासाचे बेत… लहानसहान गोष्टी ठरण्याआधीच त्या इतरांपर्यंत पोहोचविण्याची धडपड केली जाते. मात्र “अतिघाई संकटाची खाई” या उक्तीप्रमाणे बेत आमलात येण्यापूर्वीच त्याचा होणारा गवगवा अनेकदा धोक्याचा ठरतो. बिझनेसमधील एखादा व्यवहार असो वा कौटुंबिक शुभसोहळा, कोणत्याही प्रसंगात सावधानता बाळगणेच हिताचं ठरतं.

हे ही वाचा –

 

शुभप्रसंगी अनेकदा, आनंद पोटात माझ्या माईना असं म्हणत आपल्याला उत्साहाचं, आनंदाचं भरतं येतं. अशावेळी कुटुंबीय, नातलग, मित्र यांच्याकडे आपल्या मनातील बेत आपण बिनधास्त सांगतो, मात्र त्यानंतर त्यांच्या मार्फत या चर्चेला वेगळंच वळण लागतं.

अनेकदा एखादं काम केवळ तोंडी ठरलेलं असतं, मात्र गावभर होणारी त्याची चर्चा, त्यावर व्यक्त होणारी मतं, यांमुळे घडणा-या कामांत अडथळेही निर्माण होवु शकतात.तुमचा बेत आधीच कळल्याने तुमच्याशी वैर असलेल्यांकडून या कामांत खोडा घातला जाऊ शकतो,

त्यामुळे भविष्यासाठी मनात आखलेला कोणताही बेत, कल्पना पूर्ण होईपर्यंत त्याबाबत मौन बाळगलेले केव्हाही चांगलेच…

 

 

इतरांच्या हितासाठी बोललेलं खोटं अथवा दडवलेली माहिती हा गुन्हा नाही असं म्हणतात, अनेकदा एखादी गोष्ट समजल्याने समोरील व्यक्तीस त्रास होऊ शकतो, याची कल्पना असेल, तर ती माहिती त्याच्यापासून दडवण्यातंच शहाणपण आहे.

एखादा धक्का सहन न झाल्याने त्या व्यक्तीच्या थेट प्रकृतीवरही परिणाम होण्याची भिती असते, त्यामुळे समोरील व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची मानसिकता लक्षात घेऊन त्याला अपायकारक ठरणारी माहिती न सांगण्याचा निर्णय अनेकदा योग्य ठरतो.

राग, दुःख, आनंद, प्रेम या भावना कोणालाही दडविता येत नाहीत, किंबहुना त्या दडवु नयेत, मात्र त्या व्यक्त करताना आपल्या जीभेवर संयम ठेवण ज्याला जमलं त्याला सुखी आयुष्याचा मार्ग सापडला. आपल्या प्रियजनांना फसविण्यासाठी नव्हे तर आपल्यासह त्यांचंही आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी ठराविक बाबींची गुप्तता ही सवय अंगी बाणवणं गरजेचं आहे.

====

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version