' हजारो लोकांचं “आयुष्य बदलवणारे”, नैराश्यावर मात करून स्फूर्ती देणारे १५ चित्रपट – InMarathi

हजारो लोकांचं “आयुष्य बदलवणारे”, नैराश्यावर मात करून स्फूर्ती देणारे १५ चित्रपट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादा अॅक्शनपट पााहिल्यानंतर अंगात स्फुरण चढणं किंवा हिंदी रोमॅंटिक फिल्म पाहिल्यानंतर दिवसभर रोमॅंंटिक मुडमध्ये गाणं गुणगुणणं याचा अनुभव तुमच्यापैकी प्रत्येकानेच घेतला असेल.

चित्रपटाचा आपल्यावर तात्पुरता परिणाम होत असल्याचं सर्वमान्य असलं तरी, काही चित्रपट मात्र परिणामांच्या पलिकडे जात जगण्याची एक वेगळीच दिशा देऊन जातात.

ज्याप्रमाणे एखादं चांगलं पुस्तक प्रेरणादायी ठरतं, त्याचप्रमाणे आपल्या क्षेत्राशी निगडित असलेला एखादा चित्रपट स्फुर्तीदायक तर ठरतोच, मात्र त्यातून यशस्वी होण्याचा नवा मंत्रही मिळतो.

हॉलिवूडक्षेत्र गाजविलेल्या अशाच काही चित्रपटांनी आजपर्यंत हजारो लोकांना जगण्याचा, यशस्वी होण्याचा मार्ग दाखविला. एखादा चित्रपट पाहिल्यानंतर सुचलेली नवी कल्पना, बिझनेस आयडिया आणि त्यातून आपल्या क्षेत्रात घेतलेली यशस्वी झेप हा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असेल, तर या अप्रतिम १५ चित्रपटांची यादी तुम्हाला वाचावीचं लागेल..

लघुउद्योग किंवा स्टार्टअप सारख्या क्षेत्रात धडाडीने दाखल झालेल्यांसाठी तर हे चित्रपट म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहेतच, पण तुम्ही नोकरदार असाल, विद्यार्थी वा गृहिणी.. तुमच्या दररोजच्या जीवनात येणारे अडथळे आणि त्यातून येणारे नैराश्य दूर करण्यासाठीही हे चित्रपट आयुष्यात किमान एकदा तरी पाहणे अत्यंत गरजेचं आहे.

तर घरबसल्या दररोजच्या नैराश्यावर मात करण्याचा आणि त्यातून स्फुर्ती घेत यशस्वी होण्याचे हे १५ पर्याय आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत.

१.  नाईटक्रेव्हलर (२०१४)

 

nightcrawler-inmarathi

 

अवघ्या अडीच तासांनंतर प्रेक्षकांना एक आगळावेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. काहीशी अनाकलनीय वाटणारी कथा असली, तरी त्यातील अभिनेता जॅक गिलेनहॅल यांचा अभिनय आपल्याला खिळवून ठेवतो.

ज्या क्षेत्राचे शिक्षण घेतलं जातं, त्याच क्षेत्रात नोकरी करायची असा साचेबंद विचार झुगारून स्टार्टअप सुरु करणारे इंजिनिअर्स अथवा वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर गिटार वाजविणारा कलाकार सर्रास दिसतात, त्याचप्रमाणे केवळ एका अपघातामुळे नव्या क्षेत्राचा परिचय होवून करिअरला मिळालेली नवी दिशा ही अफाट कल्पना चित्रपटात मांडली गेली आहे.

बेरोजगार ते क्राईम रिपोर्टर हा हिरोचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. नोकरीच्या शोधात असलेला तरुण एका गुन्ह्याचा साक्षीदार ठरतो आणि त्यातूनच त्याच्या जीवनाला नवी कलाटणी मिळते, ही कथा प्रेक्षकांसाठीही फक्त रंजक नाही, तर प्रेरणादायी आहे.

इच्छाशक्तीच्या बळावर नव्या, अपरिचित क्षेत्रातही तुम्ही यशस्वी कामगिरी करु शकता, हे शिकविणारा हा चित्रपट तुम्ही किमान एकदा तरी पहाच…

२.  द सोशल नेटवर्क (२०१०)

 

the social network inmarathi

 

फेसबुक म्हणजे अनेकांचं दुसरं घरंच.चॅटिंग पासून सर्फिंगपर्यंत सारं काही एका क्लिकवर उपलब्ध करणा-या फेसबुकची जन्मकथा सांगणारा ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट आवडला नाही तरचं नवल..!

जगभरातील तरुण उद्योजकांचा आदर्श असणा-या मार्क झुकरबर्ग याच्या स्वप्नांची ही गोष्ट आपल्याही स्वप्न पाहण्याची जिद्द देते.

मार्क झुकरबर्ग यांची श्रीमंती, उच्च जीवनशैली, बिझनेसमधील यश यांचे दाखले दिले जात असले तरी हे मिळविण्यासाठी  त्याने केलेली धडपड, लढविलेल्या आयडिया, त्यासाठी दाखविलेली हिंमत या घटना तुमच्या विचारांना किक देऊन जातील.

सध्या एका खोलीत आणि मोजक्या भांडवलासह बिझनेससाठी धडपडणा-यांना तर हा चित्रपट म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम ठरु शकेल.

हातातील तुटपुंज्या साहित्यावर अवलंबून न राहता तुमची स्वप्न पूर्ण करा ही शिकवण चित्रपटातून मिळते आणि भारविलेला प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्याचा आग्रह धरतो हा अनुभव तुम्हाला घेता येईल

३.  पायरेट्स ऑफ सिलिकॉन व्हॅली (१९९९)

 

Pirates of Silicon Valley InMarathi

 

दोन मातब्बर उद्योजक आणि त्यांच्या कंपन्या यांच्या अफाट यशाचा प्रवास अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट पाहण्यावाचून गत्यंतर नाही. मायक्रोसॉफ्ट्सचे जनक बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स या दोघांमधील स्पर्धा अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात.

ज्यांना आपण आदर्श मानतो, त्यांच्या कंपन्या आजही तरुणांसाठी स्वप्न आहेत, अशा कंपन्या कशा सुरु झाल्या? त्यांच्यात स्पर्धा होती का? त्यात कोण जिंकलं? आज सर्वार्थाने श्रेष्ठ कोण? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला चित्रपटाअखेरसी मिळतात,  चित्रपट पाहिल्यानंतर दोन्ही उद्योगांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो.

बिझनेस माईंड असलेल्यांनी हा चित्रपट पाहिल्यास त्यांच्या उद्योगांना चालना नक्कीच मिळू शकेल.

 

४.  द पर्स्यु ऑफ हॅपिनेस (२००६)

 

pursuit of happiness inmarathi

 

पुस्तकांवर आधारित चित्रपटांच्या यादीत सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे द पर्स्यु ऑफ हॅपिनेस. हा चित्रपट पाहिला नसेल तर आताच इंटरनेटवर क्लिक करा.

Chris’s memoirs हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला अनेक पुरस्कारही मिळाले, या पुस्तकातील गोष्टीला मिळालेली पसंती लक्षात घेत चित्रपट तयार करण्याचा निर्णय झाला.

वारंवर अपयश आलं किंवा एकामागून एक सतत संकट आली तर हरल्याची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे, आपल्यापैकी प्रत्येकालाच कधीतरी हा अनुभव येतो. मात्र निराशेने ग्रासलेल्या अवस्थेतच हा चित्रपट बघाचं, कोणत्याही इतर प्रयत्नांपेक्षा काही तासांचा हा सोपा उपाय आहे.

प्रयत्न कायम ठेवल्यास तुम्हाला हवे ते मिळतेच, मात्र यश मिळण्यापूर्वीच हार मानू नका हा विचार अतिशय रंजकपद्धतीने मांडण्यात आला आहे.

 

५.  द शॉशैंक रिडम्पशन (१९९४)

 

the shawshank-hero1 InMarathi

 

नावावरून काहीसा अवघड वाटणारा हा चित्रपट अतिशय प्रेरणादायी ठरतो. तुरुंगात असलेल्या दोन मित्रांची ही गोष्ट सुरवातीला केवळ तुरुंंगातील चार भिंतींपुरती मर्यादित असली तरी प्रत्यक्षात त्यांच्या अफाट कल्पना आणि प्रयोगशीलता यांमुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होतं.

खोट्या हत्येसाठी तुरुंगात धडपडणारा हिरो कशा पद्धतीने चलाखी दाखवितो, त्यातून चित्रपटाची कथा नेमकं कोणतं वळण घेते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर चित्रपट बघा.

कोणत्याही कठीण स्थितीतीतून मार्ग कसा काढावा याचा उत्तम धडा या चित्रपटातून मिळतो.

 

६   द फॉरेस्ट गम्प्स (१९९४)

 

Forrest-gump-InMarathi

 

यशस्वी होण्यासाठी अफाट बुद्धीमत्ता अथवा असामान्य असण्याची गरज नाही हा सोपा विचार देणारा हा चित्रपट आहे.

आपल्यापैकी प्रत्येकजण हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने सेलिब्रेटींबाबत कायमच आकर्षण असतं, मात्र यशस्वी अथवा प्रसिद्ध होण्यासाठी कुणी सेलिब्रिटी बनण्याची गरज नाही, साधंसरळ आयुष्य जगूनही सेलिब्रिटी बनता येतं हा आत्मविश्वास हवा असेल तर ‘द फॉरेस्ट गम्प’ बघाचं.

एका लहानशा कुटुंबात जन्मलेला फॉरेस्ट (टॉम हॅंक्स) आपल्या प्रामाणिक प्रयत्नांच्या आधारे पिंगपॉंग खेळात इतका यशस्वी होतो, की पैसा, प्रसिद्धी, उच्च राहणीमान ही सगळी सुखं आपोआप त्याला मिळतात.

एवढ्या मर्यादेत कथेवर बेतलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर मात्र आपल्यात निर्माण होणारा आत्मविश्वास, आणि स्वतःच्या बळावर काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द अनुभविल्याशिवाय कळणार नाही.

क्रिडा, उद्योग यांसारख्या क्षेत्रात रुची असणा-यांना हा चित्रत्रपट निश्चितचं पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल.

 

७   मनीबॉल (२०११)

 

moneyball InMarathi

 

उद्योग क्षेत्रात काम करताय आणि मनीबॉल पाहिला नाही हे शक्यचं नाही. सध्या आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे खेळाडुंंची खरेदी, त्यांंसाठी लावली जाणारी बोली, वाढती स्पर्धा हे विषय आपल्यासाठी नवे नाहीत, मात्र याच विषयात पडद्यामागील स्पर्धेचा अंदाज करणेही कठीण आहे.

ऑकलॅंड अथलॅटिक्स संघ आणि त्याचा महत्वकांक्षी मॅनेजर बिली बीन यांची भेट घेतल्यानंतरचं आपल्याला जिद्द या शब्दाचा खरा अर्थ कळतो.

इतर संघांच्या तुलनेत अयशस्वी ठरणारा ऑकलॅंडड अथलॅटिक्स संघाचे अपय़श संपतचं नाही. एकीकडे आर्थिक नुकसान, दुसरीकडे पराभवाला कंटाळून इतर संघात सहभागी होणारे खेळाडू अशी अडथळ्यांची मालिका समोर असताना खरतंर  सामान्य उद्योजक निराश होईल, मात्र याचवेळी आपले वेगळेपण दाखविणारा मॅनेरजर बिली ज्या शक्कल लढवितो, ते पाहिल्यानंतर आपल्यालाही यशस्वी होता येईल यावर विश्वास बसतो.

नशीब आणि परिस्थिती सारं काही आपल्या विरोधात घडत असताना, येणारी निराशा झटकण्यासाठी मनीबॉल हा चित्रपट मार्गदर्शक ठरतो.

 

८.  द गॉडफादर (१९७२)

 

the godfather InMarathi

 

यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरणा-या चित्रपटांमध्ये गॉडफादर चित्रपटाचे नाव घेतलं नाही तर ही यादी पुर्ण होणार नाही. हॉलिवूड गाजविलेल्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर पुढे बॉलिवूडसह साहित्य क्षेत्रातही त्याचे अनेक प्रयोग झाले.

फॅमिली बिझनेस अर्थात परंपरागत सुरु असलेला व्यवसाय या क्षेत्रात तुमच्यापैकी अनेकजण काम करत असतील, मग तर तुमच्यासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल.

फॅमिली बिझनेेस सांभाळताना विरोधकांचाा सामना कसा करावा याचं शिक्षण या चित्रपटातून सहज मिळतं, कुटुंबियांच्या साथीने आपला उद्योग यशस्वी करण्याचे स्वप्न तुम्ही पहात असाल तर तुमच्या गॉडफादर सोबत हा चित्रपट जरुर बघा.

 

९.  वॉल स्ट्रिट (१९८७)

 

wall-street Inmarathi

 

शेअर मार्केटमध्ये होणारी उलथापालथ अनुभवायची असेल तर वॉल स्ट्रीट वर फेरफटका मारावा लागेल. एका तरुण स्टॉकब्रोकरची कथा चित्रपटात पाहता येतं, उद्योग क्षेत्रात वावरताना मनात कशाबद्दलही भिती असणं योग्य नाही, हा कानमंत्र चित्रपटातून मिळतो.

बेधडक, बिन्धास्त व्यवसाय करणारा हमखास यशस्वी होतो, मनात भिती ठेवून कोणतंही काम केलं तर त्याला यश मिळत नाही ही बाब प्रत्येक नव्या उद्योजकाने शिकली पाहिजे.

स्वतः चा उद्योग सुरु करताना कोणते प्रयत्न करावेत, त्यासाठी आर्थिक तजवीज कशी करावी यांसारख्या अनेक गोष्टींची शिकवण वॉल स्ट्रीट मधून मिळते.

 

१०  रॉकी (१९७६)

 

rocky inmarathi

 

उद्योग असो नोकरी.. स्पर्धेची भिती प्रत्येकालाच वाटते. या स्पर्धेत आपण हरलो तर ? याचं उत्तर हवं असेल तर किमान एकदा तरी रॉकीला भेटा. जुन्या क्लासिक्स फिल्म्सच्या यादीत रॉकीच नाव हमखास घेतलं जातं.

आपल्यापेक्षा सर्वार्थाने मातब्बर असलेल्या स्पर्धकाशी स्पर्धा करण्याची संधी रॉकीला मिळते, सर्वांकडून याला विरोध होत असतो, या स्पर्धेत रॉकी हरणार हा प्रत्येकाचा विश्वास असतो, अनेकांना त्याच्या जीवाचीही काळजी वाटते, अशा परिस्थितीत रॉकी नेमकं काय करतो, कोणती शक्कल लढवितो, यशस्वी होतो, की जीव गमावितो ही माहिती हवी असेल तर सिनेमा पहावा लागेल.

कोणत्याही प्रकारचेे संकट आलं, स्पर्धा कितीही अवघड वाटली तरी त्यात जिंकण्याचा एक मार्ग कुठेतरी निश्चित दडलेला असतो, मात्र तो शोधण्याची गरज असते, हा रॉकीचाा विचार आपल्यालाही आचरणात आणायला हरकत नाही.

 

११. जेरी मॅकगुईअर (१९९६)

 

jerrymaguire inmarathi

 

वारंवार नकार पचवावा लागला तर आपलं काय होतं, जरा विचार करा, येणारी निराशा आणि वाढणारे टेन्शन हीच उत्तरं मिळतील. मात्र या निराशेतून सकारात्मकता घेऊन यशस्वी उद्योग करण्यासाठी हा चित्रपट बघा.

उत्तम अभिनय, योग्य कथा, साधी मांडणी आणि त्यातून दिला जाणारा संदेश अशा सगळ्यांच बाजूंनी चित्रपट यशस्वी ठरलाच मात्र त्यानंतर पुढील अनेक दशके तो घराघरात पाहिला जात आहे.

१२.  स्टार्ट अप डॉट कॉम (२००१)

 

startup.com inmarathi

 

नव्वदच्या दशकातील इंटरनेटचे युग अनुभवायचे असेल तर स्टार्ट अप डॉट कॉम ही डॉक्युमेंट्री बघा.

हल्ली लहनांपासून मोठ्यांपर्यंत इंटरनेटचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. मात्र नव्वदच्या दशाकत जेंव्हा इंटरनेटचा वापर नव्याने सुरु झाला होता, तेंव्हा चित्र कसे होते, त्यातील स्टार्टअपची सुरुवात कशी झाली हे सांगणारी ही रंजक गोष्ट दीड तास आपल्याला खिळवून ठेवते.

माहितीपट असला तरी तो रटाळ न वाटता, त्यामध्ये इमोशनल ड्रामा आणि तथ्य यांची उत्तम सांगड घातली आहे, किंबुहना म्हणूनच प्रेक्षकांना ही डॉक्युमेंट्री अनेकदा पहावीशी वाटते.

 

१३.  समथिंग वेन्चर्ड (२०११)

 

something ventured inamarathi

 

उद्योग सुरु करायचाय, पण भांडवल नाही ही तक्रार हल्ली अनेकांकडून केली जाते, प्रत्येकालाच स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट असला तरी योग्य संधी मिळत नाही. अनेकदा हाती संधी असली तरी बिझनेससाठी लागणारे भांडवल कसं मिळवावं याचं उत्तर न मिळालेेल्यांसाठी माहितीपट ही खरीखुुरी संधी ठरेल.

सिलीकॉन वॅलीमधील पहिल्यावहिल्या स्टार्टअपची माहिती सांगणारा हा माहितीपट पाहिल्यानंतर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना, लक्षात येणाऱ्या संधी, अनेक प्रश्नांची मिळणारी उत्तरे यांच्या आधारे तुम्ही यशस्वी होणार याबाबत शंकाच नाही.

 

१४.  बॉयलर रुम (२०००)

 

biler room inmarathi

 

मार्केटिंग क्षेत्रात काम करणा-यांची संख्या सध्या लाखोंमध्ये आहे. आपली वस्तु अथवा एखादी कल्पना इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा चित्रपट पाहिला नााही असं होणार नाही.

सेल्समनशिप मधील कौशल्य आणि बिझनेस करताना अंगी असावी असे गुण यांची हसतखेळत शिकवण देणारा हा चित्रपट वॉल स्ट्रीट चित्रपटाच्या प्रेरणेतून तयार झाला असला तरी त्याची अनेक वैशिष्ट्य पाहून आपणही बिझनेसमन होणार असं प्रत्येकाला म्हणावसं वाटेल.

 

१५.  ऑफिस स्पेस (१९९९)

 

Office Space - 1999 inmarathi

 

ऑफिसचा कंटाळा येतो ? ९ ते ६ हे वेळापत्रक कंटाळवाणं वाटतं ? काम नकोसं झालंय ? मग तर ऑफिस स्पेस बघाच !

आपल्यापैकी प्रत्येेकालाचं ऑफिसच्या चार भिंतीतील रटाळ काम नकोसं वाटतं. कंटाळवाणं रुटीन, दररोज सकाळी येणारा ताण या सगळ्यांतून मार्ग कसा काढायचा यासाठी जरा ऑफिस स्पेसमध्ये डोकवावं लागेल.

कामाचा कंटाळा येणारा आपल्यासरख्याच नोकरदाराची ही गोष्ट पोटं धरून हसवते, मात्र हसताहसता आपण यशस्वी होण्याचा मार्ग कधी शिकलो ते तुम्हालाही कळणार नाही.

चित्रपट म्हणजे टाईमपास असं ज्यांना वाटतं त्यांनी, हे १५ चित्रपट जरुर पहा. उद्योगक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महागड्या कोचिंग क्लासपेक्षा अथवा लाखो रुपये खर्च करून मार्गदर्शकांचे सल्ले घेण्यापेक्षा रंजक पद्धतीने शिकविणारा चित्रपटांचा हा हलकाफुलका पर्याय एकदा ट्राय करुन बघाचं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?