' ३ महिने या “११” स्टेप्सवर काम कराल तर “इंग्रजी” अस्खलितपणे बोलायला लागाल – InMarathi

३ महिने या “११” स्टेप्सवर काम कराल तर “इंग्रजी” अस्खलितपणे बोलायला लागाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या काळात “इंग्रजी” या भाषेला फार महत्त्व प्राप्त झालं आहे. शाळेत, कॉलेजमध्ये किंवा अगदी सहज कोणाशीही गप्पा मारताना लोक सर्रास इंग्रजी बोलताना दिसतात. मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागला असेल किंवा मुलाखतीला जायचं असेल तर उत्तम इंग्रजी येण्यावाचून गत्यंतर नाही.

श्रीदेवीचा “English vinglish” हा चित्रपट आठवतोय? इंग्रजी येत नाही म्हणून तिचे कुटुंबीयच तिची मस्करी उडवत असतात. पण, त्या मस्करीने निराश न होता ती अस्खलित इंग्रजी शिकते. कारण, या भाषेला जगभर महत्त्व प्राप्त झालं आहे.

इंग्रजी भाषा अस्खलितपणे बोलता यावी असं बऱ्याचजणांना वाटत असतं पण, या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून करावी हे आपल्याला कळत नाही. त्यामुळेच या लेखात आम्ही अस्खलित इंग्रजी बोलण्याचे काही सोप्पे मार्ग दिले आहेत ..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –

१) रोज थोडंफार इंग्रजी बोला

 

english-InMarathi

 

कोणतीही नवीन भाषा शिकण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणते रोज ती भाषा बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे इंग्रजी शब्द येत असतील ते वाक्यांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. तोडकी-मोडकी वाक्यरचना असेल तरीही चालेल. पण, हा सराव नियमितपणे करा.

तुमच्या आजूबाजूला जे लोक इंग्रजी बोलतात त्यांच्याशी इंग्रजीमधून संवाद साधायचा प्रयत्न करा. एखाद्या माणसाला इंग्रजीमध्ये एखाद्या ठिकाणाचा पत्ता तुम्ही विचारू शकता. छोटं संभाषण सुरू करा.

“इंग्रजी आपल्याला सवयीचं होईल” तेव्हा बोलू असा दृष्टिकोन बाळगू नका. जे थोडेसे शब्द येतात, ते शब्द बोलायला सुरुवात करा. इतर लोक आपल्यावर हसतील असा विचार केलात तर तुम्ही कधीच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे स्वतःसाठी, इतरांचा विचार न करता इंग्रजी बोलायला सुरुवात करा. 

 

२) उच्चारांवर लक्ष द्या

 

Read-Loudly.Inmarathi2

 

कोणतीही भाषा बोलताना त्या भाषेतील शब्दांचे नेमके उच्चार कसे आहेत याकडे लक्ष दिले पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे इंग्रजी शब्दसंपदा असते. पण, अयोग्य उच्चारणामुळे समोरच्याला आपण काय बोलतोय हे कळत नाही.

जर, तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलायचं असेल तर, त्यासाठी शब्दांचा स्पष्ट उच्चार केला पाहिजे. यासाठी तुम्ही लहान मुलांच्या गोष्टींची [पुस्तकं आणून ती मोठयाने वाचण्याचा सराव करू शकता.

योग्य उच्चारणासाठी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. जे लोक इंग्रजी बोलतात त्यांचे उच्चार ऐकून तसेच बोलण्याचा प्रयत्न करा. पुस्तक मोठयाने वाचताना समोर अशा व्यक्तीला बसवा जिला उत्तम इंग्रजी बोलता येत असेल.

 

३) इंग्रजी चित्रपट बघा, बातम्या ऐका

 

sleeping-inmarathi16

 

तुमच्याकडे जेवढी जास्त शब्दसंपदा असेल, तेवढा तुमचा इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढेल. शब्दसंपदा वाढवण्यासाठी तुम्ही इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त वेळ घालवा. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या.

शब्दसंपदा वाढवण्यासाठी इंग्रजी बातम्या ऐकणे सुद्धा फायद्याचे ठरते. तुम्हाला चित्रपट बघण्याची आवड असेल तर तुम्ही इंग्रजी चित्रपट सुद्धा बघू शकता, इंग्रजी पुस्तकं वाचण्याची सवय करा. यातून तुम्हाला नवीन म्हणी कळतील.

इंग्रजीतले सोप्पे शब्द वापरण्याऐवजी तुम्ही काही म्हणी वापरू शकता. वाक्प्रचारांचा वापर सुद्धा समोर्च्यावर तुमची वेगळीच छाप पाडतो. यासाठी तुमचे वाचन गरजेचे आहे. “रोज किमान ५ नवीन शब्द किंवा म्हणी शिकेन” असा निर्णय करा.

 

४) इंग्रजी शिकण्याचे क्लासेस लावा

 

Gossip Inmarathi

 

हे ही वाचा –

 

आपण जागोजागी “इंग्लिश स्पीकिंग कोर्स”ची जाहिरात बघतो पण, आपण कधी जाण्याचा विचार करत नाही. घरी इंग्रजी शिकू असं आपण ठरवतो पण, इतर कारणांमुळे आपण त्याला योग्य वेळ देत नाही.

जर तुम्ही एखादा क्लास जॉइन केलात तर तुम्ही नियमितपणे तिथे जाण्याचा प्रयत्न कराल आणि त्यानिमित्ताने तुमच्या कानावर इंग्रजी शब्द पडतील. शिवाय, तिथे असणाऱ्या इतर लोकांसोबत तुम्ही न लाजता इंग्रजी बोलू शकता. तेथील शिक्षक तुम्हाला शब्दांचे योग्य उच्चारण शिकवतील. तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवा.

 

५) डिक्शनरी सोबत ठेवा

 

Oxford dictionary add new words.Inmarathi

 

इंग्रजी शिकतांना सोबत कायम एक डिक्शनरी ठेवा. प्रत्येकवेळेस डिक्शनरी नेणे शक्य नसेल तर तुम्ही फोनमध्ये सुद्धा डिक्शनरी डाउनलोड करू शकता. इंग्रजी चित्रपट बघताना किंवा कोणाशी इंग्रजी बोलताना एखादा शब्द कळला नाही तर तुम्ही लगेच डिक्शनरीमध्ये बघून त्याचा अर्थ समजून घेऊ शकता.

डिक्शनरीमुळे तुमची शब्दसंपदा पण वाढेल. प्रवासात जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असेल तेव्हा डिक्शनरी सहज वाचा. अनेक शब्दांचे अर्थ तुम्हाला समजतील.

 

६) इंग्रजी बोलणारे मित्र जमवा

 

Friendship

 

इंग्रजीत संभाषण साधण्यासाठी तुम्हाला मित्रांची गरज पडेल. बोलीभाषा नीट समजणारे आणि इंग्रजीवर सुद्धा प्रभुत्व असलेले मित्र जमवा. मित्रांना भेटल्यावर ठरवूनच इंग्रजीत बोला.

तुम्ही एखादा विषय रोज ठरवून घेऊ शकता. त्याची तयारी करून इतरांसमोर तो विषय मांडा. चारचौघात इंग्रजी बोलल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

 

७) डोळ्यांपुढे ध्येय ठेवा

 

goals inmarathi

 

एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्या डोळ्यांपुढे ध्येय असण्याची गरज असते. जर, कोणतंच ध्येय डोळ्यांपुढे नसेल तर आपण त्या दिशेने वाटचाल करत नाही. त्यामुळे, इंग्रजी शिकण्याची सुरुवात तुम्ही का केली होतीत हे ध्यानात ठेवा.

ही सगळी कारणं एका कागदावर लिहून काढा आणि तो कागद कायम डोळ्यांसमोर राहू द्या. त्यातूनच तुम्हाला ते ध्येय पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल.

 

८) रोजनिशी लिहा

 

diarywriting

 

रोजनिशी लिहिणं ही एक उत्तम सवय आहे. स्वतःला शिस्त लावण्यासाठी ही सवय खूप उपयोगाची आहे. त्यामुळे, रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही रोजनिशी लिहा.

आता, महत्त्वाचा मुद्दा असा की, इंग्रजी उत्तम येण्यासाठी बोलण्यासोबतच लिखाणावर सुद्धा भर हवा. यासाठी, रोजनिशी इंग्रजीतून लिहा. सुरुवातीला तुम्हाला शब्द सुचणार नाहीत. अनेक अडथळे येतील. एखादा शब्द सुचला नाही तर डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधा.

सुरुवातीला छोटी छोटी वाक्य लिहा. दिवसभरात आपण काय नवीन शिकलो याची यादी तयार करा.

 

९) इंग्रजीत विचार करा

 

change the way of thinking Inmarathi

 

इंग्रजी अस्खलितपणे बोलायचं असेल तर त्याआधी मेंदुने त्याच भाषेत विचार करणं गरजेचं आहे. आपण अनेकदा आपल्या बोलीभाषेत विचार करतो आणि त्यानंतर त्या शब्दांच भाषांतर इंग्रजीत करतो. यामध्ये बरीच ऊर्जा आणि वेळ वाया जातो.

प्रत्येक भाषा वेगळी असल्यामुळे काही काही शब्दांच नीट भाषांतर होत नाही. त्यामुळे, भाषांतर न करता तुम्ही, इंग्रजीमध्ये विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. असं केल्याने लिहिण्यात आणि बोलण्यातही अस्खलितपणा येईल.

 

१०) चुकांमधून शिका

 

mistake inmarathi 1

 

इतरांच्या भीतीने आपण इंग्रजी बोलतच नाही. “बोलताना काही चूक झाली तर सगळे माझ्यावर हसतील” असाच विचार आपण कायम करत असतो. हाच नकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला तर आपण कधीच उत्तम इंग्रजी शिकू शकत नाही. त्यामुळे, चुकलं तरीही चालेल पण, प्रयत्न सोडू नका.

चूक झाली तर रडत बसण्यापेक्षा त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.

 

११) वाचाल तर शिकाल 

 

Reading-inmarathi

 

नवीन भाषा शिकताना ती भाषा सतत आपल्या डोळ्यांसमोर राहणं गरजेचं आहे. त्यामुळे, इंग्रजी शिकताना तुम्ही जेवढी पुस्तकं वाचाल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल.

सुरुवातीला एकडूम कठीण भाषा असलेलं पुस्तक हातात घेऊ नका. तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयाबद्दल लिहिलेलं सोप्पं पुस्तक वाचायला सुरुवात करा. ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे इंग्रजीत लिहून काढा.

इंग्रजी शिकण्याचे हे अगदी साधे मार्ग असले तरीसुद्धा यामध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, नियमितपणे या मार्गांचा अवलंब करा आणि अस्खलित इंग्रजी बोला.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?