' उत्तम आरोग्याची मूलभूत गरज असणारी “शांत झोप” लागण्यासाठी या ९ गोष्टी करा…! – InMarathi

उत्तम आरोग्याची मूलभूत गरज असणारी “शांत झोप” लागण्यासाठी या ९ गोष्टी करा…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“शांत झोप” ही उत्तम आरोग्याची गरज आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. शरीराने आणि मनाने फ्रेश राहायचं असेल तर विश्रांतीची गरज ही लागतेच. तंदुरुस्त राहण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणंसुद्धा आवश्यक आहे. शांत झोपेमुळे मरगळ, आळस निघून जातो. पण, झोप पुरेशी झाली नाही तर मात्र त्रास होतो.

असं म्हणतात की, ज्या माणसाला रात्री फार विचार मनात न येता शांत झोप लागते तोच खरा सुखी माणूस असतो. पण, आपण आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येतं की आजकाल कोणालाच हे सुख फारसं उपभोगता येत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताण.

फार पूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या. पण, आता वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी माणसाला स्वतःच्या झोपेचं सुद्धा बलिदान द्यावं लागतंय.  तसं बघायला गेलं तर झोप कोणाला आवडत नाही? दिवसभर काम केल्यानंतर रात्री शांत झोप लागावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

पण, अनेकांच्या नशिबात ही शांत झोप नसते. अनेक औषधं-गोळ्या घेऊनसुद्धा शांत झोप लागत नाही. अशावेळेस काय करावं? हा प्रश्न पडतो. तुम्हाला सुद्धा शांत झोप लागत नसेल तर काही सोप्या गोष्टी पाळून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

 

१) उठण्याची वेळ सारखी ठेवा

 

सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपण्याची आपल्याला सवय असते. थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा सकाळी लवकर उठावसं वाटत नाही. अशावेळेस आपण आपली उठण्याची वेळ बदलतो आणि जास्त वेळ झोपतो.

पण जर तुम्हाला निद्रनाशाचा त्रास असेल किंवा शांत झोप लागत नसेल तर, कधीही उठण्याची सवय तुम्हाला घातक ठरू शकते. त्यामुळे, शरीराला सवय लावण्यासाठी रोज एक निश्चित वेळ ठरवून, त्याच वेळेस उठण्याचा प्रयत्न करा.

 

alarm-clock-inmarathi01
veja.abril.com.br

 

२) रोज व्यायाम करा

 

exercises Inmarathi
GoMama247

 

“मी रोज व्यायाम करेन” असं आपण उत्साहाने ठरवतो पण, काही दिवसांनी आपण व्यायाम करणं सोडून देतो. रोज व्यायाम केल्याने झोपेचे गणित बिघडत नाही आणि शांत झोप लागण्यास मदत होते. 

परंतु, व्यायामाच्या वेळा सुद्धा ठरलेल्या हव्यात. अयोग्य वेळी व्यायाम करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, झोपण्याच्या आधी कधीच व्यायाम करू नका. झोपण्याच्या तीन तास अगोदर व्यायाम केला तर चालेल.

 

३) ताण कमी करा

 

stress inmarathi

 

शांत झोप न लागण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे “मानसिक ताण”. सध्याची जीवनशैली इतकी धावपळीची आहे की आपण नकळत अनेक छोट्या गोष्टींचा ताण  घेतो. ताण कमी करण्यासाठी तुम्ही एखादा छंद जोपासू शकता.

मनावरील हा ताण कमी करण्यासाठी योगसाधनेचा अवलंब होऊ शकतो. याशिवाय, वेगवेगळ्या थेरपी सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. मनावरील ताण हलका झाला तरच शांत झोप लागेल.

 

४) झोपण्यापूर्वी चहा, कॉफी पिऊ नका

 

tea-coffee1-inmarathi
nuffoodsspectrum.in

 

अनेक जणांना रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. ही अतिशय चुकीची सवय आहे. रात्री कॅफेन शरीरात गेल्याने शांत झोप लागत नाही.

कॅफेनमुळे मेंदू सतर्क राहतो आणि शांत झोप मिळण्यात अडथळे निर्माण होतात. या सवयीमुळे सात तास झोपूनसुद्धा काहीच झोप झाली नाही असं वाटतं. रात्री मद्यपान करणे सुद्धा शांत झोपेला मारक आहे.

झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नका.

 

५) फार उशिरापर्यंत टीव्ही बघू नका

 

TV-Remote-inmarathi02
google.com

 

रात्री थकूनभागून घरी आल्यानंतर अनेकांना झोप येत असूनही टीव्ही बघणीची सवय असते. पण, ही सवय झोपेसाठी योग्य नाही. टीव्हीला इडियट बॉक्स म्हटलं जातं ते काही उगाच नाही.

बेडरूममध्ये टीव्ही नसलेलाच बरा आहे. त्यामुळे झोपेवर लक्ष केंद्रित होत नाही. त्यामुळे झोपायची वेळ निश्चित करून त्या वेळेत सगळ्या इतर गोष्टी बंदच ठेवा.

 

६) दिवसा कमी झोपा

 

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

 

अनेकदा रात्रीची अपुरी झोप भरून काढण्यासाठी आपण दिवसा झोपतो. यामुळे रात्री झोप लागत नाही. हे चक्र सतत चालूच राहते. दुपारी जास्त वेळ वामकुक्षी घेतल्यास आळस वाढतो आणि संपूर्ण दिनक्रम विस्कळीत होतो.

त्यामुळे, दिवसा अर्ध्यातासापेक्षा जास्त झोप घेऊ नये. दिवसा जास्त झोप घेतल्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो.

 

७) आजूबाजूचे वातावरण शांत असेल याची काळजी घ्या

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza01

 

शांत झोपेसाठी शांतता सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे, झोपण्यापूर्वी खोलीत योग्य अंधार करा. तुमचा मोबाईलफोन बंद करा. आजूबाजूला खूप गोंधळ असेल तर तुम्ही शांतपणे झोपू शकणार नाही.

तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल तर त्याला दुसऱ्या खोलीत झोपवा म्हणजे त्याच्या आवाजाने तुमची झोपमोड होणार नाही.

 

८) मोबाइल बंद ठेवा

 

sleeping-inmarathi03
medium.com

 

बऱ्याचदा आपल्याला झोप येत असते पण, मोबाईलवर चॅट करण्याच्या नादात आपण झोपेची वेळ चुकवतो. रोजच्या झोपेची वेळ ही एकच असणे गरजेचे आहे. जर तुम्ही ती वेळ चुकवलीत तर तुम्हाला शांत झोप येणार नाही.

रात्री झोपण्याआधी मोबाईल बघण्याची सवय लोकांना असते. मोबाईलच्या नादात खूप वेळ निघून जातो आणि अनेकदा बारा वाजून जातात पण, आपल्या लक्षात येत नाही. म्हणूनच, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल न बघितलेलाच बरा.

 

९) कामं वेळेत संपवण्याचा प्रयत्न करा

 

hbr.org

 

ही गोष्ट अवघड वाटू शकते पण, शक्यतो झोपेच्या दोन तास आधी तरी तुमची सगळी कामं संपवण्याचा प्रयत्न करा. रात्री उशिरापर्यंत जागून लॅपटॉपसमोर बसून काम करू नका.

सकाळी उठल्यावर दिवसभरात कोणती कामं करायची आहेत याची एक यादी करा आणि ते लिहून काढा. झोपण्यापूर्वी त्यातली कोणती कामं झाली, कोणती नाही याचीही यादी तयार करा. झोपण्यापूर्वी आपली बहुतांश कामं संपली असतील तर मेंदू निश्चिंत असतो आणि आपण शांतपणे झोपू शकतो.

एक गोष्ट लक्षात घ्या, शांत झोप ही गोष्ट आपल्या हातात आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त सकारात्मक विचार करून आणि मनावरील ताण हलका करून आपण शांत झोपू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?