Site icon InMarathi

श्रीमंत व्हायचंय, पण कसं? जाणून घ्या.. श्रीमंतांच्या “या” १५ सिक्रेट सवयींमधून…!

two thousand inmarathi

the financial express

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“पैसा म्हणजेच सगळे काही नव्हे!”, “मी पैश्यांच्या मागे लागत नाही”,”मनी कान्ट बाय हॅपीनेस”…. आपल्याला पूर्वापार हीच वाक्ये शिकवण्यात आली आहेत. पण, ही वाक्ये  पुस्तकातच शोभून दिसतात. खऱ्या क्रूर जगात मात्र वेगळंच चित्र दिसतं. आजच्या जगात पैसा नाही तर काही नाही अशीच परिस्थिती दिसते.

त्यामुळे “मनी कान्ट बाय हॅपिनेस , बट इट्स बेटर टु क्राय इन या फेरारी दॅन ऑन अ बायसिकल” किंवा “दोझ हू टेल मनी कान्ट बाय हॅपिनेस आर यूझिंग देअर मनी रॉंग” ह्यावर विश्वास ठेवावासा वाटतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कारण,  आताच्या जगात “दाम करी काम”अशीच परिस्थिती आहे. म्हणून जो तो श्रीमंत होण्याची स्वप्ने बघतो. प्रत्येकाच्याच नशिबी काही जन्मापासून चांदीचा चमचा नसतो. त्यामुळे जे आहे त्यातून कसा मार्ग काढायचा आणि श्रीमंत व्हायचे ह्यावर प्रत्येकालाच उपाय हवा असतो.

पैसा कमावण्याबरोबरच तुम्ही तो कसा गुंतवता आणि कसा खर्च करता हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. विज्ञानाने सुद्धा असे सिद्ध केले आहे की, आपली वागणूक, आपले विचार बऱ्याच अंशी आपल्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असतात.

श्रीमंती म्हणजे केवळ भरमसाठ पैसा नव्हे. श्रीमंती ही आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे. श्रीमंत लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचा जात्याच श्रीमंती टिकवून ठेवण्याकडे कल असतो. आयुष्य सोपे करण्याचा ते प्रयत्न करतात आणि जी गोष्ट त्यांना हवी असेल त्या गोष्टीसाठी आपण लायक आहोत अशी त्यांची विचारसरणी असते.

सामान्य लोक एखादी गोष्ट आपल्या लायकीच्या बाहेरची आहे असा विचार करून बऱ्याचदा आपल्या इच्छा पूर्ण करण्यापासून थांबतात. पण श्रीमंत लोक असा विचार कधीच करत नाहीत. ते कायम सकारात्मक विचार करतात.  एखाद्या गोष्टीसाठी आपण लायक नाही असा विचार त्यांच्या मनात येत नाही.

श्रीमंत आणि सामान्य लोकांच्या सवयींमध्ये बराच फरक असतो. जाणून घ्या, श्रीमंत लोकांच्या काही सिक्रेट सवयी, ज्यामुळे त्यांची श्रीमंती टिकून राहते आणि आणखी वाढते…

१. ते स्वतःला कमी लेखत नाहीत

 

 

श्रीमंत लोक असाच विचार करतात की, त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळावं. त्यांना जे हवं असेल ते मिळवण्याचा ते स्वतः प्रयत्न करतात. दुसऱ्याच्या परवानगीची वाट बघत बसत नाहीत. स्वतःला त्यासाठी लायक समजून ती गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वतःच्या मनाला हिरवा कंदील देतात.

ऑफिसमध्ये सुद्धा बॉसने त्यांना संधी देण्याची वाट बघत नाहीत. त्यांच्याकडे जर एखादे खास स्किल असेल तर ते आपण काय करू शकतो हे बॉसला स्वतःहून सांगतात. आपण मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यास लायक आहोत हे दाखवून देतात आणि चांगली संधी मिळवतात.

खाजगी आयुष्यात सुद्धा आपण कुठली गोष्ट करू शकत नाही असा विचार करून मागे राहण्यापेक्षा , ‘मी हे करू शकतो किंवा मी हे करण्यास लायक आहे’ असाच विचार ते करतात.

२. आजूबाजूच्या परिस्थितीचे उत्तम ज्ञान बाळगणे

 

 

श्रीमंत लोक पैश्याबद्दल बोलत नाहीत ही एक अफवा आहे. श्रीमंत लोक पैश्यांबाबत चर्चा करतात पण ती चर्चा ते फक्त आपापसांतच करतात. त्या लोकांना गुंतवणुकीचे विविध पर्याय, बचतीचे पर्याय म्हणजेच एकूण आर्थिक विषयातले अद्ययावत ज्ञान असते. ही सगळी माहिती ते वेळोवेळी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज लोक, त्यांचे गुरु आणि त्यांच्या वकिलांकडून घेत असतात आणि स्वतःला अपडेटेड ठेवत असतात.

सामान्य माणसाने सुद्धा गुंतवणुकीचे चांगले अद्ययावत पर्याय माहित करून घेतले पाहिजे. अकाउंटंट, फायनान्शियल ऍडव्हायजर ह्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. ऑनलाईन रिसर्च करून स्वतःच्या ज्ञानात वेळोवेळी भर घातली पाहिजे म्हणजे योग्य ते निर्णय घेतले जातील.

३. ज्यातली माहिती नसेल त्यात दुसऱ्याची मदत घेणे

 

 

श्रीमंत लोकांच्या आजूबाजूला बरेच सल्लागार असतात. अकाउंटंट, वकील, इस्टेट मॅनेजर असे बऱ्याच क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांच्या आजूबाजूला असतात. त्यामुळे त्यांची आर्थिक गणिते सहसा चुकत नाहीत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याकडे माणसे असतात.

ज्या गोष्टीतील माहिती नाही त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला मागेपुढे बघत नाहीत. सामान्य माणसाने मदत घेण्यास मागेपुढे बघू नये. मिळेल तिथून रिसर्च करत राहायला हवे. कुठे गुंतवणूक करावी, घर कुठे घ्यावे, कर कसा वाचवता येईल, बजेट कसे बनवावे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे.

४. वेळेचे महत्त्व जाणून घेणे

 

 

श्रीमंत लोक त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंदाचा हिशोब ठेवतात कारण ते वेळेचे महत्त्व जाणतात. त्यांचा वेळ पैश्यापेक्षाही बहुमोल आहे हे ते जाणून त्याप्रमाणे वागतात. स्वतःला फायदा होईल असाच त्यांचा वेळ घालवतात.

सामान्य माणसाने सुद्धा वेळेचा सदुपयोग करून आपला फायदा होईल तिथेच वेळ घालवला पाहिजे. रिकामा वेळ असल्यास तो काहीतरी नवीन शिकण्यात, योग्य त्या कामासाठी किंवा योग्य त्या संगतीत घालवला पाहिजे.

५. सुरुवातीपासून पैसे साठवणे आणि गुंतवणूक करणे

 

 

तुम्ही तरुणपणीच पैसे कमावणे सुरु केले तर तुमच्याकडे तुमचा पैसा वाढवण्यासाठी भरपूर वेळ असतो. आत्ता योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर पुढे जाऊन हाच पैसा वाढणार आहे हे ध्यानात ठेवून कमी वयापासूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सुरु केले पाहिजे.

आता तुम्ही एक रुपया गुंतवलात तर हळू हळू त्या एका रुपयाचे दहा रुपये होतील आणि नंतर त्याचेच शंभर होतील. त्यामुळे आज एक रुपया का होईना पण योग्य ठिकाणी गुंतवण्याचा शहाणपणा श्रीमंत लोक करतात.म्हणूनच, काही काळात त्यांच्याकडे एकाचे दहा आणि दहाचे शंभर रुपये साठतात.

६. श्रीमंत लोकांना केव्हा आऊटसोर्सिंग करायचे हे माहिती असते

 

 

श्रीमंत लोक वेळेला महत्त्व देतात. सगळी कामं आपणच केली पाहिजेत हा अट्टाहास ते करत नाहीत. त्यांच्या प्रायोरीटीज ठरलेल्या असतात. त्यामुळे ते कुठल्या कामात आपला बहुमूल्य वेळ घालवायचा हे ठरवतात. इतर कमी महत्त्वाची कामे किंवा जी कामे दुसरा करू शकेल त्यासाठी ते त्यांचा स्वतःचा महत्वाचा वेळ घालवत नाहीत.

सामान्य माणसाने सुद्धा स्वतःच सगळी कामे करण्याचा अट्टाहास करू नये. तुमचा बहुमूल्य वेळ तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवला, ज्यात तुमचा फायदा होणार आहे तर त्यात काही गैर नाही.

बायकांनी तर हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. सगळी कामे आपल्याच अंगावर ओढवून घेऊन आपण महत्त्वाचा वेळ वाया घालवतो. त्यापेक्षा तो वेळ तुमच्या  कामात गुंतवलात तर खूप फायदा होऊ शकेल.

७. सतत नवे काहीतरी शिकत राहणे

 

 

श्रीमंत लोक कधीही नव्या गोष्टी शिकणे सोडत नाहीत. ते सतत स्वतःला अपडेट ठेवतात. नव्या गोष्टी शिकतात.जगाच्या बरोबर चालत राहतात.

श्रीमंत लोक स्वतःची वैयक्तिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्याचा तसेच बौद्धिक विकास करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांची प्रगती कधीच थांबत नाही.

८. आरोग्याची काळजी घेणे

 

 

श्रीमंत लोक कधीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत. ते कायम त्यांचे शरीर आणि मन तंदुरुस्त कसे राहील ह्याची काळजी घेतात. योग्य आहार,विहार, व्यायाम आणि मन:शांती ह्याची ते काळजी घेतात.

“हेल्थ इज वेल्थ” हे गणित त्यांना चांगले समजते. तुमचे शरीर आणि मन निरोगी असेल तरच तुम्ही कष्ट करून स्वतःची प्रगती करू शकता.

९. टीव्ही बघण्यात वेळ वाया न घालवणे

 

 

श्रीमंत लोकांकडे रिकामा वेळ जरी असला तरी ते तो वेळ इडियट बॉक्सपुढे वाया घालवत नाहीत. जितका वेळ टीव्ही पुढे घालवाल तितके तुम्ही प्रगतीपासून लांब जाता हे सत्य आहे.

टीव्ही बघून आजवर कुणाचाही फायदा झालेला नाही. मनोरंजनात किती वेळ वाया घालवायचा आणि कुठल्या दर्जाचे मनोरंजन करायचे हे आपल्या हातात असते. श्रीमंत लोक त्यांचा हाच वेळ कुठल्यातरी विधायक कामासाठी घालवतात आणि प्रगतीकडे वाटचाल करतात.

१०. खर्च कमी होणार नाहीत, मिळकत वाढवा

 

 

श्रीमंत लोक कधीही खर्च कमी व्हावा असा प्रयत्न करीत नाहीत. उलट ते त्यांची मिळकत कशी वाढती राहील ह्यासाठी प्रयत्न करतात. सामान्य माणूस कायम कुठे बचत करता येईल हे बघत असतो आणि श्रीमंत माणूस कुठल्या कुठल्या वाटांनी पैसा येईल हे शोधत असतो.

खर्च कमी होणे कठीण आहे. पण माणूस मिळकत वाढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो.

११. बिझनेसमध्ये आणि ऍसेट्समध्ये गुंतवणूक

 

 

सर्वसामान्य माणूस त्याचे कष्टाचे पैसे कुठे घालवतो? मोठा महागडा टीव्ही घेण्यात, मोठे घर घेण्यात, मोठी गाडी घेण्यात.. ! पण श्रीमंत माणूस त्याचे पैसे परत त्याच्याच बिझनेसमध्ये गुंतवतो. स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो किंवा इन्कम प्रॉपर्टीमध्ये गुंतवतो.

पैश्याकडेच पैसा खेचला जातो. म्हणून तुमचा पैसा चुंबकासारखा पैसा कसा खेचून घेईल ह्याचा विचार करायला हवा.

१२. वेळेसाठी नव्हे कामासाठी मानधन घेणे

 

 

सामान्य माणसाला प्रत्येक तासाचे पैसे मिळतात. पण श्रीमंत लोक त्यांच्या वेळेसाठी नाही तर त्यांच्या कामासाठी मानधन घेतात. त्यामुळे त्यांच्या कामाची किंमत इतरांना असते.

१३. रिस्क घेण्यास न घाबरणे

 

 

सामान्य माणूस कायम सेफ गेम खेळायला बघतो. आपली सुरक्षितता बघून निर्णय घेतो. सगळीकडे खुंटी बळकट करून मगच पाऊल पुढे टाकतो. पण श्रीमंत माणसे मात्र रिस्क घेण्यास घाबरत नाहीत. ते अपयशाला सुद्धा घाबरत नाहीत.

रिस्क घेतल्याशिवाय माणूस यश मिळवू शकत नाही. ते चुका करतात पण त्यातून शिकतात आणि पुढे जातात. म्हणूनच त्यांना यश आणि पैसा दोन्हीही मिळतो.

१४. श्रीमंत माणूस दुसऱ्यावर दोष ढकलत नाही

 

 

सर्वसामान्य माणसाची ही मानसिकता असते की अपयश आले की त्याचा दोष दुसऱ्यावर ढकलायचा.. ! पण,  श्रीमंत माणसे मात्र अपयश आल्यास दुसऱ्यावर दोषारोप न करता स्वतःची कुठे चूक झाली हे शोधून काढतात. ते ब्लेम गेम खेळण्यात त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत. उलट चुका सुधारून ते पुढे जातात.

१५. दुसऱ्याच्या यशाचा अभ्यास करतात

 

 

श्रीमंत लोक यशस्वी लोकांच्या कारकिर्दीचा अभ्यास करतात. त्यांनी कसे यश मिळवले, कसे कष्ट केले , कुठल्या आव्हानांतून कसा मार्ग काढला आणि स्वतःची प्रगती केली हे सगळे ते जाणून घेतात. ते इतर यशस्वी लोकांबरोबर मैत्री करतात आणि दुसऱ्यांच्या उदाहरणातून स्वतः शिकतात.

श्रीमंत लोक ह्या गोष्टी करतात आणि स्वतःचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावतात. सामान्य माणसाने सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास त्यांचीही आर्थिक प्रगती नक्कीच होऊ शकेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version