बिल गेट्सच्या यशामागे असलेल्या या ९ गोष्टी सामान्य लोकांमध्ये अभावानेच आढळतात..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘बिल गेट्स’ यांचं नाव ऐकलं नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. त्यांनी मिळवलेल्या यशामागे अनेक गोष्टी आहेत. पण, त्यांच्यामध्ये काही दुर्मिळ गुणविशेष आहेत. सामान्य व्यक्तींमध्ये या गोष्टी क्वचितच आढळतील.
यशप्राप्ती ही काही सोपी गोष्ट नाही. ती साधना आहे. ज्या व्यक्ती आज आपल्याला यशाच्या शिखरावर दिसतात त्यांनी अनेक वर्ष खडतर तपश्चर्या केलेली असते. जाणून घेऊया, बिल गेट्सच्या डोळे दिपवणाऱ्या यशामागे नक्की कोणत्या गोष्टी आहेत ..
१) लवकरात लवकर प्रयत्न सुरु करण्याची वृत्ती
आपण स्वप्न पाहतो, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवातच करत नाही. जेवढी लवकर तुम्ही सुरुवात कराल, तेवढ्या लवकर यश प्राप्त होईल. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न केले तर लोकांच्या नकारात्मक किंवा सकारात्मक प्रतिक्रियांचे नावीन्य राहत नाही.
बऱ्याचदा लोकांच्या बोलण्यामुळे आपले मानसिक खच्चीकरण होते. जर अगदी लहानपणापासूनच आपण आपल्या कामाची सुरुवात केली, तर लोकांच्या प्रतिक्रियांची भीती राहत नाही. बिल गेट्स यांनी वयाच्या तेराव्या वर्षी कॉम्प्युटरशी मैत्री केली होती.
२) लोकांशी मैत्री करण्याची कला
बिल गेट्स यांना लोकांशी पटकन मैत्री करण्याची सवय आहे. अनेक दिग्गज मंडळींसोबत त्यांनी मैत्री केली होती. या मैत्रीतून त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक यशस्वी उद्योजकांच्या सानिध्यात राहून त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या.
आपल्या पुढील आयुष्यात, आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्या आजूबाजूची मंडळी खूप महत्त्वाची असतात. त्यांचा नकळतपणे आपल्यावर प्रभाव असतो. त्यामुळे कायम माणसं जोडत, नाती जपत ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे.
३) शाळेव्यतिरिक्त बाह्य शिक्षण जास्त महत्त्वाचे
बिल गेट्स यांचे कुटुंब सुद्धा शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते. हावर्डमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर त्यांनी त्यांचा वेळ कॉम्प्युटर्समध्ये अधिक घालवला आणि दुसऱ्या वर्षी त्यांच्या मित्रासोबत कंपनी सुरु करण्याच्या निमित्ताने ते बाहेर पडले. तिथून त्यांचे खरे शिक्षण सुरु झाले. फक्त अभ्यास करून यश मिळत नाही.
तात्पर्य असे की, फक्त शाळा किंवा कॉलेजमध्ये मिळते तेच शिक्षण नसते. खऱ्या आयुष्यात तुमच्यातील कलागुणांचा जास्त कस लागतो.
===
हे ही वाचा – बिल गेट्स यांना काय आवडतं- ‘अँड्रॉइड की आयफोन?’ त्यांचं उत्तर वाचण्यासारखं आहे
===
४) चुकांमधून शिकण्याची वृत्ती
स्वतःच्या चुकांसाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या चुकांना आपण स्वतः कारणीभूत असतो. त्यामुळे इतरांवर त्याचं खापर फोडण्यापेक्षा तुम्ही त्या चुकांमधून शिकण्याची सवय स्वतःला लावून घ्या.
चूक ही शिकण्यासाठीच असते. कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं हे माणूस चुकांमधूनच शिकतो.
५) स्वतःविषयी अभिमान बाळगणे
इतरांकडे बघून आपण अनेकदा निराश होतो. आपण त्यांच्यासारखे हुशार, कर्तबगार नाही याची खंत बाळगून जगतो. पण, इथे एक गोष्ट लकष्ट घ्यायला हवी ती म्हणजे, प्रत्येकजण वेगळा असतो. कदाचित तुमच्याकडे अशी एखादी कला असेल जी इतरांकडे नाहीये. ती शोधून तुम्ही यशस्वी होऊ शकता.
जर तुम्ही स्वतःविषयी अभिमान बाळगलात तरच तुम्ही आत्मविश्वासाने गोष्टी करू शकता. कधीच स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका.
६) कायम नम्रपणे वागणे
यशाबरोबर येणाऱ्या इतर गोष्टी प्रत्येकालाच हव्या असतात. पण, त्या गोष्टींचा गर्व होऊ न देणे महत्त्वाचे आहे. एखाद्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर असाल तर दुसऱ्या दिवशी खाली असू शकता. या सगळ्या गोष्टी अनिश्चित असतात.
त्यामुळे आपण गर्व न बाळगता सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणे श्रेयस्कर ठरते. कोणत्याही परिस्थितीत नम्रपणे वागणे आणि ज्या लोकांनी या प्रवासात मदत केली त्यांना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
===
हे ही वाचा – आपली कन्या इजिप्शियन मुस्लिमाशी लग्न करणार हे कळताच बिल गेट्स म्हणाले…
===
७) सकारात्मक विचार आणि नवीन शिकण्याची आवड
अनेकदा आपण केलेल्या कामावर टीका केली जाते. या टीकेमुळे आपण निराश होतो. काम सोडून द्यायचा विचार करतो. पण, त्याऐवजी जर तुम्ही त्या टीकेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याची नक्कीच मदत होऊ शकते.
एकाच गोष्टीवर अडून राहू नका. सतत नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
निराशेने हरून जाण्यापेक्षा त्या टीकेमागची कारणं शोधून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.
८) यशाची वाटणी करणे
एखादा छोटा उद्योग सुरू केल्यानंतर कोणत्या अडचणी येतात याची तुम्हाला कल्पना असेल तर तो संघर्ष इतरांना सांगा. ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत मदत केली आहे अशा सगळ्या लोकांना तुमच्या यशात सहभागी करून घ्या.
तुमच्याकडे असलेलं ज्ञान हे स्वतः पुरतं मर्यादित ठेऊ नका.
९) संयमी राहणे
यश हे सहज मिळणारे नसते. अनेकदा कठोर मेहनत घेऊनसुद्धा यश मिळत नाही. अशावेळेस संयम बाळगणे गरजेचे आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही ‘शॉर्ट कट’ नसतो. जेव्हा आपल्या मार्गात अडथळे येतात तेव्हा संयम ठेऊन त्यांना दूर करणे महत्त्वाचे ठरते.
===
हे ही वाचा – यशस्वी लोकांमध्ये हमखास आढळतात या सवयी, तुमच्यात यापैकी किती आहेत?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.